Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डाॅक्टरांची फी

स
स्वधर्म
Wed, 03/11/2015 - 11:02
🗣 429 प्रतिसाद
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता. एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही. - स्वधर्म

प्रतिक्रिया द्या
82348 वाचन

💬 प्रतिसाद (429)
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/12/2015 - 11:50 नवीन
अरे वा! खरेच अगदी मस्त प्रकार आहे हा. बहुत धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरकी
आ
आनंदी गोपाळ Wed, 03/11/2015 - 20:06 नवीन
मोठाली हॉस्पिटल्स चालवणारे नॉनमेडिको हलकट एम्बीए झालेले अ‍ॅडमिनिस्ट्रेटर नोकरीला ठेवतात अन ते ज्युनियर डॉक्टरांना अमुक महिन्यांत इतक्या बायपास नैतर तितक्या हिस्ट्रेक्टॉम्या करा नाहीतर तुमची अ‍ॅटॅचमेंट रद्द करू असल्या 'बिझिनेस टार्गेट' धमक्या देतात, ही तुमच्या समाजाची 'हेल्थ इंडस्ट्री'??? तिथे तुमच्या आयुष्याला सेल्स टार्गॅट ठरवलं तर वाईट वाटत नाही का? एथिक्स लावून डॉक्टरला दाबून मारणार, अन तिकडे हे 'हेल्थ इंडस्ट्रियालिस्ट' कट वाटायला ओपनली पीआरओ ठेवणार, निर्लज्जपणे जाहिरात करणार वर सांगणार की आम्हाला एमएमसीचा कंट्रोल लागू नाही?? सरकारी नोकरांना पैसे खाऊ घालून बिनडोक कायदे पास करून खासगी इमानदार सेवा देणारे दवाखानेच चालणार नाहीत, असा कावा रचणारे कोण आहेत? कॉर्पोरेट हॉस्पिटल अन इन्श्युरन्स्वाले, की डॉक्टर्स? खिशात २० रुपये घेऊन तापाची सुई घ्यायला जा बरं अमेरिकेतल्या दवाखान्यात? अन सांगा त्याला की माझा इन्शुरन्स नाही म्हणून? त्या नॉनमेडिकोजनी हे सगळं केलं, तरी बिलातले ८० हजार डोळ्यात आले लोकांच्या, बाकीचे दीड पावणेदोन लाख गेले कुठे?? ते नाही विचारलंत? बालाजी तांबेचे "बिझिनेस एथिक्स" मी नको पाळू? कंप्यारिझन पण नको? का?? क्वालिफाईड डॉक्टरांचं डॉक बॅशिंग करायला तर भल्ती मजा येते बा! तांबे बॅशिंगही करायचं बघा की कधीतरी.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 03/12/2015 - 08:53 नवीन
अ‍ॅडमिनिस्ट्रेटरला पॉटॅशियम क्लोराईडचं इंजेक्शन देता येणार नाही का गुपचुप? है कै नै कै. तेवढीच समाजसेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ख
खटपट्या Wed, 03/11/2015 - 21:19 नवीन
वर डॉक्टर आणि मेकॅनिकची होणारी तुलना पाहून एक चपखल बसणारा विनोद आठवला.. एक मेकॅनिक डॉक्टरला म्हणतो. "काय हो, तुम्ही जे काम करता तेच मी करतो ना. मी गाडीचे पार्ट्स बदलतो आणि तुम्ही शरीराचे बदलाता." तरीही तुम्ही एवढे जास्त पैसे कसे घेता? डॉक्टर म्हणाले, "मित्रा, तु गाडीचे जे पार्टस बदलतोस ते गाडी चालू असताना बदलून दाखव.." :)
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट गुरुवार, 03/12/2015 - 03:18 नवीन
मेकॅनिकचा धंदा करायला डिग्री लागत नाही. बिल्डरला सिव्हील इंजिनीयर असावं अशी अट नाही. कारखाना टाकणा-याने मेकॅनिकल इंजिनियर असावे अशीही अट नाही. पण हॉस्पिटल टाकणा-याने, दवाखाना टाकणा-याने वैद्यकीय प्रमाणपत्रधारक असावं अशी अट आहे. वकीलांच्या बाबतही अशी अट आहे. असं संरक्षण असल्याने जबाबदारी कुणाची वाढते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
संदीप डांगे गुरुवार, 03/12/2015 - 03:55 नवीन
सर्टीफिकेट, डिग्री असणार्‍यांनाच धंदा करू देणे हे संरक्षण जनतेला आहे हो. धंदा करणार्‍याला धंदा नीट मिळावा म्हणून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Fri, 03/13/2015 - 03:38 नवीन
धन्यवाद बेसिक्सबद्दल. म्हणजेच ज्याला धंदा करायचा आहे त्याने कापडाचं दुकान टाकण्यापासून बाटलीला हजर स्टॉकमधे बुचं बसवून मिळतील आणि फुगे फुगवून मिळतील पर्यंत कुठलाही धंदा करायला कायद्याने बंदी नाही असेच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी गुरुवार, 03/12/2015 - 10:15 नवीन
डॉक्टर म्हणाले, "मित्रा, तु गाडीचे जे पार्टस बदलतोस ते गाडी चालू असताना बदलून दाखव.." :) मग मॅकेनिक म्हणाला , मी पूर्ण बंद पडलेली गाडी चालू करून दाखवतो .. तु करशील काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
इ
इरसाल गुरुवार, 03/12/2015 - 12:21 नवीन
क मेकॅनिक डॉक्टरला म्हणतो. "काय हो, तुम्ही जे काम करता तेच मी करतो ना. मी गाडीचे पार्ट्स बदलतो आणि तुम्ही शरीराचे बदलाता." तरीही तुम्ही एवढे जास्त पैसे कसे घेता? डॉक्टर म्हणाले, "मित्रा, तु गाडीचे जे पार्टस बदलतोस ते गाडी चालू असताना बदलून दाखव.. मेकॅनिकः बरोबर आहे पण मी बंद पडलेले इंजिन चालु करु शकतो तुम्ही करुन दाखवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अजया गुरुवार, 03/12/2015 - 04:15 नवीन
सर्टिफिकेट हे त्या त्या धंद्याचे संरक्षण असते की धंदा करायचा परवाना?
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 03/12/2015 - 04:23 नवीन
डाॅक्टर स्वतःचा अनुभव,शिक्षण ,त्याचे शिक्षणासाठी घेतलेले कष्ट,काॅम्प्लिकेटेड केसेसचा ताण हे सर्व लक्षात घेऊन,तुमची गाडी नाही तर अाख्खा सजीव ठिकठाक करण्याचा प्रयत्न करत असतो.त्याला स्वतःची फी ठरवण्याचा अधिकार अाहेच दुसरं अनेक लोकांना केस गेल्यावर डाॅक्टर का हतबल झाले असतील हे न समजता सोबतच्या,ऒळखीच्या शुन्य वैद्यकिय माहिती असणार्या लोकांनी ,हे असं अाधीच केलं असतं तर हा आज जिवंत असता असल्या वक्तव्यांवर जास्त विश्वास असतो,हे मी पाहिलेलं आहे.फक्त ते आधी का हे सल्ले द्यायला आले नाहीत मग,हा प्रश्न त्याना कोणी विचारत नाही.अाॅपरेशन क्रिकेटची मॅच नाही.अरे,मी सांगतो अमका वन डाऊन आला असता ना तर मॅच आपलीच होती!!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/12/2015 - 04:34 नवीन
डॉक्टर, वकील हे व्यवसाय आहेत, नोकर्‍या नव्हेत. (नोकर्‍यांतही स्पेशल स्किलवाले स्वतःचा चार्ज लावतात आणि एम्प्लॉयर्स तो देतात ही गोष्ट अलाहिदा) त्यांना वाटेल तो चार्ज ते लावू शकतात. मिळाला तर यशस्वी होतात, न मिळाला तर डब्यात जातात. आपल्याला परवडलं तर त्यांच्याकडे जावं, न परवडलं तर त्यांचा नाद सोडून आपल्याला परवडाणारा समव्यावसायिक शोधावा... उगाच आमच्या शेजारचा वकील ५०० रुपयांत केस लढतो मग राम जेठमलानी एका दिवसाचे १ लाख रुपये का घेतात असा वाद करण्यात काहीही अर्थ नाही. यशस्वी व्यावसायिकांनी जर काही केसेस कमी पैशात/ मुफ्त केल्या तर तो त्यांचा भलेपणा... पण त्यांच्यावर कमी पैसे घेण्याची मागणी करण्याचा समाजाला काहीही अधिकार नाही. मला उपचार ब्रीच कॅन्डीच्या तोडीचे हवेत पण पैसे मात्र मी ससूनइतकेच देईन आग्रह अनाठायी आहे.....
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 03/12/2015 - 04:45 नवीन
सहमत. अजुनही एका रुग्णाकडून फक्त ३० रू. फी घेणारे डॉक्टर बघीतले आहेत. एका दिवसात १० जण आले तर ३०० होतात. शिक्षण, दवाखान्यावर केलेला खर्च्/भाडे हे सर्व पाहता कसे चालत असेल असा विचार येतो मनात. त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुबोध खरे गुरुवार, 03/12/2015 - 05:43 नवीन
पी डां साहेब राम जेठमलानी एका दिवसाचे १ लाख घेत असत या गोष्टीला आता कमीत कमी २० वर्षे झाली. आता ते (आणि त्यांच्या दर्जाचे वकील) नुसती आपली कागद पत्रे वाचायला एक लाख घेतात. त्यात काही तथ्य आढळले तर ते केस हातात घेतात आणि एका सुनावणीचे दहा लाख घेतात अशा आठ ते दहा सुनावण्या एका दिवसात ते करतात. श्री फली नरिमन १९७२ साली केस वाचण्याचे रुपये १०००/- घेत असत (वडिलांचा प्रत्यक्ष अनुभव). आजही एम बी अगरवाल सारखे डॉक्टर( ल्युकेमियासाठी भारतातील अग्रगण्य म्हणून गणले जाणारे किंवा डॉक्टर रमाकांत पांडा आपली अन्जीयोग्राफी पाहून सल्ला देण्यासाठी रुपये २०००/- च घेतात. माझी केस सर्वोच्च न्यायालयात असताना २००३ साली एका मध्यम दर्ज्याच्या वकिलास एका सुनावणीचे रुपये ४५०००/- देत होतो. तेंव्हा या तुलना करण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/12/2015 - 05:52 नवीन
सहमत आहे. मी सांगितली ती जेठमलांनींची गोष्ट ही ८०च्या दशकातली आहे.... बादमें, हम तो भये परदेस....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 03/12/2015 - 05:15 नवीन
गोपाळराव कशाला जळ जळ करून घेताय?समाजाला डॉक्टर आणि शिक्षकाने गरिबीत राहून समाजसेवा करायला पाहिजे आहे. तेंव्हा आपण कितीही जळजळ करून घेतलीत तरी निष्पन्न काय होणार? बाकी डॉक्टर आणि ड्रायव्हरची तुलना एकदम बेष्ट- जाता जाता एक विचार डोक्यात आला कि दहावी नंतर ३ महिने ( वाहन चालवण्यासारखे डॉक्टरीचे) प्रशिक्षण आणि परवाना देऊन डॉक्टर तयार करता आले तर भारतात असलेला वैद्यकीय सेवेचा मोठा तुटवडा भरून काढता येईल काय? वीस मिनिटांच्या शल्यक्रियेसाठी १२ हजार रुपये घेऊन तळहातावरच्या किलाॅईडची शल्यक्रिया करणाऱ्या डॉक्टरचे नाव आणि पत्ता कळेल काय? कारण अशा शल्यक्रियेसाठी फार मोठे कौशल्य लागते. थोडीशी चूक झाली( किंवा एखादा स्नायू आणि ताणा त्यात अडकला) तरी माणसाचा हात कायमचा आखडू शकतो. माझ्या अशा रुग्णांना नक्कीच मी त्यांच्याकडे पाठवेन. वीस मिनिटावरून एका विनोदाची आठवण झाली-- एका दंतवैद्याकडे रुग्ण विचारत होता कि दात काढण्याचे किती पैसे त्यावर दंतवैद्य म्हणाले ५०० रुपये. रुग्ण --अहो पाच मिनिटाच्या कामा साठी पाचशे रुपये? त्यावर ते दंतवैद्य शांतपणे म्हणाले तुम्हाला पाहिजे तर तोच दात मी पंधरा मिनिटे लावून काढतो आणि त्यातून तुम्ही भूल द्यायचे औषध नको म्हणालात तर त्याचे १०० रुपये कमी करतो. एक अतिशय ताजा अनुभव म्हणून सांगतो आहे-- आमच्या सासुबाई ना ह्र्युदय विकाराचा झटका आला म्हनून पनवेलला एका रुग्णालयात दाखल केले त्याचे बिल बारा तासाचे रुपये ७०,०००/- आले. यातील ३५,०००/- रुपये एका तातडीच्या इंजेक्षनचे होते(RTPA)बाकी त्यांच्या साठी वापरलेल्या सामुग्रीचे आणि आय सी यु चे २५ हजार आणि डॉक्टरांचे १०,०००/- . बारा तास दोन तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर अक्षरशः डोळ्यात तेल ठेवून लक्ष ठेवत होते. त्यामानाने हे पैसे काहीच नाहीत. दुर्दैवाने त्या सुधारत असताना परत ह्र्युदय विकाराचा एक झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. जर त्या जागल्या असत्या तर हे पैसे पूर्ण सत्कारणी लागले असते. यानंतर आमचा मेहुणा बँकॉक ला असतो त्याला येईपर्यंत वेळ जाणार होता म्हणून "ब्रिटो" या कंपनीची शीतपेटी मागवली आणि त्यात त्यांना ३५ तास ठेवले त्याचे बिल रुपये ३५ हजार झाले. (आईस्क्रीम ठेवतात तसा फ्रीझर आणि वर काच लावलेली). प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे याचा खरा अर्थ मला समजला. बारा तास प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज देणे आणि शीत पेटीचे भाडे यांची एकाच किंमत पाहून डोळे कोरडे झाले. रच्याकने-- मेहुणा मिळेल ते पहिले विमान पकडून मुंबईत आला तेंव्हा त्याच्या दिल्ली मुंबई तिकिटाचे विमान कंपनीने रुपये १५,०००/- घेतले. (तेवढेच तिकीट बँकॉक -दिल्ली प्रवासाचे होते) दोन महिने अगोदर तिकीट काढले तर दिल्ली मुंबई चे रुपये ३,०००/- तीन हजार फक्त होतात.तेंव्हा हा धागा वाचताना एक विचार आला कि दोन महिने अगोदर बुकिंग केले तर बायपासचे तीन लाख होतात मग तातडीचे म्हणून १५ लाख घ्यायला काय हरकत आहे? नाही तरी आता रेल्वे सुद्धा डायनामिक प्राईसिंगमध्ये गोव्याचे तिकीट दुप्पट घेतात. मग डॉक्टरनीच काय घोडे मारले आहे? बाकी काही प्रतिसाद मोदकरावांच्या दुव्यावर सापडतीलच डॉक्टरने समाजसेवेचे व्रत सोडून द्यावे अशा मतापर्यंत आलेला. सुबोध खरे
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/12/2015 - 05:29 नवीन
त्रस्त डॉक्टरा, शांत हो!! तुला अलिकडे खूप मनस्ताप झालाय याची कल्पना आहे... टाळूवर एखादं एरंडाचं पान ठेवून बघ!!! आयुर्वेदवालेही खूष!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अजया गुरुवार, 03/12/2015 - 06:47 नवीन
तत्काळ सेवेचे वेगळे पैसे!!क्या बात है!!किती खरी गोष्ट!!असे लावले चार्जेस तर काय पोट दुखेल लोकांचं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
काळा पहाड गुरुवार, 03/12/2015 - 07:27 नवीन
लोकांचं पोट दुखेल तर किती बरं असा विचार करणारे आणि त्यावर हसणारे डॉक्टर आहेत हे समाजाचं दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया गुरुवार, 03/12/2015 - 08:52 नवीन
साधा साबण ,त्याची मेकिंग काॅस्ट किती असते आणि आपण घेतो कितीला? तिथे विचारायला जाता येतं का इतकी किंमत का लावली आहे? डाॅक्टर हा भारतीय स्त्रीसारखा पाहिजे लोकांना.घरातली कामं करुन,सगळ्यांचं सगळं करुन स्वतः झीजणारा.मग त्याला देव्हार्यात बसवा. स्वतःच्या स्कीलचे पैसे नोकरीत पण वाजवुन घेता ना? मग डाॅक्टरने घेतले तर तुम्ही का प्रश्न विचारत आहात.याला पोटदुखीच म्हणणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
काळा पहाड गुरुवार, 03/12/2015 - 09:07 नवीन
प्रश्न तुमच्या लॉजिकवर नाही, तुमच्या टोनवर आहे. थोडासा सूडाचा वास येतोय त्या स्टेटमेंट ला. बाकी एक लक्षात घ्या. डॉक्टर हे समाजाचा भाग आहेत. ते आयसोलेटेड काम करत नाहीत. जितकं तुम्ही समाजाला नाडायचा प्रयत्न कराल, तितका समाज लवकर उत्तर शोधायचा प्रयत्न करेल. चायना वरून डॉक्टर मागवेल, एम बी बी एस ऐवजी तीन वर्षांचा डिप्लोमा सुरू करेल, प्रचंड प्रमाणात मेडिकल कॉलेज सुरू करून बल्क प्रमाणात डॉक्टर तयार करायचा प्रयत्न करेल, कायद्यात बदल करेल. डॉक्टरांचा संबंध पेशंटच्या आयुष्याशी येतो हा जसा त्यांच्या फायद्याचा विषय आहे, तसाच दुर्दैवाचा पण आहे. समाज त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक अ‍ॅक्शनवर आपलं मत बनवतो. साबण नाही परवडला तर स्वस्त घेतला जातो. तसं डॉक्टरबाबत करता येत नाही. साबण नाही घेतला तर माणसाचा जीव जात नाही. तेव्हा ही तुलना चुकीची आहे. सर्वात शेवटी, स्वतःची सेवा ही सेवा आहे की धंदा हे डॉक्टरवरच आहे. जितकं डॉक्टर त्याचा धंदा करत जातील, तितकं ते व्हल्नरेबल होत जातील. डॉक्टरवरचा ह्ल्ला ही मोठी घटना समजली जाते. वकीलाला बडवलं तर लोक म्हणतात बरं झालं. डॉक्टरांना आदरणीय व्हायचंय की वकीलांप्रमाणे व्हायचंय हे त्यांनीच ठरवावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया गुरुवार, 03/12/2015 - 09:21 नवीन
डाॅक्टरकी समाजसेवा म्हणून लोकाना त्यांच्या सोयीने पाहिजे आहे.बाकी सर्व हास्यास्पद चायनीज डाॅ इ. सोडुन दिले आहे! साबणाचे उदा. एवढ्यासाठी की तिथे तुम्हाला कोणी प्रत्यक्ष दिसत नाही ना का इतकी किंमत कसली विचारायला.कोणीतरी लिहिलंय त्याला उद्देशुन आहे ते.या सर्जरीची इतकी किंमत!! स्वस्तातल्या साबणासारखे स्वस्तातले डाॅक्टरही आहेत.तिथे जायचा पर्याय असतोच.मग तिथे जायचं नाही आणि मोठ्या सेट अप मध्ये जाऊन लुटलं म्हणून गळा काढायचा हे कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड गुरुवार, 03/12/2015 - 09:31 नवीन
अहो कोणी साबण अडीच लाखाला विकत नाही हो म्हणून विचारत नाही. दुकान्दार काय सांगणार? तो थोडाच बनवतो साबण? बाकी तसाही आम्ही बिग बझार मध्ये जावून पैसे वाचवायचा प्रयत्न करतोच. त्या पलिकडे सामान्य माणूस करणार काय?
स्वस्तातल्या साबणासारखे स्वस्तातले डाॅक्टरही आहेत.तिथे जायचा पर्याय असतोच.मग तिथे जायचं नाही आणि मोठ्या सेट अप मध्ये जाऊन लुटलं म्हणून गळा काढायचा हे कसं?
आम्ही स्वस्तातलेच शोधतो. आम्हालाही मोठ्या सेटपची हौस नाहीये. ती काय फॅशन आहे का मिरवायला? पण "तुम्ही किती घेता" हे कसं विचारायचं हे सांगा बघू एकदा. दुसरं म्हणजे आम्हाला काय झालंय हे डॉक्टरकडे गेल्याशिवाय कळत नाही. मग डॉक्टर किती पैसे घेणार हे कसं कळणार? बरं तिथे निगोशिएशन सुद्धा करता येत नाहीत. गुपचुप पैसे द्या आणि बाहेर पडा. म्हणजे मार पण खा आणि रडू पण नका पैकी प्रकार झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया गुरुवार, 03/12/2015 - 09:36 नवीन
आम्हाला काय झालंय हे डॉक्टरकडे गेल्याशिवाय कळत नाही.
याचीच फी आहे ती!रडलात तर रुमाल देऊ!फ्री!! मला मारी अंत्वानेत झाल्याचा फिल येतोय आता!ब्रेड नसेल तर केक खा!! चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड गुरुवार, 03/12/2015 - 07:36 नवीन
तेंव्हा हा धागा वाचताना एक विचार आला कि दोन महिने अगोदर बुकिंग केले तर बायपासचे तीन लाख होतात मग तातडीचे म्हणून १५ लाख घ्यायला काय हरकत आहे?
डॉक्टरसाहेब, डॉक्टर नावाच्या लोकांबद्दल समाजाच्या मनात जनरली आदर असतो. कदाचित त्यांना उपाय नसतो म्हणूनही असेल. पण सगळं ऐकलं असताना (कट प्रॅक्टिस, उगीचच सर्जरी करायला लावणे इत्यादी), आपला फॅमिली डॉक्टर (ही जमात आता नामषेश होते आहे) तसा नसेल असं सामान्य जनांना वाटतं हे खरं. खरं सांगायचं तर डॉक्टर म्हणून नव्हे, तर माणूस म्हणूनसुद्धा कुणी असा विचार कुणी तरी करतंय याची लाज वाटली. बाकी असाच विचार सैन्यातल्या लोकांनी केला तर त्यांना किती बरं ना? युद्ध सुरू झालं तर १५ लाख प्रत्येकी बोनस द्या तर लढाई वर जातो. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 03/12/2015 - 08:12 नवीन
का हो पहाड साहेब सरकारी विमान कंपनी "आमची गरज" असताना पाच पट पैसे लावते, सरकारी रेल्वे दुप्पट पैसे लावते त्याबद्दल आपण काहीच बोलणार नाही. "माणूस म्हणूनसुद्धा कुणी असा विचार कुणी तरी करतंय याची लाज वाटली". अशी नुसती तुलना केली तरी तुम्हाला आमच्या बद्दल लाज वाटली. डॉक्टरनेच समाजसेवा करायला पाहिजे का? माझ्या दवाखान्यासाठी सरकारी वीज कंपनी रुपये १०. ६१/- अधिक इंधन अधिभार हा दर लावते तेच आमच्या वरच्या मजल्यावरील घरगुती ग्राहकांना दर रुपये ४. १६/- अधिक इंधन अधिभार. म्हणजे सरकार आम्हाला धंदेवाईकच समजते.मग हा समाजसेवेचा भार डॉक्टरच्याच डोक्यावर का? येऊ घातलेले सरकारी नियम जर आपण पाहिलेत तर एका एम बी बी एस डॉक्टरला दवाखान्यासाठी कमीत कमी ४५० चौरस फुट जागा पाहिजे. मुलुंड सारख्या ठिकाणी २४०००/- चौरस फुटाला व्यापारी जागेचा दर असताना दवाखाना घ्यायचा असेल तर एक कोटीच्या वर पैसे लागतील.( हे नियम आयुश ला लागू नाहीत). असे असताना डॉक्टरने काय करावे हि अपेक्षा आहे? राहिली गोष्ट लष्कराबद्दल-- तेथे मी माझ्या तारुण्याची २३ वर्षे घालविलेली आहेत. लष्करात कितीही वेळ आणी जीव तोडून काम करा त्याची कुणाला किंमत नाही हे बाहेर आल्यावर मला व्यवस्थित समजलेले आहे. "मग माणूस म्हणूनसुद्धा कुणी असा (लष्कराला युद्धासाठी बोनस) विचार करण्याबद्दल मला आपली लाज वाटते" असे मी म्हणालो तर आपल्याला कसे वाटेल. जाऊ द्या. तुमच्याशी वाद घालून काय होणार आहे? लोकांची विचारसरणी काय आहे ते मला माहित आहे त्यामुळे मी या धाग्यावर प्रतिसाद देत नव्हतो. यापुढेही गप्प बसतो. बर झालं माझी दोन्ही मुलं डॉक्टर होत नाहीत. आपण म्हणता ते पूर्ण मान्य आहे, सगळ्या डॉक्टर न सरकारने किमान वेतन योजने प्रमाणे पगार द्यावा आणी डॉक्टरने आपले आयुष्य समाजाच्या सेवेत व्यतीत करावे. काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड गुरुवार, 03/12/2015 - 08:32 नवीन
"मग माणूस म्हणूनसुद्धा कुणी असा (लष्कराला युद्धासाठी बोनस) विचार करण्याबद्दल मला आपली लाज वाटते" असे मी म्हणालो तर आपल्याला कसे वाटेल.
साहेब, मी तुमच्या बोलण्यातली विसंगती दाखवत होतो. मी लष्कराला युद्धासाठी बोनस या संकल्पनेचं पुष्टीकरण करत नव्हतो. लष्कराला युद्धासाठी बोनस ही संकल्पना जितकी विचित्र वाटते, तितकंच डॉक्टरांनी अशा प्रकारचे पैसे आकारणं विचित्र वाटेल असं मला म्हणायचं होतं. बाकी तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे हे मला मान्य आहे. डॉक्टरनी पैसे जरूर कमवावेत. पण अव्वाच्या सव्वा पैसे आकारणं (कारण लोकांना ऑप्शन नाही हे डॉक्टरांना माहीती आहे) आणि मेडिकल प्रॅक्टीस मध्ये ज्या गैर बाबी चालतात त्यावर माझा आक्षेप होता.
राहिली गोष्ट लष्कराबद्दल-- तेथे मी माझ्या तारुण्याची २३ वर्षे घालविलेली आहेत. लष्करात कितीही वेळ आणी जीव तोडून काम करा त्याची कुणाला किंमत नाही हे बाहेर आल्यावर मला व्यवस्थित समजलेले आहे.
भारतीय व्यवस्था तुटवड्याच्या अर्थकारणावर चालते. तुटवडा करा आणि फायदा कमवा हा इथला मंत्र आहे. यात फक्त डॉक्टरच नाहीत, बिल्डर, शिक्षक, आयटीवाले आणि बाकीचे सगळेच येतात. तेव्हा लष्करात फारतर भारतीयांची बरोबर किंमत केली जाते आणि बाकीच्या ठिकाणी भारतीयांची किंमत त्यांची जेवढी लायकी नसते तेवढी दिली जाते असं म्हणा हवं तर. भारतीय लोकांनी स्वतःचं ओव्हरव्हॅल्युएशन चालू केलंय म्हणून तर त्यांना पाट्या टाकण्यासाठी एवढे पगार दिले जातात. लष्करात असं नसेल फार तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चिरोटा गुरुवार, 03/12/2015 - 07:20 नवीन
पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
महागड्या हॉस्पिटल्समुळे हे होते. हेच डॉक्टर सरकारी रुग्ण्यालयात तशाच प्रकारची ऑपरेशन्स अर्ध्या किंमतीत करतात. हॉस्पिटल्स चालवणे हा धंदा असल्याने पेशंटला जास्तीत जास्त कसे खर्चात टाकता येईल् हा धंदेवाईक विचार असतो.त्यातही मेडिकल इन्श्युरन्स असेल तर सोन्याहून पिवळे.. मोठ्या प्रसिद्ध हॉस्पिटल्समध्ये काम करणारे डॉक्टर्स खूप कुशल असतात हा गैसमज आहे. न्युरोसर्जरी सारखे काही अपवाद सोडले तर बहुतांशी सर्जन्स्,डॉक्टर्स हे सामान्य वकुब असणारे असतात.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/12/2015 - 08:29 नवीन
माझ्या मते डॉक्टर आणि मेकॅनिक अशी तुलना हास्यास्पद आहे.. डॉक्टरचा स्किलसेट असा असतो की त्याची किंमत अशी करता येणार नाही. त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे ते हवी ती फीस आकारु शकतात. ज्यांना प्रवडेल त्यांनी जावं, अन्यथा जाउ नये. कुणीतरी आयुष्याची अनेक वर्ष शिक्षण घेऊन, सेट अप साठी बराच पैसा लावुन, मला परवडेल अशा दरात काम करावं, समाजसेवा म्हणुन व्यवसायाकडे बघावं ही अपेक्षा आपण ठेवु शकतच नाही. पण डॉक्टरांनी सुद्धा एकदा हे मान्य केलं की हा त्यांचा "व्यवसाय" आहे, समाजसेवा नाही की मग हलगर्जीपणामुळे रट्टे पडले तर वाईट वाटुन घ्यायचं नाही. मग लोक "कस्ट्मर" सारखेच वागतील. "डॉक्टरसाहेब" वगैरे मान न मिळता, जाब विचारण्यात येतो तो ह्यामुळेच.. अनेकदा आम्हालाही अनेक वाईट डॉक्टरांचा अनुभव येतो.. साधं सर्दी तापाचं निदान चुकवुन भलतीच औषधं (पार टॅमीफ्ल्यु च डायरेक्ट) देणार्‍या महान बाई मला भेटल्या आहेत. मग असा धंदा नीट करता येत नसेल तर लोक गप्प का बसतील. तुमचा व्यवसाय हाय रिस्क आहेच. पण तो केवळ कुणाच्या जीवाचा संबंध अस्तो म्हणुनच नाही तर लोकांच्या त्या लेव्हलच्या भावना पण गुंतलेल्या असतात.. म्हणुनच त्याच लेव्हलचा वेळ आणि पैसा तुम्ही गुंतवला असतो.. आणि तशीच फीस सुद्धा आकारत असता. मग तशाच परिणामांना सुद्धा सामोरं जावं लागतं.. नेहमीच तुमची चुक असेल असं नाही.. पण आजकाल आजुबाजुला पाहता अनेकदा केवळ पैसा काढायचा म्हणुन डॉक्टर मढ्याचेही चार्जेस लावताना दिसतात. ओल्या सोबत सुकंही जळतं म्हणतात ना त्यातली गत होते मग.. चांगल्या डॉक्टरांवरही मारहाण सहन करायची वेळ येऊ शकते. तुमचा आणि आमचा.. दोघांचाही नाईलाज आहे..
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/12/2015 - 09:48 नवीन
मेकॅनिकशी तुलना बरोबर नाही. मेकॅनिक्स विनम्र असतात आणि त्यांच्याशी चर्चा शक्य असते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/12/2015 - 10:31 नवीन
मेकॅनिकचे पण चार्जेस वेगवेगळे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/12/2015 - 10:59 नवीन
हो, पण त्यांच्याशी त्या बाबतीत पण चर्चा शक्य असते. तुम्ही स्पष्टीकरण मागु शकता आणि त्यालाही त्यात काही वावगे वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सूड गुरुवार, 03/12/2015 - 10:28 नवीन
ह्या स्वधर्मचा आयडी बदलून नारद करा बघू!! काडी टाकून दिलीन आणि आता धाग्यावर हजेरी तरी लावल्ये का बघा? लोकं बसलीत वाद-प्रतिवाद करत.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 03/12/2015 - 15:30 नवीन
कृपया खाली पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 03/12/2015 - 16:44 नवीन
आता काय उपयोग? बूंद से गयी वो हौद से नही आती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
क
कपिलमुनी गुरुवार, 03/12/2015 - 10:30 नवीन
सर्व माहगड्या डॉक्टरचे रेट आपल्याला माहीत असतात. तिथेच उपचार घेण्याची सक्ती नसती. आपल्याला परवडेल तिथेच उपचार घ्यावेत. माझ्या वडिलांना अ‍ॅटॅक आला तेव्हा अँजिओप्लास्टी केली . वायसीएम मधे एक ब्लॉक असेल तर ८०,००० आणि २ ब्लॉक असतील तर ११०,००० खर्च सांगितला होता. पुण्यामधे नामांकित हॉस्पिटलमध्ये तोच खर्च ३५०,००० आला पण माझ्या समोर दोन्ही पर्याय खुले होते. तिथे सुद्धा स्टेंट बसवताना विचारले होते , २५,००० ते १,००,००० पर्यंतचे स्टेंट आहेत तुम्हाला कोणता बसवायचा आहे. प्रतेक स्टेंटचे फायदे तोटे सुद्ध सांगितले होते. माझ्या बजेटनुसार मी केले . जर माझ्याकडे पैसे नसते तर मी सरकारी दवाखान्यात केले असते. फक्त या मधे मला एक गोष्ट खटकली होती ती म्हणजे स्टेंट ची किंमत . माझा एक मित्र एम आर आहे त्याने डॉ. ना सांगितले तुम्ही कंपनी सांगा मी तुम्हाला तो स्टेंट आणून देतो कारण ज्या स्टेंट ची किंमत ५०,००० लावली तो निम्म्या किमतीत तो आणायचा ( बाकीचे डॉ. , हॉस्पिटल यांचे कमिशन असते) . याला डॉ. नी आणि हॉस्पिटलने परवानगी दिली नाही.याचा सरळ अर्थ त्यांना ते कमिशन् सुद्धा हवे होते. माझा डॉक्टरच्या फी वर आक्षेप नाही पण कट प्रॅक्टीस आणि या कमिशन्खोरीवर मात्र आहे.. अवांतर : आपल्यापैकी कितीजणांना स्वतःचा पगार हा स्वतःच्या स्किलसेट, अनुभव यांच्यापेक्षा कमी चालेल ?
  • Log in or register to post comments
स
सातबारा गुरुवार, 03/12/2015 - 10:58 नवीन
गोपाळराव व गंगाधरपंत मुटेंचा सूर सारखाच लागल्याचे पाहून अंमळ मौज वाटली.
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग गुरुवार, 03/12/2015 - 10:58 नवीन
डॉक्टर व विषय अगदी ज्वलंत आहे पण तो फक्त पब्लिक फोरम वर लिहिताना . तावातावा ने काहीही लिहिता येते ( असे केले पाहिजे , तसे केले पाहिजे ) .पण स्वत: किव्वा कुटुंब यावर एखादी गोष्ट आदळली असली कि सगळे मोठे विचार चुलीत जातात. प्रश्न आयुश्याचा असतो. त्यामळे थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील पण रिस्क घायची तयारी नसते समजा स्वाईन फ्लू ची एक लस आली आहे . ती सरकारी दवाखान्यात फुकट आहे पण खाजगी कडे त्याच गोष्टीचे २५०-५०० घेत असतील तरी बरीच लोक तिथे जातील. कारण काय तर सुया कुठल्या वापरल्या / औषध एक्सपायर नसेल ना / फ्रीज मध्ये साठवले असेल का अश्या बर्याच शंका मनात येतात . पण हीच गोष्ट समजा चष्मा फुकट देत असतील सरकारी दवाखान्यात तर सगळे तिथे रांगेत उभे राहतील कारण तिथे रिस्क कमी आहे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 03/12/2015 - 11:41 नवीन
१. सीनियर म्यानेजमेंटचे प्रेशर आणि पैसे कमावण्याचा दबाव फक्त डॉक्टरांवरच असतो असा गैरसमज दिसतोय. आजकाल कुठल्याही क्षेत्रातील उच्चशिक्षितांवर साधारण सारखाच ताण असतो. मात्र अशा अतिताणाच्या कामातून उद्भवलेल्या स्ट्रेस-हार्टप्रॉब्लेम्स यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या डॉक्टरांपेक्षा हवालदार किंवा नॉन हेल्थकेअर (आयटी-बिझनेसमन) व्यक्तींची संख्या जास्त दिसते. अर्थात हे पेपरात वाचलेल्या बातमीतून बनवलेले मत आहे. याचा प्रतिवाद करणारा विदा मिळाला तर नक्कीच आवडेल. २. सीनियर मंडळींचे प्रेशर असल्याने पैसे कमावण्यासाठी आम्हाला कसेही वागावे लागते (कधीकधी अनैतिक) याचे कुठेतरी सुप्त समर्थन दिसते. ३. आम्ही धंदा चांगला केला नाही तर आमच्याकडे पेशंट येणार नाहीत म्हणून आम्हाला चांगला धंदा करावाच लागतो. असं स्पष्टीकरण फसवणूक करणाऱ्या ब्रोकरने दिले तर चालेल का? ४. डॉक्टरी हा उच्चशिक्षित मंडळींनी सचोटीने करायचा व्यवसाय आहे. जेवढे मार्केटदराने आहेत तेवढे पैसे खुशाल घ्यावेत. ज्यांच्याकडे विशेष कौशल्य आहे त्यांनी प्रीमियम घ्यावे. मात्र जसे पैसे घेतलेत तशी सेवा मिळत नसेल तर वरुन ग्यारंटी कार्ड आणा, आम्ही फक्त दुरुस्त करतो बनवत नाही अशी मारवाडी दुकानदार छाप उत्तरे द्यावीत याचे वाईट वाटते. रुग्णांचे जीवनमरण हा डॉक्टरांसाठी एक रोजचा आकडा असला तरी डॉक्टरांच्या चुकीमुळे अनेक घरे उद्ध्वस्त होऊ शकतात. डॉक्टर आणि मेकॅनिक वगैरे तुलना करुन त्यावरच चर्चा चालू असल्याने आता कंटाळा आला. वरील सारांश लिहून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 03/12/2015 - 15:29 नवीन
धागा काढल्यानंतर काही कारणाने (नेहमीचेच - अाॅ़िसमधला क्रायसिस) तेवढे सतत प्रतिसाद देणे शक्य झाले नाही, त्याबद्दल क्षमस्व. सर्व प्रतिसाद वाचल्यावर वाटले, की इथे डाॅक्टरांच्या फीविषयी काही वस्तुनिष्ठ चर्चा होण्यापेक्षा दोन तट पडले अाहेत. एक डाॅ लोक कसे कापायला बसलेत, निव्वळ धंदाच करतायत असे म्हणणारा, दुसरा (खुद्द डाॅ लोकांचा ) - उलट तेच कसे ‘अन्यायग्रस्त’ अाहेत हे मांडणारा. नंतर ही चर्चा मग वैद्यकीय व्यवसाय, विमा व त्यातील नैतिकता इत्यादीवर घसरली. ज्याच्याकडे दुर्मिळ कौशल्य असेल, तो त्याला वाट्टेल ती फी लावणारच, परवडली तर सेवा घ्या, नाहीतर फूटा, असे मानले, तर प्रश्नच मिटला. मला वाटलेले फीबद्दलचे मत मी दुरूस्त करायला तयार अाहे, पण मूळ मुद्दा असा की, खरंच एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो. समजा एखाद्याकडे काही रेअर स्कील अाहे, तरी अापल्या अाजूबाजूला रहाणार्या, बसने लटकत रोज दहा तास काम करणार्यापेक्षा किती जास्त पैसे मिळावेत? या महाकुशल लोकांबाबत यांना खरंच हा विचार कधी येतो का? हे एवढे पैसे त्यांना खर्च तरी करता येत असतील का असे वाटले. अायफोन, मर्सिडीस वगैरेबाबतही हेच मत अाहे. दहा पट महाग वस्तू दहापट मूल्य देते असे नाही वाटत. बाकी कुणी त्याला जळजळ म्हणोत, कुणी सामाजिक जाणिव, कुणी इतर काही. - स्वधर्म
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/12/2015 - 15:33 नवीन
सतत प्रतिसाद देणे शक्य झाले नाही,
देउ पण नयेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
V
vikramaditya गुरुवार, 03/12/2015 - 16:48 नवीन
कोकीलाबेन अंबानी (फोर बंगलो, अंधेरी) ईस्पितळाची बिल्स बघितली तर अक्षरष: वेड लागेल. ह्या बाबतीत कोणाला काही अनुभव असेल तर शेअर करावा. प्रत्येक एचओडी ला टार्गेट देवुन काम करवणारे 'कॉर्पोरेट' रुग्णालय.... नावातील नफेखोरीचे जिवंत उदाहरण!!!
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित गुरुवार, 03/12/2015 - 17:24 नवीन
मुंबईतील मोठया रुग्णालयांच्या धोरणाविषयी नेहमी चर्चा होते. सरकारकडून मदत घेणारी ही धर्मादाय रुग्णालये गरिबांकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी समाजातील आर्थिकदृष्टया निम्न वर्गातील रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्याची अपेक्षा आहे. परंतु तशी सेवा दिली जात नाही. धर्मादाय रुग्णालयासंबंधीचे कायदे असे सांगतात की, या धर्मादाय रुग्णालयांनी १० टक्के खाटा दरसाल ५० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या वर्गासाठी राखून ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. ५० हजार ते एक लाख रुपये उत्पन्न असणा-या वर्गातील गरीब रुग्णांसाठी आणखी दहा टक्के खाटा आरक्षित केल्या पाहिजेत आणि त्यांना सवलतीच्या दरात उपचार दिले पाहिजेत. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. या संबंधातील माहिती धर्मादाय आयुक्तांकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली आहे. ही माहिती इतकी धक्कादायक आहे की, केवळ दोन टक्के खाटा या गरीब रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु त्या सरासरी चार दिवस एवढया उपलब्ध होतात. ही रुग्णालये गरिबांना मोफत उपचार देण्यास तर स्पष्ट नकार देतात. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असली तरी त्यांना ओपीडीमध्ये तपासून सोडून दिले जाते आणि त्यांना देणे अपेक्षित असलेल्या खाटा भरपूर शुल्क देणाऱ्या खासगी रुग्णांसाठी वापरून त्यातून हजारो रुपये कमावले जातात. ‘केहात’ (सेंटर फॉर इन्क्वॉयरी हेल्थ अँड अलाईड थिम्स्) या संस्थेच्या संचालिका पद्मा देवस्थळी यांनी या धर्मादाय रुग्णालयांच्या व्यापारी वृत्तीवर टीका केली आहे. त्यांनी या रुग्णालयांच्या नफेबाजीवर एक अहवालच तयार केला आहे. शहरामधील काही नामवंत रुग्णालये या सदरात मोडतात. ब्रीच कँडी, लीलावती, हिरानंदानी, जसलोक, बॉम्बे, सफी आणि कोकीलाबेन अंबानी ही धर्मादाय रुग्णालये मुळात धर्मादाय आहेत, हे ब-याच लोकांना माहीत नाही आणि इथे गरिबांना असे उपचार देण्यासंबंधी कायदा आहे, हेही ब-याच लोकांच्या गावी नाही. ही रुग्णालये खासगी आहेत आणि हजारो लाखो रुपये खर्चण्याची ऐपत असणा-या श्रीमंत लोकांनाच तिथे जाणे परवडते, असाच लोकांचा समज आहे. देशात गरिबांसाठी योजना खूप आहेत पण त्या योजनांची माहिती गरिबांपर्यंत पोहोचत नाही आणि या अज्ञानामुळे हे गरीब लोक त्यांच्यासाठी असलेल्या योजनांपासून वंचित राहतात. त्याचा फायदा अन्य लोक घेतात. वर उल्लेख केलेल्या रुग्णालयात एकंदर १६०० खाटा धर्मादाय आहेत. त्यातील ८०० खाटा मोफत उपचार घेणा-या रुग्णांसाठी तर ८०० खाटा सवलतीच्या दरात उपचार घेणा-या रुग्णांसाठी आहेत. म्हणजे त्या तशा असल्या पाहिजेत, असा नियम आहे. पण हा नियम कोणी पाळत नाही. म्हणून ‘केहात’ या संघटनेने शहरातील निरनिराळ्या रुग्णालयांच्या स्थितीची माहिती लोकांपर्यंत पोहाचवली पाहिजे, अशी शिफारस केली आहे. ज्या रुग्णालयांमध्ये या सवलतींची अंमलबजावणी केली जात नसेल त्या रुग्णालयांना तशी कडक समज दिली पाहिजे. या रुग्णालयांच्या बाहेर तिथल्या उपचारांच्या दरांची माहिती देणारे फलक लावले पाहिजेत. सवलतीच्या दरातील किती खाटा उपलब्ध आहेत आणि त्यांचे दर काय आहेत, त्यांचीही माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे साभार प्रहार : रुग्णालयांकडून लुटालूट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya
ड
डँबिस००७ गुरुवार, 03/12/2015 - 21:51 नवीन
डाँक्टरांची उपचार सुद्धा नको म्हणुनच की काय केजरीवाल बेंगरूळुला जाउन नॅचरोपॅथीचा उपचार घेऊन आलेत, आणि त्यांना तसा सल्ला अण्णा हजारेनींच दिला होता म्हणे.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 05:39 नवीन
राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला ऐकत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींचे योगासनांचे गुरू एच. नागेंद्र यांच्याकडून खोकल्यावर उपचार घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक शेषाद्री यांचे नागेंद्र हे नातेवाईक आहेत. ते स्वत: जरी बेंगळूर येथे राहत असले तरी गुजरात सरकारमधल्या बहुतेक सर्व मंत्र्यांना योगासने व योगविद्येवर आधारीत जीवनशैलीचे मार्गदर्शन ते नियमित करतात. आत्तापर्यंत दोन लाखांवर दम्याच्या रुग्णांना नागेंद्र यांनी बरे केले असल्याचे सांगितले जाते. अशा नागेंद्र यांच्या योग उपचारशैलीचा फायदा केजरीवाल घेतील खोकलामुक्तीसाठी केजरीवाल घेणार मोदींच्या योगगुरूंची मदत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
प
पिवळा डांबिस Fri, 03/13/2015 - 05:42 नवीन
केजरीवालना दमा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 05:59 नवीन
और अनियंत्रित मधुमेह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 03/13/2015 - 07:49 नवीन
परानी खांसी म्हणजे काय ते मराठीत (वा इंग्रजीत)सांगा, आमचं हिन्दी तितकसं चांगलं नाही.. अनियंत्रित मधुमेह हे कळलं. पण त्यांना दमातज्ञाकडे जे पाठवलंय ते त्यांना नक्की दमाच आहे का? आणि तुम्ही किंवा मोदींनी (त्यांनी पाठवलंय असं वर वाचलं म्हणुनच म्हणतो हो) त्यांची परीक्षा (नाडीपरीक्षा किंवा अन्य जी काही आयुर्वेदात असते ती)केलीये का? की आपलं उगाच खोकला येतो म्हणजे दमा असणार म्हणून पाठवा दमा स्पेशालिस्टाकडे असा प्रकार आहे? आणि बाय द वे: ह्या दमा स्पेशालिस्टांचे रेट्स काय आहेत? कारण हा धागा डोक्टरांच्या रेट्सवरून सुरू झालाय म्हणून एक विचारतो. (ह्यात उपहास आणण्याचा हेतू नाही. मला खरोखरीच ह्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन प्रॅक्टिशनरसचे रेटस माहिती नाहीत म्हणून विचारतोय). डिस्क्लेमरः श्री. केजरीवाल यांना कुठल्याही उपचारांनी का होईना पण आरोग्य लाभावं ही सदिच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 08:05 नवीन
वरच्या Heading पट्टीतील line space कमी ठेवल्याचा परिणाम आहे. पुरानी खांसी चा अर्थ जुनाट खोखला असावा. वरच्या दमा स्पेशालिस्टांचे रेट्सबद्दल अजून काही अनुभव नाही. पण माझ्याकडे एक आगळीवेगळी पद्धती आहे, जिचा घरबसल्या वापर करून कुठलाही दमा संपूर्ण घालवता येतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिलीयन रायडर Fri, 03/13/2015 - 08:30 नवीन
बाकी सगळं जाउ द्या.. ह्या आयुर्हितांना आवरा कुणीतरी.. एक तर हे नीट काही सांगत नाहीत. काहीही विचारा "मला प्रत्यक्ष भेटा.. व्यनि करा.." हेच उत्तर देतात. काहीतरी मार्केटिंग स्किम आहे हे नक्की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा