पहाट
जेव्हा लिहतो मी,
तेव्हा लेखणीत उरतो मी,
होऊन थेंब शाईचा,
कागदावरी पसरतो मी......
जेव्हा पाहतो मी,
तेव्हा स्वप्न सांधतो मी,
होऊन ईंन्द्र्धनुश्याचे रंग,
दाही दिशात सांडतो मी.......
जेव्हा बोलतो मी,
शब्द चोरतो मी,
कधी हास्यांचे तर
कधी आसवांचे दान फेकतो मी.......
जेव्हा गातो मी,
सप्तसुर होतो मी,
होऊन भरलेले आभाळ
जमिनीवर बरसतो मी.......
जेव्हा नाव सांगतो मी,
जरासा घाबरतो मी,
बिनचेह-याच्या या गर्दीत
स्वताची ओळख लपवतो मी.......
Taxonomy upgrade extras
मिसळपाव