Skip to main content

कविता

पाऊस - बालगीत

लेखक भास्कर केन्डे यांनी शनिवार, 20/09/2008 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या जुलै महिन्यात इयत्ता सहावीच्या माझ्या भाचीला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या भेटीदरम्यात तिने एक छोटीशी मुक्त छंदातली कविता माझ्यासाठी लिहून दिली. ती अशी... सर सर सर वारा सुटला काळ्या ढगांना घेऊन आला|| रिमझिम रिमझिम पाऊस आला इंद्रधनुष्य खुलवू लागला || वीज कडाडली कड कड कड थेंबे बरसली टप टप टप|| झाडे वेली फुलपाखरे आनंदली पशु पाखरे || धरतीचा हा सुगंध आला आसमंती दरवळू लागला || धरती माता आनंदली खुदू खुदू हसू लागली || --कु. प्राजक्ता वांजरखेडकर, अंबाजोगाई, इयत्ता ६वी
Taxonomy upgrade extras

प्राजुच्या कल्पनेचा विस्तार !

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 20/09/2008 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेची पार्श्वभूमी: काल संध्याकाळी प्राजुशी फोनवर बोलताना तिने सहज एक ओळ सांगितली. ती ओळ अशी -- हृदयात सागराच्या फेसाळती लाटा प्राजु म्हणाली, "बघ, तुला ह्या ओळींवर पुढे काही करता येतं का? गझल, कविता काहीही !" नंतर रात्रीपर्यंत हा विषय डोक्यातून निघून गेला होता. असं म्हणतात आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं सुप्त मन जागंच असतं. पहाटे तीन-साडेतीनला झोप चाळवली गेली तेव्हा दुसरी ओळ सुचली. अर्धवट झोप, अर्धवट जाग अशा अवस्थेत कधीतरी डोक्यात बहुतेक कवितेचा आकृतिबंध आला.
Taxonomy upgrade extras

(खायचे आहे कुठे?)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 19/09/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल! काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे? चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?... ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?... दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो?

मराठी भाषा एक चिरन्तन जीवनप्रवाह

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 18/09/2008 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
काय सान्गु तुम्हाला, मराठीचा बाज विदर्भाच्या राणीला, कोल्हापुरी साज, मराठ्वाड्याला ते, कोकणचे पाणी, देउन उरला आहे, हा महाराष्ट् आज ! मराठीची लव्हाळी, रोजच नव्हाळी, जशी देते कळी, गन्ध मन्द ! मराठी तर आहे, आताशी तारुण्यात, जसे गीत गात, रती यौवनाचे ! माझ्या मराठी मायेचा, वाण आहे जोरकस, इतर आहेती निकस, हिच्यापुढे ! माझ्या मराठी मायेची, लागली दिगन्ताला आस, त्यानेही मग कास, हिची धरली ! शब्द ते हो आले, भाषेत या माझ्या, अर्थ देउन सारस्वता, धन्य केले ! कैवल्य ही आहे, माझ्या या भाषेत ज्ञानियाच्या वेषात, अवतरले ! नामयाच्या भिन्ती, लावल्या नाथानी, कळ्स तुकयाने, उभविला ! हा भक्
Taxonomy upgrade extras

खेळ दोन ओळींचा - १

लेखक राघव यांनी गुरुवार, 18/09/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;) मुमुक्षु

जाम कोणी देइ

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 18/09/2008 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
******************** * जाम कोणी देइ अव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये * खाक जाळे दु:ख मोठे थेंबही एकही थेंबा कधी सांडू नये * भेटता तू स्वर्ग भेटे या इथे या क्षणाला दृष्ट मी लावू नये * काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये * घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये * वेगळी काही नशा होते जया जाहिदाचे नाव त्या देऊ नये * ********************
Taxonomy upgrade extras

नाच नाच मोरा..

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 17/09/2008 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
नाच नाच मोरा.. ========================== नाच नाच मोरा, तुझा फुलेर पिसारा.. नाच नाच मोरा, तुझा फुलू दे फुलोरा.. उडे गरुड, उडो नभी, नको खंत तुला.. तोड नाही कुणापाशी, तुझ्या गारुडा..! नाच हरपूनी तन्मया, नको भान तुला.. येते नभ उतरून, वाजविते टाळ्या...! नीलपंखी पाखरावरी, नीळ्याची रे माया.. जडविले जडाव पाठी, नको मानू हारा...! वाळवंटा देई रंग, तुझा रंगित कुंचला.. रंग निळा-हिरवा; मन-मानसी गारवा...! ========================== स्वाती फडणीस ............... १४-०९-२००८
Taxonomy upgrade extras

एका सुन्दर मुलीसाठी

लेखक अनिरुद्धशेटे यांनी बुधवार, 17/09/2008 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्दर सुन्दर ओ तुझे जणू ऊषेची लाली शोभते डोळयतील इशारे बघुन ते भाळी कुन्कू लाजते कानात ग डूल तुझ्या कुन्द्कळ्यातुन झळके स्मित नाकातील नथनी गाते माझ्या प्रीतीचे गीत ! वार्याशी जणु झिम्मा खेलती बटा या भालप्रदेशी कानातुन किणकिणती पदके ही जणु खजुराहोची नक्षी ! केस तुझे ग गर्भरेशमी वाराही त्यातुन मोहुन वाहे वेडा होउन प्रत्येकजण हा चेहरा तुझाच पाहे ! अनिरुद्ध
Taxonomy upgrade extras

काही माणसं

लेखक ग्रीष्म यांनी बुधवार, 17/09/2008 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणस काही माणस जगत असतात मरणाच्या आशेने, थोडेच असतात वेडे जे चालत जातात सरळ मरणाच्या दिशेने. दगडाला वेदना टाकिचे घाव सोसतांना, त्या मूर्तीला यातना ह्या बडव्याना पोसताना. अहो वर्दिला दुखः नको त्याना सलामी, बंदुकी ढाळतात अश्रु नशिबी दहशतवादाची गुलामी. माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना, लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना. गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना, डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना. खादीला लाज वाटे ह्या नंग्याना झाकताना, खाकीचा उर फाटे त्या दंग्याना थोपताना. तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना. स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना
Taxonomy upgrade extras

समस्यापूर्ती

लेखक रामदास यांनी मंगळवार, 16/09/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
कडव्याच्या पहील्या दोन ओळीत समस्या आणि नंतरच्या दोन ओळीत पूर्ती असं लिहून पाहीलं आहे.एक प्रयोग. जर टोचते पाठीला जर बोचते दंडाला खसखसूनी घासावी जर मऊ लागते अंगाला. *** निर्‍या काचती पोटाला जीव कासावीस होई एका धुण्यामधी कशी खळ जाईल ग बाई. *** असं कसं पायताण चावे जागोजाग बाई थेंब तेलाचा सोडावा अंगठ्याला सैल जाई. ***
Taxonomy upgrade extras