Skip to main content

कविता

मंद जाहल्या तारका.....

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 28/07/2010 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मंद जाहल्या तारका....... मंतरलेले दिवस ते चंद्र होता साक्षीला, पुनवेच्या राती रुपेरी प्रेमरंगी तुजसवे नाहल्या. रात्र होती तरुण अन यौवनी मी तुजसवे, मोरपंखी मधुर स्वप्नात तू गंध रातराणीचा दरवळे. मदहोश मी, बेधुद तू चंद्र मजकवे सामावला, हलकेच डोकाउनी नभातून तारकाहि गाली लाजल्या. आजही रात्र तैसीच आहे गंध तोच रातराणीचा दरवळे ? ? ? ? ? ? ? चंद्र नाही आज मजकवे तारकाहि मंदावल्या.नभीच्या निरंजन वहाळेकर
काव्यरस

माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/07/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा पडती मनामधी तुफानी पाउस धारा ||धृ|| लाटांवर लाट येई उंच उसळून तालात त्यांच्या घेई मला लपेटून भरती आली माझ्या मनाच्या समिंदराला माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||१|| भरल्या वादळी नाव वल्हवू मी कशी माझ्या होडीची वल्ह दिली तुझ्या हाती जोशात हाक नाव पोचव सागर तीराला माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
काव्यरस

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 27/07/2010 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !! चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !! जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे जे काही करे ते अंधारात करे उजेडात मात्र इज्जतीले मरे आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ......
काव्यरस

(प्रार्थना)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 26/07/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
यशोधराचे 'प्रार्थना' हे अप्रतिम छंद्काव्य वाचून आम्हाला काही छंद आठवले नसते तरच नवल. सादर आहे ;) ठेवतो अपेक्षा मिळेल दर्शन जिन्यात लपेन आज तुझ्या.. एकाएकी तुझे प्रकटती तात कैसे बोलतात अरे चोरा!... फोकलाया पाठी काठी बाभळीची कन्यका तुमची माझी ताई!... अवकळा उरे 'सरली' जाणीव उरली नेणीव आवर रे... छंदः परद्वार चतुरंग
काव्यरस

हातचा

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 26/07/2010 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
हातचा =============== . . हाती अर्धाच प्याला, म्हणता सौख्य कळेना.. अवीट जीवन गोडवा, मग जिभेवरी रुळेना.. . स्वीकार मीच न केला, माझ्या अपूर्णतेचा.. आसवांच्या अंध धारा, राहिल्या देत ठेचा.. . हाती अर्धाच प्याला, जो तो बघे रिकामा.. धडपडा जीव "वेडा", हताश नि निकामा.. . जन्म आशा निराशा, मन आंदोल साहवेना.. हातचा आधार विसरता, जीवनी संघर्ष चुकेना.. . हाती अर्धाच प्याला, म्हणता सौख्य कळेना.. हा सोहळा असण्याचा, हृदयांतरी खुलेना..! . बेरजेत मोजावयाचा, हातचा राहून गेला.. जोडून त्यास घेता, गोषवारा नवाच आला.. . हाती अर्धा (च) प्याला, कोट कोट सुखाचा...! हाती अर्धा (च) प्याला, काठो-काठ सुखाचा...! . . ==========

माहेराची आटवण येई

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/07/2010 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
माहेराची आटवण येई
आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ|| बाच्या मळ्यामंदी पिंपळाला बांधला झोका पुढं जाई मागं येई चुके काळजाचा ठोका पति संग बांधलं मन, इथं झुल्याला जागा न्हाई झोक्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||१|| भाऊ मुद्दामच बांधे झोका वरच्या फांदीला सुर जाई लांब मोठा जवा राही मैत्रीण जोडीला इथं मोठ्या शेहरात नावालाही सोबत न्हाई झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||२|| बरोबरीच्या पोरींसंगे खेळायाची सागरगोटी जिंकाया
काव्यरस

माझे बाबा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/07/2010 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बाबा
बंडू म्हणाला माझे बाबा ताकदवान ऑफीसात सारे झुकवतात मान राम म्हणाला माझे बाबा आहेत मस्त ४ डिश भेळपुरी करतात फस्त शाम म्हणाला माझे बाबा करतात मस्ती मातीमधली जिंकतात कुस्ती खंडू म्हणाला माझे बाबा शेतकरी शेतात जावून उसाला पाणी भरी राणी म्हणाला माझे बाबा गॅरेजमधे जातात स्कुटर कारचे ऑपरेशन करतात चित्रा म्हणाली माझे बाबा डॉक्टर पण नाटकात असतात अ‍ॅक्टर सुंदर म्हणाला माझे बाबा आहेत बिल्डर क्रिकेटमध्ये सर्वात बेस्ट फिल्डर चिनू म्हणाला माझे बाबा शाळेत शिक्षक लेख कविता नाटकांचे करतात परिक्षण गणू रडत

पाउस आला पाउस आला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 25/07/2010 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस आला पाउस आला
घंटा वाजली सुटली शाळा पाउस आला पाउस आला || दप्तराचे मोठे ओझे झाले वह्या पुस्तके भिजून गेले खांद्यावरतून फेकून देवू भरभर सारे घरी पळा पाउस आला पाउस आला || पुर आलेल्या ओढी जावू पुलावरूनी पुर पाहू उगाच जावूनी काठावरती ओढ पाण्याची पाहू चला पाउस आला पाउस आला || छत्री बित्री नकाच घेवू चिंब भिजाया घरीच ठेवू चिखलाचे सारे पाणी खेळा पाउस आला पाउस आला || * मिपा वरील हे माझे २०० वे टंकन होते.
काव्यरस

अरे देवा मी काही सुखी नाही

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 24/07/2010 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
अरे देवा मी काही सुखी नाही
नवरा आहे मुलं आहेत घरदार भरलेलं आहे तरीही मन रमत नाही अरे देवा मी काही सुखी नाही || अंधेरीला प्लॅट आहे पाली हिलला बंगला आहे सजवलेला एसी बेडरूम आहे वॉटरबेडशिवाय मला झोप येतच नाही अरे देवा मी काही सुखी नाही || नोकर आहे चाकर आहे स्वयंपाकासाठी मावशी आहे नावाला भाजीची फोडणी मी देई अरे देवा मी काही सुखी नाही || टिव्ही आहे डिव्हीडी आहे झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे तरीही करमणूक कशी नाही अरे देवा मी काही सुखी नाही