Skip to main content

कविता

"लव" इज द "गेम"!

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 24/09/2008 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या गाभार्‍यात , कधीकधी भरुन येतात भूतकाळाचे मेघ... आणि मग एकेक लडींप्रमाणे उलगडत जातात, त्या आठवणी... मी म्हणायचे, "मला आवडते काळ्या दगडावरची रेघ. " तू म्हणायचास, " मला मात्र भुरळ पाडतं अळवावरचं पाणी. " मी विचारायचे, "राधा खरी की रुक्मिणी ? " तू विचार करुन म्हणायचास, "मीरा च खरी विरहिणी. " मी : म्हणजे राधेच्या प्रेमात, नव्हतीच का कधी भक्ती? तू : हो..... पण विष पचवायलाही लागते मोठी शक्ती...! मी : तरी पण सांग ना.....

* कातरवेळची एक आठवण *

लेखक अनिरुद्धशेटे यांनी मंगळवार, 23/09/2008 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
* कातरवेळची एक आठवण * मातीच्या त्या भिन्ती, कुडाची ती घर, मनातुन जात नाहीत, ही आठवणीन्ची फुलपाखर ! बन्गल्यापुढे गेट असते, बान्धकामात असतो आधुनिकतेचा कळ्स, पण अन्गण येथे दिसत नाही, आणी दिसत नाही तुळस ! उडुन गेलेल्या छपरावर आता, उगवु लागली हिरवळ, जात्यावरली गाणी आता, येत नाहीत कानावर ! हरवलेली विट्टी आता, शोधत नाही कुणी भेन्ड्या लावुन येथे कुणी, म्हणत नाहीत गाणी ! सन्गीताला परिस्-स्पर्ष त्याकाळी, होत असे कण्ठाचा, पंण घशातुन गुरगुरणे व धान्गड्घिन्गा हा आत्मा झालाय आजच्या सन्गीताचा ! देवाच्या पायावर डोक ठेवताना
Taxonomy upgrade extras

..नातंच काही और असतं!

लेखक राघव यांनी मंगळवार, 23/09/2008 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मागे नागपूरला असतांना उन्हाळ्यात एकदा भर दुपारी अमरावतीला जाण्यासाठी प्रवास करावा लागला. मधे रस्त्यात एके ठिकाणी पळस फुलल्यामुळे लालेलाल झालेली झाडांची रांग लागली! इकडे कडक उन्हामुळे जीव हैराण झालेला होता. पाण्यालासुद्धा तहान लागावी अशी वेळ होती ती!! सगळ्या बाजूंनी धरणी साद घालतेय पावसासाठी असे वाटत होते. अन् त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडला वळवाचा.. जोरदार! त्या पावसानंतर इतके छान वाटले की वर्णन नाही करता येणार. त्यावेळेस स्फुरलेल्या ह्या काही ओळी.. नंतर कधी समर्पक अशी भर घालता आली नाही त्यात!
Taxonomy upgrade extras

श्रावणझड

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 22/09/2008 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजूबाजूला ... इकडेतिकडे .... सगळीकडे तुझ्याच आठवणी पसरलेल्या तुझी डायरी, तुझे पेन तुझा डेस्क अन बरेचसे असे तुझे काही प्रत्येक गोष्टीकडे पाहताना ... येणारा प्रत्येक संदर्भ तुझाच अन त्या संदर्भाबरोबर येणारी आठवणीची श्रावणझड माझीच ......... फक्त माझीच !! (लेखन इतरत्र पुर्वप्रकाशित. मिपाकर दोस्तांसाठी पुन्हा प्रसिद्ध करायचा मोह !)

नको लावूस पारिजात दारी

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 22/09/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
नको लावूस पारिजात दारी ==================== नको लावूस पारिजात दारी..! बावळा, फुलतो रोज नव्यानी..!! कळी-कळीत, मोती-पवळी.. वेंधळा, सांडत राहतो अंगणी..! टप-टप बरसती गंधीत सरी.. कोवळा, भिजतो श्रावण राती..! आकाशी विझती चांदणं जोती.. सोवळा, रचतो निर्माल्य राशी..! चौकटीत पाखरे गलबलती.. सावळा, ऐकतो निरव वाणी..!!! ==================== स्वाती फडणीस.......... १६-०९-२००८
Taxonomy upgrade extras

क्षितीज (कविता)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 22/09/2008 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
दूर क्षितीजावर सूर्य ढगात लपला केशराची रांगोळी नभी फ़ेकून चालला उंच उडते पाखरू पाही रंगांची लीला सय ये पिल्लाची प्राण पंखात आला आकाशी केशर मंद किरमिजी झाले उडणारे पाखरु पंख मारून थकले दाटला अंधार दोन ठिपक्यांचे डोळे पाही मनात पिल्लू दूर घरी थांबले घरट्यात भुकेले मूक घाबरून शुष्क चोंच आं वासून वासून मी आणिला न दाणा शोधून पिल्लू बघे बाहेर आससून चित्र मनोहारी ह्या क्षीतिजी राही दाद जग देई पाखरू त्राही त्राही बेरंगी रंगातून कसे भूक साही दूर क्षीतिजी पिलू वाट पाही भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद नको ते क्षीतिज नको ते मंदरंग भुकी जीवाला एक घासही उदंड

मैत्रीचं नातं

लेखक सन्दिपरे यांनी सोमवार, 22/09/2008 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
आई वडिल, भाऊ-बहिण यांशिवाय एक नातं असतं मित्रत्वाचं जीवाभावाच्या मैत्रीचं. झाडाला स्थिरावण्यासाठी गरज असते मुळांची समाजात जगण्यासाठी गरज असते खर्‍या मित्राची. मुळाच्या आधारावरच वृक्ष विस्तारतो विश्वासाच्या आधारावरच मैत्री विस्तारते. असंच नातं प्रत्येकानं जपावं मायभूमीचं नवं रूप साकारावं. विश्वासाचं ते नातं गळ्यातलं ताईत बनतं मात्र केवळ विश्वासघातामुळे फाशीचा ते दोर बनतं. आता
Taxonomy upgrade extras

हृदयांत सागराच्या..

लेखक प्राजु यांनी रविवार, 21/09/2008 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयांत सागराच्या फेसाळतात लाटा खडकांत फेनफुलेही शोधित जात वाटा खेळांत गलबताच्या लाटांचाही झिम्मा अस्तास भास्कराच्या क्षितिजावरी रक्तिमा ओठांत शिंपलीच्या मोत्याचेच गाणे किनार्‍यावरी सांडले सोनियाचे दाणे जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी घेताच खोल श्वास वारा ओशाळला धुंदीत यौवनाच्या क्षारात गंधाळला रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. का संथ चालला गं हा चंद्र अस्ताकडे प्रेमात तो ही घाली लहरींना साकडे उदयांस भास्कराच्या सागर मंत्रावला ओल्या वाळूवरी शिंपला दवांत भिजला - प्राजु