Skip to main content

कविता

युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/12/2010 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी
तो: आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी ||धॄ|| ती: नको नको आता नको, माझा बा आनल काठी तो: नको तू अशी दुर पळू नको नको तू अशी दुर राहू नको दोन प्रेमाच्या फुलामधी तिसरा भुंगा तू आनू नको ती: असं नको करू, जवळ नको येवू माझा भाऊ लागलं आपल्या पाठी तो: अर्रर्रर्रर्रर्रर्र, ह्या असल्या थंडीत चल पेटवू आपण शेकोटी ||१|| तो: ते बघ तुला दिसतंय काय ती: काय? तो: अगं, ते बघ तुला दिसतंय काय एक राघू, त्याची मैना, चोच चोचीत जाय ते बघ...
काव्यरस

काही नाती .......

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी शनिवार, 11/12/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही नाती मिरवायची असतात; मेडलसारखी काही दाखवायची असतात; दातांसारखी काही नाती भोगायची असतात; सम्राटासारखी काही नाती वाहायची असतात; ओझ्यांसारखी काही नाती ओळखायची असतात; गुपितांसारखी काही समजून घ्यायची असतात; प्रेमासारखी काही नाती जोडायची असतात; धाग्यांसारखी काही पेलायची असतात; गोवर्धनासारखी नातीगोती हातात नसतात; नशिबासारखी म्हणूनच काही नाती विसरायची असतात; दुःखासारखी . ( संग्रहीत)
काव्यरस

आंब्याची चव चाखून बघा

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/12/2010 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याची चव चाखून बघा
आबं माझ्या पाटीतलं पिकल्यात सारं चवीला ते लागत्यात न्यारं पिकलेला आंबा हाती घेवून बघा एकदा त्याची चव चाखून बघा ||धृ|| कालपर्यंत कैरी होती पाडाची फांदीनंफांदी लगडली झाडाची आता दुसरीकडं नजर मारू नका एकदा त्याची चव चाखून बघा ||१|| आंबेबन आहे लई मोठं माझं गावामध्ये नाव आहे त्याचं वाडीत कधी येता ते सांगून टाका एकदा त्याची चव चाखून बघा ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/११/२०१०

माणुसकीचा झरा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 11/12/2010 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
माणुसकीचा झरा तो शोधात असतो माणसातल्या माणुसकीचा झरा त्याला भेटतात छान अशी माणसे प्रेमाने पाठीवरून हात फिरवणारी माणसे कारण तो एकटा आहे ह्या जगात एखादा भेटतो कपटी नाही असे नाही स्वार्थी .! मतलबी ..!! पण तो माफ करतो नि शोधत बसतो त्यांच्यातील चांगुलपणाला त्यांना पण देतो आपल्या मैत्रीचा सुगंध नि माफ करतो मनापासून त्यांच्यातील स्वार्थीपणाला कुणास ठाऊक कोठून आला हा त्याच्यात गुण कसा फुटला त्याच्या मनात ह्या माणुसकीचा झरा अशे त्याला खूप झरे सापडले डाक्टरच्या रूपाने मैत्रीच्या रूपाने ज्यांनी महारोग्यांना सुद्धा जवळ केले लाखो अंधासाठी आपले कसब लावले नि दिले दृष्टी हिरवी हिरवी
काव्यरस

आई .. मिटलेला श्वास.. १२

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 10/12/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आई .. मिटलेला श्वास..११ नदीचा सुन्न किनारा पाणी वाहतेय जपून ओल्या हिरव्या तनांवर निळसर घाव थबकून चांदणे हरवलेली सुनी खिन्न गर्भरात प्रतिबिंबित गहिरा रंग मनावर काळसर रंगहीन स्वप्नांचा धुसर स्तब्ध प्रवाह दिशाहीन नेत्रनजर अन निशब्द आठवांचे काहूर - शब्दमेघ

६: पाउलखुणा

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 10/12/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
५ : मी ..एक स्त्री प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत.. सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा आणि मागोवा कशाचा ?.. कश्यासाठी ... ? बहुदा तो आहे एक अखंड प्रवास एका प्रश्नमालिकेतून, दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्याचा माझ्यासारखीच गुरफ़टलेली ही रात्र आहे .. उद्यास्ताच्या रंगात न्हाऊनही काळवंडली आहे बिच्चारी माझे काय आहे मग त्यापुढे ?.. माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर माझ अस्तित्वच संपत चाललय .. पण तरिही या रात्रीच्या सोबतीनेच मी जगते आहे..

जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 10/12/2010 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत) राधा : जा रे कान्हा नटखट, तू सोड माझे मनगट मोडेन तुझी खोड कान्हा सारी रे मला समजू नको भोळीभाळी रे ......॥१॥ कृष्ण : तू मस्त मदनाची नार, गोमटी झुंजार बोलीचालीत अंगार सखे, भरला गं तुझ्या पदराला हात राधे धरला गं ...॥२॥ राधा : अधरी धरुनी पावा, का रे धून छेडीते? सुरांच्या लहरीने, धुंदी मज जडते नंदाच्या नंदलाला, रंगीला रंगलाला मुरलीचा मोह नच पाडी रे मला समजू नको भोळीभाळी रे ......॥३॥ कृष्ण : गार गार वारं वाहे, बहरिले अंग

कुणा कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा ??

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 10/12/2010 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाकुणाचा आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा ? अगदी लहानपणापासून डोक्यात होते शिकवणारे ,सल्ला देणारे पोटभर होते आमच्या आदर्शांचे बाबा जब्लिंग झाले ....! कुठला आदर्श समोर ठेवायचा ..? सगळे गणितच चुकीचे झाले ..!! तुम्ही कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला ? कृपया सांगाल का मला ? शाळेमध्ये गेलो नि मित्र आमचा आदर्श झाला ओठाचे वर्तुळ करून शीळ घालणारा लखू आमचा हिरो झाला कशी गिर गिर घालायचा मस्त शीळ कोठल्यातरी सिनेमाचे गाणे मस्त सोडायचा मस्त मस्त कसा स्वप्न बघायचा मान असा झटकायचा आम्ही बघतच बसायचो ओठ गोलगोल करून फक्त आम्ही हवाच सोडायचो शीळ अशी कधी घालता आलीच नाही मला मग तोंड पाडून आ
काव्यरस

अंगाई

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 10/12/2010 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
अंगाई - - - - - आठवतंय ना? मी गाडी चालवताना सावध बसायचास मुठी आवळून - दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून - - - - -
काव्यरस

तो कवी..ती कवियित्री..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 09/12/2010 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
तो कवी..ती कवियित्री.. ------------------------------------- तो कवी थोर बंडखोर..ती हळवी कवियित्री.. हात एकमेका हाती देवुन हसली मग नियती..
काव्यरस