Skip to main content

कविता

सुख

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 26/05/2009 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक पाडली... सखे तव चुंबनाची पहिल्या थरथर अलगद सरते आहे मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... हळुवार ती मिलनाची धुंदी अंग अंग मोहरते आहे सर सर झर झर उनाड वारा गात्रांत शिरशिरी भरते आहे. क्षण एक सखे अन तृप्तीचा तन मन सुखे पाझरते आहे अंकुर फुलले अंगांगावर..,नी सुखात मन गुदमरते आहे. विशाल.

रात्र

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 26/05/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या काळ्याशार कुंतलांप्रमाणे विखुरलेली ती कृष्णा... ती निशा चित्रकाराने एखादं सुंदर चित्र रेखाटावं आणि मग ... त्याला दृष्ट लागु नये म्हणुन काळा रंग देण्याचा दुष्टावा करावा तशी त्या जगन्नियंत्याने ..निसर्गाने... स्वसौंदर्याचा बचाव करण्यासाठीच जणु निर्मीलेली ....

((चंपी))

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 26/05/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
चंपी श्वान कुत्तरा निखळ जात ही भुंके सदानकदा भुकेचे उसासे केकाटून गेले हाडूक जिव्हारी लागून मेले रस्त्यातूनी जाताजाता काय मनाला हरखून गेले लडबडत्या पुच्छा मागे मित्र करिती भाद्रपद चाळे.. भुंकून भुंकून दातपिसून गुरगुराटी स्वरनक्षी केली हिंस्त्र ठसे चाव्यांचे युद्धाचे क्षण वागवती झाली कुत्री म्हणॉनी हिणवी कोणी दगड मारी पेकाटी जीणे जगणे लाजीरवाणे ; संसार मांडते रस्तोरस्ती निळ्याजांभळ्या जिभा काढते हातभर पाहून पाव बिस्कुटी रस्त्यातच फिरेन रस्त्यातच मिटेन एका चाकाखाली क्षणी एका होत्याची नव्हती होईन ; शांत आकांत होईल हडुत हुडूत मधुनी सुटेन मी धाकटी चंपी
Taxonomy upgrade extras

(चंपी)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 26/05/2009 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
देवाशपथ! शरदिनी ह्यांची 'चंपी' वाचून माझी अक्षरश: चंपी झाली आणि मग बधिरल्या मेंदूला काही सुचेना. पण काय चमत्कार थोड्याच वेळात आमच्या भादरलेल्या मेंदूतून हे स्फुरले!

मोक्ष

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 25/05/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
मातलेला अंधार नी बावरलेपण प्रकाशाचे स्वप्नात जागणार्‍या..,रात्रीत बुडूनी गेलो बेधूंद वाहत्या वारियाला कुंपण अभाळाचे ऐकुन साद चांदण्याची ..,मोहरूनी गेलो समीराची झुळूक चावरी, कुजबुजणे खगांचे आळसावली जाग..,मागे अंधार सोडूनी गेलो ओसाड वाळवंटी ... थांबे फसव्या मृगजळाचे विझुन गेली आग..,धुमसायचे विसरूनी गेलो समाधिस्त मी...,स्विकारले आमंत्रण अद्वैताचे पाश तुटले सारे.., मोहमायेतुन उठूनी गेलो विशाल.

लडखडगीत

लेखक चतुरंग यांनी रविवार, 24/05/2009 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
ॐकारचे 'गडबडगीत' आवडले. म्हटलं निवडणुकी दरम्यान भरपूर कार्य केलेल्यांचा 'श्रमपरिहार' सुरु असेल तर काय गाणं म्हणतील बरं? ;) डोला डोला डोला, डोला डोला डोला ताडी प्या की, कशाला हवी टकीला? डोला डोला डोला, डोला डोला डोला चकण्याला चार उकडी अंडी सोला? डोला डोला डोला, डोला डोला डोला खिसा कधी कापला, हात कुठे गेला? डोला डोला डोला, डोला डोला डोला ओबेरॉय, ताज, झमझम(?), गुत्त्याला डोला डोला डोला, डोला डोला डोला कोण देई रोख, कोण उधार बोला? चतुरंग

गडबडगीत

लेखक ॐकार यांनी रविवार, 24/05/2009 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
बोला बोला बोला, बोला बोला बोला नीरा प्या की, कशाला हवा कोका कोला? बोला बोला बोला, बोला बोला बोला सत्काराला चालेल का नारळ असोला? बोला बोला बोला, बोला बोला बोला खिसा कसा गरम, हात कसा ओला? बोला बोला बोला, बोला बोला बोला बुलढाणा, परभणी, रायगड(?), अकोला बोला बोला बोला, बोला बोला बोला कोण देई टक्का, कोण ढुंगणटोला?
Taxonomy upgrade extras

(काळजी)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 22/05/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर भटकताना आपल्या आनंदयात्री साहेबांची 'काळजी' ही सुरेख गजल वाचली आणि दूरदर्शनवरचे गाण्याचे कार्यक्रम ऐकताना मला समस्त प्रेक्षकांची वाटणारी काळजी अचानक आठवली! ;) गायचा आहे तुला का राग हा चंपाकळी त्या बिचार्‍या तबलजीचा जायचा आहे बळी! जीवघेण्या गायकांना ऐकणे नव्हते नवे हाय!

लिलाव.....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/05/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीतरी ...... मला पण विचारा ना रे मला काय हवंय ते ! निर्जीव ..... विकल्या जाणार्‍या वस्तुंमध्ये नाहीये मी ! त्यांनाही ..... नाही जमले कधी या गांधीला खरीदणे ! महाग ..... होता खुपच तेव्हाही हा निष्कांचन म्हातारा ! एकटा ..... पडलोय मी आता त्या कागदी तुकड्यांवर ! कंटाळा ..... येतो एकटे बसण्याचा कार्यालयांच्या भिंतीवर ! नकोय ..... नोटेवरचा एकटेपणा भिंतीवरचा अलिप्तपणा ! हृदयात ..... थोडीशी तुमच्या विचारात हवीय जागा आचरणात ! विशाल

तुझी माझी प्रित

लेखक जागु यांनी शुक्रवार, 22/05/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी प्रित राधा कृष्णाची रास व्हावी वेणू च्या नादी तुझ्या माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी. तुझी माझी प्रित राम सितेचा आदर्श व्हावी वनवासातील पर्णकूटीलाही तृप्ततेची झालर झळकावी. तुझी माझी प्रित गौरी-शंकरासम पुण्य व्हावी हिमालयाच्या शिखरावरही तुझी माझी प्रित नांदावी. तुझी माझी प्रित विठोबा-रखूमाई भोळी वसून स्वतंत्र मंदीरी जय जय विठोबा-रखुमाई गर्जावी.
Taxonomy upgrade extras