विरह
कवितेतल्या प्रियकराची प्रेयसी त्याला सोडुन गेली आहे..( कायमची नाही..)
तेव्हा बघुया काय म्हणतोय प्रियकर......
विरह
सहन होत नाही विरह तिचा आता मला...
दोन दिवसात येते म्हणाली महीना आता होत आला,
कसं रहावस वाटत तिला माझ्यावाचुन इतका वेळ दुर...
प्रत्येक क्षण तुटतोय मी इथे हे सांगायला झालोय तीला आतुर....
जातांना ती तशी देऊन गेली होती
दोन दिवसांच आगाऊ प्रेमं..
पण... दोन दिवसांचा महीना होईल,
याचा कुठे होता मला नेम..
हीच्या आठवणीत मी इथे दिवसभर कुढायचं...
एकच वेळा जेवायच,आणि रात्रभर जागायच...
हीने मात्र मस्त मनसोक्त्त हींडायच..
चापुन-चुपुन खायच..आणि डाराडुर झोपायचं..
बघा ना...
Taxonomy upgrade extras
मिसळपाव