Skip to main content

कविता

मी न माझा………

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 15/07/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी न माझा……… गुंतलो इतुका ईश्कांत तुझिया राहिलो अता मी माझाच नाही. आभासत नाही ज्या गंधात तू, तो गंध मज मोहीत नाही. जी वाट जात नाही तुज घरां, वाटेवरून त्या मी जात नाही. ज्या फुलांत ना कोमलता तुजसम, ती फुले मी वेचीत नाही. हृदय वेदना ज्यां नं जाणवती तुला, वेदनाचे अशा मज दुखः नाही. भेटली आताच पाहिले डोळे भरुनी, विरहाचे आता मला दुखः नाही. सामावली श्वासांत, रंध्रा रंध्रात तू, अस्तित्व मजला तुजवीण नाही निरंजन वहाळेकर

कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/07/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ|| वाटे जीवन आता हे सारे आले संपुष्टात | नश्वर शरीर हे आत्मा कसा राहील त्यात सांभाळू काय कसे मला न समजेना | शेवटचे भेट मला हे ही बोलवेना ||१|| कधी काळी आठवण जरी माझी आली | नकोस भेटू कसे म्हणू मी त्या वेळी हुरहुर लागे नेहमी माझ्या जीवा | आठवणी जुन्या साधती कावा ||२|| पावसाचे थेंब जेव्हा सोडतात मेघांना | हुरहुर लागते तेव्हा त्यांना तशीच हुरहुर लागली मला तेव्हा | सोडून गेलीस जेव्हा तू
काव्यरस

नाव सुचत नाही.

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 15/07/2010 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
पसरुनी दो बाहु, फांद्यावरी, अविरत वणवा साहिला, शहारा पाठी सारीत; गात्री, संतंत धार वर्षा झेलला । नजर न वळली कधी तुजवरुन, कधी न श्वास तुजविण फुलला, का न कळे या मनास माझ्या; ध्यास तुझा असा जडला । फुलवेल मी... फुलवेल मी; फूलणे न फुलणे, माझ्या हाती नसे, जरी मनास न भावले; तरी मातीशी ईमान असे । उपटुनी जरी परत रोवीली रुजणे माझा धर्म. धन्यास परतुन ; ओंजळी भरुन, स्वतःस लुटणे, हे कर्म!! अपर्णाअक्षय.

शून्य

लेखक sur_nair यांनी गुरुवार, 15/07/2010 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
शून्य शून्य गाव शून्य वस्ती शून्य झाडे शून्य घरटी शून्य खिडक्या शून्य दारे शून्य भिंती शून्य वारे शून्य दिवा शून्य वाती शून्य पणती शून्य ज्योती शून्य शब्द शून्य अर्थ शून्य ओळी शून्य पानी शून्य डोळे शून्य आसू शून्य गाली शून्य हासू शून्य अधिक शून्य वजा शून्य हाती शून्य बाकी शून्य जगतो शून्य आम्ही शून्य सारे शून्य मीही सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस

एक फार्सी गज़ल.....मिर्झा महम्मद हसन ( कातिल )

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 14/07/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर ही गज़ल पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या. सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक !

स्वप्नी माझ्या आलीस तू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/07/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नी माझ्या आलीस तू
स्वप्नी माझ्या आलीस तू हळूच हसून लाजलीस तू कितीक दिसांनी झोप आली मला जागेपणी विसरलो जगाला न दिसे दुसरे काही दिसशी मजला तू रात्र माझी धुंदीत आली वेड्या मनाला समाजावून गेली स्वप्नाच्या वाटेने जातांना वाटेत भेटलीस तू होईल माझे स्वप्न का खरे भेटून सगळे सांग मला बरे विसरू नको आता काही प्रितीचे शब्द बोल तू - पाषाणभेद (दगडफोड्या) १४/०७/२०१०
काव्यरस

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा राहीला सीमाभागी वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ|| दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे विचार नको करू, नको मनामधे झुरू समजू नको अभागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१|| आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू जरी लाठ्या डोक्यास लागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२|| जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल झालो मोठे त्य
काव्यरस

काही राहीलेले

लेखक पंचम यांनी सोमवार, 12/07/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
काही राहीलेले....span> ते सर्व राहीले मागे जे काट्यात उमलले होते... फक्त पाकळ्या हातात गंध श्वासात राहीले होते... मी शोधल्यात ज्या मातीत काही ओळखीच्या पाऊलखुणा त्या मातीत जणू आता आभास राहीले होते..... मी सावरू न शकलो तू निघून गेल्यावर... त्या सावलीच्या मागे काही आघात राहीले होते...... बरेच काही सांगायचे होते तुला निघुन जाण्याआधी कविता पुर्ण झाली. तरी शब्द राहिले होते ;">-पंचम

सद्गुरू माउली

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 11/07/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
अजपाचे संगती | एकारली वृत्ती | ठाके सीता-पती | सन्निधानी || स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी | लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती || आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा | दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी || नाम जप गोडी | जरी लाभे थोडी | साधने तोकडी | बाकी होती || याजन याजन | दान तीर्थाटन | सद्गुरुवाचोन | शून्य होय || सद्गुरू माउली | देई नाम साउली | तेणे लोभावली | जिव्हा माझी || सागर लहरी - ११.७.२०१०