Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/09/2016 - 09:18
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
175546 वाचन

💬 प्रतिसाद (484)
श
शलभ Tue, 07/19/2016 - 14:18 नवीन
+१११ मुटे सर..आतातरी प्रतिसाद देणार का उंटावरचे शहाणे म्हणून इग्नोर मारणार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
य
यशोधरा Tue, 07/19/2016 - 14:01 नवीन
उत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
क
कपिलमुनी Tue, 07/19/2016 - 14:18 नवीन
काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या ! शेती करायला प्रोत्साहित होइल असमाहिती,, माहिती, यशस्वी शेतकर्‍यांनी केलेले प्रयोग येउ द्या ! @अस्वस्थामा : उत्तम प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 14:57 नवीन
काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या !
ही अपेक्षाच चुकीची आहे. ज्याला जसे व्यक्त होता येते तसे तो व्यक्त होत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/19/2016 - 15:07 नवीन
अच्छा म्हणजे तुम्ही नकारात्मक(च) लिहिता/लिहु शकता हे आपण कबूल करताय तर एकंदरीत, विषय संपला मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 15:14 नवीन
नकारात्मक आणि सकारात्मक आपापल्या सोईने ठरवले जात नाही. ते ठरवायला दृष्टी लागते, अभ्यास लागतो, तारतम्य लागते, विवेक लागतो.... आणखी बरेच काही लागते. एखादा शब्द मुखोद्गत करून लिहिता आला म्हणजे त्याला त्या शब्दाची गहनता समजतेच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/19/2016 - 15:16 नवीन
आपणही हे लक्षात घेतले तर बरे पडेल बरंका मुटे साहेब जय हिंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 15:20 नवीन
नकारात्मक आणि सकारात्मक असले शब्दच मी वापरत नाही, तरीही मला लक्षात घ्यायला सांगण्यात एक प्रतिसाद वाढवण्यापलिकडे याला काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/19/2016 - 15:23 नवीन
तुम्ही किती आडमुठे अन नकारात्मक आहात हे समजून घेण्यात मदत झाली, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 15:28 नवीन
मग इतके वर्ष काया केले? इतकं क्षुल्लक समजायला इतका वेळ लागत असतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मोदक Tue, 07/19/2016 - 15:46 नवीन
सगळ्याच सरकारांनी शेतकर्‍यांचा कसा काय घात केला..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
सूड Tue, 07/19/2016 - 14:34 नवीन
अतिशय योग्य आणि संतुलित प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
म
मी-सौरभ Tue, 07/19/2016 - 14:35 नवीन
@गंमु: ऊगाच तुम्हि एकटे नागपुरकर आणि बाकी मिपाकर सगळे पुण्या मुंबईकडचे; या गैरसमजाच्या पुढे जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 14:40 नवीन
अस्वस्थामा साहेब, तुम्ही मिसळपाववर आहात : 4 years 7 months मी मिसळपावर आहे : 6 years 6 months त्याचा कागदोपत्री अर्थ इतकाच की, मी मिसळपावला चांगल्या तर्‍हेने ओळखतो. माझे पूर्वीचे धागे आणि आताचे धागे मला माहीत आहे. कोण आयडी काय प्रतिसाद लिहू शकते, हे मला प्रतिसाद वाचायच्या आधीच कळते. तुमचा हा प्रतिसाद कुणाकुणाला आवडला असेल याचीही मी यादी बनवून देऊ शकतो. :) मिसळपाववर कुणी काहीही प्रतिसाद लिहिला तरी गेल्या काही वर्षापासून अजिबात वाईट वाटत नाही. आपणही वाईट वाटून नये. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की माझे कौतुक करणारे प्रतिसाद यावे, यासाठी मी लेखन करत नाही. फक्त दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
म
मोदक Tue, 07/19/2016 - 14:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
सूड Tue, 07/19/2016 - 15:20 नवीन
एक से इनका क्या होगा!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 15:23 नवीन
हजार से भी कुछ नही होनेवाला. अत्यंत सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत. मी तर सज्जनच नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 07/19/2016 - 15:33 नवीन
सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत.
हा हा हा!! तुम्हाला असं का वाटतं की सगळे तुमच्या वाईटावर उठलेत. तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 15:40 नवीन
तुमचं नाव व पत्ता लिहा येथे. येतो तुमच्याकडे. आपण दोघेही मिळून जाऊ मानसोपचारतज्ज्ञाकडे. कुणावर उपचार करायचा याचा निर्णय ते घेतील तपासाअंती. मान्य? मग लिहा पत्ता...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मोदक Tue, 07/19/2016 - 15:46 नवीन
सगळ्याच सरकारांनी शेतकर्‍यांचा कसा काय घात केला..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 15:53 नवीन
तुमचा पत्ता द्या इथे किंवा माझ्या विपूत किंवा ranmewa@gmail.com या विरोपावर मेल करा. सविस्तर उत्तर पाठवतो कविता सोडून बाकी विषयावर या धाग्यावर चर्चा करणे योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/19/2016 - 16:02 नवीन
मिपावर व्यनीची सोय आहे, येथेच व्यनी करा. कविता सोडून बाकी विषयांवर बोलणे योग्य असेल तर चर्चा करायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:08 नवीन
माझ्याकडे स्वतःचे ४ संकेतस्थळे आहेत. www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.com कशा सुविधा असतात हे मला चांगल्या तर्‍हेने ठाऊक आहे. तुम्हीच मला तुमचा पोस्टाचा पत्ता व्यनी करा. शक्य झाले तर "सूड" यांचाही पत्ता कळवा. मीच येतो तिकडे. आपण तिघेही मिळून मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ. नंतर चर्चा वगैरे करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/19/2016 - 16:16 नवीन
अहो... तुम्ही शेतात काम करताना दम लागला तर टेकायला म्हणून "मोत्याचे डोळे असलेले चांदीचे सिंह हातावर कोरलेले आहे असे सिंहासन" शोधता की खुर्ची, स्टूल किंवा डेरेदार वडाखालचा एखादा दगडही चालतो..? उत्तर द्यायचे तर व्यनीवर द्या की... पत्ते बित्ते कशाला मागताय..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:21 नवीन
पत्ते बित्ते कशाला मागताय..? जनावरांना पत्ते नसतात. माणसाला असतात. तिथपर्यंत पोस्टमेने पोचतो. म्हणून मागीतला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:23 नवीन
उत्तराची एवढी अपेक्षाच आहे तर सविस्तर उत्तर पाठवतो म्हटले तर पत्ता कळवायला एवढे आढेवेढे कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/19/2016 - 16:29 नवीन
तुमचे सगळे उपप्रतिसाद लिहून झाले की सांगा. मी सगळ्याला एकदमच उत्तर देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:49 नवीन
अजिबात नाही. यावेळेस या धाग्याचा समारोप मीच करेन. तोपर्यंत तुमचा पता घेऊन येणार्‍या व्यनीची वाट पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
आ
आदिजोशी Tue, 07/19/2016 - 16:52 नवीन
तुम्ही बाकिच्या प्रश्नांची उत्तरं देऊन विषय संपवून टाका आणि धाग्याचा समारोप करा पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ह
हेमन्त वाघे Fri, 07/22/2016 - 10:16 नवीन
माझ्याकडे स्वतःचे ४ संकेतस्थळे आहेत. www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.कॉम आपण 4 संकेतस्थळे सांगून URL 3 चेच दिलेत ? कि माझे काही चूल ? मी जिकडे गणित शिकलो तेथे 1 EK 2 दोन 3 तीन 4 चार असे शिकल्याचे आठवते . असो संकेतस्थळे अतिशय जुनाट वाटतात ,आजिबात रेस्पॉन्सिव्ह ( मोबाइल साठी सुयोग्य) नाहीत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Sat, 07/23/2016 - 11:13 नवीन
www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.com www.shetkari.in हे बघा ४ *************** आजिबात रेस्पॉन्सिव्ह ( मोबाइल साठी सुयोग्य) नाहीत हे खरंप पण अत्याधुनिक करणेही कठीण नाही. ही सर्व संकेतस्थळे मी एकहाती तयार केली आहेत. डोमेन,स्पेस मिळवणे, डिझायनींग करून त्यावर लेखन करणे हे काम मी एकट्यानेच केलेले आहे व तेही स्वखर्चाने. कुणीही शारिरीक अथवा आर्थिक मदत केली आहे. www.sharadjoshi.in हे शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहिलेले स्थळही स्वखर्चानेच चालवतो. शेतकरी संघटना मदत करत नाही. स्वाभाविकपणे मला संकेतस्थळे अत्याधुनिक करण्याला खर्च करण्याच्या मर्यादा पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
ग
गंगाधर मुटे Sat, 07/23/2016 - 11:14 नवीन
ही सर्व संकेतस्थळे मी एकहाती तयार केली आहेत. डोमेन,स्पेस मिळवणे, डिझायनींग करून त्यावर लेखन करणे हे काम मी एकट्यानेच केलेले आहे व तेही स्वखर्चाने. कुणीही शारिरीक अथवा आर्थिक मदत केलेली नाही. www.sharadjoshi.in हे शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहिलेले स्थळही स्वखर्चानेच चालवतो. शेतकरी संघटना मदत करत नाही. असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
अ
अस्वस्थामा Tue, 07/19/2016 - 16:08 नवीन
मुटे, आमचे मिपा-वय काढून नक्की तुम्ही काय साध्य आणि सिद्ध केलंत ते तुम्हालाच माहीत. किमान एकंदरीत आंतरजालीय वय काढून काही सिद्ध होत नाही हे मी तुम्हाला काय सांगायचं. "कोण आयडी काय प्रतिसाद लिहू शकते, हे मला प्रतिसाद वाचायच्या आधीच कळते. तुमचा हा प्रतिसाद कुणाकुणाला आवडला असेल याचीही मी यादी बनवून देऊ शकतो." हे माझ्या प्रतिसादाबद्दल पण असेल तर धन्यच. पण असो. इतका प्रतिसाद लिहिलात पण खालच्या एकाही मुद्द्याला स्पर्श केला नाहीत. सोपे व्हावे म्हणून नंबर टाकले आहेत. थोडक्यात (शंकांना धरुन) उत्तरं द्या. नपेक्षा उत्तरे नाही दिलीत तरी चालतील, किमान विचार तरी कराल अशी आशा. :) १.
पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ?
२.
शेतकरी, संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ?
३.
भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्‍याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ?
४.
माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्‍यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ?
आणि हो, दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते. आम्हाला पण असंच वाटायला लागलंय, त्यामुळे आमचा __/\__ .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 16:11 नवीन
वयाबद्दल म्हणाल तर एक इंग्रजी सुभाषित आठवले. Walt Disney — 'Growing Old is Mandatory, Growing up is Optional'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/20/2016 - 01:06 नवीन
सत्य परिस्थिती सांगणारा संतुलित प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:18 नवीन
एक थांबला की दुसरा येतो, दुसरा थांबला की तिसरा येतो, तिसरा थांबला की चवथा येतो. तुमचं नियोजन सुंदर पण मला काय दहा तोंडे आहेत का दहा लोकांशी दहा मुद्यावर बोलायला?
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 07/19/2016 - 16:27 नवीन
अहो इथे टायपायचे आहे.. ते तर बोलण्यापेक्षा एकदम सोपे. आमचा बळीराजा बघा.. एकाच वेळी सरकार, हवामान, कुटुंब, आडते, दलाल, वाहतूक, शेतातली वेगवेगळी कामे, शेती कसणारे साथीदार, सावकार आणि शेतकरी संघटना अशा अनेक आघाड्यांवर आयुष्याची लढाई लढत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:28 नवीन
पोस्टाच्या पत्त्याचं काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/19/2016 - 16:35 नवीन
मी कधी म्हणालो की पत्ता देतो म्हणून..? तुमचे बँक खात्याचे मागच्या तीन महिन्याचे विवरण येथे द्या म्हटल्यावर द्याल का.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:41 नवीन
मोदक म्हणजे जीताजगता मनुष्य आहे की एखादा व्हायरस आहे याची खात्री करून घ्यायची म्हटले तर पत्ता देण्यात काय अडचण आहे. स्वतःचा परिचय जो देऊ शकत नाही, जाहीर नव्हे तर खाजगी व्यनी करून त्याने एखाद्या सजीवाशी बोलण्याचा अट्टाहास का धरावा? आणि दुसर्‍या सजीव मानसाने एखाद्या व्हायरसचा हट्ट तरी का पुरवावा. मोदक म्हणजे बँक खात्याचे विवरण नव्हे. गरज भासल्यास मी बँक खात्याचे मागच्या तीन महिन्याचे विवरण येथे देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/19/2016 - 16:46 नवीन
मिपाच्या मालकांना, व्यवस्थापकांना आणि संपादकांना विचारा.. बहुतेक सगळ्या जणांना मी भेटलो आहे. आणि तुम्ही राव येवढे सिनीयर.. मिपाचा इतका दांडगा अनुभव.. मग थोडा अभ्यास वाढवा अनेक धाग्यांवर फोटो पण मिळेल. आणखी काय खात्री करायची आहे? (व्हायरस फ्री) मोदक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:52 नवीन
मला पोस्टाचा पत्ता हवा आहे सविस्तर उत्तर पाठवायला कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला ५००-६०० पाने लागू शकतात. हे मराठीत समजतय ना? इतर भाषा मला येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/19/2016 - 16:56 नवीन
इतके जटील असेल तर मग सरळ पुस्तक छापा.. मी विकत घेवून वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
सामान्य वाचक Tue, 07/19/2016 - 17:08 नवीन
आता बस करा दुसऱ्या चांगल्या विषयावर चर्चा करा ज्या माणसाने कुणाचा कुठलाही विचार न ऐकण्याचे ठरवले आहे , तिथे कशाला वेळ आणि शक्ती व्यर्थ घालवता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/19/2016 - 17:10 नवीन
होय देवा.. आता नाही बोलत काही..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:10 नवीन
आता सुबुद्धी सुचलीय? मग आतापर्यंत कुठे गेली होती तुमची बुद्धी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 07/19/2016 - 16:24 नवीन
मुटे साहेब, मांडलेला मुद्दा कळीचा आहे...पण कवीतेत तुम्ही एक विषय मांडलात की तुम्हाला मंत्री व्हायचय आणी परत प्रतीसादात म्हणताय की मंत्री बनूनही शेतकर्‍यांचे प्रश्ण काही सुटणार नाहीत. मग नक्की काय करायचे आहे तुम्हाला म्हणजे शेतकर्‍यांना फायदा होईल?? अजून एक..
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे.
>>> इथे तुम्ही म्हणालात की तुम्हाला धाग्याचे काश्मीर करायचे नाहीये आणी तुम्हीच प्रत्येक प्रतीसाद उप-प्रतीसाद देऊन खोडून काढायला बघताय.. का बरे असे? असे केल्याने धाग्याचे काश्मिर नाही तर निदान नागपूर तरी होईलच... असो.. हे माझे मत.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:26 नवीन
कवितेचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर शेजारच्या एखाद्या मराठी भाषिकाला विचारावा. कविला विचारण्याची मराठी संस्कृती तरी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 07/19/2016 - 16:38 नवीन
अहो मुटे साहेब.. शेजार्‍याला कशाला डायरेक्ट तुम्हालाच विचारला ना की तुम्हाला नक्की काय करायचे आहे. मंत्री व्हायचेय की अजून काय जेणे करून शेतकर्‍यांचे प्रश्ण सुटायला मदत होईल. आणी शेतकरी का कुठलाही असो नागपूर काय किंवा सोलापूर काय..तो अडचणीतच आहे...पिकवणारा जो पर्यंत विकत नाही तोपर्यंत तो पिचणारच असे वाटते. (कवितेतून जे मांडायचा प्रयत्न केलायत त्याच्याशी विरोधी भुमीका तुमच्या प्रतीसादातून वाटली आणी येण्यार्‍या प्रत्येक प्रतीसादाचे हिरीरीने खंडन करण्याचा अट्टहास जाणवला तुमच्या प्रतीसादातून..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ब
बोका-ए-आझम Tue, 07/19/2016 - 16:27 नवीन
का स्वतःचा वेळ वाया घालवताय? मनोरुग्णांसोबत वादविवाद करायची एवढी हौस का आलीय आज तुम्हाला?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा