लेखकरघु सावंतयांनी शनिवार, 21/01/2012 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
" यक्ष प्रश्न "
अश्याच एका सुंदर संध्याकाळी
एकटाच होतो पण तू नव्हतीस
तुझ्या आठवणींची एक एक गाठ
उसवत चाललो होतो एकटाच
पाखरं आपल्या घराकडे येत होती
वाराही गारवा देत जात होता पुर्वीसारखाच
मनात तुझ्या आठवनींच काहुर पण दैव
या आठवनींना एकटेपणाची झालर
रोजच्या वळणावरच होतो मी उभ
लेखकविदेशयांनी गुरुवार, 19/01/2012 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे शोधू तुला एकटीला
किती शोधू तुला एकटीला
तुझा विरह असह्य होतोय
तुझ्याविना चडफडतोय !
येताजाता बाहेर फिरायला
कामाला आणि उंडारायला
तुझी साथ असायची !
लांब जवळ गेलो तरी
तू बरोबरच असायची !
दारापासून कार्यालयापर्यंत-
मंदिरापासून मद्यालयापर्यंत
तुझ्याविना बाहेर पडायला
लाज वाटते मला ,
तुझ्याशिवाय बाहेर जायला
तोंड नाही मला ,
'प्रिये'च म्
लेखकअन्नूयांनी गुरुवार, 19/01/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी ला असताना आंम्हाला फकीरराव शिंदे यांची 'आई' ही कविता होती. शाळेत असताना आमच्या सर्वात जास्त आवडत्या कवितांमधीलच ही एक कविता! फ.मु. शिंदेंनी आपल्या प्रभावि अन् नेमक्या शब्दांत आई या शब्दाचा व्यापक अर्थ पटवुन दिला होता. तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा होता.
अशीच एक 'आई' या शिर्षकाची कविता याअगोदरच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये होती, काळाच्या ओघाने ती विस्मरणात गेली होती, पण फ.मु. च्या कवितेने- त्या कवितेची आठवण पुन्हा ताजी केली. 'यशवंत' यांची होती ती कविता! फ.मु.ची कविता जेथे हृदयस्पर्शी होती तिथेच यशवंत यांची कविता मनाच्या खोल गर्तेत सलणारी, हृदयाला चटका देणारी होती.
लेखकपाषाणभेदयांनी गुरुवार, 19/01/2012 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी माघाची
थंडी पडलीया माघाची
राया माघाची
घाई करा तुमी येण्याची ||धृ||
लवकर या हो
जवळ घ्या हो
जरातरी फिकीर करा वेळेची ||
नका नका आसं करू नका
जिव माझा फुका जाळू नका
एकटेच का दुर र्हाता तिथं
पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची ||
थंडीनं जिव केला येडापिसा
उन उन उबेला जवळी बसा
हातावर हात आन पायावर पाय
पहा चोळून राहिलेय मी केव्हाची ||
कालचा दिस आठवा ना
रुसवा गोडीनं मिटवा ना
आणलय काय दावून जरा
मुठ उघडा हाताची ||
- पाभे
लेखकविदेशयांनी बुधवार, 18/01/2012 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या ह्या ऋतूत
तुम्हाला हवे म्हणून-
माझ्याजवळचे
पाने फुले फळे आणि फांद्याचे
सर्वस्व देण्यासाठी-
मला जगावेच लागेल !
दु:खाच्या त्या ऋतूत
तुम्हाला हवे म्हणून-
कुणाच्या तरी
जगण्यासाठी
चुलीत जळण्यासाठी-
कुणाच्या तरी
मरणानंतर
चिता जाळण्यासाठी-
माझे अचेतन खोड
मला जपावेच लागेल !
लेखकमनिषयांनी बुधवार, 18/01/2012 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
आधीची कविता - My Sorrow
ही अजून एक दुसरी जुनी, पण आजही आवडणारी कविता. आयुष्यात बर्याच वेळा 'पण मीच का?', 'Why Me?' हा प्रश्न सतावतोच. कधी अक्राळविक्राळ रूप धारण करून आपण आणि इतर ही दरी इतकी रुंद करतो की एकाकीपण, कोणी समजून गेऊ शकत नाही हा सल प्रत्यक्ष दु:खापेक्षाही जास्त त्रास देतो. Experiences are so personal, they can't make anyone else wiser! असं म्हणून गप्प व्हायचं. ही कविता अशाच काळत लिहिली आहे जेंव्हा मी खूप हताश आणि निराश झालो होतो.
लेखकप्रकाश१११यांनी बुधवार, 18/01/2012 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कुणास ठाऊक
कोठून उगवते ही झुरळांची जमात
कशी कोठे दडून बसते फटीत
बाथरूममध्ये ....
किचनच्या बेसिन खाली
मध्यरात्री कधी उठलो तर दिसतात मस्त मजेने
फिरत असतात इतस्तत:
दिवां लागताच तुरुतुरु पळतात
अदृश्य होऊन जातात
भयंकर किळसवाणे वाटते त्याना बघतांना
झुरळे असतात बारीक
झुरळे असतात ढब्बू
डौलदार ...बेढब
झुरळे असतात चीनी माणसाच्या मिशी सारखी
धीर गंभीर विचारवंत
योग्या सारखी ध्यान लावून बसलेली
किती नष्ट केली
नष्ट झाली असे वाटले तरी
ती उगवतात फिनिक्स पक्ष्या सारखी
राखेतून उभी राहतात
जिद्दीने .....!
पायाने ठेचले की फट असा आवाज येतो
नि ही मरून जातात
मी पाहिलंय मुंग्यांनी त्याचा देह फ
लेखकयकुयांनी बुधवार, 18/01/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी
घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी
काचलेला लालेलाल वळ उठे झणी
रोजचेच झाले आता नवे काही नाही
इन कशी करु आता मला सांगा कुणी
झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी
निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी
सांगायचे आहे काही माझ्या मनातले मला
सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला
ना ना ना ना ना..