Skip to main content

कविता

वेदना

लेखक पंचम यांनी बुधवार, 20/08/2008 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
वेदना
त्या कोणत्या सावल्या होत्या ज्यांचा माझ्यावर अधिकार होता विस्कटलेल्या जखमांवर माझ्या नियतीचा प्रहार होता..... त्या सावल्याच होत्या की, ठिणग्यांचा पाऊस कारण झालेल्या जखमांनाही रेशमी किनार होता... आरक्त होऊनी पडले माझे शरीर खाली त्या जखमांनाही लागलेला सुरा धारदार होता..... वेदना कधी झाल्याच नाहीत त्या धारदार सुर्‍याच्या ज्याने दिल्या वेदना त्याचाच आधार होता...

(पहा वेळ झाली!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/08/2008 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! :SS :T पहा 'वेळ' झाली! 'ठमा' क्रूर आली! पळे भीत 'रिंकू'; लपेटून शाली. करा बंद गाणी; कुठे ती पळाली? बिछान्यात माती बुटांची मिळाली. कशी ही विचारे; सदर्‍यास लाली? मिळे चोप 'रंग्या'; घरी कोतवाली! चतुरंग

वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 19/08/2008 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--फारूक जामी) प्रतिमा तुझी माझ्या हृदया जवळी वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी दैव माझे सजवूनी दिलास तू आकार निष्कामी मला तू बनविलेस मुर्तिकार शब्द नी शब्द ठेविला मी हृदया जवळी वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी आणूनी स्मरणात केली मी पुजा रात्रंदिनी अचंबीत झालो ततक्ष्णी पाउलांची निशाणी पाहूनी झुकवूनी मस्तक माझे वाहतो फुलांची ओंजळी वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी करूनी गीतांची माला वाहिली मी तुझ्या गळी दूर राहूनी पुकारले तुला सकाळ संध्याकाळी कोणत्या कारणी दिलीस शिक्षा अशी आगळी वस्ति वसविली मी अगदी जगावेगळी श्रीकृष्ण सामंत

प्रतिबिंब

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 19/08/2008 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
तु खरी होतीस किंवा ते तुझे आभास होते वा तुझे प्रतिबिंब तेथे वाहत्या पाण्यात होते गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी स्वप्न माझे नभ होवुनी पैलतीरी जात होते वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते हासले हे जग मला नव्हतीस तु ही वेगळी हास्य होवोनी कट्यारी चांदणे कापीत होते पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते
Taxonomy upgrade extras

मौनाला फुटली वाणी!..

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 19/08/2008 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
मौनाला फुटली वाणी!.. . एक ना स्फुरला शब्द.. एक ना ओळ सुचली.. हसले रडले ओठांनी..! एक ना कविता रचली. शब्द पाखरे भवताली, सुर गुंफून भिरभिरली.. तार तार झंकारुनी... कंपने कंपनांत विरली..!!! अनाहतसा नाद छेडूनी.. मौनाला फुटली वाणी!.. अगम्य अशा बोलांची.. नकळत जुळली गाणी..!!! हसले रडले ओठांनी... नकळत जुळली गाणी..!!! ================== स्वाती फडणीस....... १७-०८-२००८
Taxonomy upgrade extras

वादळ आता माणसाळतंय......

लेखक मनीषा यांनी सोमवार, 18/08/2008 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
उधळत, उसळत,-- थैमान घालणारं, वादळ आता माणसाळतंय...... उजाड झाले आहेत किनारे आणि निर्मनुष्य झाल्या आहेत वस्त्या पाऊलवाटा शोधताना स्वतः मधेच हरवलंय पण तरीही .......... वादळ आता माणसाळतंय ! एकाकी वृक्षावर विस्कटलेलं घरटं सावरण्यासाठी -----काडी काडी शोधतंय कारण वादळ आता माणसाळतंय! उगारलेले हात जोडण्यासाठी दुरावलेली मनं सांधण्यासाठी आकांतानं तळमळतंय कारण वादळ आता माणसाळतंय! राख पसरली आहे आकांक्षांची आणि उरले आहेत काही कोळसे ....... माणुसकीचे उजाडलेल्या जमिनीवर, हिरवी पात शोधतंय कारण वादळ आता माणसाळतंय! उरल्या नाहीत कसल्या खुणा अन दीपस्तंभही कोसळलेले स्मशानवाटेवर...

तिन्ही त्रिकाळ

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 18/08/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही त्रिकाळ घरामधे ह्यांचीच सारखी घाई काही करायचे म्हटलं, तर माझ्यासाठी वेळ नाही सकाळी आरामात उठणे कसले आमच्या नशीबात ब्रेकफास्ट खाऊन लवकर, ह्यांना जायचे ऑफीसात आज सुट्टीचा रविवार, उठावे आरामात, सुचवता रोमॅन्टीक मूड ह्यांचा म्हणे पाहू सूर्य उगवता सुर्य तरी कसला अरसीक, तिन्ही काळ करतो काम उशीरा का उगवत नाही घ्यायला एक दिवस आराम? दुपारी हे ऑफीसात, मैत्रीणीशी फोनवर बोलते खूपवेळ मधूनच ह्यांना आठवण येते, एन्गेज मिळताच घालमेल संध्याकाळी घरी लवकर, एक दिवस तर बायकोसाठी पण कसले काय, उशीरा पर्यंत रोज मरमर कामासाठी रात्र तरी आपली असावी?
Taxonomy upgrade extras

चमचम करती ऐने

लेखक स्वांतसुखाय यांनी सोमवार, 18/08/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या साठी नटून बसले काळी चंद्रकळा नेसून रातराणीचे गंध उडवले चोळी ऐन्याची घालून
जरा टेकून घ्या, पान लावलेले खा घाई साजणा, का बरे झाली? हात हळूच लावा, जरा जपून राखा माझी आंब्याची रसाळ डाली
चमचम करती दंडावर किती ऐने नाजूक बिलोरी उरावर कशी खुलून दिसते छबी साजणाची प्यारी
नको नुसता मुका, स्वाद थोडा चाखा खुणावते गुलाबाची लाली हात हळूच लावा, जरा जपून राखा माझी आंब्याची रसाळ डाली
उगा झोंबाझोंबी नको हो राया जातील ऐने फुटून बगा थरथरे रेशमी काया अहो पाटील थोडे जपून
रात उरली बगा, जरा दमान वाग
Taxonomy upgrade extras

आहे आणि नाही असा!

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 18/08/2008 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
आहे आणि नाही असा! . संतत पडणारा पाऊस.. आहे आणि नाही असा! पाना पानावर ओलावा.. आहे आणि नाही असा! एकच थेंब खरा.. इथे तिथे विखुरलेला.. भुरभूर वारा; बोचरा, कापरा! थरथरती फांदी; झटकत पानांना..? टिप्प... एक थेंब; थेंबांना जोडणारा.. एक थेंब; थेंबांनी जोडलेला... आहे आणि नाही असा!!! =================== स्वाती फडणीस......... ०४-०८-२००८
Taxonomy upgrade extras

आज १५ ऑगस्ट ना..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 18/08/2008 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ ऑगस्ट ना मित्रा. आनंदाने भरून आलाय ऊर. पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर.. आज १५ ऑगस्ट ना मित्रा, सांग भारतात स्टेट्स आहेत किती ? असतील पंचवीस तीस. आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..! आज १५ ऑगस्ट ना मित्रा, सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ? कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही पण ए. आर.
Taxonomy upgrade extras