Skip to main content

कविता

मी पहात होतो दूर...

लेखक भारतीय यांनी शनिवार, 24/07/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
तसा काव्याच्या प्रांतात मी नवशिक्याच.. जमेल तशी केलीय, चू.भू.दे.घे. मी पहात होतो दूर, तू दिलास मजला सूर, लावलीस मला हुरहूर, मी पहात होतो दूर.. मीच होतो मूढ, की तूच होती शूर, तू केलस मला चूर, मी पहात होतो दूर.. तुझा होता वेगळाच नूर, माझ्या भावनांना आला पूर, तू छेडलास माझा सूर, मी पहात होतो दूर.. तू आलीस जवळ पुरेपूर, सांग माझा काय कसूर, लावलीस मला हुरहूर, मी पहात होतो दूर.. तू पलटविलास तूझा नूर, केलस मला भेसूर, मी पहात होतो दूर.... तू... तू ऊडुन गेलीस भूर्र्....
काव्यरस

फिनिक्स

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 24/07/2010 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स इश्क जरी दाहक आग ही खेळ विस्तवाशी मांडला, राख जाहलो तरीहि डाव अर्ध्यावर ना सोडला. मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. निरंजन वहाळेकर
काव्यरस

लावणी : आसं कसं वो तुमी मर्द गडी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/07/2010 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
आसं कसं वो तुमी मर्द गडी
{{{कानडाऊ योगेशु वदला तू लावणी लिहायची फर्माईश केलीस तू पाषाणाने लिहीली लावणी आनंदाने वाचन करा आस्वाद घ्या तुम्ही सारे}}}
काव्यरस

देवा एक माझे | पुरवावे कोड |

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 22/07/2010 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
देवा एक माझे | पुरवावे कोड | तुझे माझे आड | नको काही || नको कर्म कांड | नको ब्रह्म माया | येर झार वाया | संसाराची || नको बडिवार | सोवळे ओवळे | तेणे ना आकळे | सत्य तत्त्व || देवा ऐसे द्यावे | मज वरदान | नामानुसंधान | राहो सदा || तुझी श्याम मूर्ती | सदा राहो चित्ती | आणि सर्व वृत्ती | तुझे पाशी || सदाचा सन्नीध | माझ्या देव आहे | प्रेमे मज पाहे | ऐसे व्हावे || अलोट ते सुख | तुज मी स्मरावे | अंतरी राखावे | समचरण || प्रेम सागराचा | पूर तुझे दारी | सर्वत्र श्री-हरी | बाकी काय || -- सागर लहरी २२.७.२०१०

नका जावू अशा पावसात

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
नका जावू अशा पावसात
सिच्यूऐशन: रातीचा पाउस पडूं र्‍हायलाय आन हिरो पहारा करायच्या डुटीला जावूं र्‍हायलाय......
भर रातीचं आभाळ फाटलं मनी काहूर काळजीचं दाटलं येळीअवेळी बाहेर पडता जीवा घोर लागं कारभारी....नका जावू अशा पावसात ||धृ|| उगा काळजी लागं दिसभर पडं संततधार रातीलाही नाही उतार घरातच र्‍हावा तुमी माझ्यासंगती घ्यावं मला उबार्‍यात कारभारी नका जावू पावसात ||१|| रातीला तुमी डुटीला* जाता उलटी सारी कामं करता एकलीचा माझा येळ जाईना कशी काढू मी रात कारभारी नका जावू पावसात
काव्यरस

नव्या वर्षाची गुढी उभारू चला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या वर्षाची गुढी उभारू चला
फाल्गून सरला चैत्री पाडवा आला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||धृ|| नऊवार साडी चौरंगी खण काठी धुवून टाका बांधून लिंबाचा पाला हारकड्याने सजवू धजवू तिला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||१|| शुभमुहूर्त असे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शुभ काळ असे नव्या कार्यरंभाचा पाने आंब्याची फुले झेंडूची घेवून तोरण लावू दाराला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||२|| धरती नटली चैत्रपालवी घरात सजली गृहलक्ष्मी विसरा १ जानेवारीच्या वेड्या जल्लोशाला सण मराठी वर्षारंभाचा
काव्यरस

आठवण आणि ……

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 22/07/2010 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण आणि …… वादळ, वारा, पावसातहि भेटीस येणे अपूर्व होते, प्रीतिचे ते क्षण उन्मादी मनांत माझ्या ठसले होते प्रेमकहाणी विफल आपुली प्रारब्धाचे देणे होते, विधिलिखित हे भालीचे त्या समयी मज कळले नव्हते. निशब्द अधिकार तुजवर बिम्बवित मी गेलो नसतो, स्वप्न मोगरा फुलवीत मनींचा सुगंधित मी जाहलो नसतो. जीर्ण घराच्या मज भिंतीवरची तसविर तुझी चिरतरुण आहे, गाली खळी अन ओठ गुलाबी त्यांत आजहि तसेच आहे निरंजन वहाळेकर
काव्यरस

पाऊस आला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस आला
पाऊस आला पाऊस आला पडू लागल्या धारा थेंबांच्या नक्षीला साथ द्याया धावे अवखळ वारा || अलगद हलक्या सरी येवूनी सुरू होतसे वर्षाव वेग वाढूनी जोर येतसे धारेला नसतो ठाव क्षणात ओली होई धरती पडता असंख्य धारा ||१|| नभातून तुषारांचे पडती बारीक बारीक थेंब धरती होईल हिरवी अवघी लेवूनी हिरवे कोंब हिरवाईची किमया होईल निसर्ग बदलेल सारा ||२|| - पाषाणभेद १७/०७/२०१०
काव्यरस

हा तोच किनारा फिरतो मी

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 22/07/2010 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
उजव्या बाजुस गजबजणारी तीच गाज घुमते अरबी हा तोच किनारा फिरतो मी ।।धृ।। दगडावरती झोकुन सारे वार्‍यामनिचे गुपित खारे लेउन लाटा उधळण करती तीच तुषारांची धुंदी ।।१।। तोच दिवस त्या महिन्याचाही तोच कोन त्या किरणांचाही परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।। धरून ऐना कुंद हवेला तनामनाने हिरवुन गेला तसा न सागर आज सांगतो जन्मजन्मीच्या गुजगोष्टी ।।३।। केसांमधल्या लाटा सारत शब्दहासरे तुषार बरसत उजव्या बाजुस गाज रोखुनि चालत तू ना मजसाथी ।।४।। काय बोललो तेव्हा आपण कसे कुठे अन गेले ते क्षण मनात ओल्या रेतीवरच्या त्याच खुणा धरल्या जपुनी ।।५।। डाव्या बाजुस गाज अता ही सूर्यास्ताची सरते तरिही ज
काव्यरस

(अवलिया रुप)

लेखक केसुरंगा यांनी गुरुवार, 22/07/2010 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा क्रान्तियांची सुरेख रचना अरूपाचे रूप आणि हरिकथेतील कीर्तनकुमार परा यांचे अवलियाचे रूप> "अवलिया" रूप। अवांतर खूप पाध्ये देई चोप । वारंवार कंटकांचेपाठी । रोजपडेकाठी उभा पाध्येजेठी । चौपाटीत मिपाचा कैवारी । साळसूद वरी खर्डी व्यनी करी । संपादका परात्पर गुरु । नाना कैवारु सहजची उद्धरु । धागे काही मायबाप, भ्राता । तूच सखा, त्राता घे रे नीलकांता । सुदर्शन केसुरंगा
काव्यरस