Skip to main content

कविता

एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

लेखक झुम्बर यांनी गुरुवार, 05/08/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी तु आला अचानक बदलवून गेलास जन्मांतरी का तु दाखवले मला काट्यातही फुलती फुले वेदनाही माझी का अशी जी तुझ्यापाशीच खुले ग्रीष्मवेदना वेचताना का दाविल्या श्रावण सरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी आसवे ही सुख आणती अन सुखानेही येते रडे तुझ्या स्पर्शी कवितेलाही प्राजक्ती स्वप्न पडे अश्रुनाही का तु दिले कोंदण सुखाचे भरजरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी झोपलेल्या स्वप्नंफुलांना जाग आणली नवी वठून गेल्या फांदिलाही हुंकारली कोवळी पालवी का राखेतुनी घडवली पुन्हा मूर्त ही कारीगरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु भंगल्या
काव्यरस

चिंधी

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 05/08/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
चिंधी तू एक चिंधी, मी एक चिंधी, आपण सारे चिंधोट्या . असेच राहू धुळी मध्ये अन, उगाच मारू रेघोट्या | काळ मोकळा; काळ मोकळा, वेळ मोकळा जग ही भासे रिते रिते, अश्याच वेळी; स्वत: स्वत:ला उगाच अपुले मनही भिते | खरे खोटे अन चूक बरोबर, अशी मनाला खंत नको, आणिक व्यथित आठवणींचा उगाच ह्रदया डंख नको | म्हणुनी गड्या; म्हणुनी गड्या होऊनी चिंधी आपण होऊ निराकार , निर्जीव; निष्पाप गोष्टींचाही जगी या वापर अपरंपार | अपर्णा

दुरावा

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 04/08/2010 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिटून डोळे क्षणभर पाहून मग हा दुरावा जाता-जाता क्षणभर राहून मग हा दुरावा दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सांजवेळी क्षणभर भेटून मग हा दुरावा लाटेस भेटणारा किनारा शहारा चिंबचिंब क्षणभर भिजून मग हा दुरावा गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा भ्रमरासाठी नटून बसलेले फूल मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा एकाच खिडकीस न्याहळीत बसता दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा

“ घेतला वसा षंढतेचा ”

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 04/08/2010 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
“ घेतला वसा षंढतेचा ” आपल्याच लेकरांचे रक्त जेव्ह्ना सांडते, मातेचेहि उर तेव्ह्ना आक्रंदतांना फाटते “ सिमेपारचा ” दहशतवाद सोयीची भाषा असे, फोफावतो तो सर्वत्र येथे खंत त्याची आम्हा नसे . पाहतो उध्वस्त घरे, शहरे अन उष्ण रुधीरांचे सडे, तरीहि शिकवतो जगतां आम्ही षंढतेचे नैतिक धडे. पायघड्या पसरुनी अता स्वागत कसाबाचे करा, घेउनी षंढतेचा वसा, लांगुलचालन पाक्यांचे करा. . काय येवढे काश्मिराचे देश आपुला छोटा नसे, एक काश्मीर नाही म्हणोनी काय अडते फारसे ? निरंजन वहाळेकर

धागा धागा अखंड दळूया

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 04/08/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसांपासून मिपावर अनेक सुरेख चर्चा चालू आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत, विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे.. अनेक लोकांना आनंद झालेला आहे.. जुन्या मिपाच्या नावे उमाळे फुटू लागले..
काव्यरस

कंट्रोल झेड

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 03/08/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीतल्या नवरा बायकोंचं एकमेकाशी पटेनासं झालं काउन्सिलिंगला कपल शेवटी आमच्यापाशीच आलं (मी विचारलं, हं सांग रे लग्न कसं ठरलं? तो म्हणाला..) माझं सर्फींग चाललं होतं, ही विंडोत उभी दिसली सहज पिंग केलं तशी सांगतो काय गोड हसली आयडिया केली, आयडी शोधला, चॅटींगला इन्व्हाईट केलं डेटाफाईल डाउनलोड केली, सांगा काय वाईट केलं? फेसबुक, ऑर्कुट, हायफाय भेटी, मेसेज, मेल रोजच्या रोज कॉन्फिग्रेशन जुळतंय वाटलं, मॅरेजसाठी केलं प्रपोज (नंतर आमचं लग्न झालं...
काव्यरस

तंगड्यांवर तंगडे

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 03/08/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई, आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही, येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही। विचार करुन होते मनाची लाही लाही, किती सोसणार घाव आता माझी आई, किती अजुन २६/११, आपले म्हणुन सोसायचे। तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे? राष्ट्रर्पण

पराक्रमी असा मी : हझल

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 03/08/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
पराक्रमी असा मी : हझल माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो आधार लेखनीला खंबीर मेज आहे सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो? प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी अंधार ही अताशा संगे मलाच नेतो उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला, तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते नावात एक धागा का अभय आढळे तो?
काव्यरस

'मोगरा'

लेखक दिलीपकुमार यांनी सोमवार, 02/08/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज भल्या पहाटे , कुठुन हा मोगरा दरवळला. झोपेमध्येच डोळ्यासमोर , तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला. मग त्या सोनेरी किरणात , मी सर्वांगी न्हाऊन निघालो. तुझ्या मदहोश हसण्यामध्ये , नकळत स्वत:ला हरवुन गेलो. जेंव्हा पुर्ण जाग आली , तुझ्या गालावर खुलली होती लाली. खरं सांग प्रिये , ही करामत आपोआप झाली , की सकासकाळी माझ्या ओठांनी ,

“ म्याच फिक्सिंग “

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 02/08/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
“ म्याच फिक्सिंग “ अजय होतो आजवर हार नव्हती पाहिली, पाहिली ती बारबार इष्कात तुझिया पाहिली. विजयांत स्वजनांच्या अश्रू ढाळू ते आम्ही नव्हे, हर्ष विजयाचा तुझा हिराऊ तेहि आम्ही नव्हे. जिंकण्याचा आनन्द तुजला पराजित आम्ही ऎसे नसे, पाहण्या सदैव विजयी तुला “म्याच फिक्सिंग “ अमुचेच असे.. निरंजन वहाळेकर
काव्यरस