Skip to main content

कविता

दूर पळ दूर पळ

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी रविवार, 07/09/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
खोल खोल आत आत उठते जेव्हा एक कळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ ऍडम आणि ईव्हला टाळू म्हणून टळलं नाही तुझी माझी गत गं त्यांच्याहून वेगळी नाही झाडावरती आज पुन्हा पिकलं आहे एक फळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ कधीसुद्धा संपू नये अशी एक रात्र येईल बुद्धी तेव्हा आपली सारी गलितगात्र होईल वासनेच भूत तेव्हा भावनेला लावेल चळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ -अनिरुद्ध अभ्यंकर

डाव वेळेने साधला

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/09/2008 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--राजेंद्र्कृष्ण ) दुःखाच्या ह्या दरी मधे रथ खुषीचा लोपला प्रेमाच्या ह्या खेळा मधे डाव वेळेने साधला कुणी समजावे प्रेमातल्या ह्या नीष्ठूर संकटाना दोन जीवाने इच्छीले ते इतराना काही केल्या पटेना हंसण्या आधीच प्रीतिला का आवडे रडायला प्रेमाच्या ह्या खेळा मधे डाव वेळेने साधला नेत्रा समोर प्रीतिचा पुरावा कोणत्या कारणा म्हणावे जर ह्या जीवन मग काय म्हणावे ह्या मरणा प्रीतिचे दैव जाता निद्रे मधे दाह दुःखाचा भोगला प्रेमाच्या ह्या खेळा मधे डाव वेळेने साधला श्रीकृष्ण सामंत

राधा

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 06/09/2008 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
कळलेच नाही मजला जडला कसा जिव्हाळा मन चिंब भिजवुनी हा जणु कृष्णमेघ गेला थेंबात प्रीत जागे स्पर्शास ओढ लागे कळले कधी न जुळले आतुर मनांचे धागे सर्वस्व ये फुलुनी जणु केवडा फुलावा हातात चांदण्यांचा जणु ताटवा मिळावा ओल्या मिठीत धुंद तू सावळा मुकुंद राधा तुझी मी झाले तोडून सर्व बंध
Taxonomy upgrade extras

एका (पेक्षा एक) कवीं चे मनोगत----!

लेखक मनीषा यांनी शनिवार, 06/09/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कविता (मनोगत) वाचणा-या सर्व कवी /कवयित्रीं नी --- स्वतःस 'सन्माननीय अपवाद' समजावे )
घेउनी ताव अन लेखणीला ठरवले करु कविता एकदा शब्द शब्द चोहीकडे पण.. हाती काही येत नाही काय करु ? कसे करु ? मला काहीच सूचत नाही | अक्षरांपुढे ठेउनी अक्षर शब्द सांडले मी पसाभर जोडूनी त्या शब्दांना पण ... कविता काही जमत नाही काय करु ? कसे करु ? मला काहीच सूचत नाही | कल्पनेचे अश्व दौडले पण प्रतिभेने तर वैर मांडले निळ्या काळ्या शाई मधूनी निरर्थकच ओळी येती काय करु ?

(...बोकडाचे खूर काही!)

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 06/09/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींचे 'मारव्याचे सूर काही' ऐकले आणि एका वेगळ्याच रागाचे चित्र नजरेसमोरुन तरळले! ;) मारले वजनास, स्नायू फुगवले भरपूर काही! जवळ येतानाच गेले, ढेर माझे दूर काही! मी जरी कुथलो कितीही जोर ते मारायला पण.... होत नाही 'बेडकी'चा सांड तो मगरूर काही! ओरडा कोणी कितीही - बाटल्या होती रिकाम्या तोंड अमुचे सोडते मग दाटलेला धूर काही! वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू 'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही ! रोज मी एकेक पळुनी फाडतो प्यांटीस माझ्या... आरसा मग दोंद माझे दाखवी भेसूर काही!

वाढदिवस म्हणजे

लेखक दिप्ती यांनी शुक्रवार, 05/09/2008 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस म्हणजे ;;) वाढदिवस म्हणजे - नाही फक्त्त वाढत्या वयाची जाणीव देणारा दिवस आनंदाने , उमेदीने नवे दिवस स्विकारण्याचा हा दिवस वाढदिवस म्हणजे - नाही फक्त भूतकाळाचा जमाख्रर्च मांडण्याचा दिवस गमावलं ते गमावलं म्हणून नवं मिळवण्याच्या उभारीचा हा दिवस वाढदिवस म्हणजे- नाहि फक्त जगण्याची पाटी कोरी करण्याचा दिवस जुन्या आठवणींचे दिवे लावून नवीन स्वप्ने रंगवण्याचा हा दिवस

एक छोटी कविता (तक्रारवजा)

लेखक पांथस्थ यांनी शुक्रवार, 05/09/2008 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीने मागील वर्षी केलेली एक कविता. मी जास्त वेळ ऑफिस मधे घालवतो आणि सुट्टिच्या दिवशी खेळायला जातो ह्याची तक्रार आहे इथे -
Taxonomy upgrade extras

एक सुरवात व शेवट नसलेली कविता

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 04/09/2008 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . राहुनी जागा तरीही, शब्द गेला चोरीला बाजूनी आल्या आरोळ्या, मीच माझा चोर झालो खाऊनी आसूड त्यांचे, वेदना बोलूनी गेलो ओढुनी ओझे तरीही, बेईमानी ढोर झालो "संपले नाते जगाशी " - सांगताना मीच भ्यालो बेरकी नजरेत त्यांच्या, मी पुन्हा शिरजोर झालो . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
Taxonomy upgrade extras

ओंडका

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 03/09/2008 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओंडका =================== बुडवू पाहती कितीक लाटा.. "मी" तरी हा, बुडतं नाही!.. नाका-तोंडात पाणीच पाणी.. "मी" तरी हा, मरत नाही!.. पोहता पोहता थकली गात्रे.. "मी" तरी हा, गळत नाही!.. बनून हेंदकळे नाव सागरी.. बोट कुणाची बनत नाही!.. धरून राहतो हाती ओंडका.. "मी" तरी हा, तारत नाही..!!! =================== स्वाती फडणीस....... ०३-०९-२००८
Taxonomy upgrade extras