Skip to main content

कविता

नूतन वर्षाच्या शुभेच्छांसाठी

लेखक भाववेडा यांनी शनिवार, 01/01/2011 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
थिजलेला पारा, निजलेला वारा, गुलाबी पहाटे, भिजलेल्या तारा, धरतीवर दाट, धुके पहुडले, त्यात गुपित, नव्या वर्षाचे दडले, उगवेल दिनकर, धुके विरेल, उघडेल गुपित, जादू घडेल, हीच जादू आपल्या, आयुष्यात घडावी, आमच्या शुभेच्छांची लहर, त्या सोबत जडावी || हे मिपावरील माझे पहिले लेखन आहे, तेव्हा काही चुकले असल्यास माफी असावी. ख्रिस्ती नूतन वर्षाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा।

नुतनवर्षास....

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 01/01/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
.. रे नववर्षा रे नववर्षा ये नेमाने वल्हवित अंकुर नवजोमाने एक कवडसा चैतन्याचा जा फुलवीत ही उदास राने ....! ना अस्त्राने वा शस्त्राने उकलन व्हावी सद्भभावाने मत्सर-हेका ना गर्जन-केका बाहुबलीचे नको भूजाने .....! दानवाने ना देवाने राज्य करावे बळीराजाने आत्मग्लानी क्लेश त्यजुनी जगावा पोशिंदा सन्मानाने ...! रे नववर्षा दे अभयाने दे भरुनी दुरडी भगोणे वित्तपातल्या लक्तरांना भरव मुक्तीचे चार दाणे ...! ..

आरती गुरूदत्ताची

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 31/12/2010 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, शब्दगारवा २०१० मध्ये गुरूदत्ताची आरती गेल्या दत्तजयंतीला प्रकाशीत झालीय. ती येथे देतोय. शब्दगारवा २०१० त आणखीही लेख अन कविता आहेत. त्या आपण नजरेखालून घालाव्यात. (कवितेत सार्थ बदल प्रकाशकाकांनी केले आहेत.
काव्यरस

प्रत्येक दिवस नूतन आहे...

लेखक ज्ञानराम यांनी शुक्रवार, 31/12/2010 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव.. सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ? किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर, किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल, नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं क

कधीही काहीही होऊ शकते ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 31/12/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रचंड शहर खास पोटापाण्यासाठी राखीव कुरण गरिबांचे शहर श्रीमंताचे शहर मौज-मस्तीचे शहर संस्कृतीचे शहर सांस्कृतिक शहर चिंचोळ्या गल्लीतून दिसणाऱ्या खिडकीचे शहर आता हे शहर आहे बंदुकीच्या टोकावर गोळी कधीही उडू शकते बोंब कधीपण फुटू शकतो गाडीमध्ये ... स्टेशनमध्ये ...... भर गर्दीत ... कोठेही कधीही ..! सावध ..! नि फक्त सावध ..!! काय करू शकतो...? मी? ,तुम्ही ,??आपण ??? तुमच्या पाठीत कधीपण घुसू शकतात संगीनीची टोके आजकाल मरायच्या नि मारायच्या गोष्टी फार सोप्या होऊन गेल्यात अम्बुलंसवाला सहज सांगतो ;थकलो साहेब ,शंभर बोड्या सोडून आलो काय मजाक आहे का ? नि साले बोनस देत नाहीत .....
काव्यरस

शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 30/12/2010 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी मेहनत मजूरी करणारे कामकरी ||धृ|| आम्ही चालवतो गाडी बैलांची तिला गरज नाही इंधनाची धान्याची पोती आणतो घरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१|| पोळा साजरा करतो दरवर्षी दुधासाठी पाळतो गाईम्हशी भुमातेची करतो चाकरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||२|| रात संपून उजाडती पहाटं भल्या सकाळी कारभारीन उठं घेवून परातीत जवारी बाजरीचं पिठं न्याहारीसाठी करती झुनका भाकरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||३|| उन्हातान्हात कामं सारी करतो रातंदिस राबराब राबतो कर्ज काढूनी खत पि
काव्यरस

खरे काय नी खोटे काय ?

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 30/12/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्ही बघतो, बातम्या वाचतो येताजाता चर्चाही ऐकतो कोण बरोबर, चूक कोण कधीच मला कळंत नाय खरे काय नी खोटे काय आदीवासींच्या जमिनी गेल्या .. सरकार म्हणते योजना दिल्या खाणी गेल्या, भाकरी गेली ..

नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 29/12/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा--------------------------- महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी तेजसूर्य उगवतो मराठीचा नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा गरजले सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आहे आवाज मराठीचा तेजोमय तलवार तळपते येथे ललकार मराठीचा विवेधतेतला नाद साज मराठीचा एक चिंगार मराठीचा गणेशा
काव्यरस

सोकावलेल्या अंधाराला इशारा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 29/12/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
सोकावलेल्या अंधाराला इशारा सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे? डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर? कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू? माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे निर्भीडतेने 'अभय' असा तू, यज्ञकार्य असेच चालू ठेव ग्रहणापायी झाकोळलेला, चंद्र आता उजळला पाहिजे
काव्यरस