मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही.तक्रार येथे आहे ******************* गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? *******************भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं??सरसकटीकरन वो.. मानूस द्वेषात आंदळा व्हू न्ये याची क्ल्जी घ्याय्ची.