Skip to main content

कविता

अंतर -२

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 12/08/2011 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
3

आयुष्य-पुष्प

लेखक अभिजीत राजवाडे यांनी गुरुवार, 11/08/2011 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
तुला पाहिले मी बाकि काही पाहिले ना, आयुष्य पुष्प फक्त!, अन्य काही वाहिले ना. उध्वस्त झाले गाव, मला काय त्याचे, मी विचारले कि, माझे घर राहिले ना? तुच्छ वाटे मजला दुःख कोणतेही, फसवे वचन तुझे ते सांग साहिले ना. जे पाहिले होते मी तुझ्या संगतीने, ते विश्व चांदण्यांचे अद्याप पाहिले ना.

अंधार

लेखक अभिजीत राजवाडे यांनी रविवार, 07/08/2011 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या सुंदर वाटेवर ,मी धडपडतो आहे, समईची येते याद, अंधार वाढतो आहे. मोत्यांना मानेवरच्या, शेवटी पाहिले होते, शुभ्रधवल तो मोती, नयनात दाटतो आहे. तुटलेल्या त्या नात्यांना मी किड लावली होती, इतुकी की माझ्या मी, मनात सडतो आहे. माहित नाही मजला गाडलो किती मी आहे घावात क्षणाच्या येथे, मी अजुन सापडतो आहे.

ऑन फायरींग अ सेल्स्मन - कविता

लेखक शुचि यांनी शनिवार, 06/08/2011 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
"ऑन फायरींग अ सेल्स्मन" या कवितेतील मध्यवर्ती पत्र एक वयस्क असा विक्रेता आहे, ज्याच्या जोम आणि उत्साहाला वयापरत्वे ओहोटी लागली आहे. रोज सकाळी तो लवकर उठतो, ट्रेन पकडायला धावतो, हसतमुख चेहेर्‍याने क्लायंटच्या गाठीभेटी घेतो. क्लायंटला त्याचे प्रॉडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ऊर फुटेस्तोवर धावतो पण अनेकदा तर नव्याने एम बी ए झालेला पोरसवदा सहकारीत्याचा क्लायंट त्याच्या डोळ्यादेखत पळवतो. त्याचे दिवस असे व्यस्त, व्यग्र आहेत तर त्याच्या संध्याकाळी अतिशय करड्या, निराशाजनक आहेत. तो येईयेइपर्यंत मुले झोपून गेलेली असतात, बयकोचे मूळातले कडू तोंड अधिकच वाकडे झालेले असते.

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 05/08/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका ऊठ मर्दा ऊठ आवळून घे मूठ हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते माणुसकीचे लचके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट अन्यायाची सीमा जेव्हा मर्यादेला लांघते तुझे हक्क तुडवून तिरडीवर बांधते शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट पोशिंद्याच्या छाताडावर हरामींच्या मौजा तेव्हा राज्य करतात लुटारूंच्या फौजा स
काव्यरस

ते दिवस आता कुठे

लेखक अरूण म्हात्रे यांनी बुधवार, 03/08/2011 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरी ही सावली भेटायची... त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला माझीच फांदी व्हायची पावसाला पेच होता,ह्या सरी वळवू कुठे चिंबताना त्या पुलाखाली नदी थांबायची वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची कैक वाटा चाललो,पण विसरलो पोचायचे नेमक्या वळणातूनी ही पावले परतायची गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.

संततधार

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 02/08/2011 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कुंद पहाटे झडली संततधार मेघात विखुरले मन माझे चौफेर आषाढघनांचे धुके; नाचरे मोर उंचावुन माना शोधे चंद्र चकोर सागर भरती लाटेवर फेस विभोर रेतीवर रांगे ओघळात हिंदोळ अंधारनभाचे ओणवले झाकोळ वार्‍यात मातला अश्वबळाचा जोर चहुओर सैल मग का मनभर हा घोळ थेंबात थेंब दुथडीत अवखळे लोळ झिंगूनहि नाही कुठे लागला मेळ मृगजळ्स्वप्नांचा भातुकलीत समेळ .....................अज्ञात
काव्यरस

अर्धवट राहिलेलं प्रेम

लेखक प्रिया ब यांनी रविवार, 31/07/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भावना तुझ्या पर्यंत कधी पोचल्याच नाहीत न व्यक्त केलेलं ते प्रेम तुला कधी जाणवलच नाही अस्पष्ट मारलेली तुला हाक कधी ऐकू आलीच नाही मनाने केलेला स्पर्श तुला कधी भासलाच नाही मैत्रीच्या पुढे जावं अशी मनोमन प्रार्थना करत होते पण तुला दुखवायचं नव्हतं म्हणून मागे सरत होते तुला सांगण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न मी केले मला नीट सांगता आलं नाही आणि तुलाही कधी नाही हे कळले तुझ्या जीवनात येईल कुणीतरी नवी नसेल माझ्या मनात तिच्याबद्दल अढी नाही करणार मी तिचा हेवा पण एक सामान्य मुलगी म्हणून एवढंच म्हणेन "हे सगळं स्वीकार करायची शक्ती दे मला देवा!!!" भवतालचं सगळंच वातावरण उदास वाटत आहे आपले एकत्र असलेले

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/07/2011 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ|| सकाळीच उठले मी अजाणतेपणी काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी पोट नाही भरले जरी न्याहरी केली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१|| पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी भरलेलं ताट आले समोर दुपारी किती खावे किती नको झाले त्यावेळी कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२|| कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला संध्यासमय जवळ हा आला पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३|| - पाषाणभेद (दगडफो
काव्यरस

लोकशाहि

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 30/07/2011 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
!! लोकशाहित या सगळेच भाडखाऊ !! लोकशाहि मुळेच मिळते-लिहिणे,बोलणे,विरोध,मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, त्याचा मनसोक्त उपभोग घेणारे भाडखाऊ लोकशाहि म्हणजे काय?
काव्यरस