Skip to main content

कविता

अंतर थोडेसे

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 18/08/2008 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य आणि असत्य ह्यांत फक्त एका अक्षराचे अंतर अशाच छोट्याशा अंतरामुळे छोट्या नारायणाचा जीव गेला. जीवन आणि मृत्यु ह्यात फक्त एका श्वासाचे अंतर पण मृत्यु फक्त शरीरारालाच येतो. जीवन पुढे चालू रहात असेल कां? उधळपट्टी, कंजुषी आणि काटकसर ह्यात फक्त गरजेचे अंतर गरज नसतांना केलेला खर्च
---- उधळपट्टी
गरज असतांना न केलेला खर्च
---- कंजुषी
गरज तोलून मापून केलेला खर्च
---- काटकसर
आवड आणि नावड ह्यात फक्त चवीचे अंतर उगाच नाही म्हणत, नावडतीचे मीठ अळणी कवी आणि लेखक ह्यात आळशीपणाचे अंतर आळशी लेख
Taxonomy upgrade extras

मिसळपावार आमचे लेखनाचे शतक

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 17/08/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज लिहूनी लेख मिसळपावावरी झाली लेखनाची पहिली शंभरी हुषार चोखंदळ असती येथले सभासद मते देऊनी मनापासूनी घालती थोडा वाद विसोबा खेचर,पिवळा डांबिस,बेसनलाडू,सर्कीट टोपणनावे विचित्र असूनी संदर्भ त्याचा अवीट कविता माझी वाचून यांनी केली त्रेधातिरपीट कुणा आवडे कुणा नावडे हीच खरी निवड योग्य ते लिहा!

तुटू न जावो तुझी कंगणी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 16/08/2008 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--सूरज) अर्ध्या रात्री खणकली माझी कंगणी आलास का रे साजणा माझ्या अंगणी जा सांग रे! काळ्या काळ्या घना माझ्या करीता माझ्या साजणा प्रीतिच्या रंगामधे रंगविली मी कोरी चुनरी तुझ्या कारणी अर्ध्या रात्री खणकली माझी कंगणी आलास का रे साजणा माझ्या अंगणी ऐकूनी खणखणे कंगणाचे गे! साजणे नसे कठीण काय ते समजणे कोण पुकारून सांगे हे इशारे समजलो काय ते समजणे समोर मी उभा असे गे! साजणे होईल ते होवूदे काहीही यापुढे तुटू न जावो तुझी कंगणे श्रीकृष्ण सामंत

१६ ऑगस्ट.

लेखक रामदास यांनी शनिवार, 16/08/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाला मिळणारा लोकाश्रय बघून कविला वाटले आपणही लिहावी एक कविता.
Taxonomy upgrade extras

तांडव..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 16/08/2008 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार नित्य होती वार जैसे घुमे तलवार.. वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार 'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार.. - प्राजु

स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 15/08/2008 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली तेव्हा मी 'स्वातंत्र्य पन्नाशीचा अभंग' नावाची कविता लिहिली. स्वातंत्र्यास वर्षे| जाहली पन्नास केला सत्यानास| भामट्यांनी अशी तिची सुरवात होती. स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाली तेव्हा पहिल्या दोन ओळी बदलल्या. अन्य काही किरकोळ बदल केले. आशयाच्या दृष्टीने दहा वर्षात फारसा फरक पडला नव्हता. ती कविता खाली देत आहे. आज स्वातंत्र्याला एकसष्ट वर्षे पूर्ण होत आहेत.
Taxonomy upgrade extras

स्वातंत्र्य तर मिळाले, पण...??

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 15/08/2008 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्य तर मिळाले इंग्रज तर पळाले, पण... दहशतवाद जन्मला ...तो येथेच आहे. भ्रष्टाचार जन्मला ... तो येथेच आहे. स्वातंत्र्य तर मिळाले, स्वराज्य तर मिळाले, पण... महागाई वाढली .. ती जात नाही बेरोजगारी वाढली ..ती जात नाही स्वातंत्र्य तर मिळाले, लोकशाही तर मिळाली, पण... लोकसंख्या वाढली ... ती वाढतेच आहे बेईमानी वाढली .. ती वाढतेच आहे. स्वातंत्र्य तर मिळाले इंग्रज तर पळाले, पण... इंग्रजी येथेच आहे ... ती जाणार नाही गरीबी येथेच आहे ...ती जाणार नाही
Taxonomy upgrade extras

मनातला पाऊस

लेखक prasannakumar यांनी शुक्रवार, 15/08/2008 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
विरह व्याकुळ तप्त धरेवर मुक्त बरसले श्यामल जलधर ओलेती मग त्रुप्त धरा ती ल्याली शालू हिरवा सु॑दर हिरव्या रानी दिसती दूरवर शुभ्र रुपेरि रेषा धुसर खडका॑ना हो फुटला पान्हा स्वैर उधळले धुधाळ निर्झर उद॑ड पाणी पिऊन नाले तुड॑ब भरुनी ओढे झाले क॑पित कातर वायु लहरी तर॑ग ऊठले शा॑त जलावर क्रुषीवला॑ची शेतामध्ये लगबग झाली घेऊन ना॑गर पिके कोवळी हिरवे खाचर त्रुप्ती सारया॑ मनामना॑वर माळावरती रानफुला॑ची जमली नक्षी र॑गीत सु॑दर फुलपाखरे इकडून तिकडॅ ऊडू लागली द्रुश्य मनोहर त्रुप्त जाहली स्रुष्टी सारी तुष्ट जाहले जलचर भुचर रानामध्ये कुठे ला॑बवर घुमु लागले पाव्याचे सुर

पावसाची परी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 15/08/2008 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे लपलीस सरी दु:खी पावसाची परी सरी बसल्या लपून परी गाल फुगवून ये ग सरी ये ग सरी गाते पावसाची परी सरी आल्या भरभरून परी हसली खळखळून नको सरीवर सरी चिंब पावसाची परी बुडे घरे दारे सारी परी जा ग तुही घरी
Taxonomy upgrade extras

नाव शोधून शोधून जोडू नको!

लेखक केसुरंगा यांनी शुक्रवार, 15/08/2008 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर सदस्यांची नावे अशी फिरताना बघून आमचे डोळे फिरले! 8| एकामागून एक सदस्य अशी नावे फिरवून फिरताना पाहून ना.घ. देशपांड्यांच्या डाव मांडून भांडून मोडू नको ह्या अप्रतिम गाण्याचे शब्द आम्ही फिरवले!