Skip to main content

कविता

रिटायर्ड माणसाला कोंबडी परवडत नाही'.....!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 06/01/2011 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
[पोस्टातले नाना निवृत्त झाले . कोंबडी त्याना अतिशय प्रिय. रविवारी पिशावी घेऊन बाहेर जाताना दिसले गमत म्हणून सहज विचारले .काय नाना आज काय कोंबडी का ?हसून म्हणाले नाहीरे बाबा रिटायर माणसाला कोंबडी नात परवडत ..त्यावरून ही कल्पना] नुकताच रिटायर्ड झालो पेन्शन कसली १५२० रुपये मासिक महिन्याची पेन्शन चालू होईल होईल तेव्हा होईल ......! कधी होईल माहीत नाही ....? परवाच कोंबडी खायची इच्छा झाली बायको वेंतागून म्हणाली : आता पुरे कोंबडी-बिम्बडी तुमच्या पेन्शनमध्ये कोथिंबीर तरी येईल का...? सगळे पेंसे कोंबडी खाण्यात उडवले आता काटकसरीने जगा त्यांना पण जगू द्या ..........!
काव्यरस

किती वर्षाने असे निवांतपण ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 05/01/2011 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षाने असे निवांतपण स्वच्छ आभाळ नि असे मोकळेपण खिडकीवर बसलेली चिमणी नि तिचे एकटेपण खिडकीतून दिसणारे चिमणीच्या मागचे गुलमोहराचे झाड ते आभाळ तो ढगांचा शुभ्र कल्लोळ आभाळात शांत विहरणारी घार कसे शांत ,स्वच्छ निवांत ध्यान लावून बसलेय हे वातावरण बायको बसलीय देवघरात देवाजवळ काय मागतेय देवाजवळ कुणास ठाऊक ? चेहऱ्यावरचा शांत भाव प्रसन्नपणा सगळे मिळाल्याची तृप्तता तृप्तीचा हा अनोखा क्षण तो सेव्ह करून ठेवतोय कितीतरी वेळा सेव्ह न केल्यामुळे डिलीट होऊन गेल्यात कितीतरी घटना ,प्रसंग आयुष्याच्या ऊतरवंडीवरचे हे क्षण हे निवांतपण कोठे हरवून गेले ते क्षण ते सुख नि ते तारुण्य .
काव्यरस

(घट डोईवर घट कमरेवर)

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 05/01/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा पी. सावळाराम यांची माफी मागून, घट सगळे धर चल सखये, नळ मोरीमधला बंद झाला, बंद झाला रे ॥धृ.॥ धुणि कशि होतील, अर्धीच र्‍हातील, जो तो आता रांगही लावील सर्व कुळाच्या संडासाला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥१॥ बघ तो वरचा भट शिंदळिचा, कितके घट तो आणि एकटा मध्येच लायनित तो घुसला रे, बंद झाला रे बंद झाला रे ॥२॥ नेलीस जोडी, भरे तेवढी तोवर करतो जिन्यात कोंडी छकुली तूही धर हा पेला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥३॥ मूळ गीत : घट डोईवर घट कमरेवर
काव्यरस

कांदे पोहे...

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 04/01/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
[संवाद... ] आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा... हळुवार शिडकावा...अबोल शब्दांचा... तरल स्वप्नांचा... उंच किनारा ... अंगावर शहारा...थरथरत्या भावनांचा... [गीत...] मन हे बेधुंद झाले बावरले .. हरवले .. स्पर्श स्वप्नांचा घेवूनी नयनात सामावले !! क्षण हे गोंधळलेले थोडेशे बावरलेले अंगणात हृद्याच्या नभ अवतरलेले !! [संवाद...] हवी हवीशी सळसळ... कातरलेल्या वेलीची ... चंदेरी बरसात आज... नक्षत्राच्या चांदण्यांची... सोनेरी किरणांची... आकाशी नक्षी... अल्हाद मोहक निर्मळ...
काव्यरस

कसे वर्ष गेले हरवून ...!!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 04/01/2011 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष कसे गेले कळलेच नाही कसे दिवस जातात पटकन हरवून किती वर्ष गेली हे तरी कोठे समजले कधी .त्याला .?? जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले काय दिले त्याने ? काय घेतले तुम्ही ?? काय घेतले ठाऊक नाही काय हिरावून नेले हे फक्त लक्षात राहिले त्याचा जिवाभावाचा भाऊ गेला आठवण आली की , काळीज फुटून जातेय त्याचे जगणे फक्त ढकलून दिले जाते काळोखाच्या समुद्रात विरघळून जावेसे वाटते त्याला शप्पत ...
काव्यरस

पाउलखुणा

लेखक गणेशा यांनी सोमवार, 03/01/2011 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत.. सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा आणि मागोवा .. कश्यासाठी ...? कोणासाठी...? बहुदा एका प्रश्नमालिकेतून पुन्हा दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्यासाठीचा अखंड प्रवास गुरफ़टलेली तर ही रात्र ही आहे .. उदयस्ताच्या रंगात न्हाऊनही कालवंडली आहे बिच्चारी माझे काय मग त्यापुढे.. अता माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर माझ अस्तित्वच संपत चाललय .. पण या रात्रीच्या सोबतीनेच मी जगते आहे..

लतादेवीची आरती

लेखक JAGOMOHANPYARE यांनी सोमवार, 03/01/2011 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
जय देवी जय देवी जय लता देवी शंभर वर्षे माझेही करियर करवी | त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही सारे श्रमले तरी तू गात राही काही विवाद करिता पडले प्रवाही तुझा गायन निर्झर अखंड हा वाही |१| जय देवी... सांगलीवरुनी उड्डाण मुंबई-पंढरी किती गायिकांची भरली शंभरी वीणा, नुपूर आणि आली बासुरी तुझिया वाणी आल्या परा वैखरी |२| जय देवी.... तुझिया कृपेने सारे मंगल होऊ दे पेडर रोडवर माझा बंगला होऊ दे भारतरत्न माझ्या घरी येऊ दे 'कोल्हापूर-नंदन' सुखिया होऊ दे |३| जय देवी...

किती सांगू मी आनंद झाला-

लेखक विदेश यांनी शनिवार, 01/01/2011 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल:- किती सांगू मी सांगू कुणाला-) किती सांगू मी आनंद झाला , भाव भाज्यांचा खाली ग आला ! गडे जाऊ चला , भाज्या आणू चला- रुपयाला किलो कांदा झाला ! ।१। नवर्‍याच्या संगती ग , पिशव्या हाती घेऊन मी आले ‘नको हसू गालात , नको चालू तोर्‍यात-’ नवरोजी कुरकुरले ! चुका-दोडका-लसूण , कोबी-आलं-सुरण , नवलकोलात फ्लॉवर दिसला ! ।२। मेथी शेपू भेंडी ग , पालकाची पेंढी भुलले ग्राहक किती ! कुणी मागे गवार , कुणी घेवडा-मटार शेंगांना नांवे किती ! रोज फोडी करून , ते बटाटे चिरून- सांज सकाळी कंटाळा आला !

..गंधमुग्ध

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी शनिवार, 01/01/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यामध्येच रमले होते.. तुझ्या मूळेच फुलले होते... उमलले तुझ्यामुळे गंधले तुझ्यामुळे... कोवळ्या अन मुग्ध या रेशीम स्पर्शी पाकळ्या खुलल्या तुझ्यात अन् उमलल्या तुझ्यामुळे.. गंध भरल्या पाकळ्यांची ही नजाकत मखमली टवटवी अन् हा तजेला.. लाभला तुझ्यामुळे .. बहर सरला... गंध विरला.... झाले मुक्त फुलुनी उतरली धुंदी नजाकत वेळ झाली मिटायची परत बंद....परत मुग्ध.... मिटेन मी तुझ्यामध्ये गंधमुग्ध, स्पर्शमुक्त मिटेन मी तुझ्यामध्ये मिटेन मी तुझ्यामध्ये ......
काव्यरस

महाराष्ट्र्गीत

लेखक पिनुपवार यांनी शनिवार, 01/01/2011 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय आम्ही नायक राष्ट्राचे मराटी आमचि माता इतिहास घडला फडकला पतका इथे एक जाती -धर्म सातपुडा दक्शिनेची गंगा हेच आहे इथे मर्म महाराष्ट्र दैवत माझे
काव्यरस