Skip to main content

कविता

छोटीची आई

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 27/09/2008 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
छोटीची आई ========================= समस्या खूप आहेत.. अगदी सकाळी उठल्यावर; दात घासण्यापासून.. रात्री झोपताना; शू करून आणण्यापर्यंत. हात थकतात ! पाय लटपटतात! डोळ्यापुढे अंधार.. तरी होती उभारी!!! तिच निरागस असणं.. तिच निष्पाप हसणं.. बघितलं की; सार भरून पावायचं! आजही ती तशीच असते.. आ़जही ती तशीच हसते.. बघितलं की;रडूच फुटत! म्हातार्‍या डोळ्यांना.. तापदायक असती.. कंटाळता आलं असत! सोडव विनवता आलं असत! पण नाही... हात जोडले तरी .. ओठ हालत नाहीत..! डोळे मिटायला आलेत.. आणि झोपच येत नाही..!! माझी लाडी अजून छोटीच आहे. देवा तिला गोठवलंस..
Taxonomy upgrade extras

कुंपणावरच्या मित्रांसाठी....

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 26/09/2008 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीच्या घोळक्यात एकट्यासम शाप नाहि मित्रत्वाने पाठीवरती आपुलकीची थाप नाहि. जिंकलीस तू लंका सारी, साता समुद्रा पार रे ओल्याचिंब मिठीसाठी जवळ उरला बाप नाहि. धावताना जगण्यासाठी, गाठले पैलतीर रे विसरलास जगणे मागे, उरली फक्त धाप नाहि? दूरदेशी शांतचित्ती, मनी कर हिशोब रे आनंद मोजून ठेव नीट, हरवले कीती माप नाही. आठवते शेणमाती, मनात तोच गंध रे मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि. आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि. -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

हे वेड माझे सांग रे! साजणा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 26/09/2008 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--मलिक) झाली जर प्रीति तुजवरती राहूनी बाहुपाशात तुझ्या निद्रेत जाईन मी सत्वरी हे वेड माझे सांग रे! साजणा कमी कसे होईल याउप्परी सांगती ह्या नशाधुंद नजरा अन फूलांचे ते ताटवे क्षण एक ही घालवू कसे तुझ्या विना रे! एकटे सारीच प्रीत उधळून तुजवरी जादू करूनी जाईन तुजवरी विसरूनी ती सर्व संकटे क्षण ते पळ ते जाईन स्वपना सम विसरून परतव माझी सारी स्मृती मलाच तू फिरून जाईन दूर तुझ्या दुनियेतून स्मरूनी तुला मन जाईल क्षीणून हे वेड माझे सांग रे! साजणा कमी कसे होईल याउप्परी श्रीकृष्ण सामंत

संयमाची रेघ..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 26/09/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही मीलनाची ओढ होती संयमाची रेघही ओठ नाही त्या गुलाबी दोन होत्या पाकळ्या चुंबताना होत काटेरी जरासा स्पर्शही कामिनीचे रूप पाहू दे मला गे सुंदरी रोखले मी श्वास आणी सोसला आवेगही तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चंद्रही पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही - प्राजु
Taxonomy upgrade extras

नागीण आणि काही कविता.

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 26/09/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजच्या दिवसात लिहीलेल्या या कविता आहेत.माझ्या कॉलेज मध्ये दिलीप मालवणकर नावाचा एक चळवळ्या मुलगा होता. त्यानी एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशीत केला होता. त्या संग्रहातल्या या माझ्या कविता आहेत.
Taxonomy upgrade extras

लेकरू

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 25/09/2008 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
लेकरू ======================== ती इतकी निरागस! ती इतकी सुंदर! ती इतकी बोलकी! ती इतकी चंचल! तिच ते खट्याळ हसणं, तिच ते सशावाणी उड्या मारणं, तिच ते फुलपाखरा सारखं कुणाही भोवती भिरभिरणं. तिचं आई बरोबर बोट धरून फिरणं.. तिच देवळात तल्लीन होवून डोलणं.. तिच कुणाला ही आपलंसं करणं... तिच कुणात ही मिसळून जाणं... तिच माझ्या दिशेनं धावत येणं.. माझं घाबरत पुढे सरकणं तिच्या आईच्या डोळ्यात डोकावणारी उदास खंत एकदा बोलली ती माझ्याशी... आता मी आहे. पण माझ्या पुढं? चाळीस पंचेचाळिशीचं लेकरू सांभाळू तरी कसं!! ======================== स्वाती फडणीस ................... ११-०३-२००८
Taxonomy upgrade extras

आठवण

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 25/09/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यापरी तु निघुन गेलीस,नजरे पुढुनी बघता बघता इथे-तिथे मी शोधीत असतो तुझ्याकडे येणार्‍या वाटा... दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... दिलास तू जो हात उदासीत, स्पर्श तयाचा आहे घेरुन तुझे प्रेम ही बरसत आहे मनात माझ्या श्रावण होवुन... दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....
Taxonomy upgrade extras

बारा-तेरा वर्षांची ती..

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 24/09/2008 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
बारा-तेरा वर्षांची ती.. ============================ लयदार वळणाची, उफाड्या देहाची यौवनानं मुसमुसलेली तारुण्यानं सळसळणारी बारा-तेरा वर्षांची ती.. बाल्य आणि तारुण्यामधल्या अवघड झुल्यात हेंदकळत पाय पोटाशीधरून बसलेली अवखळ, निरागस भावली..! हस म्हटलं की हसायची नाच म्हटलं की नाचायची.. खुलवलं की फुलायची चिडवलं की रुसायची.. नजरेत दुखरी ,शब्दात बोचरी हसता-बोलता मध्येच थांबायची मोजून मापून वागणारी ती जरा प्रौढाचं वाटायची..! तिच्यावर रोखलेल्या नजरांची अगोचारी भोसकता झेलत टस्स का मस्स न होता मुर्दाडासारखी ढिम्म राहायची.. इथे कधी कशी आलीस विचारताच चरचरत मुकीच व्हायची..जणू चामडी रोज सोलली जाते जीव सो
Taxonomy upgrade extras