Skip to main content

कविता

जागरण गोंधळ : आई देवी अंबेचा जागर मी करीतो

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 09/12/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
जागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर मी करीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो जागर करीतो देवी अंबेचा गोंधळ मी घालीतो ||धृ|| आई तू ग माझी गुणी नउवारी पातळ नेसूनी कपाळी मळवट लाल लेवूनी आई बसली सिंहावरी देवी अंबेमातेला वंदन करीतो वंदन करीतो तुळजाभवानीच्या पायी नमीतो पायी नमीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||१|| सुरू होई अश्विन महिना मनी आनंद काही मावेना नवरात्राच्या ग सोहळी नऊ दिवस आरती ओवाळी नऊ दिवसांचे उपास मी करीतो उपास करीतो सप्तश्रूंगीची मी ओटी भरीतो ओटी भरीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||२|| साडीचोळी खणा

" ने मजसी ने परत मातृ भूमीला " या गीताला १०१ वर्ष पूर्ण

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 09/12/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या १० डिसेंबर २०१० स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनार्यावर १० डिसेंबर १९०९ साली लिहिलेल्या " ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला" या गीताला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन.

चोरटा मुरारी - गौळण

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 09/12/2010 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
चोरटा मुरारी - गौळण शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी सांगा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥ शेला पागोटा काठी हातात अवचित येवुनिया घुसतो घरात खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी बांधा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥ यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी पकडाया जाता, होतो फ़रारी चव हा चाखी, ओठ हा माखी टांगा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥ व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी कमरेशी बांधा, पायाशी टांगा कोंडा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी...

इतिहास

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 08/12/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मिटल्या डोळ्यातली स्वप्न भोळी भाबडी, अगदी साधी. तुझ्या न माझ्या साथीची आयुष्याच्या वाटचालीची.
तु उघड्या डोळ्यांनी साकारतोयस, शिल्पकारान कष्टान लेणी कोरावीत तशी. मी अन तु , अगदी भिन्न माणस. मी अधिर , आवेगी, तु शांत , संयमी. मी स्वप्नाळु, कल्पनेत रमणारी. तु वास्तवाच्या खडकाचा जाणकारी. अन तरीही मला जपतोयस, वास्तवाच्या दाहक उन्हात , सावली होतोयस. एव्हढ्या वेगवान जगात घटकाभर थांबुन मला डोळे मिटुन स्वप्न बघायला संधी द्यायची धडपड करतोस . आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप पुढ गेल्यावर कधी तरी आपण माग वळु, सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु, त
काव्यरस

नरकयात्रा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 08/12/2010 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
सरणावर माझ्या नको ते लोक रडूनी गेले ओले लाकुड त्यामुळेच का पेटूनी गेले जीवंतपणी पाहीलेले स्वार्थी परके आप्तगण मी गेल्यावर माझ्याशी ते नाते सांगूनी गेले आयुष्यभर सिताफ़ीने ज्यांनी पै पै माझी लुटलेली सरणावर ही माझ्या ते अश्रू गहान ठेवूनी गेले जगताना एकटाच लढलो मी स्वता:शी ज्यांनी मारले तेच आज मज खांदा देवूनी गेले चंद्रासही माझ्या कधी ना डाग होता काही नजरेच्या निखार्‍यांनी आगीस ते भडकवूनी गेले संसाराच्या झोळीत होता स्वाभिमान जपलेला कोरड्या आसवांची आज ते भीक घालूनी गेले मिळेल त्या गोष्टीत कायम स्वर्गसुख घेत गेलो स्मशानात आज ते नरकयात्रा दाखवूनी गेले श्वासांसही न दिली अंतरे कधी जीवनात मी हुं

शिखर त्यांनी गाठलेले -

लेखक विदेश यांनी बुधवार, 08/12/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
शिखर त्यांनी गाठलेले, पायथा धुंडाळतो चालती तो-यात सारे मीच का ठेचाळतो |१| देव दगडांतील येथे पुजुन का कंटाळतो माणसांतिल देव तेथे पूजणे ना टाळतो |२| शोभती जरि आज कपडे भरजरी अंगावरी कालच्या सद-यावरीचे ठिगळ का कुरवाळतो |३| फाटकी लेऊन वसने गरिब अब्रू झाकतो अब्रु उघड्यावर थिरकते मंच ना ओशाळतो |४| चोर अपराधीच येथे उजळ माथे मिरवती वेदना इतरां न होते तीच का कवटाळतो |५| बीज ते साधेपणाचे काल कोणी पेरले रोप भाऊबंदकीचे आजला सांभाळतो |६|

धान्यापासून बनवा दारू ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 08/12/2010 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
[निर्माण ग्रुपमधील .माझा मित्र त्रिशूल त्यातला छान कार्यकर्ता आहे .सर्वांनी धान्यापासून दारू ह्या विरोधात मोठे आंदोलन छेडले होते .त्यावरून हे रामायण ..!!] शेता मध्ये पिक येऊ दे पाउस पडून सारे कुजू दे मग बनवू त्याची दारू जरा खिसा भरू दे ....! बाजरीची दारू ज्वारीची दारू भाताची बी दारू बनवू दे जरा खिसा भरू दे ...! शेता शेता मध्ये लागुदेरे भट्टी देवा तुझी करतो मी सेवा जरा खिसा भरू दे...!
काव्यरस

चेंडू मारियेला

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 08/12/2010 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
चेंडू मारियेला यशोदे तुझा कृष्ण निराला राधेश्याम! चेंडू मारियेला कशी जावू यमुने तीराला राधेश्याम! चेंडू मारियेला .... ॥धृ०॥ रंगी श्रीरंग, नरनारी संग मारी पिचकारी, भिजवितो अंग दिसरात हर जागियेला .... ॥१॥ रगडी गुलाल, गळा,मान,गाली राधा लाल लाल, शरमिली झाली चराचर सुर लाजियेला ....॥२॥ माधवाचा घोष, जाहला जल्लोष बेधुंद नाचताती, मुरलीचा जोष अरविंद क्षण पाहियेला .... ॥३॥ गंगाधर मुटे .................................................. (१९८०-८५ चे सुमारास लिहिलेली गौळण)