एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________
💬 प्रतिसाद
(1265)
स
संदीप डांगे
Sat, 02/06/2016 - 10:46
नवीन
अरे वा! बरं का. म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कार्यवाहीसाठी बळ वापरले जातंय तर. भाजपच्या सगळ्या राज्यांमधे झाडून सारे हरिश्चंद्र भरलेत आणि भाजप राज्यांमधे एक रुपयाचाही भ्रष्टाचार आजवर झाला नाही तर...? गुड.
हेमामालिनी प्रकरणाचे काय झाले कुणाला माहिती आहे काय?
श
श्रीगुरुजी
Sat, 02/06/2016 - 11:03
नवीन
दुर्दैवाने युपीएच्या कारकीर्दीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने व युपीएने भ्रष्टाचाराला पूर्ण संरक्षण दिल्याने २०१४ पर्यंत ही प्रकरणे पुढे गेली नव्हती. आता ते संरक्षण गेल्याने खटले सुरू झाले आहेत. त्यामागे बळबिळ वापरले जाण्याचा मुद्दाच नाही. जर भाजप नेत्यांची भ्रष्टाचार केला असेल तर संबंधितांनी खटले भरावेत. येडीयुरप्पावरही युपीएच्या काळात खटले भरले गेले होते, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
स
संदीप डांगे
Sat, 02/06/2016 - 11:12
नवीन
संबंधितांनी म्हणजे कुणी? सध्या भुजबळांच्या मागे इडी लागली आहे बुवा. सरकारी एजन्सी. आधीचे सरकार सिबीआय वापरायचे, हे इडी वापरतात काय? बाकी खूप लोकांची यादी आहे हो. चुन चुन कर फायदा तोटा बघुन कारवाई होणार का असा आम्हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे. वर्षाचा वायदा केला होता साहेबांनी, दोन वर्ष होत आली तर आता कुठे शेपुट झटक्ले आणि भुजबळाच्या नाकात धूळ गेली. हत्ती चालायला कधी लागेल काय माहित. चालेल की नाही तेही नाही माहित.
श
श्रीगुरुजी
Sat, 02/06/2016 - 13:48
नवीन
युपीएच्या काळात कॉंग्रेसने अनेक भाजप नेत्यांविरूद्धही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. बहुतेक आरोप खोटे होते ते आरोप निव्वळ निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात केले गेले होते उदा. कारगिल युद्ध सुरु असताना शवपेट्या खरेदीत जॉर्ज फर्नांडिस यांनी घोटाळा केला असा आरोप सोनिया गांधींनी प्रचाराच्या काळात वारंवार केला होता. वाजपेयींच्या मानलेल्या मुलीच्या नवर्याने भ्रष्टाचार केला असाही आरोप केला गेला. मे २००४ मध्ये युपीएने सरकार स्थापन केल्यावर या सर्व आरोपांचा विसर पडला कारण ते सर्व आरोप खोटे होते.
याउलट किरीट सोमय्या यांनी भुजबळांच्या विरोधात भरपूर सबळ पुरावे गोळा केल्याने ईडीला कारवाई करावीच लागली. सुब्रह्मण्यम स्वामींनी गांधी कुटूंबियांविरोधात पुरावे गोळा करून थेट न्यायालयात धाव घेतल्याने खटला सुरू झाला.
भाजपचे नेते भ्रष्टाचारात गुंतले असतील तर त्यासाठी सबळ पुरावे हव्वेत. नुसते हवेत आरोप करून सीबीआय किंवा ईडी लगेच कारवाई सुरू करीत नाही. विनोद तावड्यांनी खोटी पदवी दाखविली, गिरीष बापटांनी तूरडाळ प्रकरणात २००० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला असे पत्रकार परीषद घेऊन आरोप केले म्हणून लगेच तपाससंस्था तपास सुरू करीत नसतात. त्यासाठी निदान प्रथमदर्शनी सबळ वाटतील असे पुरावे लागतात. संबंधित म्हणजे जी मंडळी हे आरोप करीत आहेत त्यांनी यासंबंधी काहीतरी पुरावे पुढे आणावेत व त्या आधारावर तपाससंस्थांना तपास करण्याची मागणी करता येईल. जर तपाससंस्थांनी तपास करण्यात चालढकल केली तर न्यायालयात दाद मागता येते. परंतु फक्त पत्रकार परीषदेत नुसते आरोप करायचे व कणभरही पुरावे द्यायचे नाहीत अशा परिस्थितीत कसला तपास करणार?
स
संदीप डांगे
Sat, 02/06/2016 - 15:48
नवीन
स्वामींकडे जेटलींविरूद्ध भक्कम पुरावे आहेत म्हणे. ते कुठवर आलंय प्रकरण?
श
श्रीगुरुजी
Sat, 02/06/2016 - 18:38
नवीन
>>> स्वामींकडे जेटलींविरूद्ध भक्कम पुरावे आहेत म्हणे. ते कुठवर आलंय प्रकरण?
वरील ठळक केलेल्या पीतवर्णीय शब्दातच पुढील प्रश्नाचे उत्तर आहे.
क
कपिलमुनी
Sun, 02/07/2016 - 12:36
नवीन
अगागा !! काय म्हणतेयाव याला !
स
संदीप डांगे
Sun, 02/07/2016 - 13:30
नवीन
आणि हे म्हणतात केजरीवाल एक शिवी आहे, =)) =)) =))
श
श्रीगुरुजी
Sun, 02/07/2016 - 16:25
नवीन
You said it!
श
श्रीगुरुजी
Sun, 02/07/2016 - 16:24
नवीन
याचा अर्थ असा की यांच्या आरोपात काहीही तथ्य नसून निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी असे आरोप केलेले आहेत. आरोपात खरोखरच तथ्य असेल तर ही मंडळी त्या प्रकरणाच्या मागे लागून त्याचा पूर्ण पाठपुरावा केला असता (जसा किरीट सोमय्या किंवा सुब्रह्मण्यम स्वामी करतात व भ्रष्टाचार्यांना न्यायालयापर्यंत आणतात).
यांच्यासारखी मंडळी (म्हणजे केजरीवाल, दिग्विजय, नबाब मलिक, मनीष तिवारी इ.) एखादी पत्रकार परीषद बोलवितात किंवा ट्विटरवरून मनाला येईल ते बिनबुडाचे आरोप करतात. त्यात काही तथ्य नसतेच. काही दिवसांनी पहिला आरोप सर्वांच्याच विस्मरणात जातो. लगेच हे दुसरा आरोप करतात. त्यातही काही तथ्य नसते. मग काही दिवसांनी तिसरा .... असे चक्र सुरू राहते.
क
कपिलमुनी
Wed, 02/10/2016 - 10:20
नवीन
जसा तुम्ही आप आणि आपसेनेच्या बाबतीत केला तसाच्च ना ओ ??
स
सुबोध खरे
Wed, 02/10/2016 - 10:23
नवीन
म्हणजे ही मंडळी बिनबुडाचे आरोप करतात हे तुम्हाला मान्य आहे तर?०
क
कपिलमुनी
Wed, 02/10/2016 - 13:57
नवीन
दिग्विजय सिंग कैच्या कै आरोप करतात.
केजरीवालंच्या वर झालेली शाईफेक भाजपाने केली हा आरोप पण बिनबुडाचाच आहे.
मनिष तिवारीने मधे सैन्याची एक तुकडी दिल्लीकडे निघाली होती हे पण अकलेचे तारे तोडणे आहे.
जे खोटा ते खोटा ! ते कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्याकडे आहे.
नेत्यांच्या वाट्टेल ते वागण्याचा , बोलण्याचा समर्थन करायला मी भक्त नाही की प्रवक्ता नाही.
( आता असेच एक इंजेक्शन त्यांनापण द्या बघू :) )
श
श्रीगुरुजी
Wed, 02/10/2016 - 13:09
नवीन
मी आआपवाला नाही. मी कोणताही बिनबुडाचा आरोप केलेला नाही. त्या धाग्यावर सर्व पुरावे दिले आहेत.
क
कपिलमुनी
Wed, 02/10/2016 - 14:00
नवीन
तुम्ही खोटारडे आहात
तुम्ही फक्त स्वत:ला काय वाटत तेवढा सांगितला आहे त्यासाठी एकही त्रयस्थ पुरावा जोडला नाही.
सर्व पुरावे कोठे दिले आहेत त्याचा तरी दुवा द्या ??
श
श्रीगुरुजी
Wed, 02/10/2016 - 18:45
नवीन
तुम्ही पुन्हा एकदा यक्तिगत टिप्पणी सुरू केलीत. धागा पुन्हा एकदा वाचा. अगदी सुरवातीपासूनच लिंक दिलेली आहे.
क
कपिलमुनी
Wed, 02/10/2016 - 18:58
नवीन
" ती महिला आपची आहे " याचा पुरावा नाही , हवा तर मिपाकरांची एक त्रयस्थ कमिटीकडुन धागा चेक करुन घ्या.
श
श्रीगुरुजी
Wed, 02/10/2016 - 18:59
नवीन
ती महिला आआपची नाही याचा काही पुरावा आहे का?
स
संदीप डांगे
Wed, 02/10/2016 - 19:27
नवीन
'श्रीगुरुजी हे भाजपाचे पेड कार्यकर्ते आहेत' ह्याचाही आमच्याकडे पुरावा नाही आहे हो... आता कसं करायचं बोला.
क
कपिलमुनी
Wed, 02/10/2016 - 20:11
नवीन
मी तुम्हाला ते पुरावे लिंकांसहीत दिले आहेत.
ती महिला आपचसेनेची आहे.
आता फक्त आप आणि आपसेना एकच आहे म्हणुू नका कारण तुमच्याशिवाय तसा कोणीही म्हणत नाही .
म्हणत असतील तर पुरावा द्या
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/11/2016 - 09:50
नवीन
ती महिला जशी आआपसेनेची आहे तशीच ती महिला आआपची सुद्धा आहे. ती सुरवातीपासून आआपमध्येच होती व नंतर आआपसेना नावाच्या संघटनेशी संबंधित आहे. बेसिकली ती दोन्हींशी संबंधित आहे.
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/11/2016 - 10:10
नवीन
आम आदमी पार्टी आणि आम आदमी सेना हे दोन वेगळे पक्ष आहेत. आम आदमी सेना ही आप मधुन बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कारण त्यांना केजरीवाल यांचे एककल्ली प्रशासन मान्य नव्हते. त्यांनी पक्षनिधीसंदर्भात आणि इतर धोरणात्मक तृटींबद्दल आप चा विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्या बद्दल वेळोवेळी आंदोलने केली आहेत. असे सर्व स्पष्ट असतांनाही तुम्ही ती व्यक्ती जी केजरीवाल विरोधक आहे, तीच आपची कार्यकर्ती आणि केजरीवालची समर्थक आहे असे म्हणताय. हद्द आहे बुवा.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/11/2016 - 10:13
नवीन
नितीश राणे हा इंदिरा काँग्रेसमध्ये आहे का स्वाभिमान संघटनेमध्ये?
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/11/2016 - 11:27
नवीन
तुम्ही त्या आआसेनाच्या कार्यकर्तीचं बोला हो. मी यादी काढली तर कठिण होईल...
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/11/2016 - 18:21
नवीन
तेच मी पुन्हापुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय. ते तुमच्या लक्षात येतच नाहीय्ये. म्हणून मी नितेश राणेचं उदाहरण दिलं. त्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तेच उत्तर भावना अरोराच्या आआप पक्ष व आम आदमी सेना यांच्या संबंधात आहे.
अजून एक उदाहरण देतो. राम माधव हे भाजपचे आहेत का रा.स्व.संघाचे याचे उत्तर शोधा म्हणजे भावना अरोरा संबंधित प्रश्नाचे उत्तर मिळेल.
क
कपिलमुनी
गुरुवार, 02/11/2016 - 09:03
नवीन
तुम्हाला पूर्वी सांगितला होता , जो आरोप करतो त्याने ते सिद्ध करायचे आसतात.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/11/2016 - 09:52
नवीन
मी ते पूर्वीच सिद्ध केले आहे. गुगलवर त्या महिलेच्या नावावर शोध घ्या. ती सुरवातीपासून आआपमध्ये आहे व नंतर आआपसेना या संघटनेच्या माध्यमातून ती निदर्शने वगैरे करते असे सर्वत्र लिहिलेले आढळेल.
क
कपिलमुनी
गुरुवार, 02/11/2016 - 10:26
नवीन
ती महिला आधी आपमधे होती नंतर आपसेने मधे गेली तिचा सध्या आपशी संबंध नाही.
भुजबळ सध्या सेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये ?
तुम्ही जी जो आरोप केला आहे की ती महिला आपमध्ये आहे आणि केजरीवालांनी स्वतःवर हल्ला करवून घेतला आहे हा आरोप खोटाच आहे.
माझे म्हणणे एवढाच आहे , ती महिला आपसेनेची आहे , ती पुर्वी आपमध्ये होती या एवढ्या कारणावरून केजरीवालांनी स्वतवर हल्ला कएला म्हणने चुकीचा आहे.
भुजबळ सेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेले आणि नंतर बाळासाहेबांना अटक झाली म्हणजे शिवसेनेने किंवा बाळासाहेबांनी स्वतःला अटक करवून घेतली असा होतो का ??
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/11/2016 - 18:30
नवीन
आआप हा एक राजकीय पक्ष आहे. आम आदमी सेना हा राजकीय पक्ष नसून एक संघटना आहे. ती महिला आम आदमी सेनेत आहे हे सत्य आहे व त्याचवेळी ती आआप या पक्षात देखील आहे. तिने आआप पक्ष सोडला आहे असा कोठे पुरावा आहे का? ज्याप्रमाणे नितेश राणे हा इंदिरा कॉंग्रेस या पक्षात आहे व त्याचवेळी तो स्वाभिमान या संघटनेतही आहे. तसेच त्या महिलेबद्दल आहे.
हा प्रश्नच इथे गैरलागू आहे. राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत.
केजरीवालांनी भूतकाळात आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वत:वर शाई शिंपडण्याची व स्वत:ला थोबाडून घ्यायची अनेकवेळा नाटके घडवून आणली आहेत. हे नवीन नाटक पूर्वीसारखेच आहे.
ती अजूनही आआपमध्येच आहे. तिने आआप पक्ष सोडलेला नाही.
वर उत्तर दिले आहे.
म
मोदक
Fri, 02/12/2016 - 08:48
नवीन
नवीन मुद्द्यांकडे वळा हो.
कंटाळा आला या वादाचा.
क
कपिलमुनी
Fri, 02/12/2016 - 10:43
नवीन
एवढा साधा कळू नये म्हणजे आश्चर्य आहे .
तुम्ही करत असलेल्या आरोपांना तुम्हीच पुरावे द्यायचे आहेत.
श
श्रीगुरुजी
Fri, 02/12/2016 - 19:08
नवीन
सर्व पुरावे पहिल्या दिवसापासूनच दिलेले आहेत. परंतु ते मान्यच करायचे नाहीत हा तुमचा अट्टाहास आहे.
क
कपिलमुनी
Fri, 02/12/2016 - 10:44
नवीन
ही आपमधून फुटून बाहेर पडलेल्या लोकांची संस्था आहे जे आपविरोधी काम करतात .
मेक युवर फॅक्टस राईट !
श
श्रीगुरुजी
Fri, 02/12/2016 - 19:07
नवीन
चूक. ही आआपमध्ये असलेल्या काही जणांनी काढलेली संघटना आहे. ते अजूनही आआपमध्येच आहेत. मेक युवर फॅक्टस राईट !
क
कपिलमुनी
Sun, 02/14/2016 - 11:15
नवीन
आप सोडलेल्या लोकांची संघटना म्हणजे आपसेना
दुवा
घटनेचा दुवा
असे स्पष्ट पुरावे द्या बघू
श
श्रीगुरुजी
Mon, 02/15/2016 - 18:26
नवीन
गफलत होतेय.
The AAS was reportedly formed by disgruntled volunteers who alleged that there were many discrepancies in the internal working of the Aam Aadmi Party.
केजरीवालांच्या हुकुमशाही वर्तनाने नाराज असलेल्या आआपमधील असंतुष्ट कार्यकर्त्यांनी आम आदमी सेना ही संघटना स्थापन केली आहे. ही एक संघटना आहे, राजकीय पक्ष नाही. या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडलेला नाही. ज्याप्रमाणे भाजपमध्ये किर्ती आझाद, शत्रुघ्न सिन्हा, अडवाणी गटाचे नेते पक्षात राहून सातत्याने मोदींवर टीका करीत असतात, अगदी तसेच इथे पण आहे.
क
कपिलमुनी
Mon, 02/15/2016 - 18:46
नवीन
सोडल्याचा तुमच्याकडे पुरावा नाही !
आझाद, सिन्हा यांची कोणती संघटना आहे ? जी एकही पद ना घेता भाजपाला उघड राजकीय विरोध करते ?
श
श्रीगुरुजी
Mon, 02/15/2016 - 18:54
नवीन
त्यांनी आआप सोडल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? असल्यास द्यावा ही नम्र विनंती.
नितेश राणे हा काँग्रेसमध्ये आहे व त्याचवेळी स्वाभिमाना नावाच्या संघटनेत सुद्धा आहे. या संघटनेने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारविरूद्ध आंदोलन केले होते.
भुजबळ एकाच वेळी समता परीषद या संघटनेत व राष्ट्रवादीत आहेत.
भाजपचे अनेक नेते एकाच वेळी भाजपत व संघात आहेत. संघ अधूनमधून कामगार कायद्यातील बदल, वॉलमार्टला भारतात परवानगी इ. विषयांवर भाजप सरकार विरूद्ध भूमिका घेत असतो.
एकाच वेळी एका पक्षात व एका संघटनेत असणे भारतात नवे नाही. आणि त्या संघटनेने आपल्याच प्क्षाच्या सरकारविरूद्ध आंदोलन करणे हेही नवे नाही.
त्यामुळे आआप पक्षात राहून आम आदमी सेनेच्या माध्यमातून दिल्ली सरकारविरूद्ध आंदोलन करणे यात काहीही नवीन नाही.
क
कपिलमुनी
Mon, 02/15/2016 - 19:47
नवीन
??
तुम्ही तुमची चूक कबूल करुन ती महिला आपची होती हा आरोप चुकीचा असून मागे घ्याल का ?
श
श्रीगुरुजी
Tue, 02/16/2016 - 10:07
नवीन
ती महिला सुरवातीपासून आआपमध्येच आहे. तिने अजून आआप हा पक्ष सोडून दुसर्या पक्षात प्रवेश केलेला नाही. त्या महिलेने आआप सोडल्याचा विश्वासार्ह पुरावा तुमच्याकडे आहे का? असल्यास द्यावा ही नम्र विनंती.
क
कपिलमुनी
Tue, 02/16/2016 - 10:56
नवीन
म
मी-सौरभ
Tue, 02/16/2016 - 12:08
नवीन
ह्याला पुरावा म्हणण्याईतका हा सबळ नक्कीच आहे.
प
प्रचेतस
Tue, 02/16/2016 - 12:22
नवीन
प्रचंड चिकाटी.
श्रीगुर्जी आता तरी विधान मागे घ्या तुमचे.
श
श्रीगुरुजी
Tue, 02/16/2016 - 16:36
नवीन
हे महेश केदारी नक्की कोण? आआपमध्ये त्यांचे काय स्थान व भूमिका आहे? नक्की कोणत्या भूमिकेतून ते उत्तर देत आहेत? दिल्लीसारख्या २ कोटी लोकवस्तीच्या शहरात आआपचे कोण सदस्य आहेत व कोण नाहीत हे त्यांना चिंचवडमध्ये बसून पक्षाच्या कोणत्याही अधिकृत राष्ट्रीय पदावर नसताना कसे समजले?
२०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक आआपभक्तांनी सोशल मिडियावरून उस्फूर्तपणे आआपचा प्रचार केला होता. अनेक अनिवासी भारतीय दिल्लीत २-३ महिने ठाण मांडून बसले होते व आआपचा प्रचार करीत होते. वेगवेगळ्या शहरातून अनेकांनी उस्फूर्तपणे स्वतःहून अनेक नागरिकांना फोन करून आआपला मत देण्याची विनंती केली होती. त्यात वेगवेगळ्या शहरातील अनेक आयटी कंपन्यातील तरूण होते. हे महेश केदारी त्यातलेच आहेत. ते पक्षाच्या कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत. स्वयंस्फूर्तीने ते आआपचा प्रचार करीत आहेत.
त्यामुळे भावना अरोरा ही दिल्लीतील महिला आआपची सदस्य नाही ही माहिती ते चिंचवडमध्ये बसून सांगत आहेत ते अजिबात विश्वासार्ह नाही.
त
तर्राट जोकर
Tue, 02/16/2016 - 16:49
नवीन
हे महेश केदारी नक्की कोण? आआपमध्ये त्यांचे काय स्थान व भूमिका आहे? नक्की कोणत्या भूमिकेतून ते उत्तर देत आहेत? दिल्लीसारख्या २ कोटी लोकवस्तीच्या शहरात आआपचे कोण सदस्य आहेत व कोण नाहीत हे त्यांना चिंचवडमध्ये बसून पक्षाच्या कोणत्याही अधिकृत राष्ट्रीय पदावर नसताना कसे समजले?
>> तुम्हाला तर त्या पक्षात नसूनही कळते. तसा दावा तुम्ही करता, त्याचे पुरावे तुमच्याकडे नसतात. फक्त अंदाज असतात, मतं असतात.
२०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक आआपभक्तांनी सोशल मिडियावरून उस्फूर्तपणे आआपचा प्रचार केला होता. अनेक अनिवासी भारतीय दिल्लीत २-३ महिने ठाण मांडून बसले होते व आआपचा प्रचार करीत होते. वेगवेगळ्या शहरातून अनेकांनी उस्फूर्तपणे स्वतःहून अनेक नागरिकांना फोन करून आआपला मत देण्याची विनंती केली होती. त्यात वेगवेगळ्या शहरातील अनेक आयटी कंपन्यातील तरूण होते. हे महेश केदारी त्यातलेच आहेत. ते पक्षाच्या कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत. स्वयंस्फूर्तीने ते आआपचा प्रचार करीत आहेत.
>> तुम्हीही ना आपचे पदाधिकारी आहात ना आसेनेचे. तरीही बेधडक बिनबुडाची विधानं करत आहात.
त्यामुळे भावना अरोरा ही दिल्लीतील महिला आआपची सदस्य नाही ही माहिती ते चिंचवडमध्ये बसून सांगत आहेत ते अजिबात विश्वासार्ह नाही.
>> तुम्हीही पुण्यातच बसून दिल्लीतील महिला आआपचीच सदस्य आहे हे मत कुठलाही पुरावा नसताना बेधडक ठोकून देताय ते विश्वासार्ह आहे असे म्हणायचे काय?
ह
होबासराव
Tue, 02/16/2016 - 16:58
नवीन
सगळे प्रतिसाद एक्स्ट्रिम उजविकडे जातायत्...
श
श्रीगुरुजी
Wed, 02/17/2016 - 08:32
नवीन
मी नेहमी संदर्भासहीत लिंक्स देतो.
माझा या संघटनेशी किंवा इतर कोणत्याही संघटनेशी किंवा कोणत्याही पक्षाशी काहीही संबंध नाही. कोणत्याही संघटनेचा व पक्षाचा मी चार आणे सुद्धा सदस्य नाही.
श
श्रीगुरुजी
Wed, 02/17/2016 - 08:34
नवीन
घटना घडल्यानंतर त्याचे वृत्तांत वेगवेगळ्या वृत्तपत्रात आले होते. ते जरा वाचा. अर्थात माझ्यावर व त्याचवेळी कोणत्याही वृतपत्रावर अजिबात विश्वास न ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
क
कपिलमुनी
Tue, 02/16/2016 - 17:00
नवीन
गुरुजी,
मी "महेश केदारी" या व्यक्तीची संपर्क साधला नव्हता .
मी आपच्या अधिकृत ईमेल आयडी सोबत संपर्क केला आहे. तुम्ही सुद्धा करू शकता .आणि तुमचे शंकानिरसन करू शकता.
१. पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीवरून मिळालेली माहिती खरी मानतात ( ती माहिती देणार्याला त्या ईमेलचा अक्सेस्स आहे, याचा अर्थ तो ती माहिती देउ शकतो).
२. आम आदमी सेनेचा आणी आपचा संबंध नाही असा अधि़कृतपणे सांगितला आहे.
३. त्या महिलेने कुठेही स्वतः ती आपची आहे हे सांगितला नाही.
४. तीने , सर्व मिडीयाने नी आम आदमी सेनेची आहे हे सांगितले आहे.
यावरून
बाकी मिपाकर सुज्ञ आहेतच !!
श
श्रीगुरुजी
Wed, 02/17/2016 - 08:29
नवीन
हहपुवा. पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीवरून पक्षविरोधी किंवा आपल्या पक्षाला घातक ठरेल अशी माहिती कशी दिली जाईल? आपल्या पक्षाचा उदोउदो करणारीच माहिती पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीवरून दिली जाते. ज्या माहितीमुळे आपल्या पक्षाची प्रतिमा वाईट होईल किंवा ज्यामुळे आपला पक्ष अडचणीत येईल अशी माहिती कधीही दिली जात नाही.
त्यामुळे या ईमेल आयडीवरून जी माहिती आली आहे त्यावर विश्वास ठेवता येत नाही.
लोल. जेव्हा जेव्हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता एखाद्या गुन्ह्यात सापडतो, तेव्हा त्या पक्षाचा प्रवक्ता "तो अमुकतमुक माणूस आपल्या पक्षात नाही. तो पक्षाचा अधिकृत सदस्य नाही" असे सांगून नामानिराळे होतात. पक्षाचा एखादा अधिकृत पदाधिकारी काही वादग्रस्त विधाने करतो तेव्हा मात्र असे सांगता येत नाही. तेव्हा मात्र 'हे त्याचे वैयक्तिक मत आहे. ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही" अशी सारवासारव केली जाते. त्यामुळे वरील दाव्यावर विश्वास ठेवता येत नाही
ती महिला आआपची आहे असे ती घटना घडल्यावर सर्व वृत्तपत्रातून आले होते.
बरोबर आहे. जसे नितेश राणे हे एकाचवेळी इंदिरा काँग्रेस व स्वाभिमान संघटनेशी संबंधित आहेत किंवा विनोद तावडे एकाच वेळी संघ, भाजप व अभाविप मध्ये होते, अगदी तसेच इथेही आहे.
या दोन्ही दाव्यांवर विश्वास ठेवणे शक्य नाही. ती महिला आआपची आहे असे सर्व वृत्तपत्रातून व वाहिन्यांवर आले होते आणि केजरीवालांनी भूतकाळात एकदा नव्हे तर अनेक वेळा स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःवर शाईफेक व थोबाडायचे कार्यक्रम आखले होते. हा हल्ला हा त्यातलाच एक प्रकार.
यावरून
- «
- ‹
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- ›
- »