केजरूके गुलाम
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.
सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.
या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.
पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?
मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.
असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.
केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.
नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.
प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.
हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.
अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.
या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).
या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
💬 प्रतिसाद
(893)
क
कपिलमुनी
Fri, 01/29/2016 - 18:33
नवीन
महिला आआपचीच होती हे अगदी पहिल्या दिवसापासून सर्वत्र उघड झाले आहे.
दुवे , फिती , बातम्या द्या ना ! कुठे लिहीलाय तसा ?
मी तुम्हाला वर्तमानपत्रांच्या लिंक दिल्या आहे तशा तुम्ही पण द्या आणि सिद्ध करा
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/29/2016 - 08:47
नवीन
गुरूजी आपले असहिष्णु आहेत हे आम्ही आधीच सांगितले आहे बुआ!!
श
श्रीगुरुजी
Fri, 01/29/2016 - 08:51
नवीन
बरं बुवा. असहिष्णु तर असहिष्णु. कोणीतरी सहिष्णु म्हणावं म्हणून कोणी आम्हाला केजरीवाल अशी घाणेरडी शिवी दिली तर आम्ही ती गोड मानून घ्यावी अशी तुमची अपेक्षा दिसतेय.
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/29/2016 - 09:10
नवीन
अजिबात नाही,
आपणाकडून काही अपेक्षा करायला आपण माझे किंवा मी आपले काहीच देणे लागत नाही, नाही का?
केजरीवाल ह्यांचे उठसुट मोदी किंवा केंद्रावर आरोप करून गळे काढणे जितके अतार्किक अन असहिष्णु आहे तितकेच तुमचे वारंवार विनापुरावा गोळीबार करणे अन केजरीवाल ह्यांचे नाव "शिवी" असल्याचे विद्वेषपूर्ण गरळ ओकणे हे सुद्धा अतार्किक अन असहिष्णु आहे हे नोंदवु इच्छितो मी. केजरीवाल हे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेतील सगळ्या खेळी करून अन दिल्लीच्या जनतेचा कौल घेऊन सीएम झालेले आहेत, त्यांचे नाव म्हणजे त्यांचे अस्तित्व हेच शिवी म्हणताना तुम्ही थेट दिल्लीची जनताच एक शिवी आहे असे दर्शवता आहात गुरूजी, म्हणजेच जेव्हा दिल्लीकर जनतेने अगोदर बीजेपी ला कौल दिला तेव्हा ती शिवी नव्हती अन आता केजरीवाल म्हणजेच पर्यायाने दिल्लीची जनता ही शिवी झाली असे म्हणता आहात तुम्ही, ह्याचा अर्थ सरळसरळ हा निघतो, की तुम्ही ज्या राजकीय विचारसरणी चे खंदे समर्थक आहात त्या विचारसरणीला नाकारणारे केजरीवाल (लोकनियुक्त असूनही) अन त्यांना नियुक्त करणारी जनता ही एक शिवी आहे, म्हणजे तुम्हाला त्यांचे अस्तित्व एका गलिच्छ शिवी सारखे खुपते आहे
ही असहिष्णुता नाही तर अजुन काय आहे?????
तळटिप :- मला केजरीवाल ह्यांच्याविषयी ममत्व असण्याचे कारण नाही अन गरज ही नाही तसेच मी दिल्लीचा रहिवाशी सुद्धा नाही, तसेच मला मोदी सरकार करत असलेले साधक कार्य अन व्यक्तिशः मोदींची निष्ठा ह्यावर नितांत आदर आहेच, पण म्हणून कोणी मोदी विरोधी आहे म्हणून त्याचे अस्तित्व शिवी आहे असा कांगवा सुद्धा मी करणार नाही, ते तुम्ही करता आहात गुरूजी म्हणून तुम्ही असहिष्णु आहात.
बाकी देशातल्या जनतेत पॉलिटिकल pragmatism अजिबात अस्तित्वात नसल्याचा मुद्दा परत एकदा समोर आलाच पण तो इथे विषय नाहिये. तस्मात् असो
च
चिनार
Fri, 01/29/2016 - 11:48
नवीन
जबराट प्रतिसाद !!
क
कपिलमुनी
Fri, 01/29/2016 - 14:40
नवीन
योग्य प्रतिसाद !
( अर्थात आतापण यावर गोलगोल प्रतिसाद येतील , पण चर्चा विरोधाकडून तिरस्काराकडे जात असल्याने इथेच थांबावे हे उत्तम )
श
श्रीगुरुजी
Fri, 01/29/2016 - 16:09
नवीन
केजरीवालांचे आजपर्यंतचे वर्तन हे कमालीचे बेगडी व नाटकी असून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करणे, जनतेला वेठीस धरून स्वतःची पोळी भाजून घेणे (दिल्लीत नुकताच सुरू असलेला कचरा सेवकांचा चौथ्यांचा झालेला संप हे अगदी आजचे उदाहरण) ही त्यांची व्यवच्छेदक लक्षणे. यांच्या नाटकांमुळेच मागील वर्षी गजेंद्र सिंह नावाच्या एका नागरिकाचा जीव गेला. तो गेल्यावर सुद्धा त्याच्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपण्यात त्यांनी यत्किंचितही कसूर ठेवली नाही.
असल्या ढोंगी व्यक्तीशी माझी तुलना करणे हे माझ्या दृष्टीने अत्यंत संतापजनक व अपमानास्पद आहे. यापूर्वी सुद्धा माझी तुलना केजरीवालांशी केली तेव्हाही मी नापसंती दर्शविली होती. मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे माझा इतका वाईट अपमान यापूर्वी कोणीही केला नव्हता. विशेषतः श्री. रा. रा. डांगे यांच्याबद्दल मी या धाग्यावरील एकाही प्रतिसादात वाईट लिहिले नसताना त्यांनी दोन वेळा माझा उल्लेख केजरीवाल असा करून वाईट अपमान केला.
केजरीवालांचे वर्तन अत्यंत वाईट आहे व त्यामुळे माझी त्यांच्याशी तुलना करू नका असे सांगणे यात कोणतीही असहिष्णुता नाही.
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 16:37
नवीन
केजरीवाल ही शिवी आहे की नाही हे ठरवणे हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न. तुम्ही जी केजरीवाल यांची लक्षणे इथे सांगितली, ते तुमच्या प्रतिसादांमधून तुमच्या विचारांमधेही दिसली. (जशी तुम्हाला केजरीवाल यांची दिसली व भाजप यांची दिसत नाहीत.) यास्तव तुलना झाली. एखाद्याला केजरीवाल म्हणणे हे शिवी वा पुरस्कार ह्याबद्दल माझे वैयक्तिक कोणतेही मत नाही.
श
श्रीगुरुजी
Sat, 01/30/2016 - 07:53
नवीन
एक्झॅक्टली. माझ्या दृष्टीने ती शिवी आहे. जे माझे व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर इतरांनी आक्षेप का घ्यावा? ती शिवी समजायला अनेक सबळ कारणे आहेत जी वर दिलेली आहेत. ती पुरेशी आहेत.
च
चैतन्य ईन्या
Fri, 01/29/2016 - 17:18
नवीन
आपण जेंव्हा केजारीवाल्ला शिवी म्हणतो तेंव्हा आपण पण नकळत दुसर्याला वाटेल ते बोलायला जागा उपलब्ध करून देतो. तसाही केजरीवाल आवडत नाही. पण त्याने सगळी चेष्टा वा माकड चेष्टा करून सत्ता मिळवली आहे आणि खणखणीत मिळवली आहे. त्याने जे केले ते आपल्याला जमले नाही. ह्यापेक्षा मोदी भाऊ पण फार काही वेगळे करत आहेत असे मला वाटत नाही. जवळपास २ वर्षांपुर्व्हीचा पाठींबा कमी होतंय. असे काहीतरी बोलून तो अजूनच कमी होतो असे लक्षात ठेवावे
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/29/2016 - 16:41
नवीन
________/\___________
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 16:50
नवीन
आमचाही. _____________/\___________
(संतुलित विचारांसोबत नेहमीच असलेला व कम्युनिस्ट नसलेला) कॉम्रेड डांगे.
म
मी-सौरभ
Sat, 01/30/2016 - 01:58
नवीन
आता तरी हां धागा मेन बोर्डावर दुसऱ्या धाग्याला जागा देईल अशी आशा आहे.
क
कपिलमुनी
Fri, 01/29/2016 - 18:28
नवीन
शेवटी पुरावा न देता विषय भरकटवून विषय संपवला म्हणायचा.
पुरावा दिलाच पाहिजे या गोष्टीला बऱ्याच मिपाकरांनी पाठींबा दिला याबद्दल आभार .
बहुसंख्य मिपाकर आंधळा सपोर्ट करत नाही आयडी असो वा पक्ष !
श
श्रीगुरुजी
Sat, 01/30/2016 - 07:49
नवीन
पुरावा पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. पूर्वी मॅनेज केलेल्या अनेक घटनांचीच ही पुनरावृत्ती, पूर्वीच्या सर्व घटनांमागे आआपचेच कार्यकर्ते होते, या घटनेतील महिला सुरवातीपासून आआपमध्येच आहे, तिला व्यासपीठावर केजरीवालांच्या जवळ जाऊन शाई शिंपडता यावी यासाठी केजरीवालांच्याच सहाय्यकाने तिथून पोलिसाला हटवून लांब पाठविणे, शाई शिंपडल्यावर लगेचच भाजपवर दोषारोप ... पूर्वीच्याच प्रसंगाची झेरॉक्स कॉपी ... सर्व काही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
क
कपिलमुनी
Sat, 01/30/2016 - 08:08
नवीन
तुमच्या शिवाय दुसरे कोणीही म्हणत नाही .
माझा आक्षेप तुमच्या खोट्या बोलण्यावर आहे. तुम्ही खोटारडे आहात
एक साधा दुवा , रेफरन्स नाही आणि फुकाच्या गप्पा मारता .
ती महिला आपमधे नाही याचे दुवे दिलेत उघडुन वाचायचे कष्ट घ्या
श
श्रीगुरुजी
Sat, 01/30/2016 - 08:23
नवीन
या प्रसंगाची मालिका पहिल्यापासून नीट बघितलीत तर हे आआपवाल्यांचेच काम आहे हे अगदी सहज लक्षात येईल. परंतु तुम्ही केवळ अट्टाहासाने ते नाकारत आहात.
क
कपिलमुनी
Sat, 01/30/2016 - 13:11
नवीन
लक्षात येणे , स्पष्ट असणे असले शब्दप्रयोग वापरु नका .
एखादा माणूस वेडा आहे हे लक्षात येता, स्पष्ट असता , पण डॉक्टर कडुन तसा लिहून मिळाल्यावरच सिद्ध होता
तुमच्याकडे पुरावा आहे की नाही ? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या आणि हा प्रश्न मिटवा
श
श्रीगुरुजी
Sat, 01/30/2016 - 18:46
नवीन
वरील शाईप्रकरणातील घटना व पुरावे अगदी स्पष्ट आहेत. परंतु केवळ अट्टाहासाने ते तुम्ही नाकारत आहात. आधीच्या सर्व प्रकरणाप्रमाणेच हेदेखील आआपनेच घडवून आणलेले नाटक हे मान्य करण्याची तुमची तयारीच नाही.
ट
ट्रेड मार्क
Fri, 01/29/2016 - 22:18
नवीन
शाई फेकणारी भाजपशी संबंधित होती वा आहे याचा काही पुरावा आहे का कोणाकडे?
स
संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 03:48
नवीन
असं कुणी म्हटलंय का?
श
श्रीगुरुजी
Sat, 01/30/2016 - 07:45
नवीन
शाई फेकल्याफेकल्या लगेचच आआपवाल्यांनी यामागे भाजपचे कटकारस्थान असल्याचा व केजरीवालांना जीवे मारण्याच्या प्रयत्नांची ही रंगीत तालीम असल्याचा (अर्थातच बिनबुडाचा) आरोप केला होता.
प
प्रचेतस
Sat, 01/30/2016 - 07:51
नवीन
त्यांचे ते बिनबुडाचे आणि तुम्ही करता ते बुडाचे असं का हो गुर्जी?
श
श्रीगुरुजी
Sat, 01/30/2016 - 07:54
नवीन
म्हणजे काय?
प
प्रचेतस
Sat, 01/30/2016 - 08:01
नवीन
आरोप ओ.
स
संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 08:13
नवीन
=)) =))
श
श्रीगुरुजी
Sat, 01/30/2016 - 08:24
नवीन
कोणते आरोप बिनबुडाचे होते?
प
प्रचेतस
Sat, 01/30/2016 - 08:39
नवीन
आआपवाल्यांचे.
असं काय करता गुर्जी? तुमचेच विधान पहा की वरचे.
क
कपिलमुनी
Sat, 01/30/2016 - 08:18
नवीन
प्रतिसादमधे
लिहीलेले
मत व्यक्तीनिरपेक्ष , धागानिरपेक्ष आणि पूर्वग्रहनिरपेक्ष असेल अशी आशा करतो .
आणि त्या मताच्या अनुषंगाने या धाग्यातील खोटे ( ध्वनित ) आरोप केले आहे आणि त्यासाठी पुरावा नाही.
संमंना विनंती , त्यांनी हे आरोप संपादीत करावे
श
श्रीगुरुजी
Tue, 02/23/2016 - 18:36
नवीन
एक मजेशीर बातमी सापडली. अरूण जेटलींनी केजरीवाल, कुमार विश्वास इ. आआपच्या ६ नेत्यांविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी व बदनानीचा दावा दाखल केला आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्यात जेटलींचा हात आहे अशा स्वरूपाचे आरोप (अर्थातच कोणत्याही पुराव्याशिवाय) या मंडळींनी जाहिररित्या केले होते. आपला कोणत्याही भ्रष्टाचारात हात नसून कोणताही पुरावा नसताना केलेल्या या आरोपांमुळे आपली मानहानी व बदनामी झाली आहे असा दावा करून संबंधितांना शिक्षा देण्यासाठी जेटलींनी या सहा जणांविरूद्ध फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही स्वरूपाचे दावे न्यायालयात दाखल केले आहेत.
या दाव्याविरूद्ध आपले म्हणणे मांडताना केजरीवालांनी न्यायालयात खालील शब्दात आरोपांचे समर्थन केले.
Arvind Kejriwal today responded to Arun Jaitley's defamation suit with a stinging reply in which he taunted the Union Finance Minister for "losing by over one lakh votes" in the national election and said he has no high public "reputation to protect".
In a statement to a Delhi court, the Chief Minister said Mr Jaitley's "claim that he enjoys a high public character is totally frivolous and unsustainable."
He wrote: "The last time he contested the election to the Lok Sabha was from Amritsar as a BJP candidate in 2014. Despite the success of the BJP this plaintiff lost by a margin of more than 1,00,000 votes. Indian democracy has never accepted his claim of public character."
In a democracy, he argued, one's public reputation can only be the reaction, response and manifestation of the people's attitude.
हा युक्तिवाद वाचल्यावर हसावे का रडावे का केजरीवालांची कीव करावी हेच समजेना. जो निवडणुक हरतो त्याला कोणतीच सार्वजनिक प्रतिष्ठा नसते (व त्यामुळेच त्याच्यावर कोणतेही आरोप केले तरी त्याची बदनामी व मानहानी होत नाही) व जनता निवडणुकीत जसा जनादेश देते तीच त्याची सार्वजनिक प्रतिष्ठा असते (म्हणजे निवडणुक जिंकलेल्याला सार्वजनिक प्रतिष्ठा असते व हरलेल्याला प्रतिष्ठा नसते) असा अत्यंत अतार्किक युक्तिवाद कोणी न्यायालयात करेल असे कधीही वाटले नव्हते.
दस्तुरखुद्द केजरीवाल वाराणशीत मोदींविरूद्ध तब्बल २.५ लाखाहून अधिक मतांनी हरले होते. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज व वाजपेयी हे देखील निवडणुकीत हरले होते. बाबासाहेब आंबेडकर व मनमोहन सिंग हे देखील निवडणुकीत हरले होते. अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. पुण्यातून अविनाश धर्माधिकारी हे देखील पडले होते. केजरीवालांच्या युक्तिवादानुसार निवडणुकीत पराभव झाल्याने या सर्वांना कोणतीही सार्वजनिक प्रतिष्ठा नाही.
http://www.ndtv.com/india-news/what-reputation-arun-jaitley-lost-by-1-lakh-votes-arvind-kejriwal-1264978
अ
अर्धवटराव
Tue, 02/23/2016 - 19:20
नवीन
कोर्टकज्जे करताना असले आर्ग्युमेण्ट्स करावे लागतात. आशीलाची बाजु मांडताना वकील लोक आरोपकर्त्याच्या प्रत्येक वाक्याचा कीस पाडतात. हा त्यातलाच प्रकार. अर्थात, स्वतः केजरीवाल फार काहि लॉजीकल बोलतात असं नाहि.
प
प्रदीप साळुंखे
Tue, 02/23/2016 - 22:13
नवीन
केजरीवालांची नौटंकी आता कळू लागली आहे,
.
[सब मिले हुए है जी]
ह
होबासराव
Tue, 03/22/2016 - 16:46
नवीन
युगपुरुष कलियुगि हरीश्चंद्र ह्यांनि निवड्णुकिच्या वेळेस सबमिट केलेल अॅफिडेव्हिट खोट असल्याच समोर आलय. संपत्ति कमि दाखवण्यात आलिय.
क
कपिलमुनी
Fri, 03/25/2016 - 07:47
नवीन
बातमीनुसार केजरीवालन यांना फॉर्चुन मॅगेझिनने जागतिक पातळीवरच्या टॉप ५० लीडर्स मधे स्थान दिला आहे.
या यादीमधले ते ऐकमेव भारतीय नेते आहेत
केजरीवालन यांचे अभिनंदन !
क
कपिलमुनी
Fri, 03/25/2016 - 07:50
नवीन
केजरीवाल * असे वाचावे
श
श्रीगुरुजी
Fri, 03/25/2016 - 10:01
नवीन
दिल्लीत १ जानेवारी ते १५ जानेवारी हे १५ दिवस समविषम क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणून प्रदूषण कमी करण्याचा प्रयोग केजरीवाल सरकारने केला. त्याबद्दल फॉर्च्युन मासिकाने जगातील ५० ग्रेटेस्ट लीडर्समध्ये केजरीवालांना स्थान दिले आहे. त्याबद्दल केजरीवालांचे अभिनंदन!
श
श्रीगुरुजी
Fri, 03/25/2016 - 16:29
नवीन
या यादीतील जगातील ग्रेटेस्ट नेत्यांबद्दल अजून माहिती मिळाली.
Fortune’s third annual ‘World’s 50 Greatest Leaders’ list features men and women from across the globe from the fields of business, government, philanthropy and the arts who are “transforming the world and inspiring others to do the same.”
It said leadership is not “demagoguery, pandering, even populism” but is defined by people across the world “you’ve never heard of who are rallying followers to make life better in ways you never imagined.”
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 03/26/2016 - 16:57
नवीन
या स्वयंघोषित युगपुरूषांचा खरा चेहरा दाखवणारे दोन फोटो---
१. दिल्लीमध्ये डॉ.नारंग यांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर for obvious reasons हे युगपुरूष असा बहाणा करत आहेत की त्यांचे कुटुंबिय सध्या प्रचंड धक्क्यामध्ये आहेत आणि ते कोणाला भेटायच्या मनस्थितीत नाहीत म्हणून त्यांना भेटायला जात नाहीत. पण त्याचवेळी सतीश उपाध्याय आणि खासदार प्रवेश वर्मा हे डॉ. नारंग यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटूनही आले.देशात इतर ठिकाणी काही खुट्ट वाजले की अगदी धाऊन जावून त्या घटनेचे राजकारण करायची संधी अजिबात न सोडणारे युगपुरूष आता मात्र खुद्द दिल्लीत ती घटना घडूनही धावून जायला तयार नाहीत. त्याचे कारण काय असावे? सूज्ञांना सांगणे न लागे.
२. दुसरा फोटो तसा जुना आहे. त्या काळात हा धागा मागे पडला होता. म्हटले उगीच कशाला शिळ्या कढीला उत आणा म्हणून धागा वर आणला नव्हता.पण या युगपुरूषाने हलकटपणाची परमावधी गाठली असल्यामुळे प्रत्येक वेळी तो जी काही आगळीक करेल त्याला उघडे पाडायचे काम मी मिपावर अगदी इमाने इतबारे करायचे ठरविले आहे. म्हणून हा फोटो जुना असला तरी इथे देत आहे.
गोष्ट आहे नोव्हेंबर २०१५ मधील. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभासाठी हे युगपुरूष गेले नसते तरच नवल. आपण भ्रष्टाचारविरोधी आहोत म्हणून जगभर डिंडोरे पिटत असलेल्या युगपुरूषांना लालूंबरोबर एकाच स्टेजवर जायला काही टोचणी लागली नव्हती. त्यावेळी मी फेसबुकवर लिहिलेलाच मजकूर इथे देत आहे:
"केजरीवाल म्हणतात--लालूच माझ्या गळ्यात पडले!! माणसाने कित्ती कित्ती ढोंगी असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे केजरीवालांची ही लेटेस्ट मखलाशी!!लालू समजा खरोखरच यांच्या गळ्यात पडले तर यांना बाजूला होता आले असतेच की.बरं ते सोडाच. या फोटोमध्ये तर केजरीवाल व्यवस्थितपणे लालूंचा हात धरून हसताना दिसत आहेत.फार तर दुसरा माणूस बळजबरीने हात हातात घेऊ शकेल पण ज्या पध्दतीने केजरीवाल हसताना दिसत आहेत त्याची बळजबरी इतर माणूस कसा करू शकेल?
हा मनुष्य एक नंबरचा ढोंगी आणि कमालीचा चालू आहे हे २०११ मध्ये अण्णा आंदोलनात याचे नाव आल्यापासूनच माझी खात्री झाली होती. याचा भ्रष्टाचाराला विरोध वगैरे सगळी बकवास आहे हे माझे मत पहिल्यापासून होतेच. ते लालूची गळाभेट आणि लालूबरोबर हात उंचावून निर्लज्जपणे हसून त्यावर याने शिक्कामोर्तबच केले आहे.
अर्थातच आआप समर्थकांकडून याविरोधात काही भाष्य होईल अशी अपेक्षाच नाही. मोदी समर्थकांपैकी अनेकांनी अनेक गोष्टींना जाहीरपणे विरोध केला आहे. मी स्वतः साक्षी महाराज कंपनीच्या वाचाळखोरीला इथेच भरपूर विरोध केलेला आहे. हा फोटो येऊन दोन दिवस झाले तरीही आजपर्यंत फेसबुकवर मोदीविरोधात आणि केजरीवाल समर्थनात बोलणार्या एकानेही अवाक्षर काढलेले नाही. हे लोक माझ्यासारख्यांना मोदीभक्त म्हणतात. पण आम्ही भक्त असू तर हे गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नाहीत तर केजरूके गुलाम (जोरूका गुलाम च्या धर्तीवर).फारच किळसवाणी जमात आहे ही.
हे गुलाम लोक काय करायचे ते करतील.पण केजरीवालांनी आपण स्वतः भ्रष्टाचारविरोधी असल्याचा दावा करून कायम मॉरल हायग्राऊंड कायम घेतली होती त्या केजरीवालांचे पाय मातीचे नाही तर चिखलाचेच आहेत हे लवकरात लवकर भारतातल्या जनतेला समजावे असे मात्र फार वाटते."
अ
अर्धवटराव
Sat, 03/26/2016 - 19:28
नवीन
मागे मिपावर मोदि आणि अंबानींच्या गळाभेटीवर यथेच्च गळे काढणारे, कमालीची एकसंघ मानसीकता वगैरे फेकाफेकी करणारे महात्मा केजरी-लालुंच्या फोटूवर काय प्रवचन बडबडले असते? कि मूग गिळुन गप्प बसले असते ?(असं सोयीस्कर गप्प बसण्यात ते अत्यंत तरबेज होते)
व
विवेक ठाकूर
Sat, 03/26/2016 - 17:30
नवीन
त्याची खंत काढणं चालूये !
त
तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 17:45
नवीन
=))
L
lakhu risbud
Sat, 03/26/2016 - 18:21
नवीन
मुद्दा काय आहे आणि तुम्ही कोणाला त्यात ओढता आहात वर त्यावर अनुमोदन पण मिळाले
यावरूनच कळते गुलाम नं १ आणि गुलाम नं २ कोण ते.
L
lakhu risbud
Sat, 03/26/2016 - 18:25
नवीन
वो अगर कहे कि हात धोना अच्छी सेहत के लिये अनिवार्य है
तो हम विरोध प्रदर्शित करने के लिये हात चाटेंगेही चाटेंगे
ह
होबासराव
Sun, 04/10/2016 - 22:25
नवीन
युगपुरुष ह्यांना काल पुन्हा कोणितरी जोडा फेकुन मारला.
गुर्जि मागे एका स्त्री ने शाई फेकली होति ह्या सुर्यावर ति सुध्दा आप शेना का आप कि शेना ह्या पक्षाचिच होति ना ?
एक गोष्ट नोटिस केलि का कोणि कि कन्हैय्या आणि मंडळि नि ह्यांचा यु.एस.पी. आधिच कमि केलाय. पण हि आत्ताचि न्युज सुद्धा काहि फार काहि दळलि नाहि चॅनेल वाल्यानी.
श
श्रीगुरुजी
Mon, 04/11/2016 - 11:17
नवीन
'रोज मरे त्याला कोण रडे' अशी केजरीवालांवर पादत्राणे फेकणार्या घटनांची अवस्था झालीये. संपूर्ण देशभरात ठराविक कालावधीनंतर फक्त केजरीवालांच्याच बाबतीत हे प्रकार कसे घडतात (का घडविले जातात?) हे एक गूढच आहे. त्यांच्या कानाखाली जाळ काढणार्यांचे किंवा त्यांच्यावर पादत्राणे/शाई फेकणार्यांचे पुढे काय होते हे आजतगायत समजलेले नाही.
नेहमीप्रमाणे कालच्या प्रकारानंतरही त्यांनी सर्वात पहिला आरोप भाजपवर केला आहे. बूट फेकणार्या वेद प्रकाश नावाच्या व्यक्तीने बूट फेकण्यापूर्वी दिल्लीतील एका भाजप नेत्याला फोन केला होता असे आआप नेत्यांचा आरोप आहे. वेद प्रकाशला पडल्यानंतर आआप कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले व त्याचे फोन रेकॉर्डही तपासले. परंतु त्याने कोणत्या भाजप नेत्याला फोन केला होता हे त्यांना सांगता आले नाही.
दोन वर्षांपूर्वी केजरीवालांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी थोबाडीत मारण्यात आली. तीनही वेळा त्यांनी तातडीने या प्रकारासाठी भाजपवर आरोप केले. नंतर दुसर्या दिवशी हे उघडकीला आले की त्यांना थोबाडीत मारण्याचा शो मॅनेज करणारे आआपचेच कार्यकर्ते होते. त्याच काळात योगेंद्र यादवांना शाई फासणारा माणूस देखील आआपचाच होता हेही उघडकीला आले. या सर्व नौटंकी प्रकारानंतर आआपवाले उघडे पडून तोंडघशी पडले.
सहानुभूती व सवंग लोकप्रियतेसाठी असले मॅनेज्ड प्रकार आआपवाले स्वतःच घडवून आहेत असे चित्र दिसायला लागल्यावर नंतरच्या काळात आआपने स्ट्रॅटेजी बदललेली दिसते. आता हे प्रकार आम आदमी सेना या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहेत. म्हणजे यात आआपचा संबंध नसून यामागे दुसरेच कोणीतरी आहे व ते भाजपच्या सांगण्यावरूनच होत आहेत असा कांगावा करायला आता आआपचे नेत मोकळे आहेत.
मुळात अशा पादत्राण/शाई फेकी विरूद्ध बोलण्याचा आआपच्या नेत्यांना कणभरही हक्क नाही. २०१३ मध्ये एका पत्रकार परीषदेत तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम् बोलत असताना जर्नेल सिंग नावाच्या पत्रकाराने त्यांच्या बूट फेकला होता. त्याच जर्नेल सिंगला केजरीवालांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आआपचे तिकीट दिले होते.
वृत्तवाहिन्यांवर आपली छबी दिसेनाशी झाली व लोकप्रियतेला ओहोटी लागण्याची चिन्हे दिसायला लागली हमखास केजरीवालांवर बूट किंवा शाई फेकण्याची नौटंकी घडविली जाते. यावेळीही तसेच घडलेले आहे.
ह
होबासराव
Mon, 04/11/2016 - 11:26
नवीन
जर्नेल सिंग विषयि माहित नव्हत, जर असे असेल तर मग काय बोलावे.
लोकप्रियतेला ओहोटी लागण्याची चिन्हे दिसायला लागली
नवयुगपुरुषाने ह्यांचा यु.एस.पी कमि केलाय, आणि आता स्वतः सुद्धा वाहिन्या, मिपावरुन गायब झालाय. मेरे कु तो ये बौत बडा झोल लगता है.
श
श्रीगुरुजी
Mon, 04/11/2016 - 12:00
नवीन
http://www.ndtv.com/elections-news/aap-fields-man-who-hurled-shoe-at-p-chidambaram-for-lok-sabha-polls-551022
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 04/11/2016 - 11:22
नवीन
आचार्य अत्रे उवाच--
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जोरात चालू असताना एका सभेत कोणीतरी स.का.पाटील आणि काकासाहेब गाडगीळांवर जोडे फेकले.त्यावर आचार्य अत्रे म्हणाले--"काँग्रेस नेत्यांवर आणि मंत्र्यांवर कोणी जोडे फेकून मारू नयेत.कारण तो जोड्यांचा अपमान आहे".
तसेच काहीसे या आआपमधील नौटंकीविषयी लिहावेसे वाटते.
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 04/11/2016 - 07:27
नवीन
आपले युगपुरूष ज्याला सायबाच्या भाषेत Run with the hare and hunt with the hounds म्हणतात ते करण्यात अगदीच वाकबगार आहेत हे परत एकदा सिध्द झाले आहेच.
पंजाब आणि हरियाणात सतलज-यमुना कालव्याचा वाद गेल्या कित्येक दशकांपासून चालू आहे. आणि युगपुरूषांना आपला पक्ष दोन्ही राज्यांमध्ये वाढवायचा आहे.खरे तर अशावेळी कोणत्याही जबाबदार पक्षाची अडचण व्हायला हवी.कारण कोणतीही एक बाजू घेतली तर दुसर्या राज्यात त्याचा परिणाम होणार!! पण असल्या लहानसहान अडचणींना घाबरतील तर ते आपले युगपुरूष कसले. त्यांनी तर एक मस्त शक्कल लढवली.ती अशी---
पंजाबात जाऊन पंजाबची बाजू घ्यायची
आणि दिल्लीत परतल्यावर हरियाणाची बाजू घ्यायची आणि पंजाबात जाऊन ज्या कालव्याला विरोध केला त्याच कालव्याच्या समर्थनार्थ (हरियाणाची बाजू घेऊन) कोर्टात प्रतिज्ञापत्र द्यायचे--
आणि दोन्ही बाजूंकडून लाथा पडायला लागल्या की मग वड्याचे तेल वांग्यावर या न्यायाने दिल्ली जल बोर्डाच्या ज्या वकिलाने कोर्टात हरियाणाची बाजू घेऊन प्रतिज्ञापत्र दिले होते त्याला कामावरून काढायचे .
उत्तम. चालू द्या.
श
श्रीगुरुजी
Tue, 04/12/2016 - 11:13
नवीन
अजून गंमत अशी की आता हे लातूरला दिल्लीतून तब्बल २ महिने दररोज १० लाख लिटर पाणी देण्यास तयार आहेत. जर दिल्लीत एवढे जास्त पाणी असेल तर ते हरयानाला देण्यास काय समस्या आहे? त्यांना माहित आहे की दिल्लीतून कोणीही लातूरला पाणी नेण्याची अव्यवहार्य योजना अंमलात आणणार नाही. म्हणून तर निव्वळ मोठेपणा घेण्यासाठी असल्या सवंग घोषणा करायच्या.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/delhi-cm-kejriwal-writes-to-pm-offering-help-to-flag-off-water-train-from-delhi-to-latur/articleshow/51790606.cms
- «
- ‹
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- ›
- »