Skip to main content

कविता

मैत्री चिरायु होवो..a.k.a Long Live Friendship

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 01/08/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री चिरायु होवो..Long Live Friendship. येथील माझ्या सर्व मित्र मैत्रिंणींसाठी... --------------------------------------- नको सम्राटपट मजला नको इंद्रपद देवा.. मित्राचा हात सदा.. खांद्यावरती रहावा... नको स्वर्गीय अमृत मजला नको पंचपक्वान गोडधोड मित्रासोबत खाता लागे शिळी भाकर मजला गोड.. नको अफाट पैसा मजला.. नको गाडीबंगला काही... मैत्रीची लाभो श्रीमंती सदैव मजला.. बाकी मागणे काही नाही.. नको मानमरातब मजला.. मिरवणुकीची गर्दी नको ती.. डोळे मिटता न्यावे मजला.. मित्रांनी वाजतगाजत खांद्यावरती... Happy Friendhisp Day to All.! ---------योगेश जोशी.

ती......

लेखक सुभाष् अक्कावार यांनी शनिवार, 31/07/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मन आतुर झाले तेव्हा ती खूप दूर होती.... मग मी वायुवेगाने तिच्या दिशेने धावत गेलो.... ती तिथेच अजून निश्चल उभी असलेली पाहून माझे मन मोर झाले.... आता, पुढे होउन तिला कवेत घेणार तोच कळून चुकले की.. फाटत चालली आहे खाली धरती अन् तिच्या आसवांचा समुद्र रिता झाला आहे माझ्या या हातावरती...... - सुभाष अक्कावार, नाशिक.

एक पाहुणी पोरगी ...

लेखक वैभव देशमुख यांनी शनिवार, 31/07/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक पाहुणी पोरगी पाणी शेंदायला येते आणि जराश्या उन्हानं फूल पळसाचं होते कसे खुणावती डोळे कसे खुणावती हात जणू अंधार राहतो आजूबाजूच्या डोळ्यात आडापुढची खिडकी मुका हवेत सोडते आणि पाहुण्या पोरीच्या मनी मोहोळ फुटते ..सारा दीस आडावर तरी भरे ना घागर एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर.. वैभव देशमुख
Taxonomy upgrade extras

मातेचे ऋण

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 30/07/2010 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
A builder builded a temple he wrought it with grace & skill pillars & groins & arches all fashioned to work his will men said as the saw it's beauty, "it shall never know decay great is thy skill o builder! thy fame shall endure for aye!" A mother builded a temple with loving & infinite care planning each arch with patience lying each stone with prayer None praised her unceasing efforts none knew of her wonderous plan for the temple the mother builded was unseen by the eyes of man Gone is the builder's temple crumpled into the dust low lies each stately pillar food for consum
काव्यरस

कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/07/2010 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
अरे आमच्या कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही? आवडते म्हणूनी लोणी मागतो माझ्यासंगे गोपाळ फिरवीतो उगाच माझी खोडी काढूनी तुम्ही लोणी मज देत नाही कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? दही दुध शिंक्यात टांगले हाती माझ्या न लागे असे ठेवले संवंगड्यासवे काढाया जाता म्हणता दही मी चोरून खाई कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? पाणवठ्यावरी जाता स्नाना करीता उगाचच तुमची वस्त्रे विसरता न जाणोनी कोठे शोधीता आळ मजवर मग का घेई? कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०७/२०१०
काव्यरस

रक्त आटते, मन सुक्ते

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 30/07/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
रक्त आटते, मन सुकते, आपल्या राष्ट्रात आपणच स्वस्त। त्यांच्या सांभाळा संवेदना, झाकुन आपल्या वेदना। वंदेमातरम् नको, गुरुला फाशी नको। समान कायदा नको, काश्मिरात पंडीत नको। तरीही तोंडे ह्यांची’, मक्के कडे सदाची।

ती स्वप्नसुंदरी

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 29/07/2010 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
ती स्वप्नसुंदरी सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी जोपासतो अशी ही आम्ही समानता राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी जोडे सजावटीला एसी-कपाट ते भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका भैरू अजून खातो कांदा नि भाकरी जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी खेड्याकडून जावे शहराकडे जसे आकार घटत चोळी, जाते सरासरी शेती करून मालक होणेच मुर्खता सन्मान मोल आहे कर अभय चाकरी गंगाधर मुटे ………………………………….……

संस्थळी प्रतिसाद देता

लेखक शुचि यांनी गुरुवार, 29/07/2010 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म जय जय रघुवीर समर्थ च्या चालीवर - संस्थळी प्रतिसाद देता सौजन्य सांडूनच चाला महाभारत होते सौजन्य सांडता फुकाचे शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
काव्यरस

माझी जन्माची शिदोरी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 28/07/2010 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या श्वासांचा विळखा तुझ्या नजरेची मिठी तुला पाहता लाजून झुके पावलांशी दिठी तुझे मौनही बोलके, गूज डोळ्यांनी सांगते भाव जाणून त्यातले गीत मनात रंगते दुराव्यात जवळीक जपणारी तुझी प्रीत तिचा अनाहत नाद, तिचे स्वर्गीय संगीत तिची अवीट माधुरी स्वप्न जागवी बिलोरी तुझी क्षणांची संगत माझी जन्माची शिदोरी
काव्यरस