Skip to main content

कविता

(टाळतो)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 16/09/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
केदार पाटणकर ह्यांचे 'टाळणे' बघून आम्हाला आमची वारंवार चालणारी टाळाटाळी आठवली! ;) रोजचा छळवाद आता टाळतो मी जरा व्यायाम आता टाळतो पाहिजे आहे तनाला शांतता कोणतीही चाल आता टाळतो गोड 'केका'ची खुमारी आगळी वरण-भाता हळुच आता टाळतो सोडले पळणे, तरण केव्हाच मी 'जीम'चीही वाट आता टाळतो घेर ढेरीचा कितीही वाढला घोरण्याचे मी न आता टाळतो! चतुरंग

ते आणि आम्ही

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 16/09/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
फुले अशी उमलत असताना मधुरसाच्या अपेक्षेने जवळच होते भुंगे दबा धरून... थेंब दवाचे झेलत अंगावर चुरचुरणा-या थंडीत आम्हीही होतो पलिकडेच डबा धरून रेल्वे अशी धावत असताना खिडकीच्या अपेक्षेने जो तो धक्का देत आपापली जागा धरून... आघात त्यांचे झेलत अंगावर गुदमरणा-या गर्दीत आम्ही होतो लोंबकळत डबा धरून देश असा प्रगती करीत असताना देणग्यांच्या अपेक्षेने तिजो-या भरताहेत सर्वांच्या भरभरून... उपहास नि उपेक्षा झेलत अंगावर सत्कार्याच्या अपेक्षेने अजुनही आम्ही आहोत डबा धरून

निकामी

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 16/09/2008 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
नात्यातले उमाळे- नसतात सत्य सारे ओठांवरील शब्द ,नुसतेच वांझ भारे हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे आभाळ शोधताना हातात मेघ येई डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही कोणासही कराव्या का व्यर्थ वल्गना मी माझे मलाच ठावे, ठरलो कसा निकामी
Taxonomy upgrade extras

तू अशी स्वप्नात माझ्या

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 16/09/2008 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू अशी स्वप्नात माझ्या तू अशी स्वप्नात माझ्या येऊ नको ग साजणी कस्तुरीचा गंध उधळित नकोस जाऊ कामिनी !!धृ !! तव तेजाच्या प्रकाश किरणी फूल मनाचे उमलून आले मावळतीला मिटू नको ग सूर्यफूलांचा बहर घेऊनी !! तुझ्या स्वराच्या हिंदोळ्यावर शब्द माझे बांधले मी गीत ते आकाशवेडे गाऊ आपण दोघे मिळोनी !! नेंणीवेच्या काठावरुनी बोलाविशी तू चंचले बोलाविले गे मी तुला सत्यात अन् जागेपणी !! ------------------------------------------ कवयित्री - सौ. उज्वला केळकर. - सांगली

वाटले की शेवटी होकार झाला

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 16/09/2008 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
****************** वाटले की शेवटी होकार झाला - का विचारे मी पुन्हा इन्कार झाला? *** जो कवी आनंद होता वांझ होता घात होता तो बघा फनकार झाला! *** ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला. *** काल रात्री काजव्याला देखिले ज्या काळरात्री तो जणू अंगार झाला. *** धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला. *** होत गेला हो जयाला पारखा जो होउनी आराध्य तो साकार झाला. ******************
-धनंजय (सप्टेंबर १५, २००८)
Taxonomy upgrade extras

मराठीतील अजरामर गीतांचा इतर भाषिकांनाही आस्वाद घेता यावा म्हणून हा प्रयत्न...

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 16/09/2008 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे - यशवंत देव यांच्या गीताचे स्वैर रुपांतर - बहुगुणी, ऑगस्ट ८, २००८ शक्य झाल्यास चालीतही गाता यावं असा प्रयत्न आहे. ------------------- इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं दिल सौ बार लुटाएं इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं चंचल झोंके, जलकी धारा, भीगी काली मिट्टी जैसे प्राण हो हरे भरे, निकल पडी तृणपत्ती फूल शर्मिले देखके किसकी, होठोंकी याद आए इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं रंगोंका फैलाकर पंखा, सांझ ये किसने बना ली रैनाके दरवाजेपर जैसी, तारोंकी रंगोली छे ऋतुओंकी हो छे मेहेफ़िलें, यहींपर दर्द हटाएं इस जीवनपर, इस जीनेपर, दिल स
Taxonomy upgrade extras

कका ची बाराखडी (भारूड)

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 14/09/2008 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
चाल- काट्याच्या अणीवर वसले तीन गांव... ककाच्या नांवावर काढल्या मालीका ककाच्या नांवावर काढल्या मालीका काही सूरू काही संपेचना संपेचना ठार केले नायकाला नायीका रडते व्हीलन बधेचिना बधेचिना रीपीटले ब्राउन तुकडे फॉरवर्ड करती प्रेक्षक बघेचिना बघेचिना त्याचा केला पुनरजनम पुनरजन्मानी नायीका तरुण पुन्हा तरुण पुन्हा दादीचे केस काळे डिस्को करते दादी खपेचिना खपेचिना तिने मारल्या तीन थपडा तीनदा लागल्या एपीसोड सरेचिना सरेचिना टाकले कमरशीयल ब्रेक चहा ढोसूनही प्रेक्षक टळेचिना टळेचिना पाडल्या नवीन कहाण्या वाढता वाढे बाराखडी संपेचिना वाढता वाढे ककाराचा विकार मूर्ख बघे
Taxonomy upgrade extras

का असे केलेस?

लेखक मीनल यांनी शुक्रवार, 12/09/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
ई सकाळ मधील पैलतीर मधे आजच माझी ही कविता प्रकाशित झाली.

ऋण मातीचे..

लेखक राघव यांनी गुरुवार, 11/09/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी? पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी.. का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे? व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी.. चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे, एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी.. वाट कुणाची बघतो आपण?

(प्रवाह)

लेखक बिनडोक बनी यांनी गुरुवार, 11/09/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आर्यचाणक्य यांच्या प्रवाहात मीही हात धुवून घेतले.. ;) मिसळपाववर कोरडे बसण्यापेक्षा मी जेव्हा मिसळीच्या डोहात बुडी मारली... तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय करायचा प्रयत्न करतोय?