Skip to main content

कविता

घर पहावं बांधून

लेखक प्रिया ब यांनी शुक्रवार, 29/07/2011 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
सहा आकडी वार्षिक पगार पाहून पालक भलतेच खूष झाले होते.. "द्रुष्ट काढा हो पोरची" असे आजीचे उद्गार आले होते. "मोठ्या शहरात दादा आपला व्हावा settle हेच होतं माझ्या मनात आता मस्त घर घेतलं की येतील मुलिंचे profiles आपल्या दारात" 'घर शोधो' मोहिम आमची जोरात सुरू झाली. 'घर पहावं बांधून' ह्या म्हणीची प्रचिती तेव्हा मला आली. "Sir swimming pool, club house, Security, Capsule lift एकदम कसं ऐटीत IT, त्या मानाने rate नहिये फार" त्याच्या downpayment ची figure बघूनच अंगात कापरं भरलं आणि पडलो होतो गार.. "ना मी करोडपती ना कुठला संस्थानिक...

आयुष्य कडेवर घेतो

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 29/07/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य कडेवर घेतो झुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला काळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो गारठल्या पंखामधी, आशा जागवतो सुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला चेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो सुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो अभयता पेरताना, रुजलेली फुलताना फळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो तेव्हा मीच आयुष्याला, कडेवरी घेतो                                

हातामधी घे तू जरा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 29/07/2011 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हातामधी घे तू जरा
हातामधी घे तू जरा गरमागरम तेल खालून वरून अंगाला माझ्या चोळ ||धृ|| कामाला मी निघतो डबा घेवून सकाळी तवाच सुरू होते ग माझी पहीली पाळी उभं राहून लेथमशीन मी चालवतो हातोड्यानं लोखंडावर दणके मी देतो कष्टाचं काम आहे हे सारं; नाही काही खायची भेळ ||१|| दुसर्‍या पाळीनं ग माझी लयी व्हती दैना उन्हातान्हाचा दिस हा जाता जाईना कामगाराचं जीनं हाय लयी बेकार राब राब राबवूनी घेई सुपरवायझर त्याच्यासंग चाले आमचा उंदरामांजराचा खेळ ||२|| तिसरी पाळी तर लयीच महाग आसती मी तिकडे कामात अन तू झोपून र्‍हाती तळमळ तळ

मैत्री

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 28/07/2011 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जन्मापासूनच ठरलेली असतात असंख्य नाती ही तुझी मावशी, हे तुझे काका, ही आजी, ती मामी .. पण पुढे आपण होऊन एक नातं निर्माण करतो जेव्हा घराच्या चौकटीतून बाहेर पडतो अनेक जण आपल्या परिचयात येतात, बरेच जण आपल्याला भेटतात , त्यातले पुशकळसे ओळखीचे राहतात आणि काहीच जीवाभावाचे होतात हे नातं असतं 'मैत्रीचं' - निरपेक्ष, निखळ अशी सख्या नात्यां इतकीच वाटते ती हवी हवीशी न सांगता आपल्या सुख दु:खात साथ देणारे अडी अडचणीत आपल्या पाठीशी उभे राहणारे हक्काने आपल्या चुकांवर रागावणारे आपल्या यशात आनंदाने सहभागी होणारे ... ह्यात कधीच नसतो द्वेश, ना दुस्वास, ना लोभ असतं फक्त प्रेम, आपलेपणा आणि एकमेका

आई बाबा

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 28/07/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा .. शाळेत पैसे द्यायचे आहेत .. जाणार आहे दोन दिवस सहल!!" "अरे वा... देतो नक्की पर्वा .. खूप कर रे धमाल.. " "आणि मला promise केली होती ना बाहुली आणि भातुकली" "म्हणजे काय!! घेणारच आहे गं छ्कुली .." "झकास पास झाला की घेणार आहे दादाला Hero Honda CD आधी पासूनच ठरवलं ... होत आहे mature एक जुनी FD .. आणि पंचविसाव्या लग्नाच्या वाढदिवशी घेऊया तुमच्या आईला साखळी सोन्याची" "छे!!

उणीव...

लेखक अभिषेक९ यांनी मंगळवार, 26/07/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
कायम touch मध्ये असूनही संवाद कुठे तरी हरवलेला आहे... कायम कट्ट्यावर log -in असूनही विषयाचा नेहमीचं वानवा आहे.. कायम available असूनही जवळ कोणीच नाही... सारखे profile visit करूनही सारे अनभिज्ञच आहे... टेक-क्रांती होऊनही मानवी उत्क्रांती अजूनही अनुत्तरीतच आहे...

क्रांतितै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 26/07/2011 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.

दोन कविता

लेखक अरूण म्हात्रे यांनी सोमवार, 25/07/2011 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मज ठाऊक नव्हते दार कोणते तुझ्या घराचे उन्हे वेचण्यासाठी.... मी खूप श्रमाने दिवस फोडूनी असाच येतो लटकत भटकत उन्ह होउनी तुझ्या घराच्या काठी...... ________________________________ तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी की स्वतःबरोबर आकाश रितं करणारा हा पाऊस सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय ! काहीच आठवत नाही--- ----इतकंच लख्ख जाणवतं की कुठूनतरी वीज कोसळली नि पागोळ्यांबरोबर खेळण्याचं माझं वय जळून गेलं ...... (या माझ्या दोन कविता आधी इतरत्र प्रसिध्द झाल्या आहेत.

आसूड

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 23/07/2011 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
नाही भय लाज सारे सत्तातूर देशाचा विचार कवडीमोल लोभालोभ सारा सत्तेचिये पायी आपापल्या सोयी लाघव भावे आज वाटे त्यांसी ब्रम्हांड ठेंगणे टेकीता ढुंगणे खुर्चीवरी सुखाचिया राशी त्यांच्यांच पायाशी मग जनतेशी काय पुसावे? मतीमंद झाला आज बुद्धीवंत नाही बलवंत कोणीच येथे उठ माझ्या लेका आता नको चुका नाहीतर भिका मागशील हातामध्ये घेरे सत्तेचा आसुड भडव्यांच्या ओढ पाठीवरी हिच माझी इच्छा पुरी कर बाबा देशाचा या ताबा तुझे हाती ..!!!