Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरूके गुलाम

क
क्लिंटन
Tue, 03/31/2015 - 18:20
🗣 893 प्रतिसाद
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया द्या
206836 वाचन

💬 प्रतिसाद (893)
च
चिनार Wed, 07/01/2015 - 05:31 नवीन
अपेक्षेप्रमाणेच माझ्या प्रतिसादाचा अर्थ तुम्हा दोघांनाही कळला नाही. असो. चालुद्या.. रच्याकने..ज्या मिडीयाच्या बातम्या वाचायला आणि इथे पोस्ट करण्याला तुम्ही अभ्यासपूर्ण लिखाण वगैरे म्हणता त्या मिडीया वर मागे मी एक लेख लिहिला होता http://www.misalpav.com/node/30423 स्वत: च्या धाग्याची जाहिरात करण्याची ही मोदींची मार्केटिंग पद्धत मी आत्मसात केली आहे किंवा उठसूट कोणावरही टीका करण्याची ही केजरीवाल पद्धत मी वापरतो आहे असे कुठलेही अर्थ तुम्ही दोघेही काढू शकता..
↩ प्रतिसाद: चिनार
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 07/01/2015 - 09:59 नवीन
अपेक्षेप्रमाणेच माझ्या प्रतिसादाचा अर्थ तुम्हा दोघांनाही कळला नाही. असो. चालुद्या..
अहो तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने का होईना नांदेडियन आणि श्रीगुरूजींचे एकमत झाले हे काय कमी आहे?
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Wed, 07/01/2015 - 10:47 नवीन
ह ह पु वा !!
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
न
नाखु Fri, 07/03/2015 - 10:50 नवीन
झाले आहे असे वाटणे म्हणजे हा "हिंदुत्वाचा" अपमान आहे - कशाचे ही शेपूट हिंदुत्वास जोडणारा सामना खरेच झाले तर बघा आम्ही सांगत होतो भाज्पा आणि आप मिळालेले आहेत (आतून) -लोक्मत(कांन्ग्रेसी प्येपर) प्रचंड धागा टीआर्पी साठी हे साटेलोटे - पटा पटा मटा संघात खळबळ तर आपची खळखळ : धुगधुगी तरूण भारत
↩ प्रतिसाद: चिनार
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 13:51 नवीन
>>> एकाचा आय पी याड्रेस भाजप मुख्यालयाचा आणि दुसऱ्याचा आप मुख्यालयाचा असल्याशिवाय हे शक्य नाही.. हा! हा!! हा!!! हहपुवा. बादवे, यालाच 'शोध पत्रकारिता' म्हणतात का?
↩ प्रतिसाद: चिनार
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 13:50 नवीन
याचा अर्थ RTI अर्जातून खोटी माहिती दिली जात आहे. तोमरने सुद्धा आपल्या शिक्षणाविषयी कोणालातरी RTI अर्ज करायला लावून त्यात आपल्या पदव्या खर्‍या असल्याची माहिती RTI च्या प्रतिसादातून आल्याचे दाखविले होते.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Tue, 06/30/2015 - 13:59 नवीन
ऍंटी करप्शन हेल्पलाईन लॉंच झाल्याच्या ३५ दिवसांच्या आत ही माहिती मागवली होती. (भाजपने किंवा कॉंग्रेसने) त्यावेळी सात जणांनाच अटक झालेली होती. पण मग फक्त ३५ दिवसांवर कशी टिका करायची म्हणून भक्तांना आत्ता रसद पुरवली एव्हढेच. भक्तसुद्धा इतके प्रामाणिक आहेत की एका शब्दाने त्यांनी ‘RTI ची कॉपी कुठे आहे ?’ असा प्रश्न विचारला नाही त्यांच्या पक्षाला/मालकाला.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 14:45 नवीन
>>> ऍंटी करप्शन हेल्पलाईन लॉंच झाल्याच्या ३५ दिवसांच्या आत ही माहिती मागवली होती. (भाजपने किंवा कॉंग्रेसने) त्यावेळी सात जणांनाच अटक झालेली होती. ही माहिती भाजप किंवा काँग्रेसने मागितली नव्हती. विवेक गर्ग नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने ही माहिती मागविली होती.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Tue, 06/30/2015 - 15:05 नवीन
ही माहिती भाजप किंवा काँग्रेसने मागितली नव्हती. विवेक गर्ग नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने ही माहिती मागविली होती.
https://www.facebook.com/vivekgargadvrti & http://www.iamin.in/en/chandni-chowk/news/i-don%E2%80%99t-want-do-rajneeti-i-want-do-rashtriyaniti-bjps-candidate-vivek-garg-50746 & http://www.thehindu.com/elections/delhi2015/manoj-tiwari-seeks-votes-for-rti-activist-vivek-garg/article6841186.ece भाजपाच्या या विवेक गर्ग व्यतिरिक्त अजून कोणते विवेक गर्ग असतील, तर कृपया माझ्या माहितीत भर घाला.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 17:07 नवीन
विवेक गर्ग २००१ पासून माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. भाजपशी त्यांचा संबंध २००८ मध्ये आला. माहिती अधिकार कार्यकर्ते या नात्याने त्यांनी आजपर्यंत २-जी घोटाळा, दिल्लीतील वाहतूक घोटाळा, दिल्लीतील वीज घोटाळा, दिल्लीतील लो-फ्लोअर बसेसचा घोटाळा, अनधिकृत वसाहतींचा घोटाळा असे अनेक घोटाळ्यांची माहिती बाहेर काढली आहे. २००१ पासून आजतगायत त्यांनी १०००० हून अधिक माहिती अधिकार अर्ज भरून वेगवेगळ्या घोटाळ्यांची माहिती बाहेर आणली आहे. त्यामुळे ती माहिती एक अत्यंत जुना माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्याने त्यांनी मिळविली होती.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Tue, 06/30/2015 - 17:52 नवीन
इतके काय गोलगोल फिरवताय राव ? सरळ सांगून टाका ना भाजपाचे नाहीयेत म्हणून. कोणी काही म्हणणार नाही.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/01/2015 - 10:53 नवीन
तुम्ही समजता त्या अर्थाने ते भाजपचे नाहीत. त्यांच्याशी संबंधित बातम्यात सुद्धा 'वकील व माहिती अधिकार हक्काचे कार्यकर्ते विवेक गर्ग' असाच उल्लेख असतो. वेगळ्या शब्दात सांगायचं तर नंदन निलेकणी जितके काँग्रेसचे आहेत तितकेच विवेक गर्ग भाजपचे आहेत.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
कर्ण-२ Tue, 06/30/2015 - 13:44 नवीन
मोदी काम करू देत नाही हे स्पष्ट दिसत आहे, आणि तुम्हाला दिसत नाही म्हणजे तुम्ही जरूर अंधभक्त असाल
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 13:54 नवीन
खरं तर केजरीवालांना काम करण्याची इच्छा नाही हे स्पष्ट दिसत आहे आणि ते तुम्हाला दिसत नाही, म्हणजे जरूर तुम्ही अंधद्वेष्टे असाल.
↩ प्रतिसाद: कर्ण-२
न
नांदेडीअन Tue, 06/30/2015 - 12:45 नवीन
मीणा या अधिकार्‍याला तिथे ८ जूनला आणण्यात आले आहे. तेव्हापासून आतापर्यंत फक्त ३ आठवडे होतात, १ महिना नव्हे.
मी मागेही म्हणालो होतो की साहेबांच्या भाषेचे मला तितकेसे ज्ञान नाही. पण माझ्या मते Almost a month म्हणजे 'एक महिना' नसतो.
श
श्रीगुरुजी Wed, 07/01/2015 - 10:49 नवीन
>>> पण माझ्या मते Almost a month म्हणजे 'एक महिना' नसतो. ते ठीक आहे. परंतु केजरीवालांच्या आडमुठेपणामुळेच एसीबीचे काम ठप्प झाले आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. कालची अजून एक नवीन बातमी . . . हा प्रकार आता पोरखेळ म्हणण्याच्याही पलिकडे गेला आहे. After two unit chiefs, the anti-corruption branch now has two SHOs. The Delhi government has declared the appointment of the new SHO as void. This comes a day after the high court refused to accept the government's plea to oust M K Meena from ACB. The vigilance department on Tuesday cancelled three of the orders passed by the ACB chief, Meena, on Monday. One of them is the appointment of the new SHO. Arguing that ACB was a part of the department of vigilance and any work allocation can happen only with the approval of the head of the department, director of vigilance, Sukesh Jain, termed the orders as those "without authority". "Vinay Malik will continue to work as the SHO of ACB," the vigilance order further reads. This order, officials said, will only add to the confusion as the new SHO, Brij Mohan, already took charge from Malik on Monday and has discharged his duty through Tuesday. It is unclear as to how Malik will be reinstated, if at all. The DoV gives reference to the allocation of business rules 1993 in his order. Jain also uses strong words against Meena and advises him to refrain from passing such "unauthorized orders" in future. The current order is likely to have repercussions as Meena has earlier warned the director of vigilance not to interfere in the matters of ACB, which is a police station. It will be interesting to see how Meena and the lieutenant governor react to the order, a source said.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
कर्ण-२ Tue, 06/30/2015 - 13:40 नवीन
असाच एक लेख येउद्या 'मोदि के अन्धभ्क्त' मह्नुन
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 13:55 नवीन
+१ 'मोदि के अन्धद्वेष्टे' असा देखील एक लेख येऊ द्या.
↩ प्रतिसाद: कर्ण-२
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 13:56 नवीन
'केजरीवाल के अन्धभक्त' असा देखील लेख चालेल.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ट
ट्रेड मार्क Tue, 06/30/2015 - 18:31 नवीन
श्री मोदी अजून ४ वर्ष पंतप्रधान आणि श्री केजरीवाल अजून ४.५ वर्ष मुख्यमंत्री राहणार आहेत (या पैकी कोणीही राजीनामा दिला नाही तर). जो काम करणार नाही तो पुढच्या वेळी निवडून येणार नाही. तसं पण राहुल गांधी किंवा केजरीवाल पंतप्रधान म्हणून किती लोकांना मान्य आहेत हा पण प्रश्न आहे. उगाच वाद घालून काय उपयोग? एक देश चालवणे आणि एक अर्धा राज्य चालवणे याची तुलना होवू शकत नाही. दोघांनी आपल्या जागी चांगले काम करावे आणि देशाला आणि राज्याला चांगले दिवस दाखवावे ही इच्छा. पण वाचून करमणूक होते आहे हे तितकेच खरं, त्यामुळे लगे रहो.
ह
होबासराव Tue, 06/30/2015 - 18:44 नवीन
(speechless)
ट
ट्रेड मार्क Tue, 06/30/2015 - 19:37 नवीन
त्यांना पुढील पंतप्रधान म्हणून केजरीवाल पाहिजेत. तसा वेगळा group पण आहे "Kejriwal as our PM", आणि .... मग खाली हळूच लिहिलंय PM म्हणजे personal motivator :)
↩ प्रतिसाद: होबासराव
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 07/01/2015 - 10:03 नवीन
दिल्ली सरकारने व्हॅट २०% वरून ३०% वर नेला. पेट्रोल, सी.एन.जी या गोष्टी दिल्लीमध्ये महाग होणार. म्हणजे केजरीवार एका हाताने स्वस्त इलेक्ट्रिसीटी देणार आणि दुसर्‍या हाताने अशा प्रकारे जास्त चार्जेस लावून जनतेला येडे बनविणार. आणि केजरीचे गुलाम त्यावर स्तुतीसुमने टाकत राहणार आणि केजरीवालांना पंतप्रधानपदी बसवायची स्वप्ने बघणार.आणी नांदिडियन त्यावरही काहीतरी तिरपागडे लॉजिक आणणार. मजाच म्हणायची.
न
नांदेडीअन Wed, 07/01/2015 - 10:51 नवीन
दिल्ली सरकारने व्हॅट २०% वरून ३०% वर नेला. पेट्रोल, सी.एन.जी या गोष्टी दिल्लीमध्ये महाग होणार. म्हणजे केजरीवार एका हाताने स्वस्त इलेक्ट्रिसीटी देणार आणि दुसर्‍या हाताने अशा प्रकारे जास्त चार्जेस लावून जनतेला येडे बनविणार. आणि केजरीचे गुलाम त्यावर स्तुतीसुमने टाकत राहणार आणि केजरीवालांना पंतप्रधानपदी बसवायची स्वप्ने बघणार.आणी नांदिडियन त्यावरही काहीतरी तिरपागडे लॉजिक आणणार. मजाच म्हणायची.
लोकांपुढे खरी माहिती तुम्ही पोस्ट कराल अशी मुळीच अपेक्षा नाहीये, किमान स्वतःशी जरी प्रामाणिक राहिलात तरी पुरेसे आहे. हां तुम्हालासुद्धा खरे काय ते माहित नसेल, तर मग हरकत नाही. चालू द्या नेहमीप्रमाणे न वाचता, न माहिती घेता टीका. दिल्ली सरकारने व्हॅटची अप्पर लिमिट २०% वरून वाढवून ३०% केली आहे, व्हॅट वाढवलेला नाहीये. यामुळे खालील १४ प्रोडक्ट्स महाग होऊ शकतात. (झाले नाहीत.) Image removed. मला सांगा या १४ पैकी कशाची किंमत वाढल्यावर जनतेला महागाईची झळ बसणार आहे किंवा जनतेला ‘त्रास’ होणार आहे. बाय द वे, माझ्या माहितीप्रमाणे गुजरात आणि हरियाणामध्ये व्हॅटची अशी कोणतीही अप्पर लिमिट नाहीये. सरकार वाट्टेल तेव्हढा वॅट वाढवू शकते. महाराष्ट्रामध्ये ही लिमिट ५०% आहे. अर्थात याबद्दल आपण बोलू शकत नाही तो भाग वेगळा. माझी माहिती चुकीची असल्यास कृपया दुरूस्त करावी ही नम्र विनंती.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 07/01/2015 - 10:56 नवीन
http://www.ibnlive.com/news/politics/delhi-government-hikes-vat-from-20-to-30-fuel-prices-set-to-go-up-1013846.html http://indiatoday.intoday.in/story/delhi-arvind-kejriwal-aap-govt-vat-petrol-price-cigarettes-alcohol/1/448113.html यातील एक वाक्य--- "With this move of the Arvind Kejriwal government, prices of petrol, cooking gas, CNG and liquor are set to go up."
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Wed, 07/01/2015 - 11:09 नवीन
तुमच्या मते पेट्रोल, डिजेलची ही दरवाढ कधीपर्यंत लागू होईल ? त्या दिवशी मीसुद्धा तुमच्यासोबत उलटा लटकायला तयार आहे.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
श
श्रीगुरुजी Wed, 07/01/2015 - 11:22 नवीन
इंडिया-टुडे मधील बातमीत खालील माहिती आहे. The Delhi Assembly on Tuesday passed VAT (Second Amendment) Bill, 2015 which proposes to increase value added tax on petrol, aerated drinks, tobacco and liquor among other products. Petrol price will be hiked by Rs 5.56 per litre to Rs 72.49 in Delhi if the proposal gets final approval. या विधेयकाला दिल्ली विधानसभेची कालच मान्यता मिळाली. आता अंतिम मान्यता कोणाची मिळवायची आहे खुदा जाने.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
काळा पहाड Wed, 07/01/2015 - 11:40 नवीन
वटवाघूळ साहेब, तुमच्या बाजूला जागा तयार करा बरं उलटं लटकण्यासाठी
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 07/01/2015 - 11:54 नवीन
वटवाघूळ साहेब, तुमच्या बाजूला जागा तयार करा बरं उलटं लटकण्यासाठी
छे हो. आआपवाल्यांना माझ्या आजूबाजूलाही फिरकू देत नाही मी :) ह. घ्या
↩ प्रतिसाद: काळा पहाड
च
चिनार Wed, 07/01/2015 - 12:06 नवीन
असं काय करताय राव?..एका झाडावर तुम्ही ..दुसऱ्या झाडावर नान्देडीयन साहेब असे उलटे लटकलेले..त्याच झाडाखाली श्रीगुरुजी मिरचीची धुनी देतायेत त्यांना..तुम्ही हे बघून टाळ्या वाजवत आहात.. बाजूलाच केजरीवाल धरण्यावर बसलेले.. मोदी विकासाचे भाषण देत असलेले ..आणि मी हे दृश्य क्यामेरात टिपतोय असे रम्य स्वप्न बघितलं मी.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
न
नांदेडीअन Wed, 07/01/2015 - 13:05 नवीन
दुसऱ्या झाडावर नान्देडीयन साहेब असे उलटे लटकलेले..त्याच झाडाखाली श्रीगुरुजी मिरचीची धुनी देतायेत त्यांना
काय योगायोग ! आज स्वप्न दिवस आहे का हो ? मलासुद्धा एक स्वप्न पडले रात्री. तुम्ही थांबलेला आहात एका जागी आणि समोरची व्यक्ती तुम्हाला बिस्किट टाकत आहे. मनोहारी दृष्य होतं एकदम !
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Wed, 07/01/2015 - 13:16 नवीन
साक्षात नांदेडीअन साहेबांच्या स्वप्नात मी !! कसं शक्य आहे? आप च्या मनोहारी स्वप्नरंजनातून आणि भाजपच्या स्वप्नभंगातून बाहेर पडता तुम्ही ? स्वप्नातही बातम्यांच्या लिंकाच शोधत असाल.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Wed, 07/01/2015 - 13:21 नवीन
नाही हो, लिंक शोधायची काय गरज आहे. स्वप्नात असले म्हणून काय झाले, डोळ्यापुढे दिसत होते सगळे. :)
↩ प्रतिसाद: चिनार
न
नांदेडीअन गुरुवार, 07/02/2015 - 13:03 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 09:20 नवीन
या बातमीची लिंक आहे का? या चित्रातल्या बारीक अक्षरातल्या ओळी वाचता येत नाहीत. एक शंका आहे. ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढविलेला आहे त्यात पेट्रोल व डिझेल चा समावेश आहे का? तसे नसल्यास, पेट्रोल व डिझेलचे भाव वाढणार असे माध्यमे व विरोधी पक्ष खोटे का बोलत आहेत? तसे असल्यास, मूल्यवर्धित कर वाढवून सुद्धा पेट्रोल व डिझेलच्या भावात का वाढ होणार नाही?
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Fri, 07/03/2015 - 09:53 नवीन
या बातमीची लिंक आहे का? या चित्रातल्या बारीक अक्षरातल्या ओळी वाचता येत नाहीत.
ही घ्या लिंक. http://epaper.navodayatimes.in/c/5747289 इथून पुढे असे काही वाचता येत नसेल, तर फोटोवर राइट क्लिक करून Open Image In New Tab हा पर्याय निवडत जा. फोटो मूळ साइझमध्ये पाहता येईल.
एक शंका आहे. ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढविलेला आहे त्यात पेट्रोल व डिझेल चा समावेश आहे का?
^^ माझ्या माहितीप्रमाणे नाही. मला ही माहिती आपच्या काही अधिकृत ट्विटर हॅंडलवरून मिळाली होती. आता तर दिल्लीच्या आप संयोजकांनी ही माहिती अधिकृतपणे जाहिर केल्यावर शंका घ्यायला काही वाव नसावा अशी अपेक्षा आहे.
तसे नसल्यास, पेट्रोल व डिझेलचे भाव वाढणार असे माध्यमे व विरोधी पक्ष खोटे का बोलत आहेत?
^^ याबद्दल तर तुम्हीच जास्त अधिकारवाणीने सांगू शकाल.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 10:40 नवीन
ती बातमी वाचली. त्यातून काहीच अर्थबोध झाला नाही. 'ज्या वस्तूंवर मूल्यवर्धित कर वाढवायचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला आहे त्यात इतर वस्तूंबरोबर पेट्रोल व डिझेलचा समावेश आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मूल्यवर्धित कर वाढल्यावर पेट्रोल व डिझेलवर कर वाढेल', हे आआपचे प्रवक्ते दिलीप पांडे यांचे विधान बुचकळ्यात टाकणारे आहे. ही बातमी इतर वृत्तपत्रात दिसली नाही. असो. थोड्या दिवसात खरे काय ते समजेलच. >>> याबद्दल तर तुम्हीच जास्त अधिकारवाणीने सांगू शकाल. माझा तो अधिकार नाही व त्याविषयी मला माहिती नाही.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
च
चिनार Fri, 07/03/2015 - 11:00 नवीन
या विषयावरच्या माझ्या मर्यादित ज्ञानानुसार दिल्ली सरकारने ११ गोष्टींवर (ज्यात पेट्रोल,डीझेल येतात) VAT वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत पारित करून घेतला आहे. याचा अर्थ ते VAT वाढवतीलच असे नाही. फक्त परवानगी घेऊन ठेवली पुढचं पुढे बघू असं काहीसं हे चित्र आहे. आता या गोष्टीला विविध बाजू आहेत १. उद्या पेट्रोल,,डीझेल चा VAT वाढवण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे जर VAT वाढलाचं तर "आम्ही कायदेशीर वाढ केली आहे" असे म्हणायला सरकार मोकळे. २. आधी विधानसभेत प्रस्ताव पारित करून घेऊ मग जनतेची प्रतिक्रिया बघून VAT वाढवायचा की नाही ते ठरवू. जनता अनुकूल असेल तर ठीकच नाहीतर VAT नाही वाढवला म्हणू स्व:त ची पाठ थोपटून घेऊ. ३. किंवा सरकारला पेट्रोल,,डीझेल सोडून अन्य ९ गोष्टींवर VAT वाढवायचा असेल पण VAT च्या त्या विशिष्ट category मध्ये पेट्रोल,,डीझेल चं समावेश सुद्धा असेल. पण VAT वाढवताना सरकार पेट्रोल,,डीझेल त्यातून वगळतील.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Fri, 07/03/2015 - 16:51 नवीन
The Delhi Assembly on Tuesday passed VAT (Second Amendmnt) Bill, 2015 which proposes to increase value added tax on petrol, aerated drinks, tobacco and liquor among other products. Petrol price will be hiked by Rs 5.56 per litre to Rs 72.49 in Delhi if the proposal gets final approval. http://indiatoday.intoday.in/story/delhi-arvind-kejriwal-aap-govt-vat-petrol-price-cigarettes-alcohol/1/448113.html
↩ प्रतिसाद: चिनार
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 07/01/2015 - 11:00 नवीन
http://www.ibnlive.com/news/politics/delhi-government-hikes-vat-from-20-to-30-fuel-prices-set-to-go-up-1013846.html http://indiatoday.intoday.in/story/delhi-arvind-kejriwal-aap-govt-vat-petrol-price-cigarettes-alcohol/1/448113.html यातील एक वाक्य--- "With this move of the Arvind Kejriwal government, prices of petrol, cooking gas, CNG and liquor are set to go up."
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 07/03/2015 - 07:12 नवीन
ऐका हो ऐका. केजरीवाल सरकारने स्वतःच्या अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी ५००+ कोटी रूपये बाजूला काढले हो SSS. यावर इथल्या आपटार्डांचे काय म्हणणे आहे? मागे टिव्ह्वीवर एक अ‍ॅड दाखवली त्यात एक गृहिणी घरात काम करताना दाखवली होती आणि तिचा नवरा आरामात टिव्हीवरचे चॅनेल बदलताना दाखवला होता. समजा अशी अ‍ॅड भाजपकडून आली असती तर इथल्या फेमिनिस्टांनी अगदी आकाशपाताळ एक केले असते (किंवा कदाचित नसते. कारण बहुदा असे सगळे लोक एन-मास ऐसीअक्षारेवर गेले आहेत आणि इथे फिरकत नाहीत--ते ही बरेच आहे म्हणा). पण काय करा? आपलेच दात आणि आपलेच ओठ. तेव्हा मौन बाळगा. तेच श्रेयस्कर. हो की नाही नांदेडीयन राव?
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 09:15 नवीन
हे तर काहीच नाही. केजरीवालांच्या निवासस्थानाचे जून महिन्याचे वीजेचे बिल आहे रू. १,३६,०००. अजून एक - AAP admits giving perks to party members NEW DELHI: Aam Aadmi Party (AAP) government in Delhi admitted that a few party members were getting benefits like official house and cars. In a reply to BJP MLA O P Sharma's question, government said that these members have been appointed as co-terminus staff with it. Government in its reply said that Bibhav Kumar, private secretary to chief minister Arvind Kejriwal and Aswathi Muralidharan, joint secretary to chief minister, have been allotted houses. The government also said the salary of these staff, who are in the grade pay of Rs 8,700 equivalent to senior IAS officers. Apart from 17 co-terminus staff, eight contractual staffs are hired and get Rs 60,000 to Rs 1.15 lakh. There are two advisors who work on the salary of Rs one per month. जेमतेम ४-५ महिन्यात करदात्यांचा इतका पैसा उधळणं सुरू आहे आणि ते सुद्धा 'आम आदमी' असा जयघोष करून. हेच ढोंगी आधीच्या सरकारवर जनतेचा पैसा उधळण्याचा सातत्याने आरोप करीत होते. असो. याचेही समर्थन करणारे आपटार्ड्स असणारच.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 09:17 नवीन
या बातमीची लिंक http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/AAP-admits-giving-perks-to-party-members/articleshow/47890819.cms
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Fri, 07/03/2015 - 09:42 नवीन
हे कारमधल्या कॉलगर्लने रस्त्यावरच्या वेश्येकडे तुच्छतेने बघण्यासारख आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 10:27 नवीन
जर वेश्या गरतीचा आव आणून कॉलगर्लला कायम तुच्छ लेखत असेल तर असे होणारच.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
नांदेडीअन Fri, 07/03/2015 - 10:33 नवीन
या बातमीची लिंक http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/AAP-admits-giving-perks-to...
ज्या लोकांना हे 'Perks' मिळत आहेत, ते लोक घरी बसून नाहीयेत. सरकारसाठी काम करत आहेत ते, आणि त्याचाच पगार आहे हा. या लोकांच्या नियुक्तीमध्ये काही नियमबाह्य झाले असेल, तर त्यावर मात्र कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि जर हे भारतीय राजकारणात पहिल्यांदाच होत असेल, तर मात्र याचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे !
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 17:05 नवीन
>>> ज्या लोकांना हे 'Perks' मिळत आहेत, ते लोक घरी बसून नाहीयेत. सरकारसाठी काम करत आहेत ते, आणि त्याचाच पगार आहे हा. नक्की काय काम करताहेत हे आआपचे लोक. नक्की कोणत्या कामासाठी त्यांना केजरीवालांनी घर, गाडी आणि प्रचंड पगार दिलेला आहे. कोणत्या आधारावर या आपच्या कार्यकर्त्यांना वरीष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बरोबरीचे मानले गेले आहे. बादवे, यातल्या काही जणांचा पगार मासिक रू. १,१५,८८१ फक्त आहे (घर आणि गाडी वेगळीच) असे काल काही वाहिन्यांवर दाखवित होते. >>> या लोकांच्या नियुक्तीमध्ये काही नियमबाह्य झाले असेल, तर त्यावर मात्र कारवाई व्हायलाच पाहिजे. केजरीवाल कधी काही नियमबाह्य करतात का? >>> आणि जर हे भारतीय राजकारणात पहिल्यांदाच होत असेल, तर मात्र याचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे ! ज्या गोष्टींसाठी इतरांना सपाटून शिव्या मोजायच्या, आम्ही आम आदमीसाठीच काम करणार असे सांगायचे आणि नेमके शिव्या घातलेल्याच गोष्टी करायच्या हे कदाचित पहिल्यांदा झाले नसले तरी क्षम्य नाही.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
स
सुबोध खरे Fri, 07/03/2015 - 17:05 नवीन
यांची नियुक्ती कोणत्या नियमानुसार झाली आहे हे आपल्याला सांगता येईल काय? आणी "त्या" लोकांना सरकारी नोकरी देण्यासाठी साठी कोणते निकष लावले गेले आहेत. सरकारी नोकरी अशी दीड दिवसात मिळणारी गणपतीची खिरापत नाही. आणी हा पगार सरकारी खजिन्यातून येण्यासाठी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध व्हावे लागते. नोकरी लागली कि तीन महिने तरी यासाठी जातात. उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे आप सारख्या साधन शुचितेचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाला शोभत नाही.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Fri, 07/03/2015 - 10:15 नवीन
ऐका हो ऐका. केजरीवाल सरकारने स्वतःच्या अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी ५००+ कोटी रूपये बाजूला काढले हो SSS.
सर्वप्रथम अपेक्षेप्रमाणे तुम्ही त्या पेट्रोल-डिझेलच्या प्रश्नावरून कल्टी मारली, त्याबद्दल आपले आभार. आता या ५०० कोटींबद्दल बोलू. यासंदर्भात मी जेव्हढ्या बातम्या वाचल्यात, त्यात reportedly हा शब्द वापरलाय. अगोदरच सांगितल्याप्रमाणे माझी इंग्रजी खूप कच्ची आहे, त्यामुळे कृपया कोणीतरी मला reportedly या शब्दाचा अर्थ सांगावा ही नम्र विनंती. आणि आप त्यांच्या जाहिरातींवर येत्या काळात खरंच ५०० करोड खर्च करणार आहे हे जरी गृहीत धरले, तरी मला त्यात काही चुकीचे वाटत नाही. हां, पण यावेळीसुद्धा जाहिरातीमध्ये आम आदमी पक्षाच्याऎवजी केजरीवालांचा उदो उदो करणार असतील, तर त्याला मात्र माझा विरोध असेल. भाजप तर त्यांच्या न्युज चॅनल्सवर आम आदमी पार्टीचे काम दाखवणे शक्य नाही, मग दिल्लीच्या बाहेरच्या जनतेपर्यंत केलेल्या कामाची माहिती कशी पोहोचवायची ? मला तरी जाहिरात हा एकच पर्याय दिसतोय, आणि म्हणूनच जाहिरातीला माझे समर्थन आहे. पण हे ही तितकेच खरे की मोदींनी स्वतःच्या इमेज बिल्डअपसाठी पाच हजार करोड रूपये खर्च केले म्हणून केजरीसाठी तोच पर्याय जस्टिफाय होतो असे नाही.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 10:47 नवीन
आआपभक्त जाहिरात खर्चाचं समर्थन करणार याची खात्री होतीच. >>> हां, पण यावेळीसुद्धा जाहिरातीमध्ये आम आदमी पक्षाच्याऎवजी केजरीवालांचा उदो उदो करणार असतील, तर त्याला मात्र माझा विरोध असेल. दूरदर्शन वाहिन्यांवरील एका १२० सेकंदाच्या जाहिरातीत एक बाई घरातील व घराबाहेरील सर्व कामे करताना दाखविली आहे. तिचा नवरा कोणतेही काम न करता सोफ्यावर लोळत टीव्ही बघत किंवा वृत्तपत्र वाचत आरामात बसलेला दाखविला आहे. तो सोफ्यावर असतानाच काही वेळाने ती बाई त्याच्यासमोर जेवणाचे भरलेले ताट घेऊन येते. या जाहिरातीत कमीतकमी १२-१३ वेळा अरविंद, केजरीवाल, अरविंदने यँव केलं, अरविंदने त्यँव केलं असे उल्लेख आहेत. हा केजरीवालांचाच उदो उदो आहे. >>> पण हे ही तितकेच खरे की मोदींनी स्वतःच्या इमेज बिल्डअपसाठी पाच हजार करोड रूपये खर्च केले म्हणून केजरीसाठी तोच पर्याय जस्टिफाय होतो असे नाही. पाच हजार कोटी हा आकडा कोठून आला? मोदींनी जाहिरातीसाठी सरकारी पैसे वापरले होते का पक्षाचे पैसे?
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा