Skip to main content

कविता

माते अंबे भवानी नमितो जिजा-बाई (राजमाता जिजाउंचे पुण्य स्मरण )

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 06/07/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
माते अंबे भवानी नमितो जिजा-बाई :- माता महान कितीही झाल्या संसारी | दिव्य चरित्र परी तुझे त्या तुलना नाही | माते अंबे भवानी नमितो जिजा बाई | पुनश्च शिव भारत घडण्या उद्धारा येई || भ्रमली रयत हि सारी भुलली अभिमाना | भ्याले जन-पती सारे पहावया रणा | स्वार्थी मदांध होऊन भुलले शिव राणा | माते तुजवाचून आता स्मरावे कोणा || जन हे समस्त वानिती शिवबा परतावा | छाये वाचून तुझिया तो कैसा व्हावा ? हिंदू अनन्य शरण त्या उद्धार द्यावा | धर्म-शक्ती-सागर शिवबा पुन्हा निर्मावा || -- सागर लहरी ०६-०७-२०१०

गाणे : असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/07/2010 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी मराठी वरच्या "गाण्याच्या-यशामधले-संगीत-संयोजकाचे-योगदान" या धाग्यावरून मला खालील गाणे करता आले. ( हे गीत येथे देतांना त्याची लिंक संकेतस्थळ अ‍ॅक्सेस होत नसल्याने देवू शकत नाही.
काव्यरस

एकदा होवोनी पक्षी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/07/2010 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा होवोनी पक्षी
वाटे एकदा होवोनी पक्षी पहावी शेते डोंगर नद्यांची नक्षी उंचच उंच जावे वरती वरती अलगद उतरावे धरणीवरती हळूच आपले पंख पसरूनी घास शोधावा हिरव्या रानी शोधावा पाणवठा निर्मळ शितल प्यावे पाणी थंडगार नितळ मध्येच एखाद्या झाडावर थांबावे विश्रांती घ्यावी पंख झाडावे चोचीने फळ एखादे तोडावे मनात येईल तेव्हा उडावे दिवसभर असेच फिरावे सायंकाळी पुन्हा माघारी यावे घरचे सारे पुन्हा भेटावे काय घडले दिवसभरात ते सांगावे - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०७/२०१०
काव्यरस

वादळ वळवाचे

लेखक धनंजय यांनी सोमवार, 05/07/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ वळवाचे - - - - - वादळ वळवाचे ना धड पोसते ना धड नासते . नि झाड झोडलेले ना धड वाकले ना धड मोडले - - - - -

देवा ढळो नेदी | माझी चित्त वृत्ती |

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
देवा ढळो नेदी | माझी चित्त वृत्ती | सदा पाहो दिठी | रूप तुझे || कष्टी हा संसार | व्यथाही अपार | तरावया पार | हात दे गा || कर्तव्य स्मरून | राखावे ते धन | परी अंत: करण| तुज पाशी || कटू बोल घेता | स्थिर ठेवी चित्ता | तव नाम घेता | शांत करी || देवा तुझे चरणी | आलो सर्व हरोनी | मज दया करोनी | सांभाळावे || - सागर लहरी २५.६.२०१०

एक जुना मित्र भेटला ..

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज एक जुना मित्र भेटला .. गर्क स्वत:शी... पहात हसत राहिला जुने जुने.. सुने काही.. धुळी मधे गिरवत राहीला .. बरेच बोललो बसून दोघे .. बोललो दोघे स्वत:शी ... वाट पुढे धावणारी पुन्हा जुन्या वळणाशी .. हळवे शांत डोळे त्याचे .. वेडेपणाची झाक जराशी ... धुळी मधले नाव पाहून... मीही हसलो स्वत:शी... मीही हसलो स्वत:शी...

गे कविते

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
गे कविते आज थोडा, दर्द ओला सजवून ये , मैफिलीचा रंग गहिरा, गर्द डोळां भिजवून ये .. १ बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी , चार गोष्टी अंतरीच्या, या जगा सुचवून ये.. २ कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या, वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३ -- सागर लहरी २२.२.२०१०

शॄंगार

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 04/07/2010 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलेले चिंबुन केस चुंबून सखे मोहरतो ओलेती झालिस तू, अन् न्हाऊन मनी मी निघतो डोळ्यातिल काजळ रेखा काळजात मी गिरवीतो शृंगार तुझा होतो अन् रंगून आत मी निघतो मलमली ओढणी मधला गंधार मनी घुमघुमतो नक्षीत बिलोरि तिच्या मी माझेच बिंब पाहातो काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो
काव्यरस

प्रलय

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 03/07/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रलय......... " येते “ म्हणून सांगून गेली, परतुनी ना आली पुन्हा. वाट पाहुनी जीव शिणला, दाटल्या अन्तरी यातना. परतीच्या वाटेवर तुझ्या, सजविला आसवांचा ताटवा . जाहले निर्माल्य त्याचे, येशील तू केधवा ? अनमोल निर्माल्य हे गंगेत कुठल्या वाहवू ? महापुराचा प्रलय नंतर, एकला कसा मी थोपवू ? निरंजन वहाळेकर
काव्यरस

उगाच काहितरी

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 02/07/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुखवट्याचा देखावा करून मनात आनंदाच्या उकळ्या फुटाव्या तसेच काहीसे झाले आहे फुर्रर्र्र फुर्र्रर्र्र्र फुर्र्र्रर्र्र्र सुंसुंसुंसुंसुंसुंसुंसुं नुसताच सर्टिफिकेटचा कागद घेऊन डोक्यात मात्र काहीच नसावे असेच काहीसे झाले आहे कुंडीत टोम्याटोचे झाड लाऊन टरबूज यावा अशी अपेक्षा करावी का पण असेच काहीसे झाले आहे हृदयात धडधड होऊन प्रेमाच्या ऐवजी हार्ट आट्याक यावा असेच काहीसे झाले आहे प्रेमाचा वॉलपेपर लावून आपले हित साधावे असेच काहीसे झाले आहे सुरुवातच कडू कडू केल्यावर शेवट तरी कसा गोड गोड होणार तसे करायची इच्छा मात्र होत आहे अशीच कडवाहट ठेवली तर आम्ही नाही ज्ज्ज्जा !!! ----------------------------
काव्यरस