Skip to main content

कविता

मागे ती लुगडी

लेखक शरद यांनी शनिवार, 09/07/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागे ती लुगडी एके काळी मराठी काव्य म्हणजे भक्ती काव्य व सोबतीला पंचपक्वांनांनी भरलेल्या ताटात थोडीशी झणझणित चटणी असावी तसे शाहीरांचे शृंगार काव्य. साहित्यात विनोद शोधावयास लागावयाचा. "विनोद आवडे टवाळा " ही समर्थांची उक्ती प्रातिनिधिक म्हणावयास हरकत नाही. तर अशा काळात अमृतराय या कवीची एक आल्हादकारक रचना मिळाली तेव्हा सगळ्या मित्रांना एक मेजवानीच मिळाली म्हणावयास पाहिजे. आणि हो, हा अमृतराय म्हणजे " अजी मी ब्रह्म पाहिले" या सुप्रसिद्ध रचनेचा कर्ता. अमृतराय (१६९८-१७५३) हा कटावाकरिता प्रसिद्ध. मराठीत त्यानेच तो सुरू केला म्हाणावयास हरकत नाही.

कवितेची पाककृती ५: धगधगत्या आत्मशोधाची गजल - १

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 04/07/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्तं कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमकविता कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची कवितेची पाककृती ४: मधुशाला व रूपकक प्रणाली सामान्य माणसाने आसपास बघितलं की त्याच्या एक गोष्ट लक्षात आल्यावाचून रहात नाही. ती म्हणजे जग हे थोर थोर व्यक्तींनी भरलेलं आहे. जगात नावाजलेले बल्लवाचार्य आणि बल्लवाचार्या आहेत.

'तो' शनिवार

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 03/07/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
जगातला सगळा ताप विसरुन तुझ्या कुशित विसावताना जमा/खर्च,फायदा/तोटा सगळं सगळं विसरताना केसामधुन फिरताना तुझा प्रेमळ हात वातावरण मंद सुगंधी...जणु लागली अत्तरवात 1BHKच्या ''छोट्याश्या'' फ्लेटमधे सुद्धा मन माझं असतं गात........ प्रेमाची प्राथमिक भुक तू होतिस नंतर आलं एक 'आपलं घर' आता तर मनाला उधाण आलय तूच त्याला आवरुन धर फ्लेट पाठोपाठ गाडी आलीये तरी ती पुरत नाही हौस कित्तीही केली तरी मागे काहीही उरत नाही सगळं सगळं पटत असुन धावण्याचा हा अट्टाहास खिशात भरपुर पैसे आणी शनिवारी रात्री ब्रेंडीचा ग्लास सुखांना किती भिजवायचं? याचा ठाव लागत नाही कित्ती कित्ती खर्च झाला मन हिशोब मागत नाही थांबवायला हव

सारं लुगड्यात गमावलं...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 03/07/2011 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
सारं लुगड्यात गमावलं... हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे.

मी असा जुगारी...

लेखक बन्या बापु यांनी शनिवार, 02/07/2011 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा खेळलो मी डाव तो जुगारी, कसे आवरू मी या मना विकारी ? झगडा तो जीवनाचा संपेल ना कधीही, पंख शोधेल कोण, मारेल कोण भरारी ? आहेत सगळे माझे, परके कोणी ना इथे, वार का त्यांचे लागले जिव्हारी ? श्वास संपले आता, खेळही संपला आता, कसे नाकारू सत्य हे विखारी. फासे फेकलेले, दान ते त्याचे, कसे जिंकेल कोणी जो तो इथे भिकारी ? येईन फिरून मीही एकदा असा कि, डाव सोडून जाईल नियती ही बिचारी..

पिंगु आणी शाळा(बालकाव्य)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 01/07/2011 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक छोटा पिंगु नेहमी शाळेत जातो आई ओरडेल म्हणुन पटकन डबा खातो खाताना झाली गंमत घश्यात अडकला घासं लवकर खायला लागलं म्हणुन झाला त्रासं घरी आल्यावर आई डबा पाहुन चिडली नीट खाल्ला नाही म्हणुन वरात काढली मग आमी शांगतो नीट डबा खाल्ला त्या येडपट चिंगुनी धक्का देऊन पाडला माझी चूक नाही मला नको ओरडू मग तूच म्हणतेस? चिडलं माझं करडू उद्या पासुन शाळेत देऊ नको डब्बा मधल्या सुट्टीत खेळेन लपंडाव-पाणी-धप्पा डबा खायची कटकट आमच्या मागुन जावी त्याच्या ऐवजी फक्त मधली सुट्टी रहावी आसा आहे पिंगू आणी त्याची शाळा वाजली शेवटची घंटा चला आता प---ळा.... पराग दिवेकर...

...... नेहमीसारखा...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 30/06/2011 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आवडायला लागलाय मला आता तो कर्नकर्कश्य गोंगाट... कारण विसरायला लावतो तो मला स्वतःला... कुठेतरी त्या गोंगाटात दाबले जातात माझे हुंदके... एवढे कि स्वतःचेच स्वतःला ऐकू येत नाहीत... एकटेपणा खायला उठतो... एकटा असलो कि भूतकाळाच्या आठवणी फेर धरून नाचू लागतात भोवती.. जशी गिधाड घिरट्या घालतात आभाळात... वाट पहात कि कधी होतोय लाचार... मग तोडतात लचके... त्या वेळी मग मुठीत निखारे दाबून, गुढग्यात डोकं खुपसून बसतो...नेहमीसारखा... जगायलाच विसरलोय आता.. आता तर मला पावसाचीसुद्धा भीती वाटायला लागलीय... सरीबरोबर त्याच्या कोसळतात तुझ्या आठवणी अंगावर... त्या वेळी डोळे झाकून चिंब भिजण्याचा प्रयत्नही मी करतो...