Skip to main content

कविता

"माय"

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 03/06/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधीमधी उगाचच वाटत राहतं, आपणही आभाळ व्हायला हवं होतं.. मायच्या फाटक्या नशीबावर, फाटकं का होईना.. पांघरुण व्हायला हवं होतं. पापणी होऊन अलगद, तिच्या आसवांना झेलायला हवं होतं.. तिच्या आयुष्यातल्या अंधारावर, चांदणी होवुन का होईना .. भरपुर पाझरायला हवं होतं. तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर, जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं.. राहुन राहुन मन खंतावतंय, एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन.. मनसोक्त रडायला हवं होतं. विशाल.

माझं काय चुकलं...?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 03/06/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतं अजुनही .... आपलं ते... कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटणं. तुझं पुन्हा पुन्हा, मान वळवून बघणं... आणि उधारीवर घेतलेल्या... सिगारेटच्या धुरात, माझं डोळ्यातलं पाणी दडवणं. तु विचारलं होतस का रे?

परब्रह्म

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 02/06/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
परब्रह्म विटेवरी | दोन्ही कर कटेवरी वाट भक्ताची पाहतो | देव पुंडलिकादारी संत जनाईच्या घरी | दळण कांडण करी ओव्या गातो भक्तासंगे | भावाचा भुकेला हरी देव एकनाथाघरी | कावडीने पाणी भरी सांभाळितो चोखोबाची | गुरे सावळा मुरारी तुक्याचे अभंग तारी | कान्होपात्रेला उद्धारी निवृत्ति, सोपान, मुक्ता| ज्ञानियाचा हात धरी दुमदुमली पंढरी | रिंगणात वारकरी नित्यनेमाने चालते | आषाढी कार्तिकी वारी संत मी ना वारकरी | आळविते तुला तरी आस मुक्तीची घेऊन | आले देवा तुझ्या दारी

कावळा आणि चिमणी

लेखक अनामिक यांनी सोमवार, 01/06/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
खालची कविता माझ्या भाचीसाठी मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे. (काही बदल सुचवता आले तर नक्की सुचवा).

विरह

लेखक अरुण वडुलेकर यांनी सोमवार, 01/06/2009 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या हिरव्या वनांत या जरि पानोपानी छाया ग, दृष्टि समोरी तूंच नाहि तर हिरवळ डोळां जाळी ग | सहा रसांचे स्वाद लेऊनी अमृत जरि मम पात्रीं ग, घांस द्यावया तूंच नाहि तर ठसका कंठी रुतला ग | फुलापरी ही कोमल शय्या जरी निरव या रात्री ग, स्पर्शावाचुनि मोरपिशी तव उरांत भडका उठला ग |
Taxonomy upgrade extras

वर्णन (तमाशातले सवाल जबाब): पुन्हा लेखन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/06/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
वर्णन (पुन्हा लेखन) (जुने वर्णन येथे आहे) (चालः तमाशातले सवाल जबाब) (सवाल जबाबात प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतो. प्रस्तुत सवाल जबाबात तो आणि ती एकमेकांची स्तुती करतात.) तो: अटकर बांधा गोरा गोरा खांदा ss पदर उडतोय वार्‍यावर चवळीची तू शेंग शेलाटी लवलव लवलव करती गss ग ग ग गss कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया...
Taxonomy upgrade extras

झाले गेले विसरुनी जाऊन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/06/2009 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
झाले गेले विसरुनी जाऊन झाले गेले विसरुनी जाऊन, सांग तू माफ करशील का? करशील का? || ध्रु || न जुळू शकल्या आपूल्या तारा न फुलू शकला मनमोर पिसारा माणूस म्हणूनी ओळखशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || १ || उलटे सुलटे पडले फासे दान दैवाचे हातात न गवसे रिते हात पकडशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || २ || न लागली मेंदी हाती न लागले कुंकू माथी अखेरचे तू बघशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || ३ || - पाषाणभेद
Taxonomy upgrade extras

मनात वसलेला गुलमोहर

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 01/06/2009 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हात लखलखणारे झुंबर मनात वसलेला गुलमोहर नजर खिळवुनी जिकडेतिकडे नजरबंदिचा खेळ खेळतो लाल तांबडे शेले उडवित हिरव्या छायेतुन सळसळतो गारुड याचे चराचरावर कधि पानांच्या पडद्याआडुन हळूच हसतो लाल तजेला कधि तेजाचे पलिते घेउन फुलांनीच हा रसरसलेला वैशाखाचा घुमवित जागर घरी, अंगणी, वाटेवरती कुठे माळरानी एकांती तप्त उन्हाच्या काहिलीतही मोहरलेली याची कांती पायांखाली कुंकुम-केशर
Taxonomy upgrade extras

|| शिवराज्याभिषेक ||

लेखक मनीषा यांनी सोमवार, 01/06/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
काजळल्या रात्री - आशंकित गात्री उसासे ही धात्री - भयभीत । गोठलेले जिणे - बंध हे पडले कोडे हे कसले - ईश्वरास । दुर्दैवी पखाली - दैन्यही सामोरी कावड अंधारी - काळ वाही । अस्मानी, सुल्तानी - घोर हा जीवासी नसे आसराही - कोणा येथे । करपली भूमी - उजाड ही सृष्टी ओसाड ही वस्ती -खिन्न शांत । तेज ते उजळे - काळोख्या गर्भात आस ही नेत्रात - वसुधेच्या । स्वये भाग्य लक्ष्मी - बळ ते सावरी माळराना वरी - अवतरी । शपथ ग्रहण - करिती प्रमाण राष्ट्रास्तव प्राण - देऊ आम्ही । शृंखला दास्याच्या - गळोनी पडती बंध हे तुटती - अमानुष । निजाम, आदिल - ही कुतुबशाही मात अ

टाहो

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 31/05/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
तडकलेला माळ जळणारं रान फेसाळता धुराळा धुराळ्याच्या थारोळ्यांत टळटळीत उन्हाचं मी न्हाणं घेतोय ! गाठुळलेल्या बुंध्यावर ठणकणार्‍या सांध्यांवर सोलावलेली साल तराटलेल्या फांद्यांवर लटकणार्‍या कबंधागत मी टाहो फोडतोय ! शिशिर-बहर चक्राच्या नि वैशाख ज्वाळांचा हा सदाचा आवर्त नाही. मृगजळांच्या मागे जात माझा मलाच मी भ
Taxonomy upgrade extras