Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरूके गुलाम

क
क्लिंटन
Tue, 03/31/2015 - 18:20
🗣 893 प्रतिसाद
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया द्या
206836 वाचन

💬 प्रतिसाद (893)
ग
गॅरी ट्रुमन Mon, 04/11/2016 - 07:40 नवीन
रच्याकने, पंकज नारंग यांची हत्या होऊन १५ दिवस लोटले. आपले युगपुरूष त्यांच्या कुटुंबियांना अजून भेटायला गेले की नाही? हा मनुष्य त्याला ज्या कामासाठी दिल्लीच्या लोकांनी निवडून दिले आहे ती सोडून इतर सर्व गोष्टी करत आहे. आय.डी.बी.आय बँकेच्या खाजगीकरणाला युगपुरूषांचा विरोध, सराफांवरील १% कराला युगपुरूषांचा विरोध, सी.रंगराजन समितीने दिलेल्या सूत्राप्रमाणे गॅसच्या किंमती ठरवायला युगपुरूषांचा विरोध, उत्तर प्रदेशात खून झाला-- युगपुरूष तिथे धाऊन गेले. हैद्राबादमध्ये आत्महत्या झाली--युगपुरूष तिथे धाऊन गेले. फक्त दिल्लीमध्ये पंकज नारंग यांचा खून झाल्यावर मात्र युगपुरूषांना तिथे जायला अजून वेळ मिळालेला दिसत नाही. सीयाचीनमध्ये बर्फात गाडल्या गेलेल्या हनुमंतप्पांच्या प्रकृतीची चौकशी करायला पंतप्रधानांनाही हॉस्पिटलमध्ये जायला वेळ मिळाला पण युगपुरूषांना नाही. या युगपुरूषांना वेळ कशाला मिळतो? तर बॉलिवुडमधले चित्रपट बघायला आणि त्याचे रिव्ह्यू लिहायला. दिल्लीतल्या लोकांनी मुख्यमंत्री निवडून दिला आहे की चित्रपट समिक्षक? बघाच--युगपुरूष म्हणतात--"वो परेशान करते रहे हम फिल्म के उपर फिल्म देखते रहे"!! Image removed. (या असल्या ढोंगी युगपुरूषाला जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे, ज्या पध्दतीने शक्य होईल त्या पध्दतीने आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा उघडे पाडायची प्रतिज्ञा केलेला) ट्रुमन
श
श्रीगुरुजी Mon, 04/11/2016 - 11:24 नवीन
केजरीवाल हे कमालीचे नाटकी आणि अंतर्बाह्य ढोंगी आहेत. जिथे जिथे मतांची बेगमी होण्याचा संभव असतो तिथेतिथे जाऊन भडक भाषणे देणे आणि प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपणे हे त्यांचे प्रकार सातत्याने सुरू असतात. दिल्लीत असून पंकज नारंगच्या कुटुंबियांना भेटण्यास यांना वेळ नसतो, पण उत्तर प्रदेश, हैद्राबाद इ. ठिकाणी जाऊन प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपण्यात मात्र यांच्याकडे वेळच वेळ असतो.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 04/12/2016 - 11:22 नवीन
धागा काढायचा आणि सहा शतकी प्रतिसाद द्यायचाही मान माझाच :) Image removed.
र
राघवेंद्र Wed, 04/13/2016 - 16:46 नवीन
+१
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 05/09/2016 - 16:46 नवीन
केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने पंतप्रधान मोदींच्या डिग्री सर्टिफिकेटवरून जो धिंगाणा चालवला आहे तो खरोखरच शिसारी आणणारा आहे. आज भाजपने पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या डिग्रीच्या कॉपी जगजाहिर केल्या तरी यांची भूणभूण चालूच आहे. म्हणे मार्कशीटवर शेवटच्या वर्षाच्या परिक्षेचे वर्ष १९७८ आणि डिग्री सर्टिफिकेटवर १९७९. काय बिनडोकपणा आहे हा. दीक्षांत समारंभ बहुतांश वेळा पुढच्या वर्षी होतो हे यांना माहित नाही का? आणि खाली दिलेल्या बी.ए च्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये परीक्षा १९७८ मध्ये झाली हे अगदी स्पष्टपणे लिहिले आहे. Image removed. दुसरे म्हणजे पहिल्या वर्षाच्या मार्कलीस्टवर नरेंद्रकुमार दामोदरदास मोदी असे लिहिले आहे तर दुसऱ्या वर्षापासून नरेंद्र दामोदरदास मोदी लिहिले आहे. म्हणजे या दोन व्यक्ती वेगळ्या आहेत हे कशावरून सिध्द होते? प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात उल्लेख आहे की ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींबरोबर ज्या चार मंत्र्यांना शपथ द्या अशी यादी राष्ट्रपतींकडे दिली होती त्यात "प्रणवकुमार मुखर्जी" हे नाव होते. याचा अर्थ ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेणारे आणि सध्या राष्ट्रपती असलेले ही दोन वेगळी माणसे आहेत का? तिसरे म्हणजे त्यात त्या मकराश्रू फेम आशुतोषने मागणी केली की मोदींनी ज्या केंद्रातून परीक्षा दिली त्याचे नाव सांगावे. उद्या म्हणतील त्या केंद्रातल्या कुठल्या वर्गातून परीक्षा दिली, कुठल्या बाकावरून परिक्षा दिली ही पण माहिती सांगावी. या रिकामटेकड्या लोकांना काही कामधंदे नाहीत म्हणून हे वाटेल त्या मागण्या करतील. म्हणून इतरांनी यांच्या मागण्या मान्य करायच्या की काय?

If Modi appeared for BA exam then he should tell the centre where he wrote his exam ?

— ashutosh (@ashutosh83B) May 9, 2016
चौथे म्हणजे यांच्या कळपातल्या राघव चढ्ढाने मागणी केली की जितेंद्रसिंग तोमरला त्याने आपण ज्या कॉलेजचा विद्यार्थी होतो हा दावा केला होता त्या कॉलेजात नेऊन वर्ग, कॅन्टिन, लायब्ररी इत्यादी ठिकाणे कॉलेजात कुठे आहेत ते दाखवायला सांगितले तसे मोदींबरोबरही करावे. म्हणजे मोदी हे external विद्यार्थी होते त्यामुळे ते फॉर्म भरणे किंवा तत्सम कामाशिवाय फारवेळा त्या ठिकाणी गेले असायची शक्यता जवळपास शून्य. आणि ते पण ३५-४० वर्षांपूर्वी. म्हणजे २०१६ मध्ये आपण पंतप्रधान असणार आणि राघव चढ्ढा नामक अडाणी माणूस असली काहीतरी फालतूची मागणी करणार म्हणून मोदींनी ३५-४० वर्षांपूर्वी इमारतीतील ऑफिसे, फॉर्म सबमिशनच्या खिडक्या कुठे आहेत हे सगळे लक्षात ठेवायला हवे होते तर!! पाचवे म्हणजे गुजरात विद्यीपीठातील एम.ए च्या सर्टिफिकेटमध्ये Entire Political Science असे लिहिले आहे. आणि Entire Political Science म्हणजे काय? मला माहित नाही. पण समजा एखाद्याने इतिहास आणि राज्यशास्त्र ही दोन majors घेतली असतील तर सर्टिफिकेटवर History + Political Science आणि एकच major घेतले तर Entire Political Science असे लिहिले जात असावे ही शक्यता जास्त. Image removed. सहावे म्हणजे श्री.रा.रा केजरीवाल यांनी म्हटले की भाजपकडे हे documents आलेच कुठून. दिल्ली विद्यापीठात ते documents सीलबंद आहेत!! म्हणजे चारच दिवसांपूर्वी हे महापुरूष म्हणत होते की दिल्ली विद्यापीठाकडे अशी कोणतेही कागदपत्र नाहीत. मग आता नक्की कोणती कागदपत्रे सीलबंद आहेत असे या महापुरूषांना म्हणायचे आहे? Image removed. २००१ मधील एका मुलाखतीत मोदींनी म्हटले की हायस्कूलनंतर त्यांनी गाव आणि शिक्षण सोडले. त्यानंतर लगेच पुढच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की संघातील कोणाच्या आग्रहामुळे त्यांनी बी.ए आणि एम.ए पण केले. पण केजरूच्या गुलामांनी मुलाखतीचा केवळ पहिला भाग (बी.ए आणि एम.ए चा उल्लेख यायच्या आधीचा) सोशल मिडियावर व्हायरल केला. कुणाला वाटावे खरंच मोदी खोटे बोलत आहेत. हे दोन्ही भाग खाली बघायला मिळतील: भाग पहिला: भाग दुसरा: या केजरीवाल आणि आम आदमी पार्टी या दोघांनाही काहीही कामधंदे नाहीत का? दिल्लीत सरकार चालवायची जबाबदारी सोडून इतर सगळ्या विषयांवरून हे धुराळा उडवत आहेत. की ऑगस्टा प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित करायचा यांचा प्रयत्न आहे यांचा? इतका गुडघ्यातला नेता आणि इतका हलकट राजकीय पक्ष १९४७ पासून भारतात झालेला नाही हेच खरे.
य
यश राज Mon, 05/09/2016 - 17:10 नवीन
या केजरीवाल आणि आम आदमी पार्टी या दोघांनाही काहीही कामधंदे नाहीत का? दिल्लीत सरकार चालवायची जबाबदारी सोडून इतर सगळ्या विषयांवरून हे धुराळा उडवत आहेत. की ऑगस्टा प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित करायचा यांचा प्रयत्न आहे यांचा? इतका गुडघ्यातला नेता आणि इतका हलकट राजकीय पक्ष १९४७ पासून भारतात झालेला नाही हेच खरे.
+१११११११११११११११११११११११ यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की या नतद्रष्टांना कामे करायचीच नाहीत नुसता धुरळा उडवायचाय. आणि विशेष म्हणजे हे नाटक "ऑगस्टा" च्या कालावधीत सुरु आहे यावरूनच संशयाला वाव आहे की युगपुरुष त्यांच्या 'टीम - ए' ला पाठीशी घालताहेत.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
काळा पहाड Mon, 05/09/2016 - 21:01 नवीन
श्री. केजरीवालांच्या बद्दल देशात संताप वाढत चालला आहे. त्यांनी त्यांच्या चेहर्‍याची आणि पार्श्वभागाची काळजी घ्यावी हेच खरं.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
त
तर्राट जोकर Mon, 05/09/2016 - 21:03 नवीन
देशात = मोदीभक्तांत. बरोबर??
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सुज्ञ Tue, 05/10/2016 - 02:21 नवीन
देशात = मोदीभक्तांत असे आपणास का वाटले ? देश म्हणजेच मोदिभक्त असे काळापहाड यांचे म्हणणे आहे असे आपणास वाटत असेल तर त्यांना असेच म्हणायचे होते ( देश = मोदिभक्त ) याबद्दल काही विदा द्या .
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 05:47 नवीन
मीच शंका विचारली आहे दोन दोन प्रश्नचिन्हे टाकून त्यांना हे आपल्याला कळले नाही काय? मीच त्यांना विचारतोय की त्यांना ( देश = मोदिभक्त ) असेच म्हणायचे आहे काय.
↩ प्रतिसाद: सुज्ञ
च
चिनार Tue, 05/10/2016 - 06:21 नवीन
तजो...मोदींची डिग्री या सुरु केलेल्या वादाविषयी तुम्हाला काय वाटते ते लिहावे ही विनंती.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 06:54 नवीन
=)) बाकी काय नाही. हे एन्टायर पॉलिटिकल सायन्स काय आहे ह्याची उत्सुकता आहे. कोण्या सीएम ने कोण्या पीएम ची डिग्री मागणे आणि त्याच्या बगलबच्च्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या दाखवणे ह्याचा अर्थ देशात लैच रिकामटेकडे लोकं राज्य करत आहेत असं सामान्य माणसानं सम्जून घ्यावं.
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Tue, 05/10/2016 - 07:18 नवीन
"देशात लैच रिकामटेकडे लोकं राज्य करत आहेत असं सामान्य माणसानं सम्जून घ्यावं" सहमत ! "सीएम ने कोण्या पीएम ची डिग्री मागणे" हाच माझा मुद्दा आहे आणि हे जास्त क्लेशदायक आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ग
गॅरी ट्रुमन Tue, 05/10/2016 - 07:21 नवीन
हे एन्टायर पॉलिटिकल सायन्स काय आहे ह्याची उत्सुकता आहे.
तुमच्यासारखे लोक कितीही पुरावे दिले तरी काहीतरी खुसपटे काढतच राहणार. हे नाहीतर ते. मी वर "एन्टायर पोलिटिकल सायन्स" म्हणजे काय असेल याविषयीचा तर्क लिहिला होता तो बरोबर होता हे खुद्द गुजरात युनिव्हर्सिटीच्याच संकेतस्थळावरून स्पष्ट झाले आहे. खुद्द गुजरात युनिव्हर्सिटी M.A with Entire History ही पदवी अजूनही देते हे स्पष्ट होईलच. अशीच "एन्टायर पोलिटिकल सायन्स" ही पदवी त्यावेळी कशावरून देत नसतील? उगीच फालतू मुद्द्यावरून राळ उठवत राहायची हा तुमच्यासारख्यांचा (व्यक्तिश: तुम्ही नाही तर केजरू समर्थक) खाक्याच आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 08:30 नवीन
ट्रुमन साहेब, माइन्ड युवर लॅन्ग्वेज सर. "तुमच्यासारखे" लोक म्हणजे??? माझे स्वतः पोलिटिकल सायन्समधे बी ए झाले आहे. आयुष्यात पहिल्यांदा 'एन्टायर पोलिटिकल सायन्स' अशी काही पदवी असते हे कळले त्याबद्दल जेन्युइन उत्सुकता होती. माझ्यापेक्षा अधिक ज्ञानी माहितगाराने ती द्यावी म्हणून प्रश्न उपस्थित केला होता. बाकी तुमचा तर्कः एम ए विथ एन्टायर हिस्टरी आहे म्हणून एम ए विथ एन्टायर पॉलिटिकल सायन्स "असू शकते" हा तर्क तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिकडून अपेक्षित नाही. गुजरात विद्यापिठातून ह्या विषयावर पदवी मिळवणारे मोदी एकमेव असू शकतील किंवा कसे ह्याबद्दल माझी वैयक्तिक काही भूमिका नाही. तसेच 'मी केजरुसमर्थक नाही' ह्यासाठी अग्निपरिक्षा द्यावी लागेल काय, जेणेकरुन प्रश्न उपस्थित करणार्‍या माझ्यासारख्या उत्सुकांची गरजहीन हेटाळणी बंद होईल?
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम Tue, 05/10/2016 - 08:48 नवीन
तजो हे मिपावरचे अरविंद केजरीवाल आहेत. एखाद्या विषयाचे सहा पेपर्स जेव्हा तुम्ही देता तेव्हा त्याला entire किंवा major असं म्हटलं जातं. पण त्यांच्या विद्यापीठात तसं म्हटलं जात नाही म्हणजे जगातल्या कुठल्याच विद्यापीठात म्हटलं जात नाही हे typical केजरीवाल style गृहीतक त्यांनी इथे मांडलंय त्यावरून हे सिद्ध होतंच. आणि तजो, तुमच्या भाषेचे पुरावे इथे देऊ का? Mind your language असं दुस-याला म्हणताना तुमची स्वतःची भाषा किती छान आहे ते दाखवणारं एक अप्रतिम उदाहरण आहे इथे. http://www.misalpav.com/user/26378/guestbook.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 09:09 नवीन
बोकाशेठ, दुसर्‍याच्या खरडी मेनबोर्डावर टाकू नये इतका विधिनिषेध नसणारांनी मला शिकवू नये असे म्हणेन. मी कुठलंच गृहितक इथे मांडलं नाही. मला खरोखर हा 'एन्टायर पोलिटिकल सायन्स' विषय माहित नाही हे जेनुइनली सांगतोय त्यावर स्पष्ट उत्तर द्यायचे सोडून इथले सदस्य अशा पद्धतीने अटॅक करत असतील तर दुर्दैव आहे. माझी मानहानी करुन तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही तर तुम्ही फार कच्च्या मनाचे आहात, खवळले आहात, तुमचं संतुलन बिघडतंय हेच सिद्ध होतं. बाकी, तुड्तुडीच्या खरडवहीतली माझी खरड ही कायम बचावासाठी वापरली जाणार असेल तर विरोधी पक्ष फारच कमकुवत आहे हे दिसून येतंय. मुद्दे नसल्याची खूण आहे ही. अगदी हास्यास्पद पवित्रा.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 05/10/2016 - 09:18 नवीन
अगोदर मान आणा मग मानहानीबद्दल बोलू आपण. बाकी यावरून तुम्ही मिपावरचे केजरीवाल आहात हे सिद्ध होतंच आहे. आणि तुम्ही काहीही लिहावं आणि इतरांनी त्याचा वापर तुमच्या वागण्यातली विसंगती दाखवण्यासाठी करु नये अशी तुमची अपेक्षा असणं यावरून तर तुमचं अरविंदत्व अगदी निर्विवाद सिद्ध होतंय. मुद्दे तुमच्याकडे नाहीयेत. आणि एका व्यक्तीच्या आईबद्दल असं लिहिणाऱ्याने मला खवळलेलं, संतुलन बिघडलेलं वगैरे म्हणावं हा त्याहून दुसरा जोक. पण शेवटी जोकर आणि तोही तर्राट, त्यामुळे काय अपेक्षा करणार?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 09:28 नवीन
सरपंच, मालक. ह्या विषयाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावाल काय? इथे तुडतुडीच्या खरडीबद्द्ल चर्चा करायची आहे काय? परत परत मला तेच लिहायला लागेल काय? तुडतुडीचे प्रतिसाद डिलिट झालेत ते बघितले असते तर परत परत तुडतुडीच्या खरडवहीतले माझे लेख्न इथे स्वतःच्या बचावासाठी वापरले नसते. बोकाशेठ, एवढं भडकायला तुम्हाला काय झालंय? ट्रुमनसाहेबांचे वकिलपत्र घेतलंय काय? एक साधासा प्रश्न मोदीभक्तांना किती टोचू शकतो हे बघून आनंद होतोय. सरळ प्रश्नाला सरळ उत्तर देता येत नाही म्हणून थयथयाट का करायला लागतोय? जो कोणी मोदीविरोधक आहे तो कॉन्ग्रेस्सी, आप्टार्ड, केजरीवाल समर्थ्क, देशद्रोही अशी लेबलं लावण्यातच मोदीभक्तांची बुद्धी (असलीच तर) खर्च होत आहे हे पाहून मजा वाटते.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 05/10/2016 - 10:04 नवीन
काहीही म्हणणं नाही. अगदी अश्लाघ्य शब्दांत करा. काहीही फरक पडत नाही. पण कसं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्याला Mind your language वगैरे सल्ला देता तेव्हा त्या सल्ल्याप्रमाणे आपण स्वतः वागतो का हे बघा. मी असले सल्ले देत नाही आणि त्यामुळे असली वेळही माझ्यावर येत नाही. आता प्रश्न ट्रूमनभौंचा - तर ते माझे मित्र आहेत. त्यांच्यावर कुणी काही आरोप केला तर पुढे येणं ही अगदी साहजिक प्रतिक्रिया आहे. आणि हेही सांगू इच्छितो की तुम्हीही माझे मित्र आहात. उद्या तुमच्यावर कुणी असले आरोप केले तर मी तुमच्याही बाजूने उभा राहीन. शंका नसावी. राहता राहिला प्रश्न तुमच्या खरडीचा. त्यातल्या मजकुराबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे हा प्रश्नच नाही. फक्त समोरच्याला त्याच्या भाषेवरुन बोलताना आपणही कधी काळी अश्लाघ्य भाषा वापरलेली आहे याचा विसर पडू देऊ नका.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 10:32 नवीन
साहेब, कुणी मला दुरान्वयानेही 'केजरीसमर्थक' म्हणणे माझा अपमान वाटतो. त्यासाठी त्यांना तसे बोललोय. बाकी मित्र वैगरेंचा प्रश्न. तर तो तुमच्या दोघांमधे वैयक्तिक राहिलेला बरा. कंपुबाजीसाठी 'मित्र आहोत' ही भलामण योग्य वाटत नाही. ज्याच्यात्याच्या लायकीप्रमाणे भाषा मी वापरतो. ज्याच्यासाठी जशी भाषा वापरली ती त्याला त्याच भाषेत समजतं हे लक्षात आल्यामुळे. बाकी ती खरड आपण नेहमी नेहमी चर्चांमधे वापरत राहणार असाल तर असो. मला चर्चा करतांना असल्या कुबड्यांची गरज भासत नाही. म्हणून मी कोणाच्याही कोणत्याही खरडी इथे मेनबोर्डावर आणत नाही. विसंगती दाखवण्यासाठी तुम्ही इथे ती खरड आणली ही लंगडी सबब आहे. माझ्याशिवाय इतर कोणा आयडीने हाच प्रतिसाद दिला असता तर आपण कोणाची खरड आणायला गेला असता? मुद्द्यांची लढाई मुद्द्यांनी करावी. चीप मेथड्स वापरुन तुमचा पवित्रा 'पवित्र' होत नाही हे लक्षात असू द्यावे.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गॅरी ट्रुमन Tue, 05/10/2016 - 10:48 नवीन
ज्याच्यात्याच्या लायकीप्रमाणे भाषा मी वापरतो.
इतरांची लायकी ठरविणारे तुम्ही कोण? कोणी अधिकार दिला तो तुम्हाला? आणि तुम्ही इतरांची लायकी काढत असाल तर तुमचीही लायकी कोणीतरी कधीतरी काढणारच हे गृहित धरायला हवे. मग तक्रार करून उपयोग नाही.
कुणी मला दुरान्वयानेही 'केजरीसमर्थक' म्हणणे माझा अपमान वाटतो.
तुम्ही जर इतरांच्या लायकीवर टिप्पणी करत असाल तर तुमचे मान आणि अपमान इतरांनी सांभाळावेत ही अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता?बरं तुम्ही काही वाटेल ती अपेक्षा कराल पण तुमची ती अपेक्षा पूर्ण होईलच असल्या भ्रमात मात्र राहू नका इतकेच. रच्याकने, मिपा सारख्या सुसंस्कृत लोकांच्या संकेतस्थळावर इतरांची लायकी काढायच्या प्रवृत्तीला मज्जाव असावा असे मनापासून वाटते.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 11:10 नवीन
ओके, म्हणजे तुम्हाला 'सर, साहेब' म्हणून मान देणे चुकीचे व तुम्ही कोणालाही तुमच्या इच्छेनुसार केजरु समर्थक म्हणून हेटाळणी करणे योग्य. धन्यवाद ह्याबद्दल. बाकी मी तुमची लायकी काढलेली नाही. बोकांनी तुमच्या मित्रत्वाचा आव आणून तुडतुडीच्या खरडवहीतली खरड इथे आणुन चिकटवली त्या तुडतुडीच्या भाषेची लायकी काढली. मला हे इतके स्पष्टीकरण का द्यावे लागत आहे? मिपासारख्या सुसंस्कृत लोकांच्या संकेतस्थळावर एखाद्या सदस्याला आगापिछा माहित नसतांना वाट्टेल ते लेबल चिकटवून लगे हात हेटाळणी करुन आपला अहं सुखावून घेणार्‍यांनी प्रवॄत्तींबद्दल टिप्पणी करावी हे मजेशीर आहे. तसेच कुणालाही केजरुसमर्थक म्हणून हेटाळणी करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिलाय ते कळले तर बरे होईल.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
य
यश राज Tue, 05/10/2016 - 11:22 नवीन
तसेच कुणालाही केजरुसमर्थक म्हणून हेटाळणी करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिलाय ते कळले तर बरे होईल.
केजरीलाही विरोध करणार्यांना लगेच भक्त म्हणण्याचा अधिकार घटनादत्त असतो का ??????
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 11:41 नवीन
"मोदींसाठी कायपण" वाल्यांना भक्त म्हणतात. केजरी मोदींच्या विरोधात आहे म्हणून भक्तांची जळजळ होते आहे. तोच सोनियाच्या विरोधात असता तर दिल्लीत रामराज्य अवतरल्याची ग्वाही मोदीभक्त फिरले असते. =))
↩ प्रतिसाद: यश राज
य
यश राज Tue, 05/10/2016 - 12:36 नवीन
"मोदींसाठी कायपण" वाल्यांना भक्त म्हणतात.
त्याप्रमाणेच बिनबुडाचा मोदीविरोध करणार्यांना केजरी चे चेले कींवा गुलाम म्हणतात.
केजरी मोदींच्या विरोधात आहे म्हणून भक्तांची जळजळ होते आहे. तोच सोनियाच्या विरोधात असता तर दिल्लीत रामराज्य अवतरल्याची ग्वाही मोदीभक्त फिरले असते. =))
यावरुन तर बोलणेच खुंटते कि विरोध करणार्यांना देशात चाललेल्या भ्रष्टाचारापेक्षा मोदीविरोध करणात जास्त रस आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Tue, 05/10/2016 - 11:43 नवीन
तुम्ही त्या खरडीत वापरलेली भाषा अगदी सुंदर आणि अनुकरणयोग्य आहे असा आपला दावा आहे काय? त्यात आपण तुडतुडी यांना त्यांच्या अाईवरुन जे काही लिहिलेलं आहे ते वाचल्यावर लोकांनी पुष्पवृष्टी करावी अशी तर ती भाषा नक्कीच नाहीये. बरं, त्यावरून लोकांनी तुम्हाला काहीही बोलू नये अशी तुमची अपेक्षा आहे काय? ते public domain मध्ये आहे अाणि public चा एक घटक म्हणून मला त्यावर टिप्पणी करायचा किंवा जेव्हा त्या खरडीचा लेखक दुसरीकडे एखाद्याला Mind your language म्हणून चारचौघांत आवाज देतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या भाषेचा पुरावा म्हणून द्यायचा पूर्ण अधिकार आहे. मग तुम्हाला संपादक किंवा मालक काही बोलले असोत वा नसोत. मी पुन्हा एकदा सांगतोय. मी तुमच्या खरडीवर काहीच बोललो नाही. माझा प्रतिसाद वाचा. तुम्ही ती खरड लिहिलीत ही वस्तुस्थिती आहे. तुम्हीच ट्रूमन यांना Mind your language म्हणालात हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि या दोन गोष्टींमधली विसंगती मी वाचकांसमोर आणलीय. Why so serious?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 11:51 नवीन
दोन व्यक्तींमधल्या खरडी मेनबोर्डावर आणू नये असे मिपाचे अधिकृत धोरण आहे. ह्याऊप्पर तुम्हाला जो काय थयथयाट करायचा असेल ना तो करा. त्या खरडीबद्दल मी मिपामालक सोडून कोणालाच कसलेच स्पष्टीकरण देणे लागत नाही. कोणीही त्याबद्दल स्पष्टीकरण मागायचा, टिप्पणी करायचा चोंबडेपणा करण्याची काहीएक गरज नाही. तुम्हाला इथे लोकांच्या खरडी चिकटवण्याचा मालकांनी स्पेश्यल परवाना, अधिकार दिला असेल तर त्याचा पुरावा द्यावा. अन्यथा अनेकांच्या अनेक खरडी इथे जाहीर करण्यास व त्यावर यथेच्छ काथ्या कूटण्यास मिपा मालकांकडून मुभा आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 05/10/2016 - 12:01 नवीन
यात
दोन व्यक्तींमधल्या खरडी मेनबोर्डावर आणू नये असे मिपाचे अधिकृत धोरण आहे.
असं कुठे म्हटलंय ते दाखवा. नमस्कार, आज दिनांक १३/०७/१० ला मिसळपावच्या धोरणांना प्रसिध्दी देतांना आनंद होत आहे. ही धोरणे मिसळपावची यापुढील मार्गदर्शक असतील. यापुढे मिसळपाववर वावर करतांना आणि लेखन करतांना सदस्यांना ही धोरणे मान्य आहेत असं गृहीत धरल्या जाईल. १. मिसळपावावरील लेखनात ललित किंवा वैचारिक लेखन, गद्य, पद्य, पाककृती यांना स्थान दिले जाईल. या व्यतिरिक्त खेळीमेळीचे धागे मिसळपावावर ठेवले जातील. लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल. एखाद्या सदस्याने मिसळपावाचे सदस्यत्व सोडले असता त्याचे लेखन प्रकाशित ठेवण्याचा किंवा अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेईल. २. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा. ३. आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे झाल्यास मिसळपावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करता येईल. ४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी. ५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करणारे लिखाण, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल. ६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी. ७. संपादकीय धोरणात परिस्थिनुरुप बदल करण्याचे हक्क संपादकांकडे राखीव आहेत. त्याचा वेळोवेळी वापर करता येईल. गरज भासल्यास सदस्यांना जाहीर निवेदनामार्फत तशी सूचना दिली जाईल. ८ . वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी. ९. संकेतस्थळावरील अडचणी, लेखांचे संपादन, संपादनाविषयी तक्रारी यांच्यावर निघणारे धागे संपादन मंडळाला अनावश्यक वाटल्यास त्वरित उडवले जातील आणि त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही. १०. येथील सर्व लेखनप्रकारातील आणि सर्व विषयांवरील लेखन तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद, हे त्या त्या लेखन/प्रतिसाद कर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला मिपा व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. मिसळपावाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी वरील सूचनांचे पालन करावी अशी अपेक्षा आहे. सदस्यांना लेखनविषयक धोरणांची जाणीव करून देण्यास आणि वेळोवेळी मदत करण्यास संपादक मंडळ नेमलेले आहे. लेखनविषयक प्रश्न असल्यास जाहीर लेख न टाकता संपादकांना खरडी किंवा व्यक्तिगत निरोपांद्वारे विचारावेत. संपादक मंडळ या आयडीवर निरोप पाठवूनही हे प्रश्न विचारता येतील.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
क
काळा पहाड Tue, 05/10/2016 - 12:09 नवीन
दोन व्यक्तींमधल्या खरडी मेनबोर्डावर आणू नये असे मिपाचे अधिकृत धोरण आहे.
हे कुठे प्रकाशित आहे हे कृपया सांगू शकाल काय? मी धोरण (येथे: http://www.misalpav.com/node/13199) जावून पाहिलं. मला असं काही सापडलं नाही. एक खालील प्रकारचं धोरण मिळालं.
४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.
पण दोन व्यक्तीं मधील खरडीचा रेफरन्स किंवा खरड मुख्य बोर्डावर आणू नये असं काही मला दिसलं नाही. तुम्ही नक्की कुठल्या धोरण नंबर बद्दल बोलत आहात?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Tue, 05/10/2016 - 11:00 नवीन
तर त्यांनाही customized प्रतिसाद दिला असता. कल्जी क्रू नये. विसंगती दाखवायलाच तुमची खरड दाखवली. रच्याकने खरडवही म्हणजे व्यनि नव्हेत, जे व्यक्तिगत असतात. तुम्ही openly काही लिहिणार आणि लोक त्याचा तुमच्याविरुद्ध वापर करणार नाहीत असं का वाटतं तुम्हाला? Anything that you say can and will be used against you as evidence हे कायद्याचं महत्वाचं तत्व आहे. You are probably learning it the hard way.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 11:14 नवीन
ओ, साहेब. लै झालं. कायदा मला शिकवू नका. मिपाच्या मालकांना सरपंचांना शिकवा.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 05/10/2016 - 11:54 नवीन
बरं, कायदा शिकवण्याने किंवा न शिकवण्याने काहीच फरक पडत नाही. कायदा माहीत नसणं ही सबब चालत नाही एवढं मात्र सांगू इच्छितो. शिवाय सरपंच आणि मालकांना कायदा शिकवा हे सांगून नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही त्यांच्यापेक्षा वर आहात आणि ते तुमच्या खिशात आहेत किंवा ते तुम्हाला हात लावू शकत नाहीत असं काहीतरी? सांगा सांगा. घाबरु नका. आम्हाला तरी कळू दे, नक्की काय आहे ते.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 11:56 नवीन
मिसळपावचे कायदे तुम्ही ठरवता काय? तुम्ही स्वत: त्यांनी ठरवलेल्या नियमांच्या वर आहात काय? तुम्ही त्यांच्यापेक्षा वर आहात आणि ते तुमच्या खिशात आहेत किंवा ते तुम्हाला हात लावू शकत नाहीत असं काहीतरी? सांगा सांगा. घाबरु नका. आम्हाला तरी कळू दे, नक्की काय आहे ते.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अगम्य Wed, 05/11/2016 - 07:26 नवीन
मराठी शब्दभांडारात एक नवे रत्न जमा केलेत तुम्ही :-)
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
द
दिगोचि Mon, 05/16/2016 - 02:47 नवीन
प्रत्येक विश्वविद्यालय ते देत असलेल्या पदव्याना वेगळि नावे देउ शकते. तेम्व्ह मला अशी अशी पदवी आहे आणि म्हणुन दुसर्या युनिव्हरसिटीने पण त्यान्च्या पदवीला पण हेच नाव दिले पाहिजे हा आग्रह का? या शिवाय गुजराथ युनिवेर्सिटी खोते सान्गत आहे असे म्हणायचे असेल तर उगीच शन्का कुशन्कान्चा गदारोळ उठवण्यापेक्षा कोर्त्टात जाउन त्या युनिवेर्सिटिवर खटला भरून खर्या खोत्याची शहानिशा करून घ्यावी.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी Mon, 05/16/2016 - 10:57 नवीन
+ १ M.C.A. हा अभ्यासक्रम वेगवेगळ्या संस्था चालवितात. या पदवीच्या प्रमाणपत्रावर M.C.A. या शब्दांपुढे कंसात Master of Computer Applications किंवा Master in Computer Applications असे लिहिले असते. यात जरी थोडासा फरक असला तरी ही एकच पदवी आहे.
↩ प्रतिसाद: दिगोचि
म
मोदक Tue, 05/10/2016 - 07:21 नवीन
मुद्दे नसले की असले उद्योग सुचतात आणि जर डिग्री दाखवली नसती तर "बघा बघा त्यांच्याकडे पुरावेच नाहीयेत म्हणून प्रतिवाद करत नाहीयेत" अशी कोल्हेकुई सुरू झाली असती. (अंतर्जालावरसुद्धा.) एकूण काय.. परदेशी NGO चा फुकट मिळणारा पैसा बंद झाल्यामुळे या बाजुने किंवा त्या बाजुने असे मिळेल तेथून मोदींवर टीका करणे सध्या सुरू आहे. (बहुदा अंतर्जालावरसुद्धा.)
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 08:32 नवीन
मी तरी पंतप्रधानाच्या कार्यपद्धती व कार्यक्रम अंमलबजावणीवर जास्त भर देतो. पंतप्रधानांची डिग्री शोधणे आणि दाखवत बसणे रिकामटेकड्या लोकांचे उद्योग आहेत हे वरच नमूद केले आहे.
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 05/10/2016 - 09:03 नवीन
मी तरी पंतप्रधानाच्या कार्यपद्धती व कार्यक्रम अंमलबजावणीवर जास्त भर देतो. अरे व्वा.. वाचून आनंद जाहला. काम दाखव फेकू या असल्या कविता व दिसेल तिथे तुम्ही दाखवणारा मोदी द्वेष या गोष्टी उघड असूनही "तुम्ही पंतप्रधानांच्या कार्यपद्धती व कार्यक्रम अंमलबजावणीवर भर" देता आहात हा अंमळ विरोधाभास आहे हे तुमच्या लक्षात येते आहे का? बाकी तुमची एकंदर वाटचाल बघता, मोदींनी केलेली चांगली कामे सोडून तुम्हाला फालतू मुद्द्यांमध्ये रस आहे हे अनेकदा सिद्ध झाले असतानाही तुम्ही एखाद्या विचारवंताचा आव आणून 'पंतप्रधानांची कार्यपद्धती' वगैरे लिहित आहात याचे आश्चर्य वाटले. असो.. शुभेच्छा.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 09:19 नवीन
अरे वा. एखाद्यावर विनोदी टिप्पण्या करणे हे द्वेषाचे लक्षण आहे माहित नव्हतं. बरोबर, जेव्हा ते मोदी असतात तेव्हा समिकरणं एकशे ऐंशी अंशात बदलतात हे विसरलो होतो. मनमोहनसिंगावर अशा टिप्पण्या देशप्रेमातून होत्या हे आठवतंय अंधुक अंधुक. धन्यवाद! बाकी भक्तांची एकंदर वाटचाल बघता, मोदींनी केलेली चांगली कामे सोडून त्यांनाही फालतू मुद्द्यांमध्ये रस आहे हे अनेकदा सिद्ध झाले असतानाही तुम्ही असे प्रतिसाद देत आहात याचे आश्चर्य वाटेनासे झाले. मोदीविरोधात जरा खुट्ट झाले की तलवारी परजणारे बघून फक्त हसायला येतं. थ्यान्क्स फॉर एन्टरटेनमेंट....
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 05/10/2016 - 09:38 नवीन
एखाद्यावरच सतत द्वेषपूर्ण टिप्पण्या करणे हे विनोदी मानत असाल तर अशा लिखाणामागची अर्थपूर्ण गणिते कळत नाहीत असे नसते म्हणजे तुम्हाला जळीस्थळी मोदी दिसतात तसे मला मनमोहन आणि राहुल दिसत नाहीत यातच तुमचे जे काय आहे ते समिकरण स्पष्ट होते. स्वतःच्या विधानांमधली विसंगती दिसलीकी लगेच मोदीभक्त मोदीभक्त चा जप करायचा आणि मुद्दे सोडून पाय लावून पळून जायचे हे आणखी एकदा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 09:41 नवीन
तुम्ही तुम्हाला काय वाटून घ्यायचे ते वाटून घेण्यास स्वतंत्र आहात. जळीस्थळी मोदी, भाजपबद्दल प्रचारकी लेखन करणार्‍यांची अर्थपूर्ण गणिते तुमच्या चाणाक्ष नजरेतून सोयिस्कर सुटत असतील तर विशेष आहे. बाकी पाय लावून पळालेले दिसणे किंवा कसे हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.
↩ प्रतिसाद: मोदक
च
चिनार Tue, 05/10/2016 - 10:34 नवीन
"एन्टायर पॉलिटिकल सायन्स काय आहे" ह्या विषयाकार कालपरवा गुजरातच्या त्या कुलगुरूंनी माहिती दिली आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 10:40 नवीन
खरडफळ्यावर बोकाशेठ यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. तेच इथे आधी दिले असते तर इतकी हाणामारी करायची गरज नसती पडली. पण ऐकणार कोण?
↩ प्रतिसाद: चिनार
अ
अनुप ढेरे Tue, 05/10/2016 - 06:54 नवीन
स्वतः केजरीवालांचच पॅनकार्ड आणि मतदारयादीत वेगवेगळं नाव आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल, दुसरीकडे अरविंदकुमार केजरीवाल. =))
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
त
तर्राट जोकर Mon, 05/09/2016 - 17:05 नवीन
दिल्लीत सरकार चालवायची जबाबदारी सोडून >> ह्याबद्दल पुरावा देता येईल??
आ
आरोह Mon, 05/09/2016 - 18:01 नवीन
जेव्हडी जास्त वयक्तिक आरोप होतील तेव्हढे मोदींसाठी चांगले आहे.
अ
अर्धवटराव Mon, 05/09/2016 - 21:24 नवीन
आम आदमी पार्टीचं देशाच्या राजकारणाला नवीन दिशा द्यायचं स्वप्न आपल्या वैयक्तीत महत्वाकांक्षेपायी आणि सूडबुद्धीपायी पार मातीत मिळवलं या माणसाने. वेमुला वगैरे प्रकरणात प्रत्येक ठिकाणी पर्सनली जाऊन चोच मारणार्‍या या साहेबांनी बिहारमधे एका आमदाराच्या पोराने माजोरडेपणाने एकाची हत्या केली त्या व्हिक्टीमच्या घरी जाऊन सांत्वन करायची इच्छा झाली नाहि या टुकार इसमाला. आणि या डिग्री प्रकरणात तर काय मर्कट थयथयाट चालवला आहे. अवांतरः पंजाबमधे आम आदमी पक्ष सत्तेत यावा अशी आमची इच्छा आहे.
स
सुज्ञ Tue, 05/10/2016 - 02:09 नवीन
सतत काहीही करून प्रसिद्धीत राहण्याची या मूर्ख टोळीची धडपड विलक्षणीय आहे. सोनिया म्याडम कडे मोदींची काही गुपिते आहेत ( आणि हे मोदी ना माहित आहे ) आणि त्यामुळे मोदी म्याडम ना वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत असा एखाद्या सद्य राजकारणातील अत्यंत तोकडे ज्ञान असणार्या माणसासही सुचणार नाही असा बिनडोकी युक्तिवाद हे युगपुरुष करत आहेत आणि यांचे सर्व गुलाम स्वताच्या मूर्खपणाची चढाओढ लागल्यासारखे हे जे म्हणतील त्यास कोणताही विचार न करता पाठींबा दर्शवत आहेत. तस्मात कुंभार हो … गाढवास तोटा नाही … हे अगदी खरे… चांगला कुंभार मग बरेच गद्धे आपोआप एकत्र आणवतो हे ही तितकेच खरे.
  • «
  • ‹
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा