कविता
कागदाचा कपटा
कागदाचा कपटा
मिश्र माध्यम.
मिश्र माध्यम...दाढी आणि खाज..
डिसक्लेमर :- आधी कधीतरी लिहिलेल्या काही कवितांपैकी ही माझी एक "खाजकविता".
काव्यरस
मी पुरुष बिच्चारा
समान संधी मध्ये आजच्या
मी पुरुष बिच्चारा
बस मध्ये चढलो, अन
रीकामी लेडिज सीट दिसली तरी
लोंबकळत तेथेच मी रहातो
वाटल्यास कंडक्टरला विच्चारा
ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो
धक्का तीचा लागतो, पण
विनाकारण ' लाईनमन' होऊन
मार मला खावा लागतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा
वाटत अस्स उठाव अन
निवडून याव आपण
नियम समान करावेत
स्त्री पुरुषांसाठीचे, पण
नेमके तेंव्हा तिथले सीट
स्त्री साठी राखीव असते
काय करणार मी पुरुष बिच्चारा
नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून
लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले
फ़ॉर्म ही भरला, पण
नियमानेच गळा कापला
३० % लेडिज reserved म्हणून
आमचा नंबर waiting list ला गेला
काय करणार मी पुरुष बिच्चारा
तरी
काव्यरस
भस्म्या
मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे.
>>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या
ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील.
काव्यरस
नाग !!
नाग जेव्हा सरपटत जातो
तेव्हा खरेच नाही कळत मला
की तो नाग आहे की साप आहे ?
तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ?
साप की नाग ?
कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..?
नि अचानक फणा काढताना ?
*****
सळसळ सळकताना विजेच्या वेगाने
नि फणा काढून जाभाड पसरताना ?
अगदी वीतभर फणा नि
पसरलेला आक्राळविक्राळ जबडा
एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि
मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात
नि जागच्या जागी कसे खिळून जातो
त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद
आपले प्राण त्याच्या हवाली करत ?
******
मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता
एका सरड्याला
हताशपणे ...!!
आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!!
मी बघितलाय ह्या त
काव्यरस
आई !!!
किती काळ गेला तुला जाऊन
तुझी आठवण येत नाही असे होत नाही.
पण तुझ्या आठवणीने
डोळ्यात पाणी येते असे पण आता होत नाही !!
काव्यरस
हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू !!
हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू
पंखावर मस्त रंगीत ठिपका
गिरकी घेत झुलत असते
फुलांच्या गंध भारल्या स्वप्नात
फुले खुणावतात फुलपाखराना
खुळावतात त्याला आपल्या मत्त गंधाने
फुलपाखरू धुंद ! मंत्रमुग्ध !!
खेचले जातात आपोआप नकळत
स्पर्श करते फुलांना फुलपाखरू
एक शहारा फुलाच्या रोमारोमात
अग आईग केवढा काटा फुलला
माझ्या गर्भ कोशात सरसरून !!
पाकळी पाकळी मत्त असते
रेशीम रेशीम मस्त मुलायम
पाकळीच्या स्पर्श सुखाने
फुलपाखरू जाते मत्त होऊन
आस कळीला जन्म घालण्यास
फुले जातात वेडात हरवून
नि ध्यान लागते फुलपाखराला
दोघेही जातात स्वप्नात हरवून ...!!!!
काव्यरस
विसर- भुकेचा
सौन्दर्या पुढे कधी कधी भूकेचा सुद्धा विसर पडू शकतो हे दाखवणारी काव्य-कथा.
नानाविध रंगांनी भरला
पुष्पसुगंधे साज बहरला
दवबिंदूंना लेऊनी सजला
आसमंत अमृते नाहला
फ़ूलपाखरे अहा नाचती
कणाकणाने मधू प्राशती
पराग प्रेमे वाटत सुटती
पुष्पावरुनी पुष्पावरती
मउ रेशमी झाल खुणावे
नारींगी पंखात झुलावे
घटकेसाठी शांत बसावे
चंचल हे भ्रमण विसरावे
बसुन मजेने पंख हलविले
फ़ुलपाखरू तिथे थबकले
लावण्याला फ़ुलही भुलले
उराउरी भेटण्या विसरले
जरा बागडून उडून जाई
फ़ुल अचलसे भुलुनी राही
भ्रमर अवचिते तेथे येई
नारींगी पदरात विसावी
फ़ूल येतसे भानावरती
क्षुधा उफ़ाळे आतुन वरती
आनंदे भ्रमरा अलिंगती
शोषुन जीवन भुक शमविती
मिसळपाव
अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका