केजरूके गुलाम
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.
सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.
या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.
पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?
मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.
असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.
केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.
नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.
प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.
हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.
अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.
या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).
या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
💬 प्रतिसाद
(893)
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 09:32
नवीन
अजित पवारांना दिलासा, सिंचन घोटाळ्यात प्रत्यक्ष चौकशीला येण्याची गरज नाही, फडणवीस सरकारचा सॉफ्ट कॉर्नर?
श
श्रीगुरुजी
Fri, 06/12/2015 - 11:00
नवीन
अजित पवारही निश्चितच अडकणार आहेत. प्रत्यक्ष चौकशीला आले किंवा पत्राने उत्तरे दिली तरी फरक पडत नाही. राष्ट्रवादीशी साटंलोटं म्हणताना भुजबळांचे नाव २ घोटाळ्यात आरोपी म्हणून नक्की झाले आहे. हळुहळू राष्ट्रवादीचे इतर नेतेही अडकणार हे निश्चित.
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 11:29
नवीन
अजित पवारांनाच भुजबळ नको आहेत :)
श
श्रीगुरुजी
Fri, 06/12/2015 - 11:35
नवीन
त्याने काय फरक पडतो?
तसं पाहिलं तर थोरल्या चुलत्यांनाही अजित पवार नकोसे आहेत!
ह
होबासराव
Fri, 06/12/2015 - 11:43
नवीन
थोडी दुरुस्ती, अनंतराव पवार शरद पवारांचे थोरले बंधु.
श
श्रीगुरुजी
Fri, 06/12/2015 - 16:37
नवीन
थोरले म्हणजे वरीष्ठ या अर्थाने मला सांगायचे होते.
ह
होबासराव
Fri, 06/12/2015 - 09:43
नवीन
अजित पवारांचि चौकशी होइल आणि त्यांना तुरुंगवास होइल हि अपेक्षाच भाबडि होति, सेम फॉर शिला दिक्षित. एवढे सोपे नसते हे मान्य, भाजपा एम्.सि.ए. च्या निवडणुकित सुद्धा राष्ट्रवादि बरोबर आहे. ह्या तडजोडि भाजपा ने करायला नको होत्या. दिलेला शब्द फिरवण्या सारखे आहे हे.
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 10:10
नवीन
सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे
राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या उभारणीतील गैरव्यवहारांचे बैलगाडी भरून पुरावे भाजप सोमवारी (२१ ऑक्टोबर) माधवराव चितळे समितीसमोर सादर करणार आहे. त्यासाठी कांचनवाडीपासून 'वाल्मी'पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. 'या गैरव्यवहारांशी संबंधित आम्ही सादर करीत असलेले पुरावे पुरेसे आहेत. मात्र, आणखी पुरावे देण्यासाठी समितीकडे पंधरा दिवसांचा वेळ मागण्यात येणार आहे,' असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 'मटा'शी सांगितले.
स
स्पार्टाकस
Fri, 06/12/2015 - 19:51
नवीन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस?
फडणवीस मुख्यमंत्री आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत.
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 20:24
नवीन
दुवा वाचावा ही विनंती
श
श्रीगुरुजी
Fri, 06/12/2015 - 11:07
नवीन
देशपातळीवरील किंवा राज्यपातळीवरील पक्षीय समीकरणे जशीच्या तशी नगरपालिका, एम सी ए इ. ठिकाणी कायम राहतीलच असे नसते. एम सी ए पातळीवर शरद पवार + मनोहर जोशी, शरद पवार + विलासराव देशमुख इ. समीकरणे भूतकाळात जमलेली होती. नगरपालिका पातळीवर राकाँ + शिवसेना + भाजप, मनसे + भाजप, मनसे + राष्ट्रवादी, मनसे + काँग्रेस इ. समीकरणे अस्तित्वात आहेत.
त्यामुळे भाजप एम सी ए च्या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आहे यातून जास्त काही अर्थ निघत नाही.
श
श्रीगुरुजी
Fri, 06/12/2015 - 16:42
नवीन
भाजप हळुहळू राष्ट्रवादीला खच्ची करीत आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे, परंतु काही महिन्यांपूर्वीच राज्य शासनाने पुणे शहर विकास आराखडा स्वतःच्या ताब्यात घेऊन वेगळे PMRDA स्थापन केले आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपने राष्ट्रवादीला भगदाड पाडले आहे. या दोन्ही महानगरपालिका अजित पवारांच्या वर्चस्वाखाली आहेत.
ह
होबासराव
Fri, 06/12/2015 - 10:26
नवीन
हे काय आहे ?
क
कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 10:33
नवीन
वाल्मी (वॉटर अॅण्ड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट)
स
सतिश गावडे
Fri, 06/12/2015 - 16:50
नवीन
या धाग्याने आणि त्यावरील प्रतिसादांनी सामान्य माणसाच्या राजकीय ज्ञानात नक्कीच वाढ होईल. :)
श
श्रीगुरुजी
Tue, 06/23/2015 - 11:27
नवीन
केजरीवाल म्हणतात माझीच **
https://youtu.be/F3aup2aqwJU
मोदीन्च्या राज्यात अच्छे दिन आले का नाही याविषयी मतमतान्तरे असू शकतील. परन्तु केजरीवालान्च्या राज्यात समस्त पतीदेवान्ना अत्यन्त अच्छे दिन आले आहेत हे नक्की, कारण केजरीवालान्च्या राज्यात गृहिणीच सर्व कामे करतात आणि पतीदेव मस्तपैकी सोफ्यावर आरामात रेलून वर्तमानपत्र वाचत किन्वा टीव्ही बघत निवान्त असतात. बसल्या जागीच त्यान्च्यासमोर भरलेले ताट येते. त्यान्ना काही काम करायची गरजच नाही.
स
सुधीर काळे
Wed, 06/24/2015 - 01:15
नवीन
क्लिंटन, खूप दिवसांनी मिपावर आलो आणि तुझे नांव पाहून तुझा लेख वाचला! वा, वा, वा! तू सुरेख लेख तर लिहिला आहेसच व त्याहून सुरेख तू आपल्या विधानांचा बचाव केला आहेस!
मी खरे तर ’केजरू’च्या अंदाजपत्रकाची वाट पहात आहे. "पैशाचे सोंग आणता न ये" हे पुन्हा एकदा मला पहायचे आहे!
श
श्रीगुरुजी
Wed, 06/24/2015 - 10:01
नवीन
दिल्लीचे अन्दाजपत्रक ही फारच किरकोळ व बिनमहत्त्वाची गोष्ट आहे. केजरीवाल मुख्यमन्त्री होऊन जेमतेम साडेचार महिने झालेत. इतक्या दिवसात ते इतर अत्यन्त महत्त्वाच्या कामात गर्क होते.
पक्षान्तर्गत विरोधकान्ना बाऊन्सर्सकरवी धोपटून काढून पक्षातून हाकलणे, गजेन्द्र सारख्या शेतकर्यान्ना दिल्लीला बोलावून आत्महत्या करायला लावून त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करणे, केन्द्र सरकार/राजनाथ सिन्ह/मोदी/उपराज्यपाल यान्च्याशी कुस्ती खेळणे, स्वपक्षातील गुन्हेगारान्चा बचाव करणे, सचिवान्च्या कार्यालयाला कुलुप लावणे, नावडते सचिव महाभ्रष्टाचारी आहेत असे जाहीर खोटे आरोप करणे, सचिवान्च्या बदल्या करणे, दूरदर्शनवर स्वतःच्या मोठमोठ्या जाहिराती करणे, दिल्लीत मोदी आणिबाणी आणणार आहेत असा कान्गावा करणे . . . या व अशा अनेक महत्त्वाच्या कामात ते गर्क आहेत.
त्यामुळे दिल्लीचे अन्दाजपत्रक मान्डणे, सफाई कामगारान्चा अनेक महिने थकलेला पगार देणे, दिल्लीतील वीज व पाणी टन्चाईवर उपाय काढणे अशा किरकोळ प्रश्नान्कडे लक्ष देण्यास ते आपला अमूल्य वेळ खर्च करू इच्छित नाहीत.
स
सुधीर काळे
Wed, 06/24/2015 - 01:24
नवीन
क्लिंटन, एक मुद्दा राहून गेलाय् तुझ्या लेखात! दिल्ली विधानसभेच्या दुसर्या निवडणुकीत भाजपाला पहिल्या निवडणुकीत मिळाली होती जवळ-जवळ तितकीच मते मिळाली. ’आआप’ला कॉन्ग्रेसची मते मिळाली म्हणून त्याचे ६७ उमेदवार निवडून आले व कॉन्ग्रेसची सफाई झाली! भाजपाच्या लोकप्रियतेत कांहींच फरक पडला नव्हता!
श
श्रीगुरुजी
Wed, 06/24/2015 - 10:04
नवीन
हे बरोबर आहे. फरक इतकाच आहे की आआपला कॉन्ग्रेसची मते मिळाली नसून भाजपला अपशकुन करण्यासाठी कॉन्ग्रेसने आपली स्वतःची मते आआपकडे वळविली होती. या निवडणुकीत भाजपच्या मतात फक्त १.५ % इतकी घट होऊन ३२% मते मिळाली, पण कॉन्ग्रेसच्या मतात तब्बल १५ % घट होऊन कॉन्ग्रेसला जेमतेम ९% मते मिळाली होती.
क
कपिलमुनी
Wed, 06/24/2015 - 11:05
नवीन
मान गये !
मोदी निवडून यावे म्हणून पण काँग्रेसने मत भाजपाकडे वळवली का ?
आणि अशी सगळी मते वळवता येतात ?
काँग्रेस आणि भाजपा यापेक्षा दिल्ली मतदारांना आप आपलासा वाटला आणि त्यामुळे पराभव झाला .
हे स्पष्ट मान्य करा की ! गिरे तो टांग उप्पर किती दिवस
प
पुण्याचे वटवाघूळ
Wed, 06/24/2015 - 12:52
नवीन
त्याचप्रमाणे देशातील मतदारांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना कौल दिला हे तुम्ही पण मान्य करायला हवे. जर का मोदींच्या 'फेकुपणामुळे' लोकसभेत इतके यश मिळाले असे तुम्ही म्हणत असाल तर केजरीवालने सगळे काही फुकट द्यायचे आश्वासन दिले हा फेकुपणा केला असे इतर लोक म्ह्नणारच.
क
कपिलमुनी
Wed, 06/24/2015 - 12:58
नवीन
जनतेने मोदींना कौल नक्कीच दिला आहे !
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/25/2015 - 08:47
नवीन
ह्या लेखात काँग्रेसने भाजपचा पराभव करण्यासाठी आपली दिल्लीतील मते आआपकडे कशी वळविली याविषयी सविस्तर विवेचन आहे. ते पुन्हा लिहित नाही.
क
कपिलमुनी
गुरुवार, 06/25/2015 - 09:09
नवीन
त्या लेखात काँग्रेसने मते कशी वळवली याचे विवेचन असलेले उतार पुन्हा टंकावे किंवा डकवावे ही नम्र विनंती
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/25/2015 - 17:14
नवीन
तो धागा बराच जुना व खूप मोठा आहे (४००+ प्रतिसाद). परत सगळा धागा वाचण्याचे आणि प्रतिसाद शोधण्याचे त्राण नाहीत.
एकाच गोष्टीवर विचार करा. भाजपच्या मतांमध्ये अगदी किरकोळ घट झाली. काँग्रेसची मते २४% वरून ९% आली. आआपकडे मुख्यत्वेकरून कोणत्या पक्षाची मते फिरली ते उघड आहे. अनेक मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराऐवजी उघडउघड आआपच्या उमेदवाराचा प्रचार करीत होते. याचा अर्थ उघड आहे.
अ
अनुप ढेरे
Wed, 06/24/2015 - 10:53
नवीन
सचिवांच्या मुद्द्यांवरून ना.रा आणि पर्यायाने केंद्र सरकार अत्यंत कोतं राजकारण खेळत आहे. राज्य सरकारने केलेल्या नियुक्त्या ना.रा.ने रद्द करण हे मुद्दाम पायात पाय घालणं आहे. आणि हे लोकांना समजत असेलच. भाजपाला या असल्या राजकारणाचा फटका नक्की बसेल. बसायला हवाच.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/25/2015 - 08:55
नवीन
दिल्ली हे खर्या अर्थाने राज्य नाही. तो केंद्रशासित प्रदेश आहे. तिथली विधानसभा आणि महानगरपालिका यात फार फरक नाही. दिल्लीत काही विभाग विधानसभेच्या अखत्यारीत येतात व बरेचसे विभाग नायब राज्यपालांच्या अखत्यारीत येतात.
२१ मे रोजी केंद्रीय गृहखात्याने एक अधिसूचना काढून दिल्ली विधानसभेचे अधिकार कोणते व नायब राज्यपालांचे कोणते याविषयी पुरेश्या स्पष्ट शब्दात लिहिले आहे. आपण निवडून आल्याने दिल्लीतील सर्व निर्णय आपल्या मर्जीनेच व्हायला हवेत असा केजरीवालांचा हट्ट आहे. घटनेतील तरतुदीनुसार त्यांना ज्या विभागात ढवळाढवळ करण्चाचा अधिकार नाही त्या विभागात सुद्धा सचिवांच्या बदल्या करून त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन केले. त्या विभागांवर नायब राज्यपालांचा अधिकार असल्याने व त्यांच्या संमतीशिवाय सचिवांच्या बदल्या झाल्याने नायब राज्यपालांनी त्या बदल्या रद्द केल्या. नायब राज्यपालांची कृती घटनेला अनुसरूनच आहे.
या अधिसूचनेविरूद्ध केजरीवाल न्यायालयात गेले होते. परंतु न्यायालयाने अधिसूचना बेकायदेशीर किंवा चुकीची आहे असे म्हटले नसून अधिसूचनेला स्थगिती द्यायला नकार दिला आहे.
आपण दिलेली अवास्तव आश्वासने पूर्ण करणे अशक्य आहे हे केजरीवालांच्या लक्षात आल्याने ते विनाकारण इतरांच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करून आणि विनाकारण केंद्रसरकारशी भांडण उकरून 'मला काम करू दिले जात नाही' असा कांगावा करीत आहेत.
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 06/25/2015 - 10:21
नवीन
कागदोपत्री ना.रा. बरोबर असतीलच. पण त्यांना ही ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार नाही अस मला वाटतं. ( आणि माझ्या आजूबाजूला अनेकांना)
स्वच्छ आणि काम करतील असं वाटणारे लोक नियुक्त करू द्यायचे नाहीत वर आरडा ओरडा करायचा की बघा काही झालं नाही हा दुटप्पीपणा आहे.
प
पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 06/25/2015 - 10:29
नवीन
संस्कृतमध्ये एक म्हण आहे--शठं प्रति शाठ्यं. म्हणजे ठकाशी ठकाप्रमाणेच वागावे.
का हो अनुपराव-- यांना राजस्थानातल्या शेतकर्याला बोलावून आत्महत्या करायचा फार्स करायचा आणि भर सभेत-- लटका क्या असे अॅक्टिंग करत विचारायचा नैतिक अधिकार होता का? हाच प्रश्न आम आदमी पक्षाच्या इतर अनेक चाळ्यांविषयी विचारता येईल. तेव्हा कुठे गेला होती तुमची नैतिकता? आता कन्व्हिनिअन्टली नैतिकता आठवत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 06/25/2015 - 11:11
नवीन
एका विषयावर चर्चा चालू असताना याच्याशी संबंध नसलेल्या मुद्दाला हात घालण्याचं प्रयोजन समजल नाही.
असो, मागे सुहास यांनी मनसेची 'बाजू' मांडणारा धागा काढला होता त्यात त्यांच्या प्रतिसादांनी मनसेचं नुकसानच झालं असावं. पुण्याचे वटवाघूळ आणि गुरुजींच्या प्रतिसादांचा तसाच परिणाम होउ नये ही इच्छा.
(मोदी समर्थक)
अनुप
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/25/2015 - 17:31
नवीन
>>> असो, मागे सुहास यांनी मनसेची 'बाजू' मांडणारा धागा काढला होता त्यात त्यांच्या प्रतिसादांनी मनसेचं नुकसानच झालं असावं. पुण्याचे वटवाघूळ आणि गुरुजींच्या प्रतिसादांचा तसाच परिणाम होउ नये ही इच्छा.
हे वाचून जरा हसायला आलं. सुहासच्या धाग्याने मनसेचं नुकसान झालं असावं असं वाटत असेल तर सुहासने धागा काढला नसता तर मनसेला फायदा झाला असता का? मिपावरील धाग्यांनी किंवा प्रतिसादांनी कोणत्याही पक्षाला शष्प फरक पडत नाही. मग तो धागा मी काढलेला असो वा सुहासने वा अजून कोणी.
स
सव्यसाची
गुरुवार, 06/25/2015 - 11:13
नवीन
मुळातच दिल्लीच्या कारभाराबद्दल नैतीकतेपेक्षा सगळ्यात जास्त काय चालत असेल तर कायदा. हे आजचे आहे असे पण म्हणायला नको. भाजप आणि कॉंग्रेस च्या मागच्या मुख्यमंत्र्यांना पण हेच करावे लागले आहे.
वरती गुरुजी म्हणाले तसे, दिल्ली ची विधानसभा म्हणजे महापालिकेपेक्षा जास्त अधिकार असलेली पण राज्यसरकारचा दर्जा नसलेली आहे. अशीच दुसरी विधानसभा म्हणजे पुदुच्चेरी. पण त्यावरती कधी तुम्ही बातम्या ऐकल्या नाहीत? कि फक्त दिल्लीच्याच बातम्या येतात?
इथे संविधानानुसार ना. राज्यपाल हे administrator आहेत आणि आत्ताचे नोटिफिकेशन थोडेसे बाजूला ठेवले तरी चीफ सेक्रेटरी आणि काही अजून सेक्रेटरी नियुक्त करण्याचे अधिकार त्यांच्याकडेच आहेत. त्यांच्या सहीशिवाय सगळ्या गोष्टी null & void आहेत.
मग आपण संविधान मानायचे कि नैतिकता? आणि नैतीकताच मानायची असेल तर कुणाची नैतिकता? आपची कि नायब राज्यपालांची?
बाकी प्रशांत भूषण यांनी सुद्धा कायदा दिल्ली सरकारच्या बाजूने नाही तेव्हा अश्या पद्धतीने आपने लढाई खेळू नये असे त्यांना वाटत होते.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/25/2015 - 17:28
नवीन
>>> कागदोपत्री ना.रा. बरोबर असतीलच. पण त्यांना ही ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार नाही अस मला वाटतं. ( आणि माझ्या आजूबाजूला अनेकांना)
स्वच्छ आणि काम करतील असं वाटणारे लोक नियुक्त करू द्यायचे नाहीत वर आरडा ओरडा करायचा की बघा काही झालं नाही हा दुटप्पीपणा आहे.
प्रशासन हे कोणाला काय नैतिक/अनैतिक वाटते किंवा कोणाचा अधिकार नैतिक/अनैतिक यावर चालत नसते. नैतिक/अनैतिकतेची कोणतीच सर्वमान्य व्याख्या नाही. प्रशासन नियम व कायद्यांनुसार चालते. आज केजरीवाल त्यांना कायदेशीर अधिकार नसलेल्या विभागात ढवळाढवळ करीत आहेत. उद्या ते राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश इ. च्या नेमणुका मी करणार असे सांगायला लागतील.
आणि केजरीवालांना जे लोक स्वच्छ आणि काम करणारे वाटतील, ते प्रत्यक्षात स्वच्छ आणि काम करणारे आहेत हे कशावरून? जितेंद्रसिंह तोमरची भानगड जानेवारी २०१५ मध्येच बाहेर आली होती. तरीसुद्धा केजरीवालांनी त्याला तिकीट देऊन नंतर मंत्रीपदाचे बक्षिस दिले. जितेंद्रसिंहच्या पदव्या पूर्णपणे खर्या आहेत अशी माझी खात्री झाली आहे असे प्रमाणपत्र केजरीवालांनी जाहीररित्या दिले होते. आता जितेंद्रसिंहला १६ दिवस तुरूंगात राहून सुद्धा न्यायालय जामीन द्यायला तयार नाही. तात्पर्य, केजरीवालांना जे स्वच्छ आणि काम करणारे वाटतात ते प्रत्यक्षात तसे असतीलच असे नाही.
श
श्रीगुरुजी
Tue, 06/30/2015 - 09:46
नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-cm-arvind-kejriwals-electricity-expense-rs-91000-in-2-months-1118464/
बापरे! वीजबिलात ५०% सवलत दिल्यानंतर सुद्धा फक्त २ महिन्यात ५ व्यक्तींच्या कुटुंबाने एवढी प्रचंड वीज वापरली!
जुन्या दराने आकारणी केली असती तर फक्त १ महिन्याचं बिल एवढं आलं असतं.
ते मुख्यमंत्री असल्याने हे बिल सरकारच्या म्हणजे पर्यायाने लोकांच्या कराच्या पैशातूनच भरले जाणार ना?
आम आदमीने आम आदमी चालवित असलेल्या आम आदमींच्या सरकारसाठी इतका किरकोळ भुर्दंड सोसलाच पाहिजे.
न
नांदेडीअन
Tue, 06/30/2015 - 10:55
नवीन
ते बिल फक्त त्यांच्या घरासाठीचे नाहीये.
त्यांचे घर, त्यांचे ऑफिस आणि २०० लोकांसाठी असलेल्या जनता दरबार हॉलचे मिळून आहे ते बिल.
या बिलातला सगळ्यात जास्त वाटा याच हॉलचा आहे, कारण जनतेच्या सुविधेसाठी इथे अनेक एसी लावून ठेवलेले आहेत.
दररोज शेकडो लोक येतात इथे.
जाऊ द्या, हा खालचा फोटो बघा.
यावर काही एक्स्पर्ट ओपिनिअन ?
आणि हो, ‘फोटो फोटोशॉप केलेला आहे.’ असे कृपया म्हणू नका.
इथला तुमचा आणि माझा एक-एक पोस्ट कमी होईल आणि बॅन्डविड्थ वाचेल थोडीफार.

श
श्रीगुरुजी
Tue, 06/30/2015 - 11:04
नवीन
म्हणजे मग केजरीवाल ह्यांच्यासारखेच झाले की. काँग्रॅट्स! आम्ही त्यांना विनाकारणच वेगळे समजत होतो आणि तेही आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशा पोकळ बढाया मारत होते.
>>> कारण जनतेच्या सुविधेसाठी इथे अनेक एसी लावून ठेवलेले आहेत.
एसी? मघाशी तर आआपचा प्रवक्ता एका वाहिनीवर सांगत होता की तिथे पंखे आणि कूलर लावलेत. मग हे एसी कोठून आले?
न
नांदेडीअन
Tue, 06/30/2015 - 11:22
नवीन
तुम्हाला नेमका आनंद कशाचा होतोय ?
केजरीवालसुद्धा कॉंग्रेस-भाजपसारखे झाले याचा, की भाजप-कॉंग्रेस अगोदरपासूनच तसे होते याचा ?
परत एकदा वाचा.
हे लाईट बिल फक्त त्यांच्या घराचे नाहीये.
त्यांचे घर, ऑफिस आणि जनता दरबार हॉलचे मिळून आहे.
माझ्या माहितीप्रमाणे तिथे AC लावलेल्या आहेत.
कोणत्या न्युज चॅनलवर कोणता प्रवक्ता म्हणाला तिथे AC नाहीयेत ?
मला माझी माहिती दुरूस्त करून घ्यायची इच्छा आहे.
श
श्रीगुरुजी
Tue, 06/30/2015 - 11:59
नवीन
मला आनंद होत नसून याचं दु:ख होतंय की केजरीवाल देखील यांच्यापेक्षा वेगळे नाहीत.
आआपच्या प्रवक्त्यानुसार एका महिन्याच्या ४५००० रू. बिलापैकी १५००० रू. बिल घराचे व उर्वरीत ऑफिसचे आहे. वीजेचा दर प्रति युनिट ५ रू. धरला तर एका महिन्यात केजरीवालांच्या घरात ३००० युनिट इतकी वीज जाळली गेली असं दिसतंय. माझ्या ५ खोल्यांच्या घराला एका महिन्यात अंदाजे ८०-९० युनिट इतकी वीज लागते. केजरीवाल माझ्या ३० पट वीज जाळतात असं दिसतंय.
२-३ वेगवेगळ्या वाहिन्यांवर (बहुतेक आयबीएन, इंडिया न्यूज, न्यूज नेशन इ.) आआपचे दावे दाखवित होते.
श
श्रीगुरुजी
Tue, 06/30/2015 - 09:53
नवीन
http://indianexpress.com/article/cities/delhi/m-k-meena-to-remain-acb-chief-hc-refuses-order-on-delhi-govts-plea/
केजरीवालांची पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने निराशा केली. केंद्राच्या नेमणुकांना न्यायालयात आव्हान देण्यातच केजरीवाल आपली ५ वर्षे घालविणार असं दिसतंय.
न
नांदेडीअन
Tue, 06/30/2015 - 11:12
नवीन
ही बातमी वाचा.
Delhi ACB paralysed, no cases registered in almost a month
http://www.hindustantimes.com/newdelhi/delhi-acb-paralysed-no-cases-registered-in-almost-a-month/article1-1363292.aspx
एम.के.मीना यांना तिथे का आणून बसवले आहे हे सगळ्यांना माहित आहे.
श
श्रीगुरुजी
Tue, 06/30/2015 - 11:53
नवीन
१) मीणा या अधिकार्याला तिथे ८ जूनला आणण्यात आले आहे. तेव्हापासून आतापर्यंत फक्त ३ आठवडे होतात, १ महिना नव्हे.
२) मीणांची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच आआप सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून, त्यांना एसीबी चे प्रमुख म्हणून काम करण्यास व त्यांना कोणतेही नवीन एफआयआर दाखल करण्यास बंदी घालावी अशी याचिका दाखल केली होती. जेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्री एखाद्या अधिकार्याने काम करण्याच्या विरोधात व त्याने कोणताही नवीन एफआयआर दाखल करू नये अशी मागणी घेऊन न्यायालयात जातो, तेव्हा निकाल लागेपर्यंत संपूर्ण अनिश्चितता असते व निकाल लागेपर्यंत सरकार अजिबात सहकार्य करीत नसल्याने सर्व कामे ठप्प होणारच.
३) नायब राज्यपालांच्या संमतीविना आआप सरकारने बिहारच्या ५ अधिकार्यांची एसीबीत भरती केली आहे. त्यांच्या नियुक्तीला राज्यपालांची परवानगी नसल्याने एसीबी प्रमुख त्यांना कोणतेही काम देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते सर्व अधिकारी रिकामे बसून आहेत.
४) मीणांनी नवीन एफआयआर दाखल करण्यास संमती दिलेली नाही असे एखादे उदाहरण आहे का असे न्यायाधीशांनी विचारल्यावर सरकारी वकील इंदिरा जयसिंग यांना असे उदाहरण देता आलेले नाही. याचा अर्थ उघड आहे.
The face-off between the Centre and Delhi chief minister Arvind Kejriwal has paralysed the city-state’s anti-corruption arm, casting shadows over a key promise that the AAP leader had made to his voters. Kejriwal, who stormed to power in February this year, had promised to deliver a corruption-free government in Delhi.
एसीबीचे काम ठप्प होण्यास संपूर्णपणे केजरीवालच जबाबदार आहेत. केंद्राने व राज्यपालांनी त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारात केलेल्या प्रत्येक नेमणुकीला विरोध करून न्यायालयात आव्हान देऊन कामात अडथळे आणत आहेत.
बरं. खालील बातमीबद्दल आपले काय मत आहे?
http://www.indiatvnews.com/politics/national/kejriwal-exposed-rti-reveals-only-7-officers-arrested-by-acb-30080.html
न
नांदेडीअन
Tue, 06/30/2015 - 12:32
नवीन
Delhi's ACB reveals details of 35 arrested officials
http://www.abplive.in/india/2015/06/13/article617763.ece/Delhis-ACB-reveals-details-of-35-arrested-officials
च
चिनार
Tue, 06/30/2015 - 12:40
नवीन
या दोघांनाही अश्या परस्परविरोधी बातम्या इतक्या लगेच कश्या सापडतात देव जाणे!
एकाचा आय पी याड्रेस भाजप मुख्यालयाचा आणि दुसऱ्याचा आप मुख्यालयाचा असल्याशिवाय हे शक्य नाही..
क
कपिलमुनी
Tue, 06/30/2015 - 12:57
नवीन
मुख्य प्रोब्लेम असा आहे की दोघेही
बातम्यामध्ये लिहिलेले असते ते खरे असते असा समजून काकू करतात
च
चिनार
Tue, 06/30/2015 - 13:03
नवीन
लय वेळा सह्मत !
न
नांदेडीअन
Tue, 06/30/2015 - 13:42
नवीन
बाब्बौ...
आता मात्र कहर झाला राव. :P
आत्ता नेमके आठवत नाही, पण मागे कोणत्या तरी एका धाग्यावर तुम्ही ‘आप’ला किंवा केजरीवालला शिव्या घालत होतात.
ते कोणत्या माहितीच्या आधारे ?
च
चिनार
Tue, 06/30/2015 - 14:24
नवीन
आजही घालतो शिव्या !!
पण तुम्हा दोघांची जुगलबंदी आता तार्किक नाही तर विनोदी व्हायला लागली आहे.
श्री मोदी आणि श्री केजरीवाल यांच्या पदाविषयी आणि आजपर्यंतच्या पूर्ण आदर राखून तुमच्यातली जुगलबंदी नक्की कशी आहे ते खालील उदाहरणात सांगतो.
भाजपवाले (श्रीगुरुजी) -- केजरीवाल आज १० वेळा शौचास गेले. हा वेळेचा आणि पाण्याचा अपव्यय आहे. खालील लिंक बघा.
आप वाले (नान्देडीयन)-- माहितीच्या अधिकाराने प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंतप्रधान वाट्टेल तेंव्हा शौचास जातात. हेच का अछ्छे दिन ? ही बातमी वाचा..
अश्या चिखल फेकीची सुरवात कोण आधी करते ते महत्वाचे नाही. ती कोणीही करते.
श
श्रीगुरुजी
Tue, 06/30/2015 - 14:56
नवीन
अत्यंत चुकीचे उदाहरण आहे.
जुगलबंदी विनोदी असेल तर त्याचा हसून आनंद घ्या. वाटेल ती उदाहरणे देऊ नका.
न
नांदेडीअन
Tue, 06/30/2015 - 15:02
नवीन
अच्छा, तुम्ही कुठल्यातरी माहितीच्या आधारे इतरांवर टिका करता ते अभ्यासपूर्ण लिखाण, आणि मी जे विषयाला अनुसरून कमेंट करतो, ते अतार्किक आणि विनोदी ?
व्वा, हे छान आहे !
^^
ह्या अशा प्रकारची टिका मी कोणत्या धाग्यावर केली होती हे खर्या उदाहरणासकट सांगितले तर खूप उपकार होतील आपले.
- «
- ‹
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- ›
- »