Skip to main content

कविता

(तनःशांती!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/07/2008 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
ॐकारशेठचा 'मनःशांती' चा शोध वाचला आणि आम्हाला पूर्वीचे अथक प्रयत्न आठवले! ;) तनःशांतीचा शोध घेत होतो रात्रंदिवस 'फिटनेस'वर शोधले, 'वेटलॉस'वर आलो जाऊन 'बुलवर्कर' धुंडाळले 'टर्बो बॅग' काढली बुकलून 'केक' पाहिले बदलून 'लो कॅलरी'ही शोधत राहिलो 'ट्रेडमिल' झाले फिरवून 'स्पिनिंग' करत फिरलो निवांत क्षणी एका लकाकले डोळे, फिटली भ्रांती 'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला सापडली तनःशांती! 'भार'नियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच झोप, तेच घोरणे आणि तोच वायदा चतुरंग

निवृत्तीनाथ केशवसुमारास...

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 21/07/2008 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
निवृत्तीनाथ केशवसुमारास... विडंबने तव सर्व जुनी मी स्मरतो आहे मनापासूनी आज तुला मी लिहितो आहे हक्कच होता! तुजला टाळ्या खूप मिळाल्या `कवी' तरीपण कशामुळे घुसमटतो आहे? कसल्या प्रतिमा? कसले जाळे?
Taxonomy upgrade extras

(निवृत्ती)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/07/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवस गावाला गेलो होतो येऊन बघतो तो काय निवृत्ती? गुरुवर्य केशवसुमारांच्या ह्या'निवृत्ती'ने आमच्या भावना उचंबळून आल्या. घेतला वसा टाकणे ही तर विडंबनाशी प्रतारणाच, शिवाय गुरुवर्यांना काय वाटेल?

कैदी आणि अंकूर

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 21/07/2008 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णी ह्यांच्या 'स्वामी' कथेतील एका प्रसंगाचे कवितेत रुपांतर. काळकोठडी मध्ये टाकला एक बंदिवान काळ्या दगडात विसरला काळाचे भान आहे ठाऊक पक्के त्याला, नशीब ह्या जन्मीचे सुटण्यासाठी सहाय्य, केवळ मिळेल मरणाचे किती खोल अन् कुणास ठाऊक, खोली तुरूंगाची तसूभरही ना दुसरे जीवन, न चाहुल कोणाची भिंतीमधली झडप उघडुनी, ताट येतसे आत तोच एक आवाज जगाचा, बाकी सारी मयत आंधाराहून कृष्ण छाया, स्वतःचीच पाहतो नीरव अश्रू विना हुंदके, अंतरीच दाबतो बाह्यजगाशी एकच नाते, नलीका हवेसाठी तिच्याच योगे जगते आहे, शरीराची काठी क्षीण कवडसा कधी उतरतो, नलीकेतून खाली मित्रची जणू येई भेटाया, दुर्गम बंदीश
Taxonomy upgrade extras

आली फिरून उत्कंठा जगण्याची

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 20/07/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-शैलेंद्रसिंग) पदर ओढिला काट्यानी चाळ तोडिला पायानी उडत्या माझ्या मनाला कुणि आता नका आवरूं चालले होऊन माझे मन जणू वाऱ्या वरचे पाखरूं आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून देखिले चोहिकडे नयन मिचकावून बहरले जीवन फुला फुलातून निश्चय झाला मग हे देखून आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा का भारावलेले असे माझे जीवन का मोकाट सुट्लेले मी असे तुफान मन होई साशंक करीता जीवन प्रवास वाटे जाईन हरवून मी तुझा सहवास आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा श्रीकृष्ण सामंत

आईच्या कविता-१

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 20/07/2008 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
ध्यास इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची परी गोंधळ्ले मन, हितंतिथं दिसे तोचि त्येच्या आंघुळीला वाटे, आणू वाईच गं पानी पान्यातच उभा व्हता, सावळा गं चक्रपाणि गंध उगाळाया हाती, घेतली ग मी सहाण तिच्यामंदी श्रीखंड्याचे, देखिले गं म्या ध्यान निवदासी आणाया, दूध ग्येले मी घरात सोता गोकुळीचा कान्हा, उबा माज्या गोकुळात कशी करू याची पूजा, मज इच्यार पडला कसा द्येव हा इट्टल, आसंल संतांनी पूजिला नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं ध्यान निरखता निसत
Taxonomy upgrade extras

प्रेमात...

लेखक truptiparte यांनी शनिवार, 19/07/2008 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात कधीच नस्त ब॑धन प्रेमात कधीच नस्ते अपे़क्षा प्रेमात फक्त असत॑ समधान प्रेमात फक्त असते प्रतीक्षा प्रेमात कधीच नस्त दु:ख प्रेमात कधीच नस्तो घात प्रेमात फक्त असत॑ सुख प्रेमात फक्त असतो विश्वास प्रेमत कधीच नसतो दुरावा प्रेमात कधीच नसतो भास प्रेमात फक्त असत॑ सोबत असण॑ प्रेमात फक्त असतो आपले पणाचा ध्यास.

(मोरपिशी साडी)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 19/07/2008 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात.... लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून, ओठांशी मस्ती करणार्‍या आरशामधल्या पाचफुटी फुला.... उगीच का अत्तर लावतोस? तुझ्या या मोरपिशी साडीनंच "अत्तर शिंपडलंय या देखाव्यात'' निर्‍या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं... आणि तांबूसकाळ्या बटांमागचं.. कानावरचं हसरं पिवळं फुल, म्हणजे सुगंधाचा कळस! आहा... ! डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून. बर आहे..., तू घरात आहेस!, असाच राहशील कायम... असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य, तुझं कोवळे पण.. तुझी मोरपिशी साडी! न विस्कटता , न कोमेजता! प्रेरणा: स्वातीताई फडणीसांची हिरवी जिद्द

शेपटा

लेखक ANIRUDDHA JOSHI यांनी शनिवार, 19/07/2008 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅड्व्होकेट रत्नपारखी यांची शेपटा हि कविता मिसळपाव साठी पाठवत आहे. तुम्ही सर्व कवितेचा आनंद घ्याल अशी अपेक्षा. एस. एस. सी.

हिरवी जिद्द

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 19/07/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
. सिमेंटच्या शेवाळल्या थरात.... मातीचा बोटभर तुकडा शोधून, उंच उंच जाणार्‍या इमारती मधल्या फुटभराच्या रोपट्या.... किती रे सुंदर दिसतोस! तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' जमिनीला घट्ट धरून ठेवणारी तुझी मुळं... आणि काळपट-करड्या पार्श्वभूमीवरच.. ते टोकाचं हसरं पिवळं फुल, म्हणजे सौंर्दयाचा कळस! आहा... ! डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून. बर आहे..., तू चित्रात आहेस!, असाच रहशिल कायम... असच राहील तुझ चैतन्यमयी हास्य, तुझ कोवळे पण.. तुझी हिरवी जिद्द! न जराठता , कोमेजता! ===================== स्वाती फडणीस ............ ०८-०५-२००८
Taxonomy upgrade extras