Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरूके गुलाम

क
क्लिंटन
Tue, 03/31/2015 - 18:20
🗣 893 प्रतिसाद
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया द्या
206836 वाचन

💬 प्रतिसाद (893)
श
श्रीगुरुजी Sat, 08/06/2016 - 11:47 नवीन
कैच्या काय ! >>> प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे एवढा पण खोटा बोलू नये , ग्रेट ग्रँड मस्तीचा परीक्षण दाखवा बघू ! किंवा वन नाईट स्टँडचा !
वरील वाक्यातील उपरोध आवडला. केजरी अंधभक्तांकडून इतके उपरोधिक वाक्य यावे हे एक आश्चर्यच!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 08/05/2016 - 19:40 नवीन
केजरीवाल सरकारने दिल्ली मधे आमदारांचे पगार वाढवल्यावर रडणारे लोक महाराष्ट्रामधे आमदार , मंत्र्यांचा पगार पेंशंन वाढून सुद्धा मूग गिळून आहेत. दुटप्पीपणाचा कहर आहे
ग
गॅरी ट्रुमन Sat, 08/06/2016 - 12:17 नवीन
धरणेसम्राट केजरीवाल सरकारने मुख्यमंत्री निवासाजवळ धरणे धरायला बंदी घातली आहे. जानेवारी २०१४ मध्ये केजरीवालांच्या त्या कुप्रसिध्द धरण्याचे समर्थन करणारे लोक आता मात्र मूग गिळून आहेत. दुटप्पीपणाचा कहर आहे
क
कपिलमुनी Sat, 08/06/2016 - 12:21 नवीन
शांततामय मार्काने विरोध व्यक्त करायला परवानगी हवीच. अशी बंदी चुकीची आहे
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
कपिलमुनी Sat, 08/06/2016 - 12:26 नवीन
हे पद कोणाच्या अखत्यारीत आहे ? दिल्ली सरकार की केंद्र की नायब राज़्यपाल? ( दिल्ली च्या पदांबद्दल कंफ्यूजन आहे म्हणून विचारला)
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 08/06/2016 - 12:51 नवीन
गुरूजी,द्रुमन तुम्ही दोघेच आपपसांत मॅच खेळताय!!!!
अ
अर्धवटराव Mon, 08/08/2016 - 08:23 नवीन
नुकतेच मोदि साहेब दलितांविषयीच्या कळवळीतुन (हा कळवळा बहुतेक उत्तरेकडुन पश्चिमेत नुकताच दाखल झाला आहे) "दलितांऐवजी मला गोळ्या घाला" टाईपचे डायलॉग मारायला लागले आहेत. हि खास केजरीस्टाईल आता मोदिंना पण आवडायला लागली बहुतेक :)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/25/2016 - 11:35 नवीन

मोदींवर टीका करण्यासाठी केजरीवाल यांनी खर्चिले ७० लाख रूपये

जाहिरातीवर खर्च केलेल्या रक्कमेपैकी ८५ टक्के खर्च दिल्लीबाहेर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. आप सरकारने कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या जाहिरांतीवर तब्बल ५२६ कोटी रूपये खर्च केले असून यातील १०० कोटींचा हिशेब त्यांनी दिला नसल्याचे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी दिल्लीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास केंद्र सरकारला जबाबदार धरत त्यावर ७० लाख रूपये खर्च केल्याचे उजेडात आले आहे. दिल्ली सरकारने टीव्हीवरील जाहिरातीसाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचे कॅगने आपल्या ५५ पानी अहवालात नमूद केल्याचे एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. कॅगने आपल्या अहवालात केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीत आप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्याप्रमाणात जाहिराती करण्यात आल्या होत्या. केजरीवाल यांनी त्यावेळी आपच्या जाहिरातीसाठी ३३.४ कोटी रूपये खर्च केले असून त्यातील ८५ टक्के रक्कम ही दिल्ली बाहेर खर्च केली आहे. एका जाहिरातीत एक व्यक्ती झाडू दाखवताना दिसतो. झाडू हे आपचे निवडणूक चिन्ह आहे. हे राज्य सरकारने केलेल्या कामाची जाहिरात नसून पक्षाचा प्रचार असल्याचे कॅगने म्हटले आहे. जाहिरातीत राज्य सरकारची उपलब्धी ही केजरीवाल यांच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/aap-government-spent-75-lacs-on-advertisement-on-cirticism-on-prime-minister-narendra-modi-1289980/
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 08/25/2016 - 14:03 नवीन
केजरीवालांच्या अंधभक्तांना त्यांनी पंतप्रधानांवर आपली हत्या करण्यासाठी प्रयत्न करु शकतात असा आरोप केला, दिल्लीत पूर आलेला असताना ते धरमशाला इथे विपश्यनेसाठी निघून गेले वगैरे गोष्टी दिसणार नाहीतच. काय करतील बिचारे? अव्यापारेषु व्यापार केल्यावर असंच होणार.
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/01/2016 - 17:39 नवीन
दिल्लीच्या आआप सरकारमधील एक मंत्री संदीप कुमार एका चित्रफितीत महिलांशी अश्लील चाळे करताना सापडला. त्याची चित्रफीत मिळाल्यापासून केवळ ३० मिनिटांच्या आत आम्ही त्याला हाकलले, आम्ही कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करीत नाही इ. तात्विक भाषण करून केजरीवालांनी आपण महान असल्याचा पुन्हा एकदा दावा केला. ज्याने चित्रफीत बाहेर आणली त्याच्या म्हणण्यानुसार ही चित्रफीत बर्‍याच दिवसांपासून केजरीवालांकडे होती. पण ते गप्प बसून राहिले. जेव्हा काल माध्यमांकडे ही चित्रफीत पोहोचली तेव्हा नाईलाजास्तव त्यांना मंत्र्याला काढायला लागले. अर्थात हे केल्यावर सुद्धा आपल्याला हे माहित नसल्याचे त्यांनी साळसूदपणे सांगितले. एखादा माणूस काय करणार हे कोणाच्याही चेहर्‍यावर लिहिलेले नसते, त्यामुळे संदीप कुमार काय करीत होता हे मला माहितीच नव्हते असा आव त्यांनी आणला. "वो परेशान करते रहे और हम 'काम' करते रहे" हे आआपच्या जाहिरातीतील वाक्य संदीप कुमारने खरे करून दाखविले आहे. आणि आज आआपच्या पवन शर्मा नावाच्या आमदाराला न्यायालयाने १८ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा दिलेली आहे. २००९ मध्ये झालेल्या एका कामगाराच्या मृत्युप्रकरणी गुन्हा सिद्ध होऊन पवन शर्माला ही शिक्षा झाली. हे प्रकरण २००९ चे आहे. त्यामुळे २०१५ मध्ये त्याला आमदारकीचे तिकीट देताना त्यावेळी मला हे प्रकरण माहितीच नव्हते अशी लोणकढी थाप केजरीवालांना मारता येणार नाही. जितेंद्र तोमरवर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप असूनसुद्धा त्याला तिकीट देऊन निवडून आल्यावर केजरीवालांनी त्याला मंत्री केले. संदीपकुमारबद्दल माहिती मिळूनसुद्धा त्याच्यावर लगेच कारवाई केली नाही. पवन शर्मावरील गुन्ह्याची माहिती असूनसुद्धा त्याला तिकीट दिले. आणि ह्यांनी म्हणे इथली व्यवस्था बदलण्यासाठी अवतार धारण केला आहे! http://www.business-standard.com/article/news-ians/aap-mla-sentenced-for-worker-s-death-in-2009-gets-bail-116090101163_1.html
स
सुबोध खरे Sat, 09/03/2016 - 12:02 नवीन
आताच आलेल्या बातमी नुसार केजरीवाल साहेबानी आरोप केला आहे कि मंत्र्यांच्या चावट चित्रफीतिचा सर्वत्र प्रसार करण्यासाठी श्री मोदींनी अंबानींना हाताशी धरून नेट स्वस्त केले आहे. "सब मिले जुले है"
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डँबिस००७ Sat, 09/03/2016 - 04:55 नवीन
भारत देशाचे आंतर राष्ट्रिय ख्यातीचे नेते श्री केजरीवाल यांनी वॅटीकन सिटिला मदर तेरेसा सेंट हुड प्रोग्रामला उपस्थित रहाण्याचा निर्णय घेतला आहे. धर्म निरपेक्ष राजकारणाचा उत्तम पायंडाच श्री केजरीवाल यांनी पाडलेला आहे !!
क
कपिलमुनी Sun, 09/04/2016 - 21:31 नवीन
सुषमा स्वराज दिसल्या का तिथे गेलेल्या ? त्यांनी काय पायंडे पाडले ते सांगा
↩ प्रतिसाद: डँबिस००७
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 09/03/2016 - 12:57 नवीन
धाग्याचे नाव केजरूचे गुलाम विरुद्ध मोदींचे अंधभक्त असे करण्यात यावे ही माननीय संपादक मंडळाला विनंती!! जरा फुकट कंदील लावणे, हे आपलं कलगी तुरा रंगल्याचा फील तरी येईल. ह्या निमित्ताने मिपावरील एका माजी (का पाजी!) अन विद्यमान काळात आपटार्ड असलेले एक मजेशीर भोचक पात्र आठवले!
स
संदीप डांगे Sat, 09/03/2016 - 13:00 नवीन
टाझो का?
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गॅरी ट्रुमन Tue, 09/06/2016 - 12:12 नवीन
गेल्या काही दिवसात आआपमध्ये आणखी काही शिसारी आणणार्‍या गोष्टी घडल्या आहेत. अर्थात आआपमध्ये शिसारी न आणणार्‍या फारच थोड्या गोष्टी आहेत (इफ अ‍ॅट ऑल असल्याच तर). त्याच मांदियाळीतल्या या आणखी काही गोष्टी: मंत्री संदीप कुमार सीडी प्रकरण उघडकीस आले. हा व्हिडिओ सादर करणार्‍याचे म्हणणे असे की त्याने हा व्हिडिओ केजरीवालांना काही दिवस आधीच दिला होता.पण काही दिवस केजरीवालांनी त्यावर काहीच पावले उचलली नाहीत.पण मग तो व्हिडिओ उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडे आणि मिडियाकडे पोहोचल्यावर मात्र 'अर्ध्या तासात' संदीप कुमार यांची उचलबांगडी केली गेली. एकीकडे केजरीवाल म्हणत होते की या कृत्याने संदीप कुमार यांनी पक्षाच्या विचारसरणीला धक्का पोहोचवला तर दुसरीकडे मकराश्रू फेम आशुतोष म्हणत होते की जे काही झाले ते संदीप कुमार आणि त्या स्त्री मध्ये परस्परसहमतीने झाले तेव्हा इतरांना याविषयी तक्रार करायचे कारण नाही.इतकेच नाही तर आशुतोष यांनी महात्मा गांधींच्या ब्रम्हचर्यावरील प्रयोगांचे आणि सरला चौधरी यांच्याबरोबरच्या संबंधांचे दाखले दिले.पण असे दाखले उठल्यासुटल्या कुणीही देऊन कसे चालेल?गांधीजींची ध्येयनिष्ठा आणि त्याग याच्या ०.०१% ही न करता कोणीही उठावे आणि असे काहीतरी दाखले द्यावेत हे कसे काय समर्थनीय आहे? याच न्यायाने हे उद्या रेल्वेगाडीतील खजिना लुटतील आणि म्हणतील की काकोरी प्रकरणात क्रांतिकारकांनीही हेच केले होते!! २०१४ च्या निवडणुकांच्या काळात उजव्या गटाच्या अनेकांनी (ज्यांना 'मोदीभक्त' म्हणतात अशांपैकी अनेकांनी) नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांचे फोटो फॉरवर्ड करायचा प्रकार केला होता.त्यावर टिका केलीच पाहिजे. पण मग काहीसा प्रकार फोटोच्या माध्यमातून नाही तर शब्दाच्या माध्यमातून आआपच्याच एका नेत्याने केल्यावर ही शांतता का? असो.हे थोडेच झाले की काय म्हणून त्या पिडीत स्त्रीने संदीप कुमारने आपल्यावर बलात्कार केला असा दावा केला. त्यानंतर संदीप कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले. "वो परेशान करते रहे हम काम करते रहे" यातील 'काम' चा असा अर्थ लागेल असे वाटलेही नव्हते!! सध्या केजरीवालांना पंजाबात मोठा विजय मिळवायची महत्वाकांक्षा आहे. त्यासाठी दिल्लीवरून संजय सिंग आणि दुर्गेश पाठक यांना केजरीवालांनी पंजाबात रवानाही केले. कर्नल देविंदर सेहरावत हे पक्षाचे बिजासवान येथील आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पक्षाने दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.कालच त्यांनी केजरीवालांना पत्र पाठवून पंजाबातील नेते पक्षातील स्त्री नेत्यांचे उमेदवारी द्यायच्या आमिषावरून शोषण करीत आहेत असा आरोप केला. हा आरोप करणारे कोणी बाहेरचे नाहीत तर दोनदा पक्षाच्या अत्यंत उच्च मुल्यांच्या चाळणीतून पार झालेले नेते आहेत. आता त्याविरूध्द आआपचे नेते सेहरावतांविरूध्द अब्रूनुकसानीचा खटला दाखल करायची गोष्ट करत आहेत. तर आशुतोष यांच्या ब्लॉगपोस्टविरूध्द राष्ट्रीय महिला आयोगाने नोटिस बजावल्यानंतर आशुतोष महिला आयोगावर उखडले आहेत!! म्हणजे एकूणच काय तर यांच्या अमर्याद मर्कटलीला चालूच आहेत. हा सगळा प्रकार शिसारी आणणारा नाही का? आणि याविरूध्द काही लिहिले तर काही सन्माननीय सदस्यांना माझा आय.डी हॅक झाला असे वाटू लागते. असो. इतर कोणालाही काहीही वाटले तरी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या भारतीय राजकारणावरील कलंक असलेल्या प्रकाराविषयी मी मिपावर तरी लिहिणे सोडणार नाही!!
म
मोदक Tue, 09/06/2016 - 12:47 नवीन
याविरूध्द काही लिहिले तर काही सन्माननीय सदस्यांना माझा आय.डी हॅक झाला असे वाटू लागते हे मी बोललो होतो. नेहमी तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचण्याची सवय आहे मात्र केजरीवालबद्दल बोलताना तुमची लेखणी वेगळे रूप धारण करते आणि ते नेहमी खटकत राहते म्हणून तो प्रतिसाद दिला होता. केजरीवाल कितीही पातळी सोडून वागूदे किंवा राजकारणात कोलांट्या उड्या मारूदे... आपण येथे चर्चा करताना पातळी सोडणे अयोग्य आहे इतकेच माझे मत आहे. (क्लिंटनचा चाहता) मोदक
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम Tue, 09/06/2016 - 17:30 नवीन
शिव्यांचा जन्म कसा झाला? तर जेव्हा शिव्या द्यायच्याच लायकीच्या लोकांचा जन्म झाला, तेव्हा शिव्यांचा जन्म झाला. हा formula आहे. यात पाहिजे ती नावं substitute करा म्हणजे सगळी समीकरणं सुटतील. - (क्लिंटनचा, गॅरी ट्रूमनचा आणि मिल्टनचा चाहता) बोका-ए-आझम
↩ प्रतिसाद: मोदक
त
तर्राट जोकर Tue, 09/06/2016 - 17:51 नवीन
मग मिपावर शिव्या देणारे बॅन का होतात....
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अमितदादा Tue, 09/06/2016 - 19:30 नवीन
तुमचे प्रतिसाद खूप माहितीपूर्ण असतात, पण आप बाबतीत आपला पूर्वग्रह दिसून येतो. खालील वाक्याशी सहमत नाही
आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या भारतीय राजकारणावरील कलंक असलेल्या प्रकाराविषयी
केजरीवाल यांनी विकासावर लक्ष केंद्रित न करता खूप उचापती केल्या आहेत पण याचा अर्थ ते कलंक वैगेरे नाहीत. त्यांच्यापेक्षा इतर खूप पक्षांनी वाईट दिवे लावले आहेत. त्यांच्यामुळे भ्रष्टाचार हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. आप ला लोकांनी विकास आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार साठी निवडून दिलेलं, त्यांनी पाणी आणि वीज यावरती चांगलं काम केलं आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, दिल्ली सरकार च्या अख्ततिरित असणाऱ्या सेवा चांगल्या प्रकारे पुरवल्या जातात. खाजगी शाळा ची मुजोरी कमी केलीय. PWD डिपार्टमेंट सुधरवल, जेणेकरून रस्ते बांधणी आणि दुरुस्ती चांगली होईल. अर्थात जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासन बरोबर तुलना करून नाही चालणार कारण सगळेच पक्ष मतदारांना चंद्राचं आमिष दाखवतात. आप च्या चांगल्या कामाबद्दल इथे वाचा. तसेच अनेक दुवे जालावर मिळतील. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संदीप कुमार प्रकरणात आप ची नाचक्की झाली, मग काँग्रेस चे मनू सिंघवी सेक्स प्रकरण मध्ये काँग्रेस ने साधी कारवाई पण केली नाही. इथे तर आप ने कारवाई केली. तसेच आप चे स्थानिक नेते अजून राजकारणात मुरलेले नाहीत त्यामुळं political correct राहायला जमत नाही. पण चांगल्या लोकांना आप ने राजकारणाचे दरवाजे खुले केले हे नाकारून चालणार नाही. आप धर्माच्या नावांनी ते काँग्रेस चे बाप आहेत, ultra psedu secularist आहेत. सतत मोदींच्या नावाने किंवा जंग च्या नावाने ओरड करून आप ने पत घालवली आहे. परदेश नीती संदर्भात त्यांची मते फालतू आहेत. अजून बरेच दोष निघतील पण ते सगळीकडे आहेत. मी आप समर्थक अजिबात नाही. सतत बोंबलणारे केजरीवाल डोक्यात जातात मी हि आप बद्दल जास्त वाचत नाही परंतु तुम्ही जेवढ वाईट रंगवताय तेवाढे पण ते वाईट नाहीत. माझा प्रतिसाद खूप विस्कळीत आहे, तसेच मला तुम्ही मांडलेले मुद्दे मान्य आहेत पण त्याची जी तीव्रता तुम्ही दाखवताय तेवढि ती नाही.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुज्ञ गुरुवार, 09/08/2016 - 03:59 नवीन
या बाबतीत मी क्लिंटन साहेबांशी एकदम सहमत आहे. आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवाल यांचे नाव जरी काढले तरी प्रचंड संताप येतो. अरविंद केरीवाल यांची तुलना मी इदी आमेन वगैरेंशी करेन. क्रूरतेच्या बाबतीत नाही परंतु चेहेऱ्यावर सोज्वळ भाव असणाऱ्या केजरीवाल यांच्यासारख्या व्यक्ती मनातून अतिशय घाण प्रवृत्तीच्या असतात . सत्तापिपासू , दुसऱ्यांच्या सतत द्वेष करणे , त्यासाठी कोणत्याही थराला जाणे , दुसऱ्या व्यक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे आणि वरपांगी मात्र सज्जनतेचा अभिनय करणे अशी या व्यक्तींची दुटप्पी भूमिका कायम असते. आज फक्त एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री असूनही या घाणेरड्या माणसाची पंतप्रधानांना वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. भगवंत मान या व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च संस्थेला धोका येईल असे चित्रण केले व स्पष्टीकरण विचारल्यावर निर्लज्जपणे मोदींचे नाव पुढे केले होते. जर यांच्या हातात पंजाब सारखे सुरक्षादृष्टीने महत्वाचे राज्य मिळाले तर तिथे हे लोक नंगानाच चालू करतील. काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन. पंजाब मधूनहि काँग्रेस निवडून यावे असे मला व्यक्तिशः वाटते मात्र ज्यांना निववळ हुल्लडबाजी करायची आहे अशा मूर्ख आप पार्टी कडे इथून पुढे कधीही कुठलेहि राज्य जाऊ नये. आजपर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा इतका तिरस्कार वाटला नसेल तितका केजरीवाल चा वाटतो कारण केजरीवाल हा माणूस राजकारणी म्हणून अत्यंत नालायक आहेच पण एक माणूस म्हणूनही (human Being) अत्यंत व नीच व ढोंगी आहे.
स
सामान्य वाचक गुरुवार, 09/08/2016 - 04:31 नवीन
प्रतिसाद
↩ प्रतिसाद: सुज्ञ
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/08/2016 - 08:29 नवीन
आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवाल यांचे नाव जरी काढले तरी प्रचंड संताप येतो.
आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाते!!
दुसऱ्या व्यक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे आणि वरपांगी मात्र सज्जनतेचा अभिनय करणे अशी या व्यक्तींची दुटप्पी भूमिका कायम असते.
असे म्हणतात की a man's character is known by what he does when nobody is watching!! वरकरणी "इन्सान का इन्सान से हो भाईचारा" वगैरे घोषणा देणारेच केजरीवाल योया आणि प्रभू यांच्या विशिष्ट अवयवावर लाथ मारून हाकलून द्यायची भाषा करतानाचे फोनवरचे बोलणे जाहिर झाले आहे. आणि हो उंटाच्या त्याच विशिष्ट अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर "ही कसली भाषा" म्हणून आआपसमर्थक तुटून पडले होते.पण प्रत्यक्ष केजरीवालांनी माणसाच्या त्याच अवयवाचा उल्लेख केल्यावर मात्र त्यांनी सोयीस्कर मौन पाळले होते. आमचे जॉर्ज ऑरवेल साहेब म्हणूनच गेले आहेत--"all animals are equal. But some animals are more equal than others." आता त्या न्यायाने उंट माणसापेक्षा कमी equal निघाला असे म्हणायचे तर!!
आज फक्त एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री असूनही या घाणेरड्या माणसाची पंतप्रधानांना वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.
आपण नक्की कोणत्या पदावर काम करत आहोत, त्या पदाचे अधिकार आणि मर्यादा किती याचे भान प्रत्येकाने ठेवलेच पाहिजे आणि त्या प्रमाणेच वर्तन असले पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय? ठिक आहे. दिल्लीच्या लोकांनी तुम्हाला भरभरून प्रचंड बहुमताने निवडून दिले पण याचा अर्थ तुम्हाला त्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींविषयी बेताल बडबड करायचा परवाना मिळत नाही. समजा उद्याला कुणा गैबी कुडुत्री गावच्या सरपंचपदी ९९.९% मते घेऊन कोणी निवडून आला आणि मला जनतेचे मॅन्डेट प्राप्त आहे असा दावा करत त्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींविषयी (उदाहरणार्थ भारताचे परराष्ट्रधोरण) कोणी बडबड करू लागला तर ते जितके गैर ठरेल तितकेच केजरीवालांचेही वर्तन गैर आहे. (अवांतरः याच कारणामुळे आमच्या रघुराम राजन साहेबांचे वर्तनही अनेकवेळा खटकण्यासारखे होते.अशा पदावरील कोणीही त्यांच्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींवर जाहिरपणे बोलणे अयोग्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. तरीही सरकारला अर्थकारण सोडून विविध गोष्टींवर free advice मधूनमधून राजनसाहेब देत असत. त्यांची गव्हर्नर म्हणूनची इतर कारकिर्द कशीही असली तरी हा प्रकार म्हणजे त्यावर नक्कीच डाग होता असे मला वाटते)
काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन.
नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने प्रचंड गोंधळ घातला आहे आणि त्यांचा धुव्वा उडणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर समर्थ विरोधी पक्षही हवा आहे. जर पंजाबात काँग्रेस जिंकली तर काँग्रेस गेल्या अडीच वर्षात बसलेल्या एकामागोमाग दुसर्‍या पराभवाच्या तडाख्यातून काही अंशी तरी सावरेल आणि ते राष्ट्रीय राजकारणाला चांगले असेल. त्याऐवजी असे मर्कटलीला करणारे केजरीवाल आणि आआपचा विजय होणे चांगले लक्षण नसेल.
↩ प्रतिसाद: सुज्ञ
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/08/2016 - 11:34 नवीन
नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने प्रचंड गोंधळ घातला आहे आणि त्यांचा धुव्वा उडणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर समर्थ विरोधी पक्षही हवा आहे. जर पंजाबात काँग्रेस जिंकली तर काँग्रेस गेल्या अडीच वर्षात बसलेल्या एकामागोमाग दुसर्‍या पराभवाच्या तडाख्यातून काही अंशी तरी सावरेल आणि ते राष्ट्रीय राजकारणाला चांगले असेल. त्याऐवजी असे मर्कटलीला करणारे केजरीवाल आणि आआपचा विजय होणे चांगले लक्षण नसेल.
देशात समर्थ विरोधी पक्ष असावा, पण तो काँग्रेस नक्कीच नसावा. काँग्रेस हा विरोधी पक्ष होण्यास सुद्धा पात्र नाही. काँग्रेस ही फक्त गुन्हेगार, भ्रष्टाचारी, देशद्रोही व जातीयवाद्यांची देशविघातक टोळी आहे. या टोळीचा संपूर्ण नि:पात होणे भारतासाठी गरजेचे आहे. विरोधी पक्ष असावा पण त्यात नवीन पटनाईकांसारखे नेते असावेत. पंजाबात अकाली-भाजपने चांगला कारभार केला नसला तरी काँग्रेस, बसप, आआप, सिधूचा नवीन पक्ष इ. पर्याय हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारातले आहेत. एकवेळ अकाली-भाजप परवडले, पण यापैकी कोणीही नको.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुखी Fri, 09/16/2016 - 16:07 नवीन
अगदी योग्य बोललात गुरुजी. पण, सध्या सगळी खान्ग्रेसी मंडळी भाजप मधे जाताना दिसत आहे त्याचे काय? म्हणजे काहिही होउ दे, हि लोकं सत्तेपासुन दुर नाहिच आहेत!!!!!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 09/29/2016 - 09:13 नवीन
असल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. एखादा खांग्रेससी भाजप मध्ये गेल्यावर गोमूत्र शिंपडले लगेच शुद्ध होतो.. तेवढी पावरच आहे गोमूत्रात...
↩ प्रतिसाद: सुखी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/08/2016 - 11:21 नवीन
आजपर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा इतका तिरस्कार वाटला नसेल तितका केजरीवाल चा वाटतो कारण केजरीवाल हा माणूस राजकारणी म्हणून अत्यंत नालायक आहेच पण एक माणूस म्हणूनही (human Being) अत्यंत व नीच व ढोंगी आहे.
संपूर्ण प्रतिसादातील वाक्यावाक्याशी सहमत, अपवाद फक्त खालील वाक्यांचा.
काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन. पंजाब मधूनहि काँग्रेस निवडून यावे असे मला व्यक्तिशः वाटते
मी दोघेही निवडणार नाही. कॉंग्रेस हा आआपइतकाच नालायक पक्ष आहे.
↩ प्रतिसाद: सुज्ञ
स
सुज्ञ गुरुवार, 09/08/2016 - 05:05 नवीन
म्हन्जे काय ?
प
पिलीयन रायडर गुरुवार, 09/08/2016 - 05:08 नवीन
सुज्ञ प्रतिसाद! असं म्हणाली ती!!
↩ प्रतिसाद: सुज्ञ
स
सामान्य वाचक गुरुवार, 09/08/2016 - 05:54 नवीन
असे झाले का Btw जेंव्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनात हा माणूस होता, तेंव्हाच मी नवरोबांबरोबर पैज लावली होती , कि हा माणूस खूप पाताळयंत्री वाटतो आहे, आणि अण्णांच्या मागे येण्यात ह्याचा स्वतःचा अजेंडा आहे, आमच्या नवरोबाना हा चांगला माणूस इ इ वाटत होता पैज हरला ना राव त्यामुळे येत जाता त्याला ऐकवू शकते, तुला कशी माणसाची पारख नाही आणि मला कशी आहे
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
र
रुपी गुरुवार, 09/08/2016 - 05:57 नवीन
त्यामुळे येत जाता त्याला ऐकवू शकते, तुला कशी माणसाची पारख नाही आणि मला कशी आहे >> फार वेळा म्हणू नका हं.. नाहीतर "तुझी पारख मी केली आणि तू माझी" असे उत्तर ऐकायला मिळेल ;)
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक गुरुवार, 09/08/2016 - 06:38 नवीन
हा धोका आहे नाही का
↩ प्रतिसाद: रुपी
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/08/2016 - 08:37 नवीन
जेंव्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनात हा माणूस होता, तेंव्हाच मी नवरोबांबरोबर पैज लावली होती , कि हा माणूस खूप पाताळयंत्री वाटतो आहे, आणि अण्णांच्या मागे येण्यात ह्याचा स्वतःचा अजेंडा आहे,
यावरून एक गोष्ट आठवली. अण्णांचे २०११ मधले उपोषण जोरात चालू होते त्यावेळी त्या उपोषणाला विरोध करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देणे वगैरे हिस्टेरिया जाणीवपूर्वक तयार करण्यात आला होता. त्यावेळी मिपावरही जोरदार चर्चा झाली होती.सुरवातीला अनेक भाजप समर्थक अण्णा-केजरीवाल कंपनीचा उदोउदो करत होते तर काँग्रेस समर्थक अर्थातच या प्रकाराचा विरोध करत होते.पुढे आआपची स्थापना झाल्यावर केजरीवाल भाजपविरूध्द उलटल्यावर भाजप समर्थक केजरीवालांना नावे ठेवायला लागले आणि काही काँग्रेस समर्थक केजरीवालांच्या बाजूने बोलायला लागले.(मुळचे इकडचेच असलेले) पण सध्या तिकडे असलेले काही या कॅटेगिरीमध्ये मोडतात. या बाबतीत मात्र माझी भूमिका कन्सिस्टन्ट आहे याचा सार्थ अभिमान मला आहे :) अण्णांच्या उपोषण काळापासूनच या असल्या अराजकवादाला माझा विरोध होता.आणि त्यातही केजरीवाल म्हणजे गुड फॉर नथिंग लोकांचा सरताज आहे हेच मत होते. आणि हो. मिपावर तरी केजरीवाल आणि आआपचा माझ्यापेक्षा अधिक कडवा विरोधक सापडणे तसे कठिणच आहे याचाही मला अभिमान आहे :)
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक गुरुवार, 09/08/2016 - 08:48 नवीन
कारण प्रामुख्याने हे महोदय आहेत ते खोटे वागणे, बोलणे, खोटा साधेपणा इ इ पहिले कि tv फोडीन असे वाटते बाकी तुमच्या पोस्ट शी सहमत सगळाच एकंदरीत भंपकपणा होता
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
च
चिनार गुरुवार, 09/08/2016 - 08:53 नवीन
त्यावेळी मिपावरही जोरदार चर्चा झाली होती.
ह्या चर्चेची लिंक मिळेल का ? दुर्दैवाने त्यावेळी मी मिपावर नव्हतो.. आशुतोषची शप्पथ घेऊन सांगतो, ती चर्चा फक्त वाचेल. धागावर काढणार नाही. :-)
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/08/2016 - 09:13 नवीन
काही लिंका पुढीलप्रमाणे: एक दोन तीन चार आणखी काही चर्चा सापडल्या तर इथे लिंका देतोच.
↩ प्रतिसाद: चिनार
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/08/2016 - 11:29 नवीन
आआपच्या पवन शर्मा नावाच्या आमदाराला काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने २००९ मधील एका कामगाराच्या मृत्युच्या संदर्भात दोषी जाहीर करून १८ महिन्यांच्या तुरंगवासाची शिक्षा जाहीर केली. ही बातमी बहुतेकांच्या नजरेतून निसटलेली दिसते. २०१२/१३ मध्ये केजरीवालांनी असे जाहीरपणे सांगितले होते की "शिक्षा झाल्यावर आमदारकी/खासदारकी रद्द होण्याऐवजी एखाद्यावर नुसते आरोप असले तरी त्याची/तिची आमदारकी/खासदारकी रद्द व्हायला पाहिजे". या पवन शर्माचे प्रकरण २००९ चे आहे. खोटी पदवी प्रमाणपत्रे तयार करणार्‍या जितेंद्र तोमरवर २०१५ मधील निवडणुक होण्याच्या आधीपासून आरोप होते. अर्थात केजरीवालांनी त्याला जाहीररित्या निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. त्या निवडणुकीच्या वेळी या दोघांना तिकीट देताना केजरीवालांना आपल्याला जाहीर घोषणेचा सोयिस्कर विसर पडला.
सुरवातीला अनेक भाजप समर्थक अण्णा-केजरीवाल कंपनीचा उदोउदो करत होते
सुरवातीला त्यात मीही होतो. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत राजस्थान, म. प्र. व छत्तीसगड येथे भाजपला बहुमत मिळावे व दिल्लीत आआपला बहुमत मिळावे अशी माझी इच्छा आहे असे मी एका धाग्यावर लिहिले होते. केजरीवालांमुळे मी त्यावेळी खूप प्रभावित झालो होतो. अर्थात नंतर इतरांप्रमाणे माझाही भ्रमनिरास झाला. मात्र अण्णांबद्दल मला अजूनही पूर्वीइतकाच आदर आहे व त्यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सामान्य वाचक गुरुवार, 09/08/2016 - 08:59 नवीन
दुसरा धागा काढताय का ? कारण अजून खूप लोकाना खूप बोलायचे असणार आहे
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/08/2016 - 09:15 नवीन
दुसरा धागा काढताय का ?
हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अन्य कोणी मिपाकराने नवीन धागा काढल्यास हा धागा वाचनमात्र करायला काहीच हरकत नाही. ८००+ प्रतिसाद म्हणजे तसे खूपच झाले. या क्षणी तरी नवा धागा काढायचा उत्साह नाही. पण तुम्ही किंवा अन्य कोणी नवा धागा काढल्यास नक्कीच सहभाग घेईन :)
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
क
क्षमस्व Fri, 09/16/2016 - 14:09 नवीन
हजार होऊ द्या ना प्लिज।।।
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
र
रुस्तम गुरुवार, 09/08/2016 - 09:16 नवीन
दिल्ली उच्च न्यायालयाचा आप सरकारला झटका; २१ संसदीय सचिवांची नियुक्ती रद्द
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 09/08/2016 - 09:35 नवीन
मागच्या आठवड्यात दिल्लीला गेलो होतो.माझे हॉटेल होते दक्षिण दिल्लीत अमृतनगर भागात, जो कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघात येतो. कस्तुरबा नगर मतदारसंघाचे आआपचे आमदार मदनलाल हे या २१ संसदीय सचिवांपैकी आहेत.किमान दोन ठिकाणी रस्त्यावर या मदनलालांचे बोर्ड बघितले. त्यात "विधायक (कस्तुरबा नगर) आणि पार्लामेन्टरी सेक्रेटरी-- दिल्ली सरकार" असाही उल्लेख होता. या २१ आमदारांपैकी काहींनी "आम्ही मंत्र्यांच्या ऑफिसात इंटर्न" म्हणून काम करत आहोत असा दावा केला होता.जर इंटर्न असाल तर मग रस्त्यावर पाट्या लावून ते सर्व जनतेला सांगायचे प्रयोजन कळले नाही. ही पाटी मी उबरमधून बघितली होती आणि त्यामुळे फोटो घेता आला नव्हता. जर दिल्लीतील कुणा मिपाकराने (पटाईतकाका किंवा चित्रगुप्त किंवा अरूण जोशी किंवा अन्य कोणी) अशा एखाद्या पाटीचा फोटो घेऊन इथे दिला तर ते फारच चांगले होईल.
↩ प्रतिसाद: रुस्तम
ग
गॅरी ट्रुमन Fri, 09/16/2016 - 13:04 नवीन
गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये आआपच्या सरकारमध्ये आणखी काही शिसारी आणणार्‍या गोष्टी झाल्या आहेत. तर झाले असे की दिल्लीमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ आली.१२-१५ जणांच्या त्यामुळे मृत्यूही झाला.खरे तर आआपचे सरकार कसा लोकाभिमुख कारभार देऊ शकते हे दाखवून द्यायची संधी या साथीच्या निमिताने मिळाली होती. दिल्ली सरकारमध्ये गृहमंत्री नाही कारण दिल्ली पोलिस दिल्ली सरकारला रिपोर्ट करत नाहीत तर ते केंद्र सरकारला रिपोर्ट करतात.तेव्हा दिल्ली सरकारमध्ये गृहमंत्र्याचे कामच नाही.पण दिल्लीच्या मंत्रीमंडळात सत्येंद्र जैन हे आरोग्यमंत्री आहेत. याचाच अर्थ दिल्ली सरकारच्या हातात शहरातील आरोग्यसेवा पुरवायचा अधिकार काही प्रमाणात नक्कीच आहे. बाकी काही नाही तरी एकूण ३८ हॉस्पिटल्स दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतात हे दिल्ली सरकारचेच संकेतस्थळ म्हणत आहे. मान्य आहे की एम्स किंवा राममनोहर लोहिया हॉस्पिटल ही हॉस्पिटल्स केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात आणि दिल्ली मनपाची काही हॉस्पिटल्स असतीलच त्यावरही यांचा काही अधिकार नाही.पण दिल्ली सरकारच्या अंतर्गत जी हॉस्पिटल्स येतात त्यात या प्रकाराविषयीची व्यवस्थित उपाययोजना करता आलीच असती. परवा टाईम्स नाऊवर एक डॉक्टर म्हणत होता की चिकनगुनिया १००० मध्ये सरासरी एकाचाच मृत्यू घडवतो.म्हणजे जर १२-१५ जणांचा मृत्यू झाला आहे तर याचाच अर्थ १२ ते १५ हजार लोकांना त्याची लागण झाली असली पाहिजे.डेंग्युचे रूग्ण किती असावेत याची कल्पना नाही. म्हणजे करायचे ठरविले असते तर बरेच काही करण्यासारखे होते. पण कसे आहे की स्वतः काही करायचे नाही आणि इतरांवर दोष ढकलायचा ही आमच्या युगपुरूषांची आणि आआपची जुनी परंपरा आहे.त्यातूनच मग बघा कोर्टाने नायब राज्यपालांना दिल्लीचे सर्वेसर्वा ठरविले आहे ना मग त्यांनाच विचारा, मनपांना विचारा वगैरे मखलाशी करून झाली. एक गोष्ट कळत नाही.जर नायब राज्यपालच सर्वेसर्वा असतील तर शीला दिक्षित दिल्लीमध्ये मोठे रस्ते, फ्लाय-ओव्हर इत्यादी कशा काय बांधू शकल्या? कोर्टाचा आदेश काय आहे हे बघायला हवे पण असे दिसते की दिल्लीचे नायब राज्यपाल राज्य सरकारचे प्रस्ताव 'व्हेटो' करू शकतात (जो अधिकार इतर राज्यांच्या राज्यपालांना नसतो).असो. जे काही असेल ते. टाईम्स नाऊ मध्यल्या त्याच कार्यक्रमात पूर्वाश्रमीच्या आआपच्या आणि सध्या भाजपत असलेल्या शाझिया इल्मी म्हणत होत्या की दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे चांगले ३००० कोटींचे बजेट आहे.मग त्या बजेटचा वापर करून यांना चिकनगुनियाविषयी काहीही करता आले नाही? दिल्ली मनपांचा कारभार भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे हे अगदी जगजाहीर आहे.अशावेळी दिल्लीतल्या ३ मनपा काम करत नसतील तर ते काम दिल्ली राज्य सरकारला करून त्या मनपांना आणि भाजपला तोंडघशी पाडायची अगदी उत्तम संधी होती.आपले युगपुरूष दिल्लीबाहेर काहीही कुठेही झाले तरी तिथे धाव मारतात.मग ती दादरीची घटना असो की रोहित वेमुलाची आत्महत्या असो. पुण्यातल्या एफ.टी.आय.आय ला दिल्लीमध्ये जागा द्यायची तयारी होती त्यांची.म्हणजे आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसलेल्या अनेक गोष्टींमध्येही नाक खुपसणारे हे युगपुरूष शहरात फॉगिंग करून डेंग्युचे डास उत्पन्न होणार नाहीत या त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसलेल्या (पण दिल्ली मनपांच्या अधिकारक्षेत्रातील) गोष्टीपासून मात्र दूरच राहिले.भाजपवर डाव उलटवायची नामी संधी त्यांनी घालवली नाही का? असो. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी तर अगदीच कहर केला.पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर यांचा पारा चढला आणि म्हणे त्यांनी हातातला फोनच भिरकावला.बरं ही साथ सुरू होण्यापूर्वी हे कुठे होते?तर गोव्यातील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची व्यवस्था बघायला तिकडे गेले होते.आपले युगपुरूष त्यावेळी पंजाबमध्ये प्रचार करायला आणि नंतर ऑपरेशनसाठी बंगलोरला गेलेले होते.अन्य एक मंत्री हाजसाठी सौदी अरेबियाला गेलेले आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कुठे होते तर फिनलंडमध्ये. काय करायला ते तिकडे गेले आहेत? तर फिनिश शिक्षणव्यवस्था जगात सर्वोत्तम आहे आणि त्या पध्दतीच्या शाळा दिल्लीत आणायच्या या उद्देशाने त्या व्यवस्थेचा अभ्यास करायला तिकडे गेलेले आहेत. एकीकडे म्हणायचे की १० रूपयाचे पेन घ्यायचाही अधिकार दिल्ली सरकारला नाही आणि दुसरीकडे त्या शाळांचा अभ्यास करायला फिनलंडला जायचे? म्हणजे तशा शाळा सुरू करायचा अधिकार यांना आहे का या प्रश्नाचे उत्तर आधी शोधून ठेवले आहे का?की करदात्यांच्या पैशावर एक जीवाचे ब्राझील झालेच आहे तसे दुसरे जीवाचे फिनलंडही होऊन जाऊ द्या!!म्हणजे दिल्लीमध्ये साथ आलेली असताना दिल्ली सरकारच्या मंत्र्यांचाच शहरात पत्ता नव्हता.आता परत नायब राज्यपालही न्यू यॉर्कमध्ये होते ते का विचारत नाही हे केजरूच्या गुलामांनी म्हणूनही झाले. पण प्रश्न असा आहे की आम्ही सोडून इतर सगळे चोर आहेत, भ्रष्ट आहेत, अमक्यातमक्याचे एजंट आहेत असली बकवास यांनीच करून ठेवली होती.त्यामुळे जनतेच्या यांच्यापासूनच्या अपेक्षांची पातळी वाढली तर त्यांनी इतरांकडे बोट दाखवून उपयोग नाही. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे म्हणणे की चिकनगुनियाने कोणी मरूच शकत नाही.हे त्यांनी एकदा म्हटले.आणि त्यावर गदारोळ झाल्यावर परत "गुगल म्हणते की चिकनगुनियाने कोणी मरूच शकत नाही" असेही हास्यास्पद विधान केले. एकूणच काय की हे आआपवाले प्रचंड माजले आहेत.मिळालेल्या ७० पैकी ६७ जागांची हवा यांच्या डोक्यात शिरली आहे आणि दिल्लीच्या मतदारांना हे गृहित धरू लागले आहेत.अशा माजोरड्यांचे विमान कधीनाकधी जोरदार आपटतेच. या आआपवाल्यांचे विमानही लवकरात लवकर आपटू दे हीच सदीच्छा.
ग
गॅरी ट्रुमन Fri, 09/16/2016 - 14:36 नवीन
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा फिनलंडमधील शाळांचा अभ्यास अगदीच जोरदार चालू आहे असे दिसते: Image removed. दिल्ली सरकारने आपल्या लोकांची सोय लावायला दिल्ली डायलॉग कमिशन म्हणून एक प्रकार चालू केला आहे. त्याचेच प्रमुख म्हणून आशिष खेतानची नियुक्ती झाली आहे. चीनमध्ये डेंग्युच्या डासांचा बंदोबस्त कसा केला गेला याचा अभ्यास करायला हा मनुष्य मागच्या वर्षी चीनलाही जाऊन आला. या दौर्‍यासाठी करदात्यांचे पैसे खर्च झाले पण त्यातून निष्पन्न काय झाले हा प्रश्न विचारायला बंदी का? बाकी काही म्हणा खुद्द केजरीवालचा चेहरा बघून जितकी तिडिक जात नाही तितकी तिडिक या आशिष खेतान आणि आशुतोषचा चेहरा बघून जाते राव!!
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक Fri, 09/16/2016 - 15:51 नवीन
गॅरी भाऊ.. तुम्ही कशाला इतके हात धुवून केजरीवालच्या मागे लागला आहात...? मी पुन्हा एकदा सुचवतो आहे, असले प्रतिसाद टाकून तुम्ही काय सिद्ध करत आहात ते एकदा प्लीज बघा. या न्यायाने मोदी ढोल वाजवताना किंवा तेथील कलाकारांची कला बघतानाचा वेळ वाया गेला असे समजायचे का? आपण हाफिसात १००% वेळ कामातच घालवतो का? ब्रेक, विरंगुळा, पूल खेळणे वगैरे कधी ना कधी करतोच ना..? असे उथळ प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत राव...!!
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 09/16/2016 - 15:59 नवीन
गॅरी भाऊ.. तुम्ही कशाला इतके हात धुवून केजरीवालच्या मागे लागला आहात...?
अहो जुनी सवय आहे ती माझी. मी एखाद्याच्या मागे लागलो की काहीही झाले तरी सोडत नाही. म्हणूनच कधीकधी वाटते की मी कधी भूतबित झालो आणि कुणाच्या मानगुटीवर बसलो तर त्या माणसाची खैर नाही :)
मी पुन्हा एकदा सुचवतो आहे, असले प्रतिसाद टाकून तुम्ही काय सिद्ध करत आहात ते एकदा प्लीज बघा.
जे मिपावर इतर कुठलाही लेख/प्रतिसाद लिहून सिध्द करायचे असते तेच :)
असे उथळ प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत राव...!!
काय उथळ आणि काय खोल हे व्यक्तिपरत्वे बदलेल. तरीही सूचनेबद्दल आभारी आहे.
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 09/16/2016 - 16:39 नवीन
धन्यवाद :)
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
संदीप डांगे Fri, 09/16/2016 - 17:04 नवीन
When you loose balance, you loose credibility too! बाकी ट्रुमन/क्लिंटन साहेबांची मर्जी!
म
मोदक Fri, 09/16/2016 - 17:12 नवीन
त्ये Lose हाये वो.. Loose न्हाई.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 09/16/2016 - 17:22 नवीन
आजकाल टायपो फार व्हाइलेत! ;))
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा