Skip to main content

कविता

बालकवी

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 13/05/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी कविता म्हटले की, बालकवीशिवाय पुढे जाता येणार नाही. बालकवींची कविता वाचून मन वेडावून जाते. त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांचे बालपण खेड्यात गेलेले. वडिलांची नौकरीनिमित होणार्‍या बदलीमुळे त्यांना वेगवेगळ्या गावात जाता आले. निसर्गाच्या सहवासातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणीच पाने फुले गोळा करण्याचा नाद त्यांना निसर्ग विषयक लेखनाकडे असे ओढत गेला. गावाच्या बाहेर जाऊन सूर्यास्त निरखत राहणे, नदीला निरखत बसणे. असे निसर्गात रममाण होण्याची ऊर्मी बालकविंना लहानपणापासून होती. आणि कवितांच्या आद्याक्षरावर कवितांच्या भेंड्या अडल्या की, स्वतःच एखाद्या कवितेची निर्मिती करायचे.

(सोडू नको)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 12/05/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्या ह्यांची अप्रतिम गजल 'सोडू नको' ही वाचल्यावर विडंबनधर्मा सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! ;) संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे? हेलमेटा रोज तू घालायचे सोडू नको! केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको! पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! चतुरंग

एका बेसावध क्षणी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 12/05/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
एका बेसावध क्षणी वचनात गुंतून मी तुझ्या संगतीने आले विश्व माझे त्यागून मी तुझ्या सोबतीचा किती गर्व, अभिमान होता महाराज्ञी होते जशी, जग सारे जिंकून मी चार भिंती, छत, दारे यांना घरपण दिले चांदण्याचे कवडसे अंगणात शिंपून मी चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले रंग माझे विसरले तुझ्या रंगी रंगून मी नाही घेतला मी ठाव, नाही मोजली मी खोली तुझ्या अस्तित्वात असे दिले मला झोकून मी तुझी प्रगती, विकास, तुझा चढता आलेख तुझ्या कोडकौतुकात नित्य गेले गुंगून मी तुझ्या यशाचे मंदीर, शिखराचा तूच धनी नामदेवाची पायरी तशी दारी थांबून मी माझे आयुष्य परीघ, तूच एक केंद्रबिन्दू तुझ्याभोवती फिरले मला हुलकावून मी एक
Taxonomy upgrade extras

ती आणि तो .

लेखक जागु यांनी मंगळवार, 12/05/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
ती : नेहमीच राहतोस एकाकी ,भग्न, चेहर्‍यावर शोधत प्रश्नचिन्ह, साचवत असतोस सदा एकांत ! तो : कुणी नसे मज, मला एकटेपण कुणासाठी मी नसे साजण विश्वच सारे मजसाठी दुष्मन ती : का आणिलेस स्वतःस एकाकीपण मी आहे तुझीच साजण विश्वात कोण तुज दुष्मन ? तो : कुणासही नसे माझे भान घरी-दारी नसे मज मान कुणीच ना म्हणे मज छान ! ती (नियती) : तू कुणाचे ठेवलेस भान घरी दारी दिला कुणास मान ? कुणास तू म्हटलास छान ? प्रत्येकास आपलं मान, प्रेमाचं कर तु दान, क्षमेसाठी धर कान ! तो : उघडले आता माझे कान ! उमगली मज हे गुढ सान अहंभाव हा पेटवितो रान

मन माझं..!!

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 12/05/2009 03:06 या दिवशी प्रकाशित केले.
अलगद दु:ख आज डसतंय गं मन माझं खुळं मुसमुसतंय गं रूणझुण पाऊलात रूतलेला काटा पूर येता मनामध्ये दिसेनाशा वाटा कुसळ का उरामध्ये सलतंय गं.. मन माझं खुळं मुसमुसतंय गं.. वठलेल्या वेलीवरी चोरून का उभं खाली काळी माती अन शिरावरी नभ सुकलेलं पान असं रूसतंय गं.. मन माझं खुळं मुसमुसतंय गं.. दूर दूर कोण तिथं काळोखात फ़िरे मला पाहूनिया करी कोणते इशारे सुख तिथे दूर उभं हसतंय गं मन माझं खुळं मुसमुसतंय गं.. भेगाळली धरा वाहे आसवांचा झरा आभाळात नुसताच वाजतो नगारा प्रखर उन्हांत रान भिजतंय गं मन माझं खुळं मुसमुसतंय गं कधी कानी येता काही प्रेमभरे बोल मोह पडे जीवास नि होई घालमेल भुलव्याला रोज असं फ़सतंय गं मन माझं

उरलेला गतकाल

लेखक जागु यांनी सोमवार, 11/05/2009 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
उरले जे जगायचे, वाया क्षण गतकालीचे, जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे. राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे. राहीले जे अधुरे, स्वप्न मनातील जागपणीचे स्वप्न साकारुन मनीचे, समाधान जिंकून यावे. उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे. राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे. राहीले जे योग्य फलाचे, कर्तव्य ते जीवनाचे फळ मिळवून कर्माचे, कर्तव्यदक्ष बनुनी यावे. राहीले जे भोगावयाचे, भोग जगल्या पापाचे भोगुन भोग गतकालाचे, उरले जीवन पुर्ण जगावे. .
Taxonomy upgrade extras

कुठवर पाहू तुझी मी वाट

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/05/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
कुठवर पाहू तुझी मी वाट

कुठवर पाहू तुझी मी वाट
सा़जणा, आठवण तुझी येते ||

एकटी मी मनामध्ये कुढते
वेड्या शंकेने उर धडधडते ||

भेट तुझी आहे जवळी
तिच्यामध्येच तुला बघते ||
Taxonomy upgrade extras

उशीर.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/05/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
उशीर..... ही हुरहुरणारी सांज अशी अन् भुरभुरणारे केस तुझे असते सुरेख सुंदर कांता पण..... मज दिसती ते गणवेष तुझे ! खिडकीवर , गाली ओघळते ही श्रावणातली धार अशी तू कधी कवळशील सांग सखे हे विरघळते अवशेष तुझे? ही चांदरात गे पुनवेची मी स्वार जुन्या आठवांवरती हा धपापणारा श्वास मला पण ओठांवरती फेस तुझा ! संपले स्वप्न ते सोनेरी अन् माझेही झाले सोने पण मोहरलो मी चितेवरीही गळता.....भिजल्या पापण्यांचे केस तुझे !
Taxonomy upgrade extras

मी कुठवर पाहू वाट ?

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/05/2009 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुठवर पाहू वाट ? मी कुठवर पाहू वाट ? सांग ना..... कुठवर पाहू वाट ? या उत्तररात्री आठवतो मज केशसंभार घनदाट ही रिती शेज अन् तळमळता मी जाते उशीत भिजून पहाट सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? तो तरुण कोवळा स्वप्नाळू ती सुंदर , शीतल ना कुठला थाट पाहताच तिला तो हरवून गेला ....नयनी आठवांची* ही लाट !
Taxonomy upgrade extras

माय.........

लेखक उमेश__ यांनी रविवार, 10/05/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाप्रेमी मात्रुदिना निमित्त ही एक छोटीशी कविता............ माय, माय आतला पदर चार पुडदाच्या पोळीतला भाजलेल्या खोबर्याचा तुकडा गावाच्या होळीतला... तव्यावरची भाकर भाजण्यासाठी माय झाली चुलीतलं सरपण जळत राहिली सतत घराला यावं घरपण... चुलीवर शिजून-शिजून मऊ झालेल पूरण आत्मशांतिसाठी पोळीचा तुकडा आगीत जळावा तसं माईला आलेलं मरण..................