Skip to main content

कविता

बंदिनी

लेखक जयवी यांनी सोमवार, 29/09/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मजात लाभली बंधने जगातली कुशीत जरी पहुडली कोवळी कुमुदिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी तरुणाई चिवचिवते स्वप्नी पंख पसरते जनकाच्या परी सदनी पराधीन नंदिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी सप्तपदी चालता जोडवी हासती नजरकैद कुंकाची असून हृदयस्वामिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी सांजकाली जीवनी पुत्र सुकाणू धरी पुनश्च वाट चालते पायी बेडी घालुनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी जयश्री
Taxonomy upgrade extras

स्वप्नसुंदरी

लेखक अनिरुद्धशेटे यांनी सोमवार, 29/09/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नसुंदरी हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता, तोच हात मेंदीने, तेव्हा रंगला होता ! नथनीचा तुझा त्यावेळी डौलच न्यारा होता, गालावरील लालीचा रंग लाजरा होता! डोळ्यांमध्ये निरागसता पराकोटीची जपलेली, गोष्ट माझ्या प्रेमाची तव ओठी लपलेली ! वाळवंटातही कोठेतरी हिरवळ थोडी असावी रखरखत्या या जीवनात माझ्या सावली तुझी मिळावी ! अनिरुद्ध
Taxonomy upgrade extras

चल ग सजणे

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 29/09/2008 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
चल ग सजणे कश्शाला रड्ते रडताना, डोळ्यातले का़जळ वहाते चल ग सजणे कश्शाला रडते बाबा कळ्वळतात हाताना चोळ्त्तात म्हण्तात कशाला पाठीवले पोरीला परदेशात ती तिथे मी इथे भेट कशी रे चल ग सजणे, कश्शाला रड्ते स्पष्टिकरण : ही कविता ओळखा आणि बक्षिस मिळवा असे म्हणण्याइतका मी बावळट नाही आहे. भड्कमकर मास्तरांना खरड पाठ्विली होती , "मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा. आण्खी एका सदस्याना विचारले(मराठी चे लज्जत पापड) पण त्याच्या घरी १० वी व १२वी आहे.
Taxonomy upgrade extras

मित्राच्या निमीत्ताने...

लेखक रामदास यांनी सोमवार, 29/09/2008 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मैत्रीणीनी असे काही प्रश्न विचारले नाहीत.पण नंतर जवळ जवळ बारा वर्षांनी आठवण असह्य झाली तेव्हा कविता लिहून मला पाठवली. तुझ्यामागून हिरव्या रानातून चालताना - माझी वाट चुकली, अन् घनगर्द अरण्यात मला माझी - झोपडी बांधावीच लागली. त्यानंतर किती वर्षांनी -- उन्हं माझ्या अंगणात आली, दारच्या त्या ओंडक्यांची -- कोवळी रोपे झाली. गर्द असे हे रान-आणि उन्हे अधीमधी, सावलीतली ही रोपे -वाढतील का रे कधी ? त्यात आता झोपडीचे -एक असे गाव झाले, मनात पालवी असून -रोप बाजूला राहिले. मनातले हिरवे रान-अणि मी झोपी जाते, गर्द रानातली वाट-चालण्यास सोपी जाते. १२-१२-१९९४.
Taxonomy upgrade extras

प्रिय मित्रा!

लेखक नीधप यांनी रविवार, 28/09/2008 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे मी कधी फुशारुन गेले नाही या पहिल्या दोन ओळी चोरून पुढे.... ----------------------------------------- तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे मी कधी फुशारुन गेले नाही मी मोहरले नक्कीच हे तात्कालिकच आहे अशी समजूत घातली स्वतःची तगमग शांतवण्यासाठी 'का होईना! ओढ तर आहे' अशीही समजूत घातली मनाची सुखवून जाण्यासाठी.. या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे मी कधीच पाह्यलं नाही.

भरती-अहोटीच येणं

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 28/09/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
भरती-अहोटीच येणं ===================== रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... लाटांच्या झुल्यात.. मनाच झुलणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... रेतीच्या किल्ल्याचं.. सागरी बुडणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... विखुरती चांदी.. हलकेच झेलणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... उमटल्या खुणांच.. तळाशी रहाणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... खार्‍या लोटात.. खळाळून हसणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... लाटांच्या ओठी.. जीवन गाण..! ===================== स्वाती फडणीस.................... २००६
Taxonomy upgrade extras

मम सुखाची ठेव...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/09/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!
मम सुखाची ठेव....
ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....! षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा, अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार.. तो तर तिच्या गळ्यातच आहे...! नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभूत्व हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...! कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी, स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध, परंतु दोघेही तिचेच

(अफवा)

लेखक चतुरंग यांनी रविवार, 28/09/2008 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसाद कुलकर्णींच्या 'अफवा' वाचून आमच्या पूर्वीच्या काही प्रमादांबद्द्ल उठलेल्या अफवांची आठवण ताजी झाली!

सर्किटची मेख (अर्थात लघुकथास्पर्धा)

लेखक आंबोळी यांनी शनिवार, 27/09/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
हे विडंबन नाही. आम्ही फक्त प्राजुच्या संयमाची रेघ या सुंदर कवितेवरुन प्रेरणा घेतली आहे. आदितीचा 'पाय' होता 'ब्रह्मकुमारी' विप्रंची आंबोळ्याची 'नाडी' होती मनिषची 'लक्ष्मी' कर्णाची 'थंडी' होती होती जरी अजब ती धनंजयाचा 'कंस' तो करी किती 'हाराकिरी'! आत्महत्या करुन गेला ऋषिकेशाचा शेतकरी आयुष्यातून उठून गेला पेठकरांचा टॉमीही मासेमारीचे गूज सांगे टारु हा माउंटब्युकी मारतो माणसे आता चतुरंगाचा बिबटाही! बाजी मारली पार्टनरनी पुरस्कारही घेतला मिपाकरांची परिक्षा घेत आहे सर्किटही! ------------------------------------------- कंदीलसुमार २७-०९-२००८
Taxonomy upgrade extras

साधा माणुस

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 27/09/2008 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
साधा माणुस हे बरं आहे कि लोकं मला साधा म्हणतात साधे असण्याचे बरेच फायदे असतात मी मुद्दामुनच साधा रहातो येडा बनुन बरेच पेढे खातो आहो लोकं माझ्या साध्या बोलण्याला फसतात माझ्या बेशरम कबुलीला ते प्रांजळपणा म्हणतात मी स्वत:वरच टीका करतो लोकं म्हणतात किती प्रामाणिक आहो सांगुन फसवता येतं काय पाहिजे आणिक..? लबाडांचे पाय घेउन मी साधेपणाने वावरतो लबाडांच्या दुनियेत मी असाच रहातो मी असा रहातो म्हणुन पोट भरतो तुम्हिही भरा नाहीतर मरा