डाॅक्टरांची फी
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
💬 प्रतिसाद
(429)
आ
आनंदी गोपाळ
Wed, 04/08/2015 - 04:54
नवीन
रवी/सोमवारी पनवेलला होतो. अधिक काय लिहू?
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Fri, 03/27/2015 - 02:28
नवीन
जाँदेना बे. मला वाटायचं की निदान जापनीज तेल मालिशवाला असेल. च्यायला हे तर पोपट घेऊन फिरणारं हाय. नादाला लागू नका. (अधिक माहितीसाठी व्यनी करू नका. इथेच विचारा)
~~जनहितार्थ जारी~~
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 09:04
नवीन
या धाग्यावरच्या गोंधळात मला अजून १ समजलेले नाही
समजा १ व्यक्ती जीचे वार्षिक उत्पन्न साधारण २.५ लाख आहे...त्या व्यक्तीच्या पालकांपैकी कोणाला हार्ट संबंधीत उपचार घ्यावे लागले तर त्याच्यासमोर काय पर्याय असतील्/आहेत ज्यामुळे उपचार करणार्या डॉक्टरला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळेल परंतू त्या व्यक्तीवर आर्थिक बोजा पडणार नाही
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/27/2015 - 09:10
नवीन
मेडिकल इन्शुरन्स.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 09:27
नवीन
हा पर्याय अजून बहुसंख्य लोकांपर्यंत पोचलेला नाहीये..आणि डायबेटिस असेल तर पहिले ४ वर्षे काही आजार कव्हर होत नाहीत...अजून काही??
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/27/2015 - 09:28
नवीन
चॅरिटी. :(
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 09:35
नवीन
वर्षाला २.५ लाखाचे उत्पन्न असलेल्याला कोणी गरिब नाही समजत...त्यामुळे चॅरिटीचे बरेच पर्याय बंद होत असावेत
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 03/27/2015 - 10:58
नवीन
नारायण हृदयालय कमी पैशात हृदयावरील उपचार करते. देवी शेट्टी ह्यांच्या ह्या हॉस्पिटल बद्दल बहुदा सत्यमेव जयते मध्ये ऐक्लं होतं. मुलाच्या वेळेसही हेच नाव सर्वात आधी सुचवल्या गेले. पण एकदा खात्री करुन घ्यावी.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/27/2015 - 11:17
नवीन
जरूर चौकशी करा. डॉ देवींनी वैद्यकीय व्यवस्थापनात अनेक क्रांतीकारी बदल करून उपचारांच्या किंमती लक्षणियरित्या कमी केलेल्या आहेत. पाश्च्यात्य देशातही (काहींना यामुळे डॉ देवींच्या क्षमतेबद्दल खात्री वाटेल ;) ) त्यांच्या व्यवस्थापकीय प्रारुपाचे (मॉडेल) अध्ययन केले जात आहे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 03/27/2015 - 11:44
नवीन
एक्काजी..
सहज सुचले म्हणून...
दवाखान्यात किंवा विशेषतः वैद्यकीय शस्त्रक्रियेदरम्यान या थोरामोठ्यांनी तयार केलेल्या प्रारूपांबद्दल किंवा प्रोटोकॉल बद्दल (डॉ नीतू मांडके यांनी असे अनेक प्रोटोकॉल तयार केले असे वाचले आहे) आम्हाला समजेल अशा भाषेत कृपया एखादी लेखमालिका लिहा..
शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांनी वॉश घेणे, OT ची तयारी किंवा शस्त्रक्रियेदरम्यान पेशंटच्या नातेवाईकांना कोणत्या प्रकारे / पद्धतीने माहिती देणे अशा साध्या गोष्टींपासून सुरूवात केली तरी चालेल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/27/2015 - 10:25
नवीन
ट का शेट
आरोग्य विमा हेच उत्तम साधन आहे. ४५ वर्षच्या दोन माणसांसाठी दर वर्षी ३ लाखाचा आरोग्यविमा ६-८००० /- इतका येतो आणि तोच जर मधुमेह असेल तर १० -१२ हजार पर्यंत जातो. जसे वय वाढत जाते तसा त्यावरील हप्ता वाढत जातो. तेंव्हा पंचवीशीच्या मुलाला आपल्या आईवडिलांसाठी दर महिना ५०० रुपये हा खर्च अवाढव्य नाही. परंतु आपल्याकडे याबद्दलची जागरुकताच नाही. त्यामुळे बहुसंख्य लोक आजारी पडेपर्यंत काहीच करीत नाहीत.
प्रत्येक आईबाप आपल्या मुलांसाठी तोंडचा घास काढून देतात शिवाय आपल्या भविष्यासाठी हि तरतूदहि करतात परंतु आपल्या उमेदिच्या काळात आपल्या वाढत्या वयात येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची काहीही सोय करीत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. जर २५ वर्षाच्या मुलाने आपल्या चाळीशीच्या नंतर येणाऱ्या खर्चासाठी दर वर्षी १२०००/- रुपये (दर महीना रुपये १०००/-) ppf( भविष्य निर्वाह निधी) मध्ये ठेवले तर चाळीशीला ३ लाख ७४ हजार रुपये होतात. यानंतर हे पैसे तसेच व्याजावर ठेवले तर आयुष्यभर येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची बर्यापैकी सोय होऊ शकेल. शिवाय चाळीशी होण्याच्या अगोदर आपला आरोग्य विमा केला तर जवळ जवळ सर्व वैद्यकीय खर्च या दोन्ही तून निघू शकेल. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. कारण मला काय धाड भरलीये पासून होय हो करायचाय ( आळशीपणा) अशा विविध कारणामुळे ते होताना दिसत नाही.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 10:32
नवीन
अगदी सहमत...पण ज्यांना अजून"ही" हे समजलेले नाही ती सुध्धा माणसेच आहेत की
जर २५ वर्षाच्या मुलाने आपल्या चाळीशीच्या नंतर येणाऱ्या खर्चासाठी दर वर्षी १२०००/- रुपये (दर महीना रुपये १०००/-) ppf( भविष्य निर्वाह निधी) मध्ये ठेवले तर चाळीशीला ३ लाख ७४ हजार रुपये होतात. यानंतर हे पैसे तसेच व्याजावर ठेवले तर आयुष्यभर येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची बर्यापैकी सोय होऊ शकेल.
हे सहीच
चाळीशी होण्याच्या अगोदर आपला आरोग्य विमा केला तर जवळ जवळ सर्व वैद्यकीय खर्च या दोन्ही तून निघू शकेल.
हे समजले नाही....जरा आणखी माहिती मिळेल काय?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/27/2015 - 10:35
नवीन
चाळीशीनंतर आपल्याला रोग होण्याची शक्यता वाढते आणि विमयाचा हप्ता चाळीशी नंतर वाढत जातो. म्हणून चाळीशीच्या एक वर्ष अगोदर विमा काढला तर हप्ता थोडा कमी असतो
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 10:38
नवीन
आरोग्यविम्याचा हप्ता दर वर्षी वेगळा वेगळा असतो ना?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 03/27/2015 - 10:54
नवीन
डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न. माझी अशी समजूत होती की विम्याचा हप्ता एक वर्षासाठी असतो (उदा: ८००० रुपये) आणि तो दर वर्षी वेगळा भरावा लागतो आणि तो विमा फक्त त्या वर्षासाठीच लागू असतो. असा एखादा विमा आहे का की ज्या साठी मी साठी पर्यंत दर वर्षी पैसे भरेन (उदा: दरवर्षी ८००० रुपये), त्यातून मला ६० वर्षांपर्यंत काही कव्हर मिळणार नाही पण त्यातून ६० वर्षांनंतर होणार्या रोगांवर मला कव्हर मिळेल? मला कव्हरची गरज तेव्हाच असणार असेल (बहुधा).
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 11:25
नवीन
मला पण असेच माहित आहे :(
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 03/27/2015 - 11:35
नवीन
life long renewal असलेल्या पॉलिसी असतात.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Fri, 03/27/2015 - 11:45
नवीन
...अजून काही माहिती आहे का ह्या विषयी?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 03/27/2015 - 12:58
नवीन
बहुदा आता प्रत्येक नव्या पॉलिसीला ही सोय असणं सक्तीचं आहे. गूगल करा.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 03/27/2015 - 13:30
नवीन
विम्याचा विषय निघाल्यामुळे लिहितो. आरोग्यविमा हा गाडीच्या विम्यासारखा आहे. आहेे तीच पॉलिसी रिन्यू केली जात असली तरी तो दरवर्षी नवा काढावा लागतो. (काही कंपन्या सवलतीच्या दरात दोन वर्षाच्या कालावधीचे विमे विकतात).
नवीन विमा काढताना तुमचे वय 35च्या आत असल्यास कुठलाच त्रास न होता सहज विमा मिळतो. पस्तिशी उलटल्यानंतर काही खाजगी विमाकंपन्या शारीरिक तपासणी करण्याची मागणी करतात. या तपासणीमध्ये एखादा आजार निघाला तर तो प्री-एक्झिस्टिंग डिसिज या कलमाखाली 3 वर्षापर्यंत उपचारासाठी अपात्र होतो. किंवा एखादा आजार विमाकंपनीसाठी प्रचंड खर्चिक आहे असे लक्षात आले (उदा. कॅन्सर) तर तो कायमचा अपात्र ठरवून विमा कंपनी कवरेज जेऊ शकते. सरकारी विमाकंपन्या 40 किंवा 45 नंतर विमा देण्यापूर्वी शारीरिक तपासणीची सक्ती करतात असे दिसते. केवळ याच कारणासाठी 35च्या आत विमा काढलेला बरा.
बहुतेक सर्व कंपन्या लाईफलाँग रिन्यूअल देत असल्या - तरी सर्वच देत नाहीत. त्यामुळे विमा घेताना लाईफलाँग रिन्युअल उपलब्ध आहे याची काळजी घेतलेली बरी. 3 वर्षानंतर विमापॉलिसी दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करता येते. मात्र त्यातही साधारण एकाच प्रकारच्या पॉलिसीमध्ये ट्रान्सफर होते.
जसजसे वय वाढत जाते तसतसा विम्याचा प्रीमियम वाढतो. 35 पूर्वी विमा काढल्यानंतर प्रीमियम कमी असतो हे त्या वयाच्या ब्रॅकेटपुरतेच खरे आहे. 35 पूर्वी विमा काढून तो 45 वयापर्यंत रिन्यू करत आल्यावर प्रीमियम वाढलेला असेल हे मी जितपत नियम वाचलेत त्यानुसार खरे आहे. (कोणी दहा-बारा वर्षापूर्वी 35च्या आत विमा काढून आता जुन्याच प्रीमियमवर 45त तो रिन्यू केला आहे असे प्रत्यक्ष उदाहरण पाहिल्याशिवाय या नियमाची सत्यासत्यता कळणार नाही).
उपचाराचा जितका जास्तीतजास्त खर्च अपेक्षित आहे तितक्या कवरेजचा विमा घ्या. 3लाख रुपये विमा हा एका कुटुंबासाठी अत्यंत अपुरा आहे. हार्ट सर्जरीला एका व्यक्तीला अडीच लाख लागतात. जर एखादे कुटुंब अपघातग्रस्त झाले तर 3 लाख रुपयात नवरा बायको व मुलगी असा तिघांचा उपचार होणे अशक्य आहे. आजच्या दरानुसार प्रत्येक व्यक्तीला किमान पाच लाखाचा विमा संरक्षण असावे.
त्यासाठी पन्नाशीच्या आत असाल तर फॅमिली फ्लोटरसारखे कवर घेतलेले चांगले. त्यात एकाच पॉलिसीवर कुटुंबाला संरक्षण मिळते.
विमा घेताना कंजूषी न करता क्रिटिकल इलनेस वगैरे सर्व पर्याय उपलब्ध असलेला विमा घ्यावा. जसे वय वाढेल तसे विम्याचे संरक्षण तपासून पाहून त्यात बदल करावा. बेसिक इंडेम्निटी पॉलिसीसोबत टॉप अप किंवा सुपर टॉप अप पॉलिसीही घ्यावी. सुपरटॉपअप पॉलिस्यांमध्ये पहिली विवक्षित रक्कम रुग्णाने भरायची असते व उरलेला खर्च ती विमाकंपनी भरते. उदा. उपचाराचा खर्च 25 लाख रुपये होतोय असे उदाहरण घेतले तर पूर्ण 25 लाखाची इंडेम्निटी पॉलिसी खूपच महाग पडेल. (5 लाखासाठी 8 हजार प्रीमियम तर 25 लाखासाठी 40 हजार प्रीमियम) त्याऐवजी 5 लाखाची बेसिक इंडेम्निटी पॉलिसी घेऊन (8 हजार प्रीमियम) 25 लाखाची सुपर टॉप अप पॉलिसी घेतली (5 हजारापर्यंत प्रीमियम) तर 13-14 हजारात 30 लाखाचे कवरेज मिळते. सुपर टॉप अप पॉलिसीमध्ये सुरुवातीचे 3-4 लाख डिडक्टिबल हे तुम्ही तुमच्या बेसिक पॉलिसीतून भरु शकता.
5 लाखाचे कवरेज काढायचे असेल तर 3 लाखाचा विमा एका कंपनीकडून व 2 लाखाचा विमा दुसऱ्या कंपनीकडून असे काढले तर विम्याच्या कवरेजची खात्री होईल. (एखाद्या कंपनीने विशिष्ट आजाराचा विमा नाकारला तर दुसऱ्या कंपनीकडून तो मिळू शकतो).
www.aisiakshare.com/node/2996 इथे थोडी आणखी चर्चा आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/27/2015 - 10:29
नवीन
जर पैसे नसतील तरीही के इ एम किंवा नायर रुग्णालयात हृदयरोगाचे बायपास पर्यंत इलाज होतात. तेथे बायपासचा खर्च साधारण सव्वा लाखापर्यंत येतो. ( यात सर्जन लुबाडण्याचा प्रश्न नाही. कि त्यांना काहीही मिळत नाही). इतर आजारांचा त्याप्रमाणे कमी जास्त. फक्त रांगेत बसावे लागते आणि चार चकरा माराव्या लागतात. आता पिवळ्या कि तांबड्या रेशन कार्ड धारकाना बर्याच रुग्णालयात राजीव गांधी योजने खाली दीड लाखापर्यंत इलाजाची सोय होते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/27/2015 - 10:33
नवीन
४०० झाले
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 03/27/2015 - 10:37
नवीन
जेपी, चिमणराव आहात कुठे...सत्कारमुर्ती खोळंबलेत तुम्च्याकडून सत्कार करुन घ्यायला :)
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 03/27/2015 - 11:50
नवीन
स्वस्तातली सर्कारी इंजेक्शने आणि हिमालयीन जडीबुटी शोधतोय आणि टका मोफत चुंबक* पाणी हुडक्तोय असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर स्.दा.धांदरफळे कळवितो.
*चुंबक पाणी नस्ते कल्पना तर्क लढवू नयेत.
अखिल मिपीय लगोलग हातासरशी सत्कार संघातर्फे ज्ञान हितार्थ प्रसारीत.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/27/2015 - 12:32
नवीन
हाबिणंदन!!!!
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Fri, 03/27/2015 - 12:46
नवीन
४१९ आणि पुढे आगेकूच चालूच आहे ....
अर्धसहस्रकासाठी शुभेच्छा ...सगळ्यानांच
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 03/27/2015 - 13:03
नवीन
४२० नंबरचा प्रतिसाद माझा!
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Fri, 03/27/2015 - 16:06
नवीन
वा वा
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Mon, 05/25/2015 - 20:29
नवीन
http://www.dailyrounds.org/blog/why-i-will-never-allow-my-child-to-become-a-doctor-in-india/
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9