Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/09/2016 - 09:18
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
175546 वाचन

💬 प्रतिसाद (484)
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:29 नवीन
ही त्यांची अनेक महिन्यापासूनची सवय आहे, हे तुम्हाला माहीत असतानाही असा प्रतिसाद?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
आ
आदिजोशी Tue, 07/19/2016 - 16:37 नवीन
मुटे काक, तुम्ही इतकी वर्ष ह्या क्षेत्रात आहात, उमेदीची अनेक वर्ष संघटना आणि शेतकर्‍यांसाठी वेचलीत... का ह्यांच्या नादी लागताय? ह्यांना तुम्ही कविता करण्याव्यतिरिक्त ठोस काम काय केलंय हे जाणून घ्यायचंय ना? मग करा एक यादी आणि ह्यांच्या तोंडावर फेकून मारा. शेतकर्‍यांच्या ह्या ह्या समस्या आहेत... त्यावर मी हे उपाय शोधले आणि अंमलात आणले... त्यातून शेतकर्‍यांचा असा असा फायदा झाला... एक कंसॉलिडेटेड रिप्ल्यास फेकून मारलात की विनाकारण बोलणारी थोबाडं बंद होतील...
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:45 नवीन
तुम्ही आलात? मला माहीतेय की बाकी सवंगडी दमले की तुम्ही बाजू लढवायला येत असता. (जुने धागे बघावेत) मी शेतकरी मानूस आ।ए. पीक घेण्यासाठी निंदण, खूरपण व फवारणी आवश्यक आहे, हे माहीत आहे. जनावरांनी त्रास दिला तरी शेती सोडून पळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Tue, 07/19/2016 - 16:48 नवीन
विषय सोडून गप्पा हाणायची चिकाटी बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:54 नवीन
याच निकषावर तुम्ही स्वतःला तपासा. तुमचा प्रतिसाद कवितेशी निगडीत आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ट
टवाळ कार्टा Tue, 07/19/2016 - 16:39 नवीन
(युनोहू)ता का गप्प आहेत इथे?
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:46 नवीन
टवाळ. माफ करा. तुम्ही आले तर लक्षच नव्हते. या स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 16:53 नवीन
मुटे साहेब, असे डोक्यात राख घालून घेण्यापेक्षा "एवढे" लोक आपल्यावर टीका का करतात याचा शांत डोक्याने विचार करा. मिसळपाव हे सर्वात जास्त वाचले जाणारे मराठी संकेत स्थळ आहे असे काही दिवसांपूर्वी कुणीतरी लिहिल्याचे आठवते. आपली भूमिका शांतपणे मांडली गेल्यास जे लोक मिपाचे सदस्य नाहीत त्यांना ही आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा होईल. मला अशा बऱ्याच वाचनमात्र असलेल्या लोकांचे फोन व्यनि येतात यामुळे याचा सर्वदूर असलेला परिचय लक्षात आला. बाकी दंगा करणारे करू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:57 नवीन
मिसळपाववर ते लेख कविता वाचायला येतात. तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद नव्हे. जे वाचतात ते वेगळे मिपासदस्य आहेत. तुमच्या दहापाच जणांचा कंपू म्हणजे अख्खी मिसळपाव नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 17:10 नवीन
तुमच्या दहापाच जणांचा कंपू म्हणजे अख्खी मिसळपाव नव्हे. बिस्मिल्लाहरहिमानुर्रहीम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
अ
अनुप ढेरे Tue, 07/19/2016 - 18:26 नवीन
तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद नव्हे.
ऑ?? आम्ही तर बुवा सुबोध खर्‍यांचे प्रतिसाद वाचायलाच येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
र
रुस्तम गुरुवार, 07/21/2016 - 06:25 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
र
रुस्तम गुरुवार, 07/21/2016 - 06:26 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ज
जेपी Tue, 07/19/2016 - 16:53 नवीन
असल्या भाट लोंकामुळे शेतकरी संघटना पर्यायाने शेतकरी बदनाम झाला. नेणत्या राजाची हुजरेगीरी करण्यात संघटना वाया गेली. 2007 साली विनय हर्डीकर यांनी सकाळ मध्ये याविषयक लेख लिहीला होता.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 16:59 नवीन
या आपली येण्याची वेळ झाली आहे. स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:11 नवीन
संकेतस्थळ मालक आणि संपादक मंडळ केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून पाहतोय मिपावरच १५-२० आयड्यांचं टोळकं माझ्या धाग्यावर तुटून पडत असते. हे १५-२० आयड्यांचं टोळकं म्हणजे अख्खी मिसळपाव आहे किंवा हे मिसळपावचे अधिकृत प्रतिनिधी आहे असे मी मानत नाही. तुम्ही काय मानताय हे मला माहीत नाही. स्वत:ची ओळख लपवणार्‍यांना काहीच धरबंद नसतो. ते काहीही बोलू शकतात, लिहू शकतात. पण त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. मात्र यावेळेस मी सर्वांना जशास तसे उत्तर देणार आहे, यांची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की, यापूर्वी सारखी एकतर्फ़ी कारवाई करून केवळ माझे उपप्रतिसाद उडवू नयेत. वाचकांना सर्व वाचू द्या. ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीने काय ठरवायचे ते ठरवतील. आपला एक सदस्य गंगाधर मुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 17:15 नवीन
गल्ली चुकली काय मालक? संपादकांना दिलेला प्रतिसाद चुकून इकडे आला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
म
मोदक Tue, 07/19/2016 - 17:17 नवीन
पहिले तुम्ही नेव्हीत होता हे सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 17:19 नवीन
पण मी कुठे म्हणालो मी नेव्हीत होतो? मी तर शेतकरी आहे आणि आमची कोकणात शेती आहे कुळकायद्यात बरीचशी जाऊन पोटापुरती थोडीशी शिल्लक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:18 नवीन
जाहीरपणे सांगण्याची शक्ती आहे माझ्यात. पदराआडून वार करणारापैकी मी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 17:19 नवीन
कुणाच्या पदराआडून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:42 नवीन
जे पदराआडून बोलतात त्यांना हा प्रश्न विचारावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जेपी Tue, 07/19/2016 - 17:11 नवीन
शेंच्युरी निमीत्त श्री.मुटे यांचा सत्कार एक ऊंट,दोन शेळ्या,तीन कडब्याच्या पेंड्या आणी चार संस्थळांचे पत्ते देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम मिपाकर कार्यकर्ते..
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:14 नवीन
तुमचा संपूर्ण परिचय व पत्ता देण्याची हिंमत दाखवाल तर तुमचा सत्कार स्विकारायला मी तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Tue, 07/19/2016 - 17:23 नवीन
पुर्ण पत्ता हवाय. पंकज जोशी मुपो-खरोळा ता-रेणापुर जि -लातुर. मोबाईल आणी ईमेल हवा असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 17:26 नवीन
उंट कुठून आणणार ते पाहिले सांगा मगच सत्काराबद्दल बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:41 नवीन
सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ सांगा मी यायला तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:48 नवीन
सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ सांगा मी यायला तयार आहे. आणि हो इथेच जाहीर करा. मिपाकरांना माहीत व्हायला पाहिजे की तुम्ही शब्दाचे पक्के आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 18:01 नवीन
जे पी उंटाची ऑर्डर दिली आहे का? राजस्थानातून आणायला वेळ लागतो म्हणून म्हटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 18:15 नवीन
मला असे आठवते की गंगापूरवरून लातूरला जाताना मध्ये रेणापूर तालुका लागतो. पुढल्या दौर्‍याचे वेळी अवश्य त्यांचे घरी जाईन. उंट आणि इतर वस्तू त्यांचेकडे नसल्या तरी तेवढ्या रक्कम रोख किंवा चेक घेऊन गावच्या सरपंच्याच्या हस्ते शाल व श्रीफळ स्विकारता येईल. मात्र मिपावर फोटो अवश्य टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चंपाबाई Sat, 07/23/2016 - 19:40 नवीन
मोगाखानला भेटायला बोलावत होतास तेंव्हा तो फोन नंबर की अ‍ॅड्रेस मागत होता तेंव्हा नाय दिलास . आता मात्र दिलास. धिस ईज डिस्क्रिमिनेशन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सामान्य वाचक Tue, 07/19/2016 - 17:28 नवीन
नाव गाव फळ फुल कसले खेळताय ?
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 07/19/2016 - 17:29 नवीन
मिपाकरानो बस करा आता, हा धागा शतकी प्रतिसादाचा गक्कीच नाही, उगा अति महत्व देउ नका.यापेक्षा खुप चान्गले आणि माहीतीपुर्ण धागे आहेत त्यान्चा असा अपमान होउ देउ नका.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:46 नवीन
कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद देऊन प्रतिसादाची संख्या स्वतःच वाढवायची आणि इतरांना (जे ऐकण्याची अजिबात शक्यता नाही) सल्ला द्यायचा. काय म्हणावे याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 17:45 नवीन
कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद देऊन प्रतिसादाची संख्या स्वतःच वाढवायची आणि इतरांना (जे ऐकण्याची अजिबात शक्यता नाही) सल्ला द्यायचा. काय म्हणावे याला?
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 07/19/2016 - 18:01 नवीन
काही म्हणु नका हो, तुम्हाला इतकी तसदि घ्यायची गरज नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
सामान्य वाचक Tue, 07/19/2016 - 18:37 नवीन
,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 18:41 नवीन
तुम्ही तसदी नियमितपणे न चुकता घेता आणि मी तसदी घेऊ नये? यह तो बहुत बडी नाइन्साफी होगी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 07/19/2016 - 17:56 नवीन
बर्याच सिनेमात हा ड्वायलाग असतो....ऐकलाय का कोणी ?
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 18:01 नवीन
तुमचाही पत्ता द्या. थेट तुमची दुवा घ्यायला तुमच्या घरी येतो. आणि दुवा देण्याइतपत तुमचे कोनते महान कर्तुत्व आहे हेही मिपावर छायाचित्र आणि सविस्तर वृत्तांतासह जाहीर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 07/19/2016 - 18:20 नवीन
तुमचे कार्य मात्र खचितच महान आणि लोकोपयोगी आहे हे आम्ही झाईर करु इच्छित आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 18:24 नवीन
पळवाट शोधून पळू नका. पत्ता द्या. घरी येतो. दुवा द्या. चहाही मागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 07/19/2016 - 18:31 नवीन
चहाचं म्हणत असाल तर एक चहा कट्टा करुया हवं तर...आम्ही लोकांना चहा आणि पाणी दोन्ही पाजतो ! तुम्ही आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धाग्यावर भेटलात...जीवन धन्य झाले...आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 18:53 नवीन
पत्ता कधी देणार? तेवढं सोडून अवांतर लिहिण्यात फारच उत्साह आहे तुम्हाला. पत्ता ध्या. तुमचा दुवा घ्यायला येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
स
सूड Tue, 07/19/2016 - 19:52 नवीन
पत्ता कधी देणार?
ह्यातला कंचाबी उचला!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ध
धनावडे गुरुवार, 07/21/2016 - 10:34 नवीन
मुटे साहेब सगळ्याचे पत्ते मागतायत मी द्यायला तयार आहे माझा पत्ता काय आहे सध्या भात लावणीसाठी गावी आलोय ते आलेतर भात लावायला मदत होईल आणि शेतीतज्ञ आहेत तर काहीतरी सल्ले पण देतील येताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Fri, 07/22/2016 - 01:12 नवीन
मला विपू करा. नक्की भेटुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
ग
गंगाधर मुटे Tue, 07/19/2016 - 18:26 नवीन
किंवा मी माझा पत्ता देतो. जाण्यायेण्याचा खर्च देतो. पाहुणचार करतो. माझ्या घरी या. दुवा द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 18:30 नवीन
मामलेदार रेकी सारखा पाकीटात घालून दुवा पाठवून द्या हा का ना का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 07/19/2016 - 18:33 नवीन
नको रे बाबा...कशाला विषाची परीक्षा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा