Skip to main content

कविता

आई...मिटलेला श्वास - ११

लेखक गणेशा यांनी बुधवार, 01/12/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
आई...मिटलेला श्वास -१० अंधारयुगी हरविलेले अंधुक संकेतचिन्हे घंटेच्या निनादात विखुरलेले शब्दथवे भग्न शिवालय अंधार्‍या कपारी सांध्यसंध्या उभी एकटीच दूरवरी मनभृंग पोखरे विचारांच्या भिंती छ्प्पर हरविलेले घरटे विराण रडती अंतरीचे दाटता धुके भासांची स्मरणे मागे दग्ध भाव निर्मिते मायेचे सोवळे धागे -------- शब्दमेघ
काव्यरस

बाबा !!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 01/12/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
खूप पावसाळे डोक्यावरून गेले मोजू नये ईतकी वर्ष उलटली परंतु तुम्ही माझ्या आठवणीत सतत असता बाबा !! हे शपत कुणाला सांगायला हवे का ?? तुम्ही अचानक निघून गेलात असे कुठे तुमचे वय झाले होते बाबा !! आह्मी तर लहान होतो नि आईचे तर किती छान दिवस होते हौस-मजेचे आणि तुम्ही एकदम निघून गेलात अचानक !! किती पोरके पोरके नि उध्वस्त होऊन गेलो आम्ही सर्व दुखाचा पहाड कोसळला आई नको त्या वयात म्हातारी झाली पण बाबा !! काळ कुणासाठी थांबतो ?? माझी बायको मुले फक्त तुमचा शोकेसमध्ये ठेवलेला फोटो बघतात !! त्यांना काय वाटते ?
काव्यरस

किनारा

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 27/11/2010 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा, तृप्तल्या गात्रांत गेला तृप्तसा इषारा मन भोगते पुन्हा तो आवेग मंथनाचा. अन सांडतो भरुनी शृंगार अंतरीचा. वनवास या सुखाचा मी विरहात साहीला, स्वप्नात शोधीला पण शारीर राहीला, माझ्या प्रियेस ठावा आक्रोश या मनीचा, दवबिंदुनी विझावा वणवा कसा तनीचा. होता आवेश वेडा, अन वेडीच रात्र होती, लवलवती पेटुन काया, गंधीत मात्र होती, नग्न वासनेचा तो, शुद्ध मंत्रखेळ होता, ह्रदयातल्या प्रीतीचा त्या अजोड मेळ होता. होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची, गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची, आली प्रचंड भरती मग उधान सागराला, गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा.
काव्यरस

कशी बदलून जाते ही सुंदर सकाळ !!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 26/11/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
कशी मस्त सकाळ उगवत असते हलक्याफुलक्या पिसासारखी .....!! अंगावर कसा गोड काटा फुलवीत बसते ही थंडीची सकाळ बिस्स्मिल्लाखांच्या सनई सारखी कशी वेलांटत येतेय ही सकाळ ....
काव्यरस

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 26/11/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!! जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही अनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!! राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!!

प्रतिभावंत !!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 26/11/2010 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक प्रतिभावंत कवी होता त्याच्या मनाच्या तळाशी झुळझुळनार्या प्रतिभेचा एक झरा होता कुणास ठाऊक कोणी काय केले ? कसे केले ? कशासाठी केले?? त्याच्या प्रतिभेचा झरा कसा गेला आटून ? अचानक !.नकळत!!
काव्यरस

आई... मिटलेला श्वास.. १०

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 25/11/2010 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ९ :- http://www.misalpav.com/node/15559 नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ---- शब्दमेघ
काव्यरस