कविता
* महामानव गांधी*
* महामानव गांधी*
स्वतसाठी नसलेल स्वप्न महात्म्याने पाहिल,
सामान्यांच्या स्वप्नात नसलेल स्वातत्र्य महात्म्याने आणल !
बाबा तुझ्या या देशात
लोकशाहीची पाळ्मुळं घट्ट आहेत अजुन,
मात्र, मेळघाटातल्या आदिवासींना
स्वातंत्र्य कशाशी खातात हे , माहित नाही अजुन !
तुझ्यावर इतके प्रेम या लोकांचे
तुझ्या जन्मदिवशी ठेवलाय यांनी ड्राय डे,
बहुतेकांचा असतो याच दिवशी
पहिला-वहिला 'ट्राय डे'
बाबा सान्गु नकोस कुणाला
तुला म्हणुन सांगतो ,
पण इतर दिवसांच्या पेक्षा
ड्राय डे च्या दिवशी बाट्ल्यांचा खच जास्त असतो !
घेतील काही लोक जेव्हा
असत्य व हिंसेचा वसा,
तेव्हा दोनच तत्वे स
Taxonomy upgrade extras
म्रुगजल
म्रुगजल मण हे माझे,
जसे पाणी हे वाळ्वटातले,
सान्भाळु तरी किती हे याला,
हे भरकटतच चालले.
नाही कोणी विचार करणारे,
नाही कोणी वाट पाहणारे,
तरी पण आशा आहे याला,
कधीतरी येइल-कोणी साथ देनारे,
माहित असुनही सर्व काही,
वेडी आशा नाही लपलेली,
कधीतरि एकदिवस येइल आठ्वण,
म्हणून अजुनहि वाट पाहणारे.
कधीतरि एकदिवस येइल ती,
अण आठवेल तिला सर्वकाही,
त्यावेळेस कदाचीत नसतीलही हे क्षण,
ज्यासाठी तळमळत होते......"म्रुगजल माझे हे मण."
गांधी जयंति निमित्ताने (आम्हि कपाळ करंटे महात्माजींची क्षमा मागतो)
मी हि भोंदू तुहि भोंदू
आपण दोघे भोंदू
जे जे नाहित भोंदू
ते आहेत सारे गांडू
बोले त्यैसा चाले
तयाचि कापून टाकु पावूले
सत्याचे जे उदघोष करिती
तयांचे दाबून टाकु गळे
गांधी जरीका पुन्हा जन्मला
आम्हि मारून टाकु त्याला
कार्य तुझेरे संपले केव्हाच
पुन्हा कशाला आला..........?
परतन्त्र होईल देश जेव्हा हा
बोलवु तुला रे पुन्हा
सत्य अहिंसा आहे येथे
सध्या तरी रे गुन्हा.....!
Taxonomy upgrade extras
अन परतवून टाक त्या आठवणी
(किंचीत अनुवाद.
बुद्धिबळाच्या युद्धपटावर!
बुद्धिबळाच्या युद्धपटावर,
एक प्याद निमुटपने लढत होत.....
स्वबळावर स्वहिमतीवर,
एक एक घर ते पुढ सरकत होत.
समोर येना-या प्रत्येक सन्कटाला,
ते धैर्याने समोर जात होत,
स्वबळावर स्वहिमतीवर,
एक एक घर ते पुढ सरकत होत.
लढता लढता ...लढता लढता,
पोहचल शेवटच्या घरट्यात,
तेव्हा ते प्याद एक वझिर होत,
स्वबळावर त्यान आता राजालाही,
नमवल होत.
पण्.........पण ????
खेळ सन्पला तेव्हा......
ते प्याद मात्र एक प्यादच होत,
अण पुन्हा एकदा ,
लढण्यासाठी सज्ज होत.........पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होत.
ओढ परतीची
पाखराला ध्यास लागला दूर देशी जाण्याचा
दुसरी माती, दुसरी नाती अनुभवण्याचा
पाखरा जा दूर देशी
मन त्याचे त्यालाच सांगे
दे झुगारुन बंधन इथले
नकोत काही पाश मागे
उडोनी जाई पाखरु
जाई ते दिगंतरा
धडपड, खटपट पुन्हा नव्याने
मांडण्या संसार सारा
एकटेच ते सदैव आता
नसे सोबत्यांचा मेळा
आठव येई घरट्याची
येई आता कंटाळा
Taxonomy upgrade extras
कोण खरी
खूप रागावलो मी कधी तर मग,
माझीच नक्कल करुन
हसवणारीस तू
आणि कधी स्वताच फ़ूरंगटून
बसणारीस तू
कोण खरी ?
कधी मग उगीचच साधी बस नाही मिळाली म्हणून
रडवेली झालेली तू खरी ..
की घाई घाईत तवा भाजला तरी
’काही नाही रे’ ’तू जा, उशीर झालाय ..घड्याळ काय शो साठी बांधलेस काय...’
म्हणून हसत पाठवणारी तू
खरी कोण ?
कधी दोन तासात ..फोन नाही केला म्हनून ..
चिडनारी तू ..
आणि कधी
’कित्ती वेळा फोन करतॊस रे..?’
’आज काम नाहीए का तूला ...ठेवतेय मी’
मला रागावणारी तू ...
कधी मग आशा - गुलजार ची गाणी
मला समजावून सांगणारी तू ..
की ..
कधी चल AC मध्ये बसून गप्पा मारुयात ..
म्हनून एखाद्या FLOP पिक्चर ला घेउन जाणारीस ..तू..
अगदी
Taxonomy upgrade extras
भेसूर रात्र (आणि आस्वाद)
भेसूर रात्र (आणि आस्वाद)
काल अचानक मी
बसलो उठून रात्री
लक्षात आले मजला
अमावस्या ती सर्वपित्री
कुठलेच नव्हते आवाज
कुठलाच रव नाही
थरथरत्या फांद्या अन्
झाडाला झोप नाही
पिंपळावरील मुंजा
हसतो भेसूर तेव्हा
सळसळत्या पानांचा
उच्चार अस्फुट होई
भुंकती मध्येच तेव्हा
रस्त्यावरील कुत्री
ऐकण्यासाठी त्यांना
कानांची लक्तरे उरली ...
१. वरील कविता अक्षरगणवृत्तात आहे की मात्रावृत्तात की मुक्तछंदात यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
२. कवितेचा नक्की आशय काय असे कुणी विचारल्यास आम्ही पानभर लिहायला तयार आहोत.
३. या कवितेत लपलेला सामाजिक आशय सापडला का?
मिसळपाव