' ठोकळे '
ठोकळे, ठोकळ्यांचा समूह, मग आख्खा एक ठोकळा
किंवा
आख्खा ठोकळा, ठोकळ्यांचा समूह आणि किरकोळ ठोकळे : एकूण एकच.
लाल ठोकळ्यातून उतरलास की काळापिवळा थांबव
शंभरची पत्ती दाखव
दिली नाहीस तर तो भाव खाणार
रिंकाम्या खिशाने बोंबलत पुढे जाणार
एरवी दहावीसचा धंदा ; पण आता नाही, तर कधी कमावणार ?
उजवीकडे मोठे भुयार
मग भुयारात भुयार !
आणि
मग तिथे ठोकळेच ठोकळे, ठोकळ्यात ठोकळे
काळे ठोकळे , पांढरे ठोकळे , खाकी ठोकळे ,
मळकट,कळकट, ठिसूळ आणि बळकट
लहान, मोठे, उंच आणि बुटके ; गब्बर आणि फाटके ठोकळे
एकदाचे तुझे भुयार शोध
सापडले ?