Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डाॅक्टरांची फी

स
स्वधर्म
Wed, 03/11/2015 - 11:02
🗣 429 प्रतिसाद
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता. एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही. - स्वधर्म

प्रतिक्रिया द्या
82348 वाचन

💬 प्रतिसाद (429)
र
रुस्तम Fri, 03/13/2015 - 08:52 नवीन
काहीतरी मार्केटिंग स्किम आहे हे नक्की..
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 09:15 नवीन
जैसी जिसकी सोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
प
पिलीयन रायडर Fri, 03/13/2015 - 09:22 नवीन
बरं माझी सोच च बेक्कार आहे.. तुम्ही का नाही जाहिर सांगत की नक्की कसं "रोग्याच्या मुळावर" उपचार करता येतात? माझा सिंपल फंडा आहे.. एखादी गोष्ट अत्यंत मानव हिताची आहे.. आणि कुणाला तरी ती ठाउक आहे.. तर ज्याला खरंच लोकांविषयी वाटतं तो ती सरळ सर्वांदेखत सांगेल.. ज्याचा स्वतःचा स्वर्थ त्यांत गुंतला आहे, तो सांगणार नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 09:45 नवीन
धाग्यावर सर्वांच्या फायद्यासाठी "कॉमन" उपाययोजनाच सांगता येतात आणि तो १०१% देत गेलो आहे. प्रत्येक रुग्णाचा आजार, प्रकार, गंभिरता, समज,आजाराची मूळ कारणे,इतर असलेले आजार व त्यांची गंभिरता, मानसिक शक्ती, आवड, निवड, धार्मिक तत्वे, व्यवसाय, दिनचर्या, क्रयशक्ति व त्यामूळे आलेली मानसिकता ह्यात जमीन आस्मान एवढा फरक असतो. यामूळेच उपाययोजनेत फरक करावाच लागतो. एकाचे औषध हे दुसर्‍यासाठी विष ठरु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 03/13/2015 - 09:47 नवीन
मला हेच उत्तर अपेक्षित होतं. पण मग जर मी जाहिररित्या तुम्हाला माझा आजार सांगितला तर तुम्ही मला जाहीररित्या उत्तर देणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 11:22 नवीन
आपल्याला सिरीअसली जर उपचार करायचमार्ग काढायचा असेल तर व्यनी करावा. विचारलेल्या सर्व प्रश्नाची सविस्तर माहिती पुरवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 03/13/2015 - 13:12 नवीन
सगळी माहिती देऊ.. पण जाहिररित्या.. तुम्ही पण जाहिररित्या सांगा की उपचार काय आहेत ते.. तुम्ही इथे डॉक्टरांना आव्हान दिले आहेत की म्हणे ९९% बायपासची गरज नसतेच. त्यांच्याकडे बायपास का करायची ह्याची शास्त्रोक्त कारणे आहेत. तुम्ही का नाही करायची ह्याची "जाहीररित्या" सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
क
कपिलमुनी Fri, 03/13/2015 - 13:18 नवीन
गुरूमंत्र आहे कानातच सांगायचा असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 13:25 नवीन
ज्यांना मनापासून बरे व्हायचं आहे ते आपले व्यनी करतात आणि माहिती घेतात. मी माझा वेळ आणि सल्ला फक्त मदत मागणार्यानच देत असतो. आपण नाही माहिती घेतली तरी चालेल. कुणाला बळजबरी नाही. धन्यवाद. कळावे, लोभ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 03/13/2015 - 13:35 नवीन
तुम्ही देता ती माहिती एखाद्याच्या जीवाशी खेळणारी सुद्धा सु शकते. वर स्पंदनाने सांगितलेल्या गोळ्या लोक शहानिशा न करता "कुठलाही रोग मुळापासुन बर्‍या करणार्‍या गोळ्या" म्हणुन खात आहेत. त्याचे होणारे साईड इफ्फेक्ट्स काय हे कुणी तपासलय? तुम्ही सुद्धा असंच काही करत असाल तर तुम्हाला जाब विचारु शकते मी.. इथे तुम्ही कायम आरोग्यविषयक जाहिरात करणारेच प्रतिसाद जास्त दिले आहेत. त्यातुनही तुम्ही लोकांना "निरोगी..आनंदी व्हायचे असेल तर भेटा" टाईप होलसेल व्यनि सुद्धा केले होते. अशी जाहिरातबाजी तुम्ही मिपावर करत असताना एक "टारगेट कस्टमर" म्हणुन मी ही माहिती विचारु शकते.. तुम्ही तुमच्या ह्या एका धाग्यावर सुद्धा बायपास.. दमा अशा मेजर रोगांवर माझ्याकडे अक्सीर इलाज आहे असा दावा जाहीररित्या केला आहे. तसे असताना कुणी काऊंटर केल्यास त्याचे उत्तर जाहीररित्या देणे तुमचे कर्तव्य आहे. मी तुम्हाला स्पेसिफिक माझ्यावर इलाज करा असा आग्रह करत नसुन तुमची "उपचारपद्धती" काय हे विचारत आहे. ती तुम्हाला सांगता आली पाहिजे (आणि प्लिझ.. रोगाच्या लक्षणापेक्षा मुळ कारणावर इलाज करणे अशी फालतु उत्तरं देऊ नकात) जाहिरात करत आहात तर ती तरी धड करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 13:43 नवीन
कुणाला बळजबरी नाही. धन्यवाद. कळावे, लोभ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
र
रुस्तम Fri, 03/13/2015 - 13:42 नवीन
त्या जाहीररित्या सल्ला मागत आहेत ना. मग तुम्हाला, त्यांना जो सल्ला व्यनितून देणार तो जाहीररीत्या द्यायला काय प्रोब्लेम आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 13:48 नवीन
कारण फक्त चौकशी करणाऱ्यांना कोणीच Entertain करत नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
प
पिलीयन रायडर Fri, 03/13/2015 - 13:52 नवीन
आणि जो जाहिररित्या सांगु शकत नाही त्यावर कुणी विश्वास ठेवत नसतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 14:09 नवीन
नका ठेवू, काही जबरदस्ती नाही आपल्यावर. ह्या गोष्टी व्यनीतूनही होवू शकतात हे सांगूनही एवढी साधी गोष्ट आपल्याला कळत नाही? (धागा इतरही वाचत असतात त्यांनाही कळली असेलच आता आपली ही गोष्ट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बॅटमॅन Fri, 03/13/2015 - 14:16 नवीन
ठीके होमियोहित साहेब. तुमच्यासाटी कायपन. होमेपदीपन. (म्हसरान्ला चाल्नारी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
र
रुस्तम Fri, 03/13/2015 - 16:52 नवीन
चौकशी विना सल्ला. तुम्ही सगळ्या गोष्टी चौकशी न करताच करता अस दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
र
रुस्तम Fri, 03/13/2015 - 11:38 नवीन
नो जाहिररित्या ओन्ली व्यनि प्लीज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कपिलमुनी Fri, 03/13/2015 - 11:43 नवीन
बीजीनेस शिक्रेट हाये त्ये ! तुमाले काहून सांगाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
र
रुस्तम Fri, 03/13/2015 - 11:52 नवीन
टॉप शिक्रेट हाये त्ये ! शिक्रेट फॉर्मुला !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
स्पंदना Fri, 03/13/2015 - 09:44 नवीन
अग मी त्यांना या आधीपण याच धाग्यावर विचारलं आहे "सबिंसा (sabinsa) किंवा (sami labs limited) या कंपनीच्या औषधांबद्दल आहे का म्हणुन" त्यांनी वाचलेले दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 03/13/2015 - 09:46 नवीन
हो ना.. अणि मलाही वाटतय की ते तसंच काहीसं असावं.. आता बघु काय म्हणतात ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
पिवळा डांबिस Fri, 03/13/2015 - 18:05 नवीन
ओह, पुरानी खांसी! मला वाटलं की हिंदीमध्ये हा काही वेगळाच खांसीचा प्रकार आहे की काय! नेव्हर माईन्ड, टायपो आमचेही होतात अनेकदा, समजू शकतो. स्पेशालिस्टांच्या रेट्सबद्दल विचारलं कारण काही नॉन्-अ‍ॅलोपाथी स्पेशालिस्टांचे रेट्सही भरभक्कम असतात. असोत बिचारे. आणि ह्या उपचारपद्धती दीर्घकालीन समजल्या गेलेल्या असल्यामुळे प्रत्येक वेळचे पैसे धरून दीर्घ कालात बरेच होतात असा अनुभव आहे. आमच्या मते, अ‍ॅलोपाथी डॉक्टर मोंगलांसारखे एकदम धाड घालून लुटतात तर नॉन-अ‍ॅलोपाथी डॉक्टर्स इंग्रजांसारखं दीर्घकाळ शोषण करून लुटतात!! :) अर्थातच मिपावरचे सगळे डॉक्टर, वैद्य, हकीम, मांत्रिक, जडीबुटीवाले, अ‍ॅक्युप्रेशर/पंक्चरवाले सोडून!!
माझ्याकडे एक आगळीवेगळी पद्धती आहे, जिचा घरबसल्या वापर करून कुठलाही दमा संपूर्ण घालवता येतो!
आम्हाला दमा नसल्याने आम्हाला तिचा काही उपयोग नाही. पण श्री. केजरीवालांना कळवलंत तर ते कदाचित उपयोग करून घेतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ड
डँबिस००७ गुरुवार, 03/12/2015 - 22:01 नवीन
डोळे येण्यावर घातल्या जाणार्या औषधामुळे डोळे जाण्याची शक्यता असते, हे किती लोकांना माहीती असते ? डोळे येण्यावर दिले जाणार्या स्टूरॉईड ड्रॉप्सच्या जास्त वापरामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते असे प्र सिद्ध नेत्र तज्ञ काल टीव्हीवर सागत होते. पण असे सल्ले डॉक्टर तुम्हाला कधीच देत नाही !! का देत नाही ? माहितीतल्या ह्र्दयरोग्याला औषधामुळे देन्ही किडन्या निकामी झालेल्या पाहील्या आहेत. डॉक्टरने त्या रुग्णाला ४-५ वर्षे असे औषध दिले जे सगळीकडे (अमेरीकेत आणि युरोप मध्ये) बॅन् आहे, त्या औषधामुळे ह्या रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात. आता तो कोणाकडे तक्रार करणार ?
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 03/13/2015 - 08:18 नवीन
'स्वाइन फ्लू'च्या वाढत्या संसर्गाच्या प्रतिबंधात्मक लसीची मागणी वाढल्याचा गैरफायदा घेत एका कंपनीच्या लसीचा 'काळाबाजार' डॉक्टरांकडून काही दिवसांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एका कंपनीची ७१४ रुपयांना मिळणारी लस डॉक्टरच खरेदी करून तिप्पट दराने थेट पेशंटना विकत असल्याची माहिती हाती आली आहे. लसींची वाढती मागणी आणि 'स्वाइन फ्लू'चा वाढता उद्रेक याचा गैरफायदा घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी डॉक्टरमंडळी पुढे सरसावली आहेत. त्यामुळे केमिस्टांकडे असलेली लस पेशंट डॉक्टरांकडे घेऊन गेल्यास त्यांना 'आमच्याकडूच लस विकत घ्यावी लागेल. केमिस्टांकडील लस चालणार नाही', असा दम डॉक्टर भरू लागले आहेत. त्यामुळे पेशंट थेट डॉक्टरकडून लस टोचून घेत असून, त्यासाठी त्यांना आठशे ते अडीच हजार रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागत आहे. डॉक्टरांकडून लसींचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. हा काळाबाजार रोखण्याची पेशंटकडून मागणी होत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 03/13/2015 - 16:05 नवीन
आयुर्हित, माफ करा पण तुमचे प्रतिसाद वाचून मला साईनफेल्डमधील होलिस्टिक हीलरची आठवण येते. www.youtube.com/watch?v=uH5IMv2jeuk
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 03/13/2015 - 18:31 नवीन
it is in the interest of medical industry that you always remain sick!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
क
काळा पहाड Fri, 03/13/2015 - 19:59 नवीन
पण सगळेच बिचार्‍यांच्या मागे लागले आहेत. इतकं पण एखाद्याला 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
V
vikramaditya Sat, 03/14/2015 - 04:20 नवीन
सुद्धा ब-याच डॉक्टरांचा खास गुण आहे. एक डॉक्टर दुस-या डॉक्टरचे मत कधीच ग्राह्य धरत नाही. "Unless they are a part of the same chain" सेकंड ओपीनीअन चा विषय काढतात डॉक्टर कपाळ्याला आठ्या घालतात. पेशंट मेला तरी चालेल पण मी म्हणेन तेच योग्य असा अ‍ॅट्यीटुड असणारे बरेच डॉक्टर बघितले. सेकंड ओपीनीअन घेणारच तर मी सांगतो त्याच डॉक्टर कडुन घ्या म्हणणारे पण आहेत. दुसरीकडे गेलात तर मी जबाबदार नाही म्हणणा-या डॉक्टरला जेव्हा विचारले की " बरं आता शंभर टक्के जबाबदारी घेता का? मग रुग्णाला इथेच उपचार करवतो" तर बोलती बंद. बाकी विषय फार मोठा आहे. बरेच प्रतिसाद ह्यावर प्रकाश टाकतात.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/14/2015 - 05:01 नवीन
हेल्थ केअर इंडस्ट्रीत मानवी अवयव मूल्यवान आहेत. मग एखाद्याला वाटल की बास झाल जगण आपण आपले शरीर वैद्यकीय क्शेत्राला डिसमेंटल करुन द्याव. त्याची किंमत आपल्या कुटुंबियांना द्यावी. थोडकयात म्हणजे मानवी अवयवाचा व्यापार वैध असू द्यावा. शरीर माझ आहे त्याच काय करायच हे मला ठरवू द्यात. मरण येत नाही म्हणुन जगताहेत असे कित्येक लोक असतात. तसा शरीर विक्रय करायच्या ऐवजी असा शरीर विक्रय करु. अनेक गरीब कुटुंबात आर्थिक हातभार मिळेल. पुर्वी रक्त देउन पैसे मिळण्याची सोय होती. दान द्यायच्या ऐवजी विकत देउ! काय बिघडल. असा विचारप्रवाह भविश्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Sat, 03/14/2015 - 06:02 नवीन
तसेच मला वाटते कि सरकारने बर्याच लोकांना मृत्यू दंड द्यावा. अति भ्रष्टाचारी . बलात्कारी आणि child molestar ला आणि अजून काही गुन्हेगारांना जगण्याचा काहीही हक्क नाही. तरी कडक कायदे करूनं वर्षाला १५-२० हजार लोकांना मृत्यू दंड देवून त्यातील ८० % लोकांचे अवयव विकता येतील. जर जास्ती झाले तर विदेशी लोकांना चढ्या भावात विकून नफा कमावता येईल . मी हे मी गंभीर पणे लिहित आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 03/14/2015 - 06:36 नवीन
मानवी अवयवाचा व्यापार हि आपल्याला वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. गर्दच्या आहारी गेलेली तरुण मुले पैश्याच्या लोभाने आपली मूत्रपिंडे विकण्यासाठी आलेली मी पाहिलेली आहेत. एकदा त्यांनी मूत्रपिंड विकले आणि ते आपल्या नातेवाईकाला बसवले कि लोक त्या गर्द पीडीत तरुणाला( रुग्णालयातून डिसचार्ज देववून) अक्षरशः रस्त्यावर सोडत असत. आणि असे तरुण त्या शल्यक्रियेतून पूर्ण बाहेर यायच्या अगोदरच शरीराने आणि पैश्याने लुबाडले जाऊन बेवारशी रस्त्यावर मृत्युमुखी पडलेले पाहिलेले आहेत.(याचा मी नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे) एखाद्याला धमकी देऊन त्याचे अवयव विकत घेणे किती सोपे होईल हे पहा. आज जर कोणी अगदी जवळचा नातेवाईक असेल तरच हे अवयव रोपण करता येते. हा कायदा सैल केला तर काय होइल ते पहा. प्रतिसाद देणे एकदम सोपे आहे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/14/2015 - 08:42 नवीन
मला व्यक्तिशः प्रतिसाद देणे देखील सोपे वाटत नाही.पण मी भविश्यात विचारश्रेणी अशी असू शकते असे शेवटी लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/15/2015 - 08:02 नवीन
आज एक व्हॉट्सअ‍ॅप संदेश वाचनात आला. त्यातले काही प्रश्न रोचक (आणि खोचक) वाटले म्हणून त्याची नक्कल खाली देत आहे. विशेषतः शेवटचा पॅराग्राफ आपल्या समाजातले एक महत्वाचे सत्य सांगून जातो... India's Doctors, When was the last time, you heard, there is a national emergency of pending cases in Indian courts so judges and lawyers must work 16 hr a day till all cases are cleared. When was the last time, you heard, There are so many vacancies in officer cadres of Indian Army that national security is at risk, so all management graduates from IIMs must join army for 5 years When was the last time, you heard, there is a crisis in education system as we have very few teachers going to village schools, so all engineering grads must dedicate 3 years of their life after graduation for this cause When was the last time, you heard, so many children, adults and old people are suffering from mental agony and remain untreated, so all bollywood actors, musicians, artists must do a 3 month crash course in art therapy and serve this population for 3 years and not pursue any commercial activity at all When was the last time, you heard, millions of people in India are dying due to lack of medical investigations and medications so all manufacturers of medical equipment and pharma companies must set up factories at their own cost and supply entire output for almost free to rural areas When was the last time, you heard, A politician was jailed and served a lifetime bar from any elections because a clerk did not fill a form properly that was mandatory by law When was the last time, you asked, Why software companies pay residential rate property tax and doctors clinics are treated and taxed as "Commercial establishments"? When was the last time anybody gave a F*** to what is happening to medical services in India? Then why majority hardworking medical professionals are maligned and treated like criminals because of a small percent of crooks, lame regulators and apathetic short sighted governments get a free run of the country? जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्‍या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजूतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्‍या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 03/16/2015 - 09:03 नवीन
त्यांना कोणी झोडपत नाही, मग डाॅक्टरांनाच का झोडपायचं, हा तुमचा प्रश्न बरोबर अाहे. ही चर्चा एकूणच वैद्यकीय सेवा, त्यातले अनेक घटक इत्यादीवर घसरत चालल्यामुळे मी वर पुन्हा एकदा मूळ प्रश्न / विचार मांडण्याचा प्रयत्न केला अाहे, तो असा: >> एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो. समजा एखाद्याकडे काही रेअर स्कील अाहे, तरी अापल्या अाजूबाजूला रहाणार्या, बसने लटकत रोज दहा तास काम करणार्यापेक्षा किती जास्त पैसे मिळावेत? अाता इथे कोणीतरी उदाहरण दिले अाहे, त्याप्रमाणे डाॅक्टरएेवजी सर्वोच्व न्यायालयातल्या वकीलांबाबतही हा प्रश्न विचारता येईलच. हा विषय केवऴ मागणी - पुरवठा यावर सोडून देता येईल काय? - स्वधर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
असंका Mon, 03/16/2015 - 09:35 नवीन
समजा एखाद्याकडे काही रेअर स्कील अाहे, तरी अापल्या अाजूबाजूला रहाणार्या, बसने लटकत रोज दहा तास काम करणार्यापेक्षा किती जास्त पैसे मिळावेत
हे ठरवायचा अधिकार कुणाकडे असावा? जो कष्ट घेतो त्याच्याकडे, की जो कष्ट घेतो तो सोडून इतर सर्वांकडे? कधी 'अ‍ॅटलास श्रग्ड' नावाची 'अ‍ॅन रँड' या लेखिकेची कादंबरी वाचली आहे का? माझ्या मते नसावी...ती वाचल्यास काही मुलभुत प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
क
काळा पहाड Mon, 03/16/2015 - 10:56 नवीन
अर्थातच जो कष्ट घेतो त्याच्याकडेच. धंदा असल्यामुळे डॉक्टरांनी एका ऑपरेशन चे एक लाख किंवा दहा लाख रुपये, डॉलर किंवा पौंड घेण्यात काहीच प्रत्यवाय नाही. पण मग सगळंच मार्केट फोर्सेस च्या रूलप्रमाणं व्हावं. स्वाईन फ्लूची लस त्यांच्याकडूनच (तिप्पट किंमतीत) घेण्याची जबरदस्ती डॉक्टरांनी का करावी? आमच्याकडूनच औषधं घेतली पाहिजेत असं सांगणार्‍या हॉस्पिटल्स वर कायदेशीर खटले दाखल करावेत. १. मेडिकल शिक्षणासाठी स्वस्तात (एडेड/सरकारी) फी वगैरे असते असा माझा समज आहे. त्याला मेरिट ने प्रवेश दिला जातो. जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार असतील त्यांच्यासाठी ती बंद करून सगळीकडेच एन-एडेड फी लागू करावी. २. जे सवलतीच्या फीत शिकतील त्यांना कायमची गव्हर्नमेंट सर्व्हिस मँडॅटरी करावी. त्यांना खाजगी प्रॅक्टीस करता येणार नाही असा कायदा करावा. ३. जास्तीत जास्त गव्हर्नमेंट इस्पितळे सुरू करावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
म
मोदक Mon, 03/16/2015 - 11:40 नवीन
आमच्याकडूनच औषधं घेतली पाहिजेत असं सांगणार्‍या हॉस्पिटल्स वर कायदेशीर खटले दाखल करावेत. खटले कोणी दाखल करावेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 03/16/2015 - 11:47 नवीन
आरोग्य विभागानं. शेवटी कायदे समाजासाठीच असतात. आणि समाजाचा प्रतिनिधी सरकार असतं. म्हणून आरोग्य विभागानं. जसं स्त्री भ्रूणहत्ये विरोधी तक्रार करता येते तशीच ही किंवा तत्सम तक्रार स्वीकारली जावी. आणि संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणे किंवा अतिप्रचंड पेनल्टी लावता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/16/2015 - 11:56 नवीन
म्हण्जे आरोग्य विभागाला तक्रारी देण्याचे काम सामान्य नागरिकच करणार - बरोबर..? का येथेही आरोग्य विभागाने गैरप्रकारांचा "तपास करून, उघडकीस आणून" मग खटले दाखल करावेत..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 03/16/2015 - 12:03 नवीन
हो तसंच. जसं अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरो ची साईट आहे तशी आरोग्य विभागाची साईट अशा तक्रारी स्वीकारू शकते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/16/2015 - 12:25 नवीन
नागरिकांनी आवाज उठवण्याची आवश्यकता असेल तर नवीन सेटअप* करण्याची काय गरज आहे? सध्याच्या यंत्रणेमध्ये डॉक्टर / हॉस्पीटलच्या मनमानीविरूद्ध दाद मागण्याची सोय असेलच की. *आरोग्य विभागाने तक्रारींची दखल घेवून खटले दाखल करण्याची - थोडक्यात एक "मध्यस्थ" होण्याची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 03/16/2015 - 12:31 नवीन
सध्याची यंत्रणा कोणती? सगळे डॉक्टर आरोग्य विभागाअंतर्गत तर येतात. मी या प्रकारचा कायदा असण्याबद्दल बोलत होतो. आहे की नाही मला माहित नाही, नसला तर केला पाहिजे. कारण असा कायदा नसेल तर आरोग्य विभाग कारवाईच करू शकणार नाही. ता.क. अशाच प्रकारचा कायदा शाळांनाही लागू करायला हवा. इथूनच कपडे घ्या, इथूनच बूट घ्या असे यांचे नियम असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/16/2015 - 12:54 नवीन
सध्याची यंत्रणा कोणती? न्यायदान यंत्रणा. यामध्ये आपण सामान्य नागरिक खटले दाखल करू शकतो. असे खटले दाखल केल्यानंतर त्याचा निकाल कधी लागणार किंवा तुमच्या हयातीत तरी लागेल का.. याची खात्री कोणीही देवू शकत नही. त्यामुळे हा मुद्दा बाद. (हा मुद्दा तुमच्या दृष्टीने बाद नसेल तरी हरकत नाही) अशाच प्रकारचा कायदा शाळांनाही लागू करायला हवा. इथूनच कपडे घ्या, इथूनच बूट घ्या असे यांचे नियम असतात. समजा पुण्यामध्ये काही लाख मुले शाळेत जातात. त्यातल्या ५०% शाळा असे नियम करतात. मग अशा हजारो मुलांपैकी सर्वांचे पालक अशा मुजोर आणि अन्यायकारक नियमांना बळी का पडतात..? कारण.. या असल्या शाळा आणि ही हॉस्पीटल्स या गोष्टी "Perquisites" आहेत. सक्ती नाही. (शाळा / उपचार हे मुलभूत हक्क आहेत आणि सरकारने याची तरतुद केलेली आहे) पांचगणीच्या शाळेपासून ते गल्लीतल्या नगरसेवकाने टाकलेल्या इंग्लीश मिडीयम दुकानापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तेही नको असतील तर सरकारने ZP शाळा उघडलेल्या आहेतच - कोठे जायचे हा सर्वस्वी तुमचा निर्णय असताना त्यामध्येही एखादा नियम असावा, रेग्युलेशन असावे या मागण्यांना सरकारदरबारी काडीचीही किंमत मिळणार नाही. तुम्हाला मुलांना डेहराडूनला पाठवायचे आहे परंतु ती सेवा जिल्हा परिषद शाळेच्या फी मध्ये मिळावी ही अपेक्षा रास्त नाही. आपण असे समजू की चरक शुश्रुतांच्या काळापासून डॉक्टर लोक दुनीयेला असेच लुबाडून पैसे कमावत आलेले आहेत. साधा उपाय आहे. "त्यांचे उपचार घेवू नका" समजा डॉक्टर लोकांनी बळजबरी केली तर सांगा "मला तुमच्याकडून उपचार नकोत" शक्य आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
स्वधर्म Mon, 03/16/2015 - 11:06 नवीन
हे ठरवायचा अधिकार कुणाकडे असावा? जो कष्ट घेतो त्याच्याकडे, की जो कष्ट घेतो तो सोडून इतर सर्वांकडे? >> जो हे कष्ट करतो, तो जर या समाजातच रहात असेल, समाजावरच अवलंबून असेल, समाजातूनच पैसे मिळवत असेल, अन समाजातच खर्च करत असेल, तर हे मूल्य ठरविताना निदान समाजातील इतर घटक किती व कसे मिळवत अाहेत, हे तरी पहावे. त्या तुलनेत अापण किती शुल्क अाकारतो, त्याचा विचार सुजाण घटकांनी तरी करायला नको काय? फक्त अापल्याला असणार्या वेळापेक्षा, गरजू/ मागणी अाधिक अाहे, म्हणून केवळ प्रचंड ( सर्वसाधारण घटकाच्या मिळकतीच्या १००/२०० पट) फी अाकारणे हे कितपत बरोबर अाहे? >> 'अ‍ॅटलास श्रग्ड' नावाची 'अ‍ॅन रँड' या लेखिकेची कादंबरी वाचली होती, बर्याच वर्षांपूर्वी, खूप अावडली होती. नंतर त्या विचारातला एकांगीपणा जाणवला व पटला नाही. शेवटी लेखिकाही असायलममध्ये मृत्यू पावली, असे माहिती अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
क
काळा पहाड Mon, 03/16/2015 - 11:13 नवीन
फक्त अापल्याला असणार्या वेळापेक्षा, गरजू/ मागणी अाधिक अाहे, म्हणून केवळ प्रचंड ( सर्वसाधारण घटकाच्या मिळकतीच्या १००/२०० पट) फी अाकारणे हे कितपत बरोबर अाहे?
एम आर पी च्या पेक्षा जास्त किंमत घेणे हे काळाबाजार या सदराखाली येते हे आपल्याला माहीत आहे. असाच प्रकार सर्व्हिसेस च्या बाबतीत (उदा: रिक्षावाल्याने बंदच्या दिवशी ५० रुपया ऐवजी ५०० रुपयाची मागणी करणे) आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
अ
असंका Mon, 03/16/2015 - 11:42 नवीन
तो जर या समाजातच रहात असेल, समाजावरच अवलंबून असेल, समाजातूनच पैसे मिळवत असेल, अन समाजातच खर्च करत असेल, तर हे मूल्य ठरविताना निदान समाजातील इतर घटक किती व कसे मिळवत अाहेत, हे तरी पहावे. त्या तुलनेत अापण किती शुल्क अाकारतो, त्याचा विचार सुजाण घटकांनी तरी करायला नको काय? फक्त अापल्याला असणार्या वेळापेक्षा, गरजू/ मागणी अाधिक अाहे, म्हणून केवळ प्रचंड ( सर्वसाधारण घटकाच्या मिळकतीच्या १००/२०० पट) फी अाकारणे हे कितपत बरोबर अाहे?
नाही. हा विषय दुसर्‍याने सांगायचा नाहीच. हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आपण जेव्हा अशा पद्धतीने मखलाशी करायचा प्रयत्न करतो तेव्हा स्वत:ला पण असल्या हल्ल्याला तोंड द्यावे लागेल हे विसरतो. आपण जरी बसने लटकत जात असलो तरी इतर बैलगाडीतनं जात असतील; अगदी चालत जाणारंही कुणीतरी असतंच. मग आपणही चालत जायचं असं वाटायला पाहिजे का? कुणा कुणाकडे तर कामच नसतं. मग आपणही असलेलं काम न करता बसायचं का? इतरांकडे बघून अशा गोष्टी ठरवायच्या का? समाजातील इतर घटकांनी किती मानधन घ्यावे, किती क्षमता मिळवावी, किती कष्ट घ्यावे हे आपणच ठरवायचा अट्टाहास कशाला? एखादा व्यकती अगदी अव्वाच्या सव्वा मानधन घेत असेल, तर जाऊ नका त्याच्याकडे. दुसर्‍याकडे जा. ज्याची जी क्षमता आहे, तेवढे तो पैसे मिळवतो. दुसर्‍याला मिळणार्‍या अधिकच्या पैशाकडे बघू सुद्धा नका.
शेवटी लेखिकाही असायलममध्ये मृत्यू पावली, असे माहिती अाहे
फारच मुद्देसूद. म्हणजे ती जेव्हा एखाद्या वस्तूला "फावडं" म्हणाली असेल, तेव्हा ते नक्कीच फावडं सोडून दुसरं काहीतरी असणार! मान्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
क
काळा पहाड Mon, 03/16/2015 - 12:13 नवीन
मग डॉक्टरकी सारखं पवित्र कार्यच कशाला स्वीकारायला हवं असं करायचं तर? बाकी ठिकाणीसुद्धा पैसे मिळवता येतात. जे कार्य एखाद्याच्या जीवाशी निगडीत आहे त्यात नफेखोरी करू नये असं वाटतं. बाकीची कुठलीच कामं अशी जीवाशी निगडीत नाहीत. आणि समजा नफेखोरी करायचीच असेल (आणि मरणार्‍या लोकांच्या टाळूवरचं लोणी खायचंच असेल) तर डॉक्टरांना समाजाच्या संरक्षण परिघाबाहेर ठेवावं. डॉक्टरांना ठेवू देत प्रायव्हेट सिक्यूरिटी गार्ड. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिस दलाला प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही. चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Mon, 03/16/2015 - 13:07 नवीन
मग डॉक्टरकी सारखं पवित्र कार्यच कशाला स्वीकारायला हवं
बरोबर. जरा इतर कार्य जी अपवित्र किंवा कमी पवित्र आहेत त्यांची नावं सांगा ना प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 03/16/2015 - 13:31 नवीन
ज्यात जनतेचे हित महत्वाचे असते ती पवित्र सदरात येतात. उदाहरणार्थ, वैद्यकीय, ज्ञानदान, मंत्रीपरिषद, राज्यपाल, न्यायाधीश इत्यादी. सर्वसाधारण पणे अशा कार्यात शपथ घेतली जाते. बाकीची सगळी कामं म्हणजे खानावळ टाकणे, बैलगाडी चालवणे, व्यापार करणे, दलाली करणे, करविषयक सल्ले देणे :) इत्यादी कामं पवित्र सदरात येत नाहीत. या गोष्टींचा संदर्भ व्यक्तीगत फायद्याशी असतो. आणि तुमचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही सरकारला कर देता. तुमचा टोमणा मला खरं तर कळाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा