Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/09/2016 - 09:18
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
175546 वाचन

💬 प्रतिसाद (484)
ग
गंगाधर मुटे Fri, 07/22/2016 - 05:13 नवीन
त्याचा अर्थ जाऊ द्या हा नवा घ्या उच्चांक गाठताना बेबंद धूर्ततेचा उंटीणिला शिडीने चंगून चुंबते तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उदय के'सागर Fri, 07/22/2016 - 05:27 नवीन
काही नाही 400 एवढच म्हणायचं होतं :P
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 07/22/2016 - 05:57 नवीन

एक जाहीर प्रश्न


         याच धाग्यावर एक अस्तित्वहीन आयडी माझ्या नावावर आणि आडनावावर व्यंग कसायला लागली, तेव्हा त्या आयडीला वैयक्तीक पातळीवर टीका-टिपणी करणे अयोग्य आहे, असा सल्ला देणारा मिसळपावर कोणीच नव्हता का?
मला सल्ले द्यायला बर्‍याच आयडी सदैव उताविळ असतात, म्हणून या प्रश्नाचे प्रयोजन. बाकी विशेष काही नाही.

- गंगाधर मुटे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/22/2016 - 06:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
अ
अभ्या.. Fri, 07/22/2016 - 06:47 नवीन
अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सामान्य वाचक Fri, 07/22/2016 - 07:16 नवीन
सचिन चांगला क्रिकेट खेळतो म्हणून त्याचे बाकी चुकीचे वागणे बोलणे अजिबात क्षम्य नाही तसेच हे आहे तुम्ही चांगल्या कविता लिहिता म्हणून तुमचा दुराग्रह, अपमानास्पद बोलणे, लोकांची अक्कल आणि लायकी काढणे या गोष्टी लोक का सहन करतील ? तुम्ही हे सगळे केल्यावर लोकांनी तुमच्या कविते कडे बघून सगळे सहन करावे आणि नाही केले तर तुम्ही अन्याय झाल्याची , झुंड शाही ची ओरड करणार हे बरोबर वाटते का हे खरच एकदा शांतपणे विचार करुन बघा शेवटी मान द्यावा आणि मान घ्यावा हे खरे मी एरंडी च्या बिया पेरणार आणि झाडाला मात्र आंबे आले पाहिजेत हे शक्य आहे का? मिपा वर अनेक उत्तम लेखक , देशप्रेमी, समाजसेवक, मान्यवर, आपल्या क्षेत्रात अतिशय यशस्वी अशी अनेक लोक आहेत . कुणाच्या लिखाणात तुम्हाला असा दुराग्रह दिसला ? मीच एकटा त्यागी आणि समाजसेवक आणि बाकी सगळे संधिसाधू या विचारसारणीतून कृपया बाहेर या लोकांचाही आदर करायला सुरुवात करा आणि मग लोकांच्या वागणुकीतला फरक बघा अर्थात मला कल्पना नाही कि तुम्ही कितपत शांतपणे हे वाचाल का परत वार करत सुटाल अर्थातच या वर तुमचा परत ल
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Fri, 07/22/2016 - 15:34 नवीन
बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
क
कविता१९७८ Sat, 07/23/2016 - 12:00 नवीन
सहमत, मुटेंनी कधीच स्वतःचे धागे सोडुन दुसर्‍यांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिले नाहीत आणि त्यांना वाटतय की सर्वांनी त्यांच्या धाग्यावर त्यांची फक्त वाहवाईच करावी. ज्यांनी केली नाही त्यांना कविता समजत नाही असे त्यांचे मत. मग तो कुणी ही असो त्यांचा अपमान करत रहा ही त्यांची सवय. मी तर त्यांना शक्यतो कधी प्रतिसाद ही देत नाही तरी त्यांनी मला या धाग्यावर तुम्ही नियमित अस लिहिता आणि तसं लिहिता असे प्रतिसाद दिलेत. अशा आयडीला विनातक्रार झेलतय ते आपलं मिपा. चांगलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
ग
गंगाधर मुटे Sat, 07/23/2016 - 13:03 नवीन
मुटेंनी कधीच स्वतःचे धागे सोडुन दुसर्‍यांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिले नाहीत
दुसर्‍यांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिलेच नाहीत असेही नाही पण जितके द्यायला हवे तितके देऊ शकत नाही. पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही (पूर्वी पडीक असायचो) याचे शल्य मलाही आहे. मिसळपाववरच म्हणून नव्हे तर अन्य कुठल्याही संकेतस्थळावर, फेसबूकवर अथवा व्हाटसपवर देखील मी प्रतिसाद देऊ शकत नाही याला नाईलाज आहे आणि त्याला पर्याय नाही. कारणेच सांगायची तर .... १) एका व्यक्तीला असणार्‍या मर्यादा २) दिवस फक्त २४ तासाचाच असणे ३) नित्यनेमाची कामे टाळून वेळ न वाचवता येणे उदा. जेवण ४) झोपेला अन्य पर्याय नसणे ५) दोनवेळेचे पोट भरण्यासाठी खाजगी कामांना वेळ द्यावाच लागणे वगैरे... पण दुसर्‍यांच्या धाग्यांवर प्रतिसाद न देणे हे चांगले नसले तरी गुन्हा नाही असे मला वाटते.
त्यांना वाटतय की सर्वांनी त्यांच्या धाग्यावर त्यांची फक्त वाहवाईच करावी.
असे मी म्हटले नाही. यापुढे तसे म्हणण्याची शक्यता नाही.
ज्यांनी केली नाही त्यांना कविता समजत नाही असे त्यांचे मत.
असे मी कधीही म्हटलेले नाही. एखाद्या व्यक्तीला म्हटले याचा अर्थ सर्वांना होत नाही.
मग तो कुणी ही असो त्यांचा अपमान करत रहा ही त्यांची सवय.
मी कुणाचाही अपमान करत नाही. मात्र मी म. गांधींचा वारस नसल्याने कुणी माझ्या एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करत नाही. मला देवाने हात दिले आहे आणि माझा अपमान करणार्‍यालाही देवाने गाल दिले आहेत, याचे मला भान असते, इतकेच.
मी तर त्यांना शक्यतो कधी प्रतिसाद ही देत नाही तरी त्यांनी मला या धाग्यावर तुम्ही नियमित अस लिहिता आणि तसं लिहिता असे प्रतिसाद दिलेत.
शितावरून भाताची परिक्षा होत असे म्हणतात.
अशा आयडीला विनातक्रार झेलतय ते आपलं मिपा. चांगलय.
हा सर्वस्वी मिपाचा निर्णय आहे. मी त्यावर मत नोंदवू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
स
सुबोध खरे Sun, 07/24/2016 - 19:17 नवीन
श्री गंगाधर गाडगीळ यांनी आपली एक आठवण लिहिली आहे ती अशी. मला (श्री गंगाधर गाडगीळ याना ) साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तेंव्हा असे वाटायला लागले की आपण आता प्रथितयश साहित्यिक झालो. माझा हा दंभ/ गैरसमज कीर्ती कॉलेज च्या एका कला शाखेच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने खाड्कन जमिनीवर आणला. त्याने आपल्या मित्राला विचारले आपल्याला १२ मार्कांचा ज्ञानेश्वर आहे ना? अमृतातेही पैजा जिंके असे लिहिणारा ज्ञानेश्वर १२ मार्काला मग गंगाधर गाडगीळ कोण्या झाडाचा पाला? मी खाड्कन जमिनीवर आलो आणि मला सगळे हसत आहेत असा भास होत होता. या आठवणींचा कोणाशीही वैयक्तिक संबंध नाही हे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Sun, 07/24/2016 - 19:57 नवीन
माझ्या एका हझलेचा (विनोदी गझल) एक शेर आठवला. नकोस मित्रा मला जळू तू, अता न सामान्य राहिलो मी कितीतरी जाड पुस्तकांचे, लिखान माझे तयार आहे मिपावर पूर्वप्रकाशित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चंपाबाई Mon, 07/25/2016 - 06:03 नवीन
हा प्रसंग पुलं देशपांडेंचाही आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अजया Sat, 07/23/2016 - 12:24 नवीन
मला मुटेंवर फार एकतर्फी हल्ला होतोय वाटत असल्याने सहानुभूती वाटत होती.ती चुकच झाली.मुटे अत्यंत बहकल्यासारखे प्रतिसाद देत असताना कारवाई करुन फक्त बोका ए आझम सारखा आय डी बॅन केला जावा हे दुर्दैव आहे.वैयक्तिक प्रतिसाद हे जर कारण असेल तर पत्ता मागणे काय सार्वजनिक कारण आहे?
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 07/23/2016 - 12:55 नवीन
काय म्हणतेस? बोका - ए - आझम चा आय डी बॅन केला गेलाय? आणि तो ही मु टें सारख्या आयडी मु ळे? असे असेल तर खरच दुर्देव आहे या मिपाचा , बोका - ए - आझम या सारख्या अत्यंत हुशार आणि अभिमानास्पद आयडी बॅन केला जावा आणि मुटेंसारखा दुराग्रही अभिमानी आयडी ज्याला मिपा वरच्या स्वतःच्या धाग्या खेरीज दुसर्‍या कुणाच्या धाग्यावर काडीचाही रस नाही, अशा स्वत:ला श्रेष्ठ समजणार्‍या अणि दुसर्‍यांची अक्कल / लायकी काढणार्‍या मुटेसारखा आयडीच्या वैयक्तिक प्रतिसादाकडे काणाडोळा केले जाणे हे काही पटले नाही , निषेध नोंदवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सामान्य वाचक Sat, 07/23/2016 - 14:15 नवीन
बोका ए आझम हे खरच चांगले लेख आणि अनुवाद लिहायचे अवघड आहे एकंदरीत सगळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
म
मुक्त विहारि Sat, 07/23/2016 - 14:27 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
र
रुस्तम Sat, 07/23/2016 - 19:48 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
ग
गंगाधर मुटे Sat, 07/23/2016 - 13:14 नवीन
अत्यंत बहकल्यासारखे प्रतिसाद देत असताना
मी प्रतिसाद दिलेले नाहीत. केवळ उत्तरादाखल उपप्रतिसाद दिलेले आहेत. मी कुणावर वार केला नाही फक्त स्वसंरक्षण केले आहे.
बोका ए आझम सारखा आय डी बॅन
मी तशी मागणी केलेली नव्हती.
वैयक्तिक प्रतिसाद हे जर कारण असेल तर पत्ता मागणे काय सार्वजनिक कारण आहे?
मी सर्वांना त्यांचे पत्ते मागीतलेले नाहीत. ज्यांच्या पत्त्यांची मला गरज भासली त्यांनाच मागीतली. सार्वजनीक द्या म्हटले नाही, मी माझा इमेल आयडी देऊन व्यक्तीगत पाठवा असे म्हटले. मात्र का म्हटले ते येथे विस्तृत लिहित बसणार नाही. मराठी भाषा जाणणार्‍या कोणत्याही व्यक्तीला ते सहज कळू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
महासंग्राम Sat, 07/23/2016 - 13:37 नवीन
अशा रीतीने ४०० प्रतिसाद नोंदवून कविता विभागातील हा विक्रमी धागा ठरला आहे. बोर्डमॅन मंदार
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 07/23/2016 - 13:38 नवीन
या धाग्याचे दोन तीन वेळा चारशे झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Sat, 07/23/2016 - 13:43 नवीन
अर्रर्र मग प्रतिसाद उडवले गेले काय.... त्या अर्थाने मग १२०० झालेत ख्यिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
वटवट Sat, 07/23/2016 - 13:39 नवीन
कविता आणि बहुतांशी प्रतिसाद ह्यांचा ३६ चा आकडा???
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sat, 07/23/2016 - 13:53 नवीन
जे काही चालले होते आणि चालले आहे ते मिपाला भुषणावह नाही. या असल्या चर्चांमधून कोणाचाही आयडी बॅन होणे हे तर फारच वाईट... मला वाटते एवढे झाल्यावर तरी सगळ्यांनी आपापल्या तलवारी म्यान कराव्यात व विधायक लेखनासाठी लेखणी उचलावी..... शेवटी आपल्या सगळ्यांची इच्छा....
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 07/23/2016 - 15:33 नवीन
तुमचे अत्यंत योग्य असले तरी मी धागाकर्ता असल्याने या धाग्याची समारोपीय पोस्ट माझी असणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.
मिपाला भुषणावह नाही
तसं असेल तर मी माझ्यापरिने एक पर्याय देऊ इच्छीतो की हा धागाच उडवून टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
आ
आनन्दिता Sat, 07/23/2016 - 17:45 नवीन
बोका ए आझम बॅन होणे दुर्दैवी आहे. त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 07/23/2016 - 18:12 नवीन
हेच म्हणतो. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, आदि जोशी इत्यादींचे काही प्रतिसाद खटकण्यासारखे असतीलही. मात्र मुटे यांचे प्रतिसाद अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत. इतर लोकांनी काही मत व्यक्त केले नाही याचा "इतरांना माझे लेखन आवडते" असा सोयिस्कर अर्थ त्यांनी लावलेला आहे. प्रांता-प्रांतातील शेती वेगळी, तिची दुखणी वेगळी असतात हे सत्य मान्य करुनही एक शेतकरी कुटुंबात वाढलेला, शेतीत खेळलेला आणि लहानाचा मोठा झालेला मुलगा म्हणून खेदाने म्हणावेसे वाटते की मुटेंच्या या असल्या पुढारीपणातून शेतकर्‍याचे काही भले होईल असे वाटत नाही. झाले तर नुकसान होण्याचीच शक्यता आहे. ही प्रसिद्धीला हपापलेली तथाकथित साहित्यशेती आहे. असल्या प्रसिद्धीलोलुप टंकनशेतीने गरजू शेतकर्‍यांना काडीचा तरी फायदा होईल का याबद्दल शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
क
कविता१९७८ Sat, 07/23/2016 - 18:32 नवीन
मुटे ईतके उद्घट आणि उर्मट वागुन त्यान्च्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही हा मोठा प्रश्नय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
संदीप डांगे Sat, 07/23/2016 - 18:35 नवीन
१. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, आदि जोशी इत्यादींचे काही प्रतिसाद खटकण्यासारखे असतीलही. २. मात्र मुटे यांचे प्रतिसाद अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत. गावडेसर, दोन्ही विधानांत पक्षपातीपणा जाणवत नाही? ही प्रसिद्धीला हपापलेली तथाकथित साहित्यशेती आहे. असल्या प्रसिद्धीलोलुप टंकनशेतीने गरजू शेतकर्‍यांना काडीचा तरी फायदा होईल का याबद्दल शंका आहे. ह्याच्याशी मात्र सहमत आहे. तसेच तो त्यांच्या आवडीचा उद्योग आहे. करु देत. मिपावर आले म्हणून आपल्याला माहिती झाले, नस्ते आले तर कोण कुठले गंगाधर मुटे, काय काम करतात हेही कळले नसते. मिपाबाहेरच्यांना (किंवा त्या दहा हजार फॉलोअर्सशिवाय) तर अजूनही माहित नसेल पाळेकर तीस वर्षापासून कार्यरत आहेत, वीस लाखाहून अधिक शेतकर्‍यांची आयुष्य बदललीत त्यांनी. तरी शहरी लोकांना आत्ता माहित झाले. मिसळपाववर झिरोबजेटशेतीचे तंत्रज्ञानाबद्दल धागे काढले असते तर त्यांचीही हुर्यो उडवण्यात आली नसती ह्याबद्दल खात्री देऊ शकत नाही. देशी गायीच्याच गोमुत्राला पाळेकर समर्थन देतात. त्याबद्दल त्यांना 'आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे काय' व तत्सम प्रश्न विचारुन भंडावून सोडले असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
स्वामी संकेतानंद Sat, 07/23/2016 - 18:43 नवीन
देशी गायीच्याच गोमुत्राला पाळेकर समर्थन देतात. त्याबद्दल त्यांना 'आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे काय' व तत्सम प्रश्न विचारुन भंडावून सोडले असते.
हा प्रश्न प्रामाणिक वाटतो. भंडावणे वगैरे नाही. जेव्हा आपण एखादा दावा करतो तेव्हा तो शास्त्रशुद्ध फिल्ड एक्सपरिमेन्टद्वारेही सिद्ध करता आला पाहिजे.अनेकानेक शेतकर्‍यांना व्यक्तिगत चांगले अनुभव आले असतीलही आणि पाळेकरांचा अनुभव अतिशय दांडगा आहेच, पण तरीही जेव्हा हे नियंत्रित प्रयोगाद्वारे तपासले जाईल तेव्हा ते तसे सिद्ध व्हावे. यामुळे देशी गाईच्या गोमूत्राचे रासायनिक आणि जीवशास्त्रीय असे कोणते घटक आहेत ज्यामुळे विशेष फायदा होतो ते पण कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 07/23/2016 - 18:52 नवीन
स्वामीजी, तुमचे म्हणणे खरे आहे पण माझ्या 'भंडावून सोडणे' ह्या शब्दाच्या वापरामागे इथेच वाचलेली एक आयुर्वेद बद्दलची चर्चा आहे. आयुर्वेद डॉक्टर आपल्या पद्धतीने समजवून नीट सांगत होते, प्रश्नकर्ता नुसता किस पाडत होता. असे अनेकदा अनेक बाबतीत झाले आहे. अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीत कैच्या कै दावे करतात, त्यांना कोणीही हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करा आणि मग बोला असे म्हणत नाही. मुकाटपणे उत्पादने वापरतात. असो. एखादी गोष्ट वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेली आहे की नाही हे जाणून घेण्याची इच्छा असणे वेगळे. पण नुसतं आपल्याला पटत नाही म्हणून आपलेच म्हणणे रेटत भंडावून सोडणे वेगळे. तसे मिसळपाववर घडतांना पाहिले आहे इतकेच सांगायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Sat, 07/23/2016 - 18:59 नवीन
100 टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभ्या.. Sat, 07/23/2016 - 18:48 नवीन
सहमत, आणि प्रसिद्धीलोलूप म्हणायला त्यांनी धागा काढणे एवढेच केले होते. ना खरडवह्यात येऊन ना व्यनि करून आवतण धाडले होते. ना व्हॅटसप वर पिंगत होते कि द्यारे मला प्रतिसाद. आधीच्या त्यांच्या बर्याच धाग्याना मर्यादीत प्रतिसाद होते. तेवढ्यावर भागले असते. आता सांगा उचकवले कोण? चुकीचा निवाडा करायला आपण कुणीच जज्ज नाही आहोत सो इतके झाल्यावर मुटे तुम्हारा चुक्याच अशी भूमिका घेणे मला तरी पटलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उडन खटोला Sat, 07/23/2016 - 18:54 नवीन
असं मला देखील वाटतंय. अर्थात मी कोण म्हणा! बोका ने मुटे दारु पिउन पडले असतील असं लिहिलं होतं. त्यावर हे आवडलं नाही असं लिहीलं होतं. बाकि मुटे अथवा बोका हे दोघे सुद्धा मित्र अथवा शत्रु दोन्हि पैकी एकही नाहियेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Sat, 07/23/2016 - 19:01 नवीन
माझ्या प्रतिसादाबद्दल म्हणत असाल तर मी ही शेतकरी कुटुंबातील असल्याने मला हा शेतकर्‍यांबद्दलचा कळवळा बेगडी वाटतो. हे असल्या कायम आक्रमक हल्ल्याच्या स्वरुपातील काव्यशेतीने शेतकर्‍याचे काहीही भले होणार नाही. आता ज्यांना विरोधी मते असणार्‍या धाग्यांवर आपली मते मांडूच नये असे म्हणत असाल तर प्रश्नच मिटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मोदक Sat, 07/23/2016 - 19:06 नवीन
आता ज्यांना विरोधी मते असणार्‍या धाग्यांवर आपली मते मांडूच नये असे म्हणत असाल तर प्रश्नच मिटला. +११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
संदीप डांगे Sat, 07/23/2016 - 19:19 नवीन
शमत हायेच.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अभ्या.. Sat, 07/23/2016 - 19:47 नवीन
गावडे सर नमस्कार, आपली भूमीका कळाली. आता असे धरून चालू कि मुटे सर पुढारीपण करताहेत. ओके. कुणाचे? आपले? शेतकऱयांचे? आपल्या प्रतिसादावर ठरणारे का त्यांचे पुढारीपण? आपण दोघेही शेतकरी कुटुंबातले आहोत. ओके. काय फरक पडणारे आपल्या निषेधाच्या प्रतिसादाने? त्यांची भूमिका बेगडी आहे. ओके. अस्सल भूमिका कुणाची आहे आपणास ठाऊक आहे का? आपणास म्हणजे आपणा सर्वानाच. शेतकऱयांचे भले होणार नाही. ठीक आहे. ज्याने भले होईल अशे चार मार्ग आपण हुडकून काढू. काय म्हणता? राहता राहिले विरोधी मत मांडूच नये का? अवश्य मांडावे. अगदी संदर्भासहित मांडावे. धागा कवितेचा, कशाला करायचा काथ्याकूट? त्यावर धागाकरत्याने खुलासा द्यावा अशी अपेक्षा पण करू नये. प्रश्नच मिटतो. उत्तर दिलेच पाहिजे असा आग्रह होतो तेव्हा वेगळे वळण मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 07/23/2016 - 19:54 नवीन
चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Sat, 07/23/2016 - 18:53 नवीन
गावडेसर, दोन्ही विधानांत पक्षपातीपणा जाणवत नाही?
पक्षपातीपणा करायचा असता तर काही प्रतिसाद खटकले असं लिहीलंच नसतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 07/23/2016 - 19:03 नवीन
खटकण्यासारखे असतीलही. (डळमळीत विधान) अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत. (ठाम विधान) ह्यामुळे वाटले तसे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 07/23/2016 - 19:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
शि बि आय Sat, 07/23/2016 - 17:52 नवीन
उठलीच पाहिजे ..... उठलीच पाहिजे... बोकाभाऊंवरील बंदी उठलीच पाहिजे
  • Log in or register to post comments
च
चैतू Sat, 07/23/2016 - 18:24 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शि बि आय
च
चैतू Sat, 07/23/2016 - 18:24 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शि बि आय
च
चैतू Sat, 07/23/2016 - 18:24 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शि बि आय
च
चैतू Sat, 07/23/2016 - 18:24 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शि बि आय
उ
उडन खटोला Sat, 07/23/2016 - 18:40 नवीन
अरेरे! अय्या! आयला! काय सांगता? कैच्या कै... शी बाबा! हा अन्याव आहे. बरं झालं. का पण? झालं?
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sat, 07/23/2016 - 18:46 नवीन
बोका-ए-आझम - Tue, 19/07/2016 - 19:57 का स्वतःचा वेळ वाया घालवताय? मनोरुग्णांसोबत वादविवाद करायची एवढी हौस का आलीय आज तुम्हाला? http://www.misalpav.com/comment/859096#comment-859096 ------------------------ धाग्याचा सारांश: बोका-ए-आझम - Wed, 20/07/2016 - 23:42 मै तो हूं पागल ये कहूं हर पल कर कोई हलचल होने दे होने दे होने दे होने दे होने दे कोई दीवानगी...! http://www.misalpav.com/comment/859875#comment-859875 ------------------------ @अजया @आनन्दिता @शि बि आय गंगाधर मुटेला मनोरुग्न आता कोण म्हणेल, असा प्रश्न पडलाय का तुम्हाला? तसे असेल तर तुम्ही तसा प्रतिसाद लिहिला आहे आणि मी वाचला आहे, अशी आपण समजूत करून घेऊयात ना! कुणाचाही आयडी बॅन होणे दुर्दैवीच आहे. बोका-ए-आझमचा आयडी बॅन झाला काय किंवा बंदी उठवली काय, मला यात रस नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Sat, 07/23/2016 - 19:32 नवीन
मुटे इथे तुम्ही लोकांची अक्कल, दानत काढलीत ते योग्य होतं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
म
मितभाषी Sat, 07/23/2016 - 19:39 नवीन
प्रतिसाद देताना किमान सभ्यता पाळायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा