केजरूके गुलाम
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.
सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.
या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.
पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?
मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.
असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.
केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.
नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.
प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.
हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.
अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.
या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).
या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
💬 प्रतिसाद
(893)
क
कपिलमुनी
गुरुवार, 01/21/2016 - 09:12
नवीन
कोणी घेतले आहे हे उघड आहे .आधी ती महिला आपची कार्यकर्ती आहे म्हणायचा आणि मग आपसेनाची आहे म्हणायचा , पुन्हा आप आणि आपसेना एकच आहे म्हणायचा , पुरावा मागितला की तो नसल्याने आता शब्दांची फिरवाफिरवी करत आहात.
मी तुम्हाला वर्तमानपत्रांच्या लिंक दिल्या आहे ज्यात आप आणि आपसेना यांतला फरक सांगितला आहे .
आणि ती महिला आपसेनाची आहे हे सुद्धा आहे.
तुमच्या अरण्यरूदनापेक्षा पुरावा द्या , लिंक द्या आणि सिद्ध करा .
तरच चर्चा योग्य दिशेने चालली आहे असे म्हणता येइल.
श
श्रीगुरुजी
Fri, 01/22/2016 - 09:49
नवीन
अहो, ते दोन्ही एकच आहेत. जसा इंदिरा काँग्रेस व सेवा दल यांच्यात अजिबात फरक नाही, तसाच या दोघांमध्येही काहीही फरक नाही. अर्थात तुम्हाला जागे करणे अवघड आहे.
क
कपिलमुनी
Fri, 01/22/2016 - 17:20
नवीन
सेवा दल ई. गप्पा न सांगता तुमच्या विधानाला पुरावा द्या !
तुम्ही काय म्हणता, याला षष्प महत्व नाही .
पुरावा नाही असे कबूल करा ( तुम्ही किती जागे आहात हे या निमित्ताने कळेलच )
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/22/2016 - 17:22
नवीन
त्यांचे प्रतिसाद अन पोस्ट्स असहिष्णु नसतात बरंका कपिलमुनी!!
श
श्रीगुरुजी
Sun, 01/24/2016 - 16:54
नवीन
तुम्हीच जरा जागे व्हा. सर्व काही पूर्वीप्रमाणेच जसंच्या तसंच घडलं आहे. तेच कलाकार, तोच प्रसंग, तशीच घटना, तसाच कांगावा, तसेच दोषारोप, स्वतःला दीन/पतित्/अन्यायी असे दाखविण्याची अगदी तशीच पद्धत, प्रसिद्धीसाठी कितीही खालच्या थराला जायची तशीच उमेद आणि एकाच साच्यातल्या गणपतीच्या मूर्तीसारखे एकाच पक्षातून आलेले तेच तेच कलाकार ... सर्व काही अगदी स्पष्ट आहे. जागे झालात तर समजेल.
क
कपिलमुनी
Sun, 01/24/2016 - 20:36
नवीन
अहो गुरुजी ,
सध्याची आरोपी महिला त्याच पक्षाची आहे याचा वर्तमानपत्रांतला , वाहिनीवरचा कोणता पुरावा तुमच्या कडे आहे ??
तीच तीच कॅसेट वाजवू नका. तुम्ही पुरावा देउ शकत नाही हे सर्वांना कळले आहे .
या निमित्ताने फेकुगिरी उघडकीस आली
श
श्रीगुरुजी
Mon, 01/25/2016 - 16:28
नवीन
आधीचे अनेक प्रयोग झालेल्या त्याच नाटकाचा, तीच संहिता असलेला, तेच कलाकार असलेला, तेच नेपथ्य असलेला, तेच समीक्षक उपस्थित असलेला नवीन प्रयोग पुन्हा एकदा त्याच संचाने सादर केला. सर्व काही तेच आहे. तसूभरही फरक नाही. जागे झालात की लक्षात येईल तेच नाटक आपण त्याच संचासोबत त्याच नेपथ्यासहीत पुन्हा एकदा पहात आहोत.
क
कपिलमुनी
Mon, 01/25/2016 - 18:25
नवीन
पूर्वीच्या कहाण्या सांगू नका . तुमच्याकडे पुरावा नाही .
तुम्ही खोटे आरोप करता.
पुरावा देता आला नाही की गोल गोल फिरता.
श
श्रीगुरुजी
Tue, 01/26/2016 - 08:41
नवीन
त्यात काय गोल गोल फिरायचं? हा अनेक प्रयोग झालेल्या पूर्वीच्याच त्याच नाटकाचा त्याच कलाकारांसहीत, त्याच नेपथ्यासहीत हा एक पुढचा प्रयोग होता. तुम्हाला हे एक संपूर्ण नवीन नाटक आहे असे वाटत आहे याचेच आश्चर्य वाटत आहे.
"सही रे सही" नावाचे एक नाटक गेली १३-१४ वर्षे रंगभूमीवर प्रयोग करीत आहे. त्यात एकूण ८ वेगवेगळे कलाकार काम करतात. त्यातील भरत जाधव, जयराज नायर व भरत जाधवच्या सहाय्यकाचे काम करणारे कलाकार पहिल्या प्रयोगापासून आजतगायत काम करीत आहेत. उर्वरीत ५ भूमिका प्रत्येकवेळी वेगवेगळे कलाकार करतात. केजरीवालांच्या "शाई रे शाई" या नाटकात सुरवातीपासून केजरीवाल, कुमार विश्वास, आशुतोष इ. कलाकार आजतगायत टिकून आहेत. शाई फेकण्यासाठी ते प्रत्येक वेळी वेगळे कलाकार निवडतात व त्यामुळे तुमच्यासारख्यांना प्रत्येक प्रयोग हे एक नवीन नाटक आहे असा भास होतो.
प
प्रचेतस
Tue, 01/26/2016 - 08:50
नवीन
गुर्जी, कपिलमुनी ह्यांचे म्हणणे पटतंय. पुरावे द्यायचे सोडून तुम्ही नुसतेच गोल गोल फिरत राहात.
श
श्रीगुरुजी
Tue, 01/26/2016 - 16:25
नवीन
याच "शाई रे शाई" या हातखंडा नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग आआपवाल्यांनी भूतकाळात अनेकवेळा केलेले आहेत. नुकताच घडवून आणलेला प्रसंग हा त्यातलाच एक नवीन प्रयोग.
भूतकाळातील सर्व प्रसंगात केजरीवालांनी आपल्यावर शाई फेकण्यासाठी आआपच्याच कार्यकर्त्यांना सांगितले होते. कधी शाई फेकल्याचे आरोप, कधी गाडीवर अंडी टाकल्याचे आरोप, कधी आपल्या अंगावर व्हॅन घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप, कधी सार्वजनिक थोबाडीत मारून घेणे असे वेगवेगळे प्रयोग ते आपल्याच कार्यकर्त्यांकडून घडवून आणतात.
यावेळीही तसेच झाले आहे. यातील प्रयोगातील सर्वजण आआपशी संबंधित असलेले तेच तेच कलाकार आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी अशी नौटंकी करणे व त्यासाठी भाजपला जबाबदार धरणे आणि चौकशीनंतर हे त्यांनीच आपल्या लोकांकडून ठरवून केलेले नाटक आहे हे उघडकीस आल्यावर तोंडात मिठाची गुळणी धरणे हे केजरीवालांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
प
प्रचेतस
Tue, 01/26/2016 - 19:07
नवीन
पुरावे द्या ना पण.
पुराव्यांचं नाव काढलं तर त्याबाबतीत तुम्ही सुद्धा मिठाची गुळणीच धरत आहात.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/28/2016 - 15:47
नवीन
नौटंकीतले सर्वजण एकाच पक्षाचे आहेत. ही नौटंकी त्याच सर्वांनी अनेकवेळा पार पाडलेली आहे. सर्व प्रकार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे.
क
कपिलमुनी
Wed, 01/27/2016 - 12:25
नवीन
सध्याचा धाग्यावर लिहलेल्या एका विधानाला पुरावा देता येत नाही.
तुम्ही चर्चा करायला येत नसुन एक राजकीय अजेंडा राबवायला मिपाचा वापर करत आहात.
एखाद्याने ते मक वैयक्तीक आहे / किंवा पुरावा नाही असे सीमगितले असते , पण तुमची ईगो खरी गोष्ट कबूल करू देत नाही.
गेट वेल सून गुरूजी !!
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/28/2016 - 15:43
नवीन
अगदी अपेक्षित प्रतिसाद! यापेक्षा वेगळा प्रतिसाद अपेक्षितच नव्हता.
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 16:06
नवीन
पुरावा द्याहो! बाकीचे नेहमीचे डोयलोग ठेवा बाजुला. तुम्हाला वाटतं म्हणून सत्य आहे हे म्हणणे आता बास करा. लोकांना पुरावे मागत फिरता, स्वतःची वेळ आली की डोंबार्याचा खेळ!
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/28/2016 - 16:14
नवीन
या नौटंकीतील सर्वजण एकाच पक्षाचे आहेत. हीच नौटंकी यांनी यापूर्वी अनेकवेळा पार पाडलेली आहे. अजून कसला वेगळा पुरावा हवाय?
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 16:20
नवीन
म्हणजे जे पूर्वी झालंय तसंच पुन्हा झालं तर पूर्वी झालेल्या घटनेमागे जे कारण होते तेच आता झालेल्या घटनेमागे असतेच असा नियम आहे काय तुमचा? सांगून टाका. म्हणजे कसं पुढे कुठे गरज पडल्यास हा नियम दाखवता येईल.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/28/2016 - 16:25
नवीन
केजरीवालांच्या बाबतीत तेच कारण असतं. सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करणे, भाजपला शिव्या घालणे, आपण व्यसस्थेचा बळी असल्याची बतावणी करणे हीच पूर्वी घडलेल्या (खरं तर घडवून आणलेल्या) घटनांमागची कारणे होती. आताही तेच आहे.
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 16:27
नवीन
म्हणजे उद्या कोणी त्यांना बॉम्बने उडवले तरी तुम्ही हेच कारण द्याल?
म
मी-सौरभ
गुरुवार, 01/28/2016 - 19:03
नवीन
याच न्यायाने नितीश कुमार ना चप्पल फेकून घेण्याचा आणि मोदींना परदेशात स्वत:ची प्रतिमा मलिन करून घेण्याचा छंद आहे असे म्हणणे योग्य असेल.
श
श्रीगुरुजी
Fri, 01/29/2016 - 07:50
नवीन
आता हे काय नवीन?
श
श्रीगुरुजी
Fri, 01/29/2016 - 07:48
नवीन
केजरीवाल अत्यंत चतुर आहेत. बाँबबिंबने उडविण्यातील धोका ते ओळखतात. त्यामुळे असले कार्यक्रम ते करणारच नाहीत. त्याऐवजी स्वतःच्याच कार्यकर्त्यांनाकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे कार्यक्रम मॅनेज करणे किंवा स्वतःच्याच कार्यकर्त्यांनाकडून स्वतःवर शाई शिंपडून घेणे असे निरूपद्रवी कार्यक्रम मॅनेज करण्यात त्यांचा हातखंडा आहे. भूतकाळात अनेकवेळा त्यांनी हे कार्यक्रम यशस्वीपणे मॅनेज केले आहेत व भविष्यकाळातही असे कार्यक्रम ते करीत राहतील.
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/29/2016 - 19:16
नवीन
अरे बास झाले. अधिक उजवीकडे गेलात तर कडेलोट होईल =)) =)) =))
स
संदीप डांगे
Mon, 01/18/2016 - 18:42
नवीन
त्यांच्या चेहर्यावरील लबाड भाव
आजकाल काही सरकारी जाहिरातींमधल्या हसर्या चेहर्यावरचे भाव आम्हालाही लबाड वाटायला लागलेत बॉ....
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/19/2016 - 08:46
नवीन
गुरुजींना आमचे तुरीचे वरण काही पचले नव्हते कपिलमुनी! तवा पासुन आम्ही आग्रह सोडला! :D
ह
होबासराव
Tue, 01/19/2016 - 08:57
नवीन
त्यासोबत मिसयि चि भाकर आन थोडा खुरसनिचा ठेचा बि त मस्त लागते ना :)
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/19/2016 - 09:17
नवीन
भाकर देऊ पर ठेसा नाही भेट्न!! लोकयची गुड मॉर्निंग टाइम ची असहिष्णुता वाढन !!
च
चिनार
Tue, 01/19/2016 - 09:46
नवीन
त्यैची असहिष्णुता साम्भायाले सरकार हाय ना बाप्पा …. तुम्ही कायले फिकीर करता बापू…
तुम्ही देजा ठेचा मस्त लवंगी मिरच्या टाकून…झोमल्या त झोमुद्या
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2016 - 10:03
नवीन
समजा ठेच्याने वाढली सकाळची असहिष्णुता, तर ठेच्यामुळे मिळालेले पुरस्कार सकाळी परत देऊ टाकू. हाकानाका.
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/22/2016 - 10:19
नवीन
आधी साधं वरण पचवा!! :D :D
श
श्रीगुरुजी
Fri, 01/22/2016 - 10:24
नवीन
असहिष्णु प्रतिसाद!
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/22/2016 - 10:27
नवीन
:D :D असहिष्णु गुरूजी असहिष्णु प्रतिसाद!!! :D :D
श
श्रीगुरुजी
Fri, 01/22/2016 - 10:28
नवीन
मी असहिष्णु नाही आणि माझे प्रतिसादही असहिष्णु नसतात!
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/22/2016 - 10:30
नवीन
चेष्टा करतोय हो गुरूजी! आपण पर्सनल घेऊ नका ही विनंती करतो! उणे अधिक झाल्यास माफ़ी मागतो
(स्वगत :- आयला आता प्रत्येकाला कृहघ्या समजवाव लागणार असे दिसते बाप्या)
च
चिनार
Fri, 01/22/2016 - 11:29
नवीन
बापू…
कृपया हलके घ्या ऐवजी 'कृपया सहिष्णू घ्या' असा वाकप्रचार मिपावर रुजू करण्याची विनंती मी संपादक मंडळाला करतो.
तुमचं अनुमोदन गृहीत धरलंय
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/22/2016 - 11:36
नवीन
धरा न मंग! तुम्हाले कोण मना करन!!
ई
ईश्वरसर्वसाक्षी
Fri, 01/22/2016 - 11:38
नवीन
अश्लिल अश्लिल
च
चिनार
Fri, 01/22/2016 - 11:41
नवीन
नाय पन तुमाले सांगा तं लागन ना…
श
श्रीगुरुजी
Fri, 01/22/2016 - 16:31
नवीन
अनुमोदन
च
चिनार
Fri, 01/22/2016 - 19:03
नवीन
चीमायबीन...बापु अन गुर्जीच यकाच मुद्द्याले अनुमोदन...याले म्हंतेत सहिष्नुता गड्या..
म
मोदक
Wed, 01/20/2016 - 09:19
नवीन
न
नमकिन
Mon, 01/25/2016 - 04:49
नवीन
उत्कृष्ट नमूना.
दोन्ही बाजूस शुभेच्छा १००० साठी, प्रणव चा विक्रम (क्रिकेट) मोडा.
बाकी तेल स्वस्त झालेय तर जाऊदे गाड़ी भरधाव (अबकारी, मुल्यवर्धित कर वाढवणारे आपणंच निवडलेत)
एकंदरीत सहामाही आढावा घेतो.
क
कपिलमुनी
गुरुवार, 01/28/2016 - 19:05
नवीन
ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. सध्या फक्त केविलवाणी धडपड चालली आहे.
अति केला आणि हसू झाला .
यापुढे पुरावा असेस तर उपप्रतिसाद द्यावा
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 19:08
नवीन
गुरुजी मिपावरचे केजरीवाल आहेत. त्येच जज, तेच जल्लाद, ते म्हणतात तेच पुरावे.
जाऊद्या, लक्ष देऊ नका फार. त्यांची ही नेहमीची नाटकं आहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
श
श्रीगुरुजी
Fri, 01/29/2016 - 07:52
नवीन
मी तुमच्याविषयी एकही वावगा शब्द उच्चारलेला नसताना तुम्ही मला पुन्हा एकदा घाणेरडी शिवी दिलीत.
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 07:59
नवीन
केजरीवाल ही शिवी आहे काय? मला वाटलं सत्य बोलण्याची पराकाष्ठा करणार्या व्यक्तिला केजरीवाल म्हणत असावेत.
श
श्रीगुरुजी
Fri, 01/29/2016 - 08:12
नवीन
केजरीवाल ही एक घाणेरडी शिवी आहे.
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 09:01
नवीन
केजरीवाल ही एक घाणेरडी शिवी आहे.
सनी लियोनच्या उल्लेखाबद्दल आगपाखड करणार्यांनो, आता आपले काय मत आहे?
श
श्रीगुरुजी
Fri, 01/29/2016 - 07:51
नवीन
केजरीवालांवर शाई फेकणारी महिला आआपचीच होती हे अगदी पहिल्या दिवसापासून सर्वत्र उघड झाले आहे. ती आआपची नाही असे दाखविण्याची तुमचीच केविलवाणी धडपड सुरू आहे.
- «
- ‹
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- ›
- »