Skip to main content

कविता

तुझी माझी प्रित होती

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/12/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी प्रित होती
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ|| हातांना ना कधी, गुंफण आता मिळायची पावलांना सवय होवूदे, एकटेच चालायची भेटलो तो किनारा, विसरूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||१|| त्या आर्त नजरा, ते नजरेतले बोलणे न बोलताच कळणारे मनातील हुरहुरणे आठवणींना सांग, स्मरणातूनी निघूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||२|| आठवते मला दिलेले मोरपीस निळेगार तूही वहीत ठेवले होते पिंपळपान जाळीदार भेट दिली घेतली, परत घेवूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||३||
काव्यरस

ती येणार आहे ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 23/12/2010 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ झाली आहे नि ती येणार आहे तो वाट बघतोय तिची आतुरतेने ..चातकासारखी .!! तिन्हीसांजा झाल्यात ..... चुकून- माकून मागे राहिलेली पाखरांची भिरी घरी परततेय .... आकाशी रंगाची साडी नि कपाळवरचा घाम त्याला अजूनही आठवत असते त्याचे कासावीस होणे तिच्या नुसत्या आठवणीने तिचा हलकासा वावर तिची लगबग तिने केलेला चहा देवाजवळ लावलेला दिवा सुख सुख निव्वळ ..... कसे असते हो ..? पाखरे तर गेली उडून दूरदेशी आपल्या पोटापाण्यासाठी स्वताचे घरटे बनवून पण ती येणार आहे तो वाट बघतो आहे तिची ती गेलीय खूप दूर जेथे जाण्याचे मार्ग असतात पण येणारे मार्ग हरवून जातात गच्च काळोखात ....! तरीही त्याला
काव्यरस

किम्म्त .. विचारांची ..

लेखक गणेशा यांनी बुधवार, 22/12/2010 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्नलला रीक्षात बसललो असताना समोर एक भिकारी आला सुरकतलेला चेहरा अन थरलेला हात करुन नजरेने त्याच्या मन कासावीस झाले दिवसभराच्या घाईगर्दीत विचार कुठे करतो आपण अश्यावेळेस मग हे विचार अगदी डोक्यावर नाचतात विचार..? अन आपन मध्यमवर्गीय यापलीकडे म्हणा काय करु शकतो..? देश प्रगतीपथावर चाललाय.. सेन्सेक्स वाढतोय..मग ही स्थीती का? विचारले मग मी त्याच म्हतार्‍याला का रे बाबा असा भीक मागतोस...? तसा उसळला माझ्यावर मी अवाक..परत विचार आला परिस्थीती मानसास उद्धट बनविते पुन्हा भावूकपणे मी विचारले तेंव्हा नजरेतून भाव सरकण सरकले त्याच्या एका सेकंदात त्यात दिसली त्याच्या जीवनाची व्यथीत कहानी पुढे..

जा जग !! .. (अध्यात्मिक कदाचीत)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 22/12/2010 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी दिसतो तुज फ़क्त निळा सोगा घातलेला आणि शुभ्र अंगरखा पांघरलेला.. ? वेडे.. अन माझी भेट ..? कश्यासाठी .. ? अग डोकाव आपल्या आत.. अंतरात.. दिसेल तेथेही मीच, तुझे शरीराचे जळमट घातलेला... कश्यास हवे आहे तुला अंगारा ते हि त्या तरल ढगांचा ... ढग ..(हसून).. अग ठग आहेत ते क्षणात येथे ..क्षणात तेथे त्यांपासुन का शक्ती हवी आहे तुला ? वेडे तू जगतेच आहे .. फ़क्त जग सर्वांसाठी.. शोध मलाही दुसर्‍यांच्या मनात.. हो आणि म्हनु नको तेथे का पांघरलेत शरीराची जळमटे... रागवलीस ..? बर सांगतो मी मी आहे असाच निद्रिस्त सर्व मानवात.. ओळख माझी अशीच ..

अग्नि..

लेखक ज्ञानराम यांनी बुधवार, 22/12/2010 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
कालजात माझ्या अजून राग आहे , मेलेल्या नजरेला अजून जाग आहे, कोण विझवेल माझि चिता हि माझि?
काव्यरस

व्यथा वार्धक्याची

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 21/12/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा वार्धक्याची नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांना असुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हाला प्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरविती अंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला अनिल आपटे

घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 20/12/2010 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ..?? आमच्या लहानपणची घरे जशी होती तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक.? माडीवरचे बळद कितीतरी जुने असावे पुसलेच जात नाही मनातून सिगारेट ओढणारा फेल्ट ह्यात घालणारा पत्री डब्यावरचा अनेक मुखवट्याचा तो डबा त्यात साठवलेल्या कितीतरी चीनी मातीच्या बाहुल्या लोलक,भवरे आणखीन काय नि काय कितीक काळ तसाच होता पुसलाच जात नाही मनातून ....!! डबल ब्यारलची सायकल होती हर्क्युलसची मस्त दणकट मजबूत ...!! आजोबांच्या काळातली मामा वापरून त्याची मुले वापरू लागलेली तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक...?
काव्यरस

सांता कलॉज

लेखक पियुशा यांनी सोमवार, 20/12/2010 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
santasanta
सांता कलॉज
गोड़ गुलाबी कुडकुड नारी थंडी पडली होती ..... पांढरा पांढरा बर्फही भुरभुरत होता ...... घरातल्या ख्रिसमस ट्री वर छोटे छोटे स्टार हलत होते......... मी अन बाबानी रात्रि ख्रिसमस ट्री तयार केले होते ........... सगळे गेले शांत झोपी..... मी एकटीच आईच्या मखमली कुशितुन बाहेर आले अं

नमस्ते, सचिन...

लेखक सुभाष् अक्कावार यांनी रविवार, 19/12/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी नंबर देता का नंबर लैंडलाइन किंवा मोबाइल... कुणाचा म्हणून काय विचारता ? अहो, आपल्या लाडक्या तेंडल्याचा !... नंबर नाही मिळाला तर काय करीन म्हणता ? कुतुबमीनार किंवा लाल किल्ल्यावर चढून जाईन... एव्हरेस्टचे उंच शिखर गाठीन... अथवा 'ताजमहाल'च्या भव्य प्रांगणात उभा राहीन... मनापासून करायचाय अभिनंदनाचा वर्षाव सचिन रमेश तेंडुलकरवर !... वीस वर्षापासून आपल्या बहारदार खेळाने अवघ्या क्रिकेट रसिकांना भरभरून स्वर्गीय आनंद मिळवून दिल्याबद्दल... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी तीस हजार रन्स काढल्याबद्दल... वनडेत नाबाद दोनशे रन्सची सर्वोच्च खेळी केल्याबद्दल... कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पन