Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शृंगापत्ती

स
सुबोध खरे
Fri, 08/19/2016 - 06:25
🗣 413 प्रतिसाद
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

प्रतिक्रिया द्या
92497 वाचन

💬 प्रतिसाद (413)
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 10:50 नवीन
अतिशय असहमत पेठकर काका.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
श
शरभ Fri, 08/19/2016 - 10:41 नवीन
लग्नाआधीच्या संबंधांमुळे मुलगी व्यभिचारी ठरत नाही. जर का तिच्यावर गर्भपाताची वेळ आली नसती तर कळलं तरी असतं का कुणाला ? मला वाटतं more than anything else भारतीयांची मानसिकता मोठा problem आहे. मुलं सर्वकाही करुन नामानिराळे राह्तात natural advantage मुळे. हेच लग्न केलेल्या मुलाच्याबद्द्ल (लग्नापूर्वीच) काही समजल असतं तर तुमच्या मित्राला वाईट वाटलं असतं का इतकं मुलीबद्दल ? Time to grow up. - शरभ
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/19/2016 - 10:43 नवीन
लग्न केलेल्या मुलाच्याबद्द्ल (लग्नापूर्वीच) काही समजल असतं तर तुमच्या मित्राला वाईट वाटलं असतं का इतकं मुलीबद्दल ह्याच उत्तर त्यांना वाईट वाटलं असत अस देउ शकतो, कारण त्यांना विवाहपुर्व / बाह्य संबंध मान्य नाहित!
↩ प्रतिसाद: शरभ
श
शरभ Fri, 08/19/2016 - 10:46 नवीन
हो का ? पण त्या केसमध्ये अगदी श्रूंगापत्ती वगैरे मुळीच आली नसती अस मी तुम्हाला सांगतो ! Theory of relativity ! - शरभ
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/19/2016 - 10:47 नवीन
.
↩ प्रतिसाद: शरभ
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 10:50 नवीन
मुलाबद्दल समजलं असतं तर वाईट वाटल असत हे नक्की का? कारण इथे ह्या कथानकातही एक मुलगा आहेच की असा, पण त्याच्या विषयी काहीही शंका आलेल्या लिहिलेल्या तरी नाहीयेत.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
श
शरभ Fri, 08/19/2016 - 10:52 नवीन
म्हणूनच म्हंटलं - Theory of relativity... - शरभ
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/19/2016 - 11:04 नवीन
होतेयं का? प्रश्न मुलीबाबत उभा राहिला कारण त्या मुलीने त्यांच्या ओळखीतल्या मुलाशी लग्न केले. ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल करतो असे मला वाटते. एखाद्या मुलीने विवाहपुर्व संबंध ठेवलेल्या मुलाशी लग्न केले तर हे प्रीमाय्सेस लागु होईल असे वाटते. ओव्हरॉल डॉक्टरांची पहिल्यावेळेची (जेव्हा अबॉर्शन केले)रिअ‍ॅक्शन समजु शकली नसल्याने हे सगळे शक्यतांवरच राहते.
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 11:08 नवीन
ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल करतो असे मला वाटते.
करु नये. मुलगी डॉ कडे गेली ते पेशंट म्हणून, तिचे डिटेल्स डॉ ना माहिती आहेत ते व्यावसयिक कपॅसिटीमध्ये. ते पर्सनल लेव्हलला आणायला निदान नकोत तरी.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/19/2016 - 11:15 नवीन
इतके ईमोशनल सेपरेशन होत नाहियेत म्हणुन तर शृंगापत्ती झालिये.
↩ प्रतिसाद: यशोधरा
आ
आनन्दा Fri, 08/19/2016 - 11:27 नवीन
यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे संबध डॉ. आणि पेशंट असे होते तोपर्यंत हे ठीक होते. पण आता संबंध पर्सनल लेव्हल ला आलेले आहेत, तेव्हा आता हे पेर्सनल लेव्हलला आणू नका असे म्हणण्यात काय अर्थ आहे? समजा तुम्ही डॉ आहात आणि तुमचा मुलगा तुमच्या अश्या पेशंटशी योगायोगाने लग्न करणार आहे असे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?
↩ प्रतिसाद: यशोधरा
ग
गंम्बा Fri, 08/19/2016 - 11:31 नवीन
समजा तुम्ही डॉ आहात आणि तुमचा मुलगा तुमच्या अश्या पेशंटशी योगायोगाने लग्न करणार आहे असे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?
त्यापेक्षा असे समजा. तुमच्या मुलाचे/मुलीचे लग्ना आधी दुसर्‍यांशी संबंध आहेत/होते ( आणि हे तुम्हाला माहीती आहे ), आता त्यांचे लग्न ठरवायची वेळ आली, तर तुम्ही काय करणार? दुसर्‍यांच्या मुला/मुलींबद्दल बोलायच्या आधी स्वता कडे बघा, मग कॉमेंट करा इतकेच नम्रतेनी सांगु इच्छितो.
↩ प्रतिसाद: आनन्दा
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 11:43 नवीन
माझा मुलगा जर लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतो तर कोणाशी लग्न करावे हाही निर्णय घेऊ शकतोच की. मी काही करण्याचा प्रश्न कुठे आला? त्यांच्या लग्नात वरमाय म्हणून मिरवेन आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. हे अगदी मनापासून सांगते आहे.
↩ प्रतिसाद: आनन्दा
N
nanaba Fri, 08/19/2016 - 12:56 नवीन
1. They should sit and discuss What their expectations are from each other now onwards.. 2. Should get tested for STDs. These are the 2 things I would expect..
↩ प्रतिसाद: आनन्दा
अ
अजया Fri, 08/19/2016 - 10:42 नवीन
विवाहपूर्व संबंध, त्यातनं उद्भवलेली गर्भधारणा ,नंतर दुसर्या मुलाशी लग्न करणे यात नक्की चूक काय समजायचे आहे? या गोष्टी काही नविन नाहीत कुठल्याच काळात. गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले. विवाहपूर्व बाॅयफ्रेंड आहे.त्याच्याशी संबंध आहेत पण तो लग्न करुन कायम राहण्यालायक नसेलही वाटला तिला.तर तिने का ते ओझे बाळगावे. उगाच आपले नैतिक मापदंड दुसर्याला लावण्यात काय अर्थ आहे? डाॅ असे वागून उगाचच काॅम्प्लिकेशन तयार करत आहेत असे वाटतेय.
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 08/19/2016 - 13:09 नवीन
असेच म्हणतो....
↩ प्रतिसाद: अजया
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 20:08 नवीन
गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले. अशा गोष्टींकडे त्रयस्थ पणे तुम्ही जेंव्हा बघत असता तेंव्हा तुम्हाला त्याचे काहीही वाटत नाही पण हीच गोष्ट तुमच्या जवळच्यांच्या बाबतीत होते तेंव्हा तुम्ही अपसेट होता"च". आपण रोज जर तोंडाच्या कर्करोगाच्या केसेस पाहता तेंव्हा त्यात आपली भावनिक गुंतवणूक नसते. पण हीच गोष्ट आपल्या मित्राच्या बाबतीत होते तेंव्हा त्याचा आपल्याला प्रचंड त्रास/ धक्का बसू शकतो. हि मी प्रत्यक्ष अनुभवलेली गोष्ट आहे.(माझ्या डेंटिस्ट मित्रालाच तोंडाचा कर्करोग झाला होता सिगरेट तंबाखू न खाता )
↩ प्रतिसाद: अजया
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 08/22/2016 - 06:52 नवीन
गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले. अशा गोष्टींकडे त्रयस्थ पणे तुम्ही जेंव्हा बघत असता तेंव्हा तुम्हाला त्याचे काहीही वाटत नाही पण हीच गोष्ट तुमच्या जवळच्यांच्या बाबतीत होते तेंव्हा तुम्ही अपसेट होता"च". >> अनुमोदन. हेच म्हणतोय!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आदूबाळ Fri, 08/19/2016 - 10:56 नवीन
लग्नाआधी काय झालं होतं याचा पुढे संबंध नाही हे वरच्या अनेक प्रतिसादांत आलं आहे. त्याला खच्चून अनुमोदन. त्याबरोबरचः व्यावसायिक नीतिमत्ता पहिली, दुसरी, शेवटची. डॉक्टर, वकील, बँकर, सीए वगैरे लोकांकडे त्यांचे क्लायंट अतिशय विश्वासाने आपल्या गोपनीय गोष्टी सोपवतात. त्यात काही बेकायदेशीर नसेल, तर व्यावसायिकाने ती गोष्ट दुसर्‍या कोणाला सांगायचा काही संबंधच येत नाही.
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 20:10 नवीन
आ बा साहेब या सर्व लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे हे आपण सांगू शकाल काय?
↩ प्रतिसाद: आदूबाळ
व
वाल्मिक Sat, 08/20/2016 - 20:14 नवीन
पण ते उल्लंघन झाले असे कुठे म्हणाले ?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/19/2016 - 10:59 नवीन
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील? किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील? असे उगीच, आजच्या काळातले अनैतिक, पण प्रामाणिक प्रश्न मनांत आले.
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 11:06 नवीन
मला वाटते पेठकरकाका, हे प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे.ज्यांना मुलाच्या/ मुलीच्या/ जावयाच्या/ सुनेच्या विवाहपूर्व संबंधांशी निगडीत संसार करायचा आहे, ते नाहीच स्वीकारणार. पण जर ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते, त्यांना फारश्या अडचणी येणार नाहीत, आल्याच तरी सोडवतील.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/19/2016 - 12:47 नवीन
पण यशोधरा, आपल्याकडे मुलाची-मुलीची चौकशी करण्याची पद्धत आजही आहे. जात-पात आजही पाहिली जाते. नवर्‍या मुलाच्या वडीलांची गुंडगिरीची, बेकायदेशीर दारू गाळण्याची, बाई ठेवलेली असण्याचा इतिहास असेल तर अशा घरात मुलगी आजही दिली जात नाही. तसेच आई कजाग आहे की सुस्वभावी आहे, तिच्याच कांही भानगडी कानावर आल्या तर अशा घरातही मुलगी द्यायचे धाडस कोणी करीत नाही हे वास्तव आहे. ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते ते वरील परिस्थितीत विचलीत होत नाहीत? हेच मुलाच्या लग्ना बाबतही असते. मला मान्य आहे की ज्यांना संसार करायचा असतो त्यांचे कॅरेक्टर महत्वाचे तरी पण कुठल्या संस्कारांच्या पार्श्वभूमीवर त्या मुलाचे/मुलीचे संगोपन झाले आहे हे ही पाहिलं जातंच नं. त्यात कांही अयोग्य आहे असेही मला वाटत नाही. गुन्हेगार व्यक्ती (कायद्याने किवा नैतिकतेने) आयुष्यात कधी बदलतच नाही असं मला अजीबात म्हणायचे नाहीये. पण अशा किती टक्के व्यक्ती पुढील आयुष्यात १८० डिग्री कोनात वळतात/वळू शकतात? आपण आपल्या मुलांबाबत अशी जोखिम उचलणार नाही. आता मुलांनी आपल्यासमोर नाईलाजच उभा केला तर आपण कांही करूच शकत नाही म्हणून स्विकारतो. बाकी संधी मिळाल्यास जात, धर्म, सामाजिक पार्श्वभूमी, सुसंस्कृतपणा इ.इ. सर्व पाहूनच लग्न केली जातात. दोन वेगळ्या धर्मांमध्येही लग्न होतात पण ती सहजतेने स्विकारली जात नाही. नाईलाजाने स्विकारली जातात. ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते तेही आपल्या मुलाला/मुलीला पाकिस्तानी जोडीदार स्विकारणार नाहीत. बाकी कोणी १८ वर्षावरील मुलाने मुलीने असा निर्णय घेतलाच तर आई-वडील काय करू शकणार? तरीपण मुलांशी कायमस्वरूपी संबंध तोडल्याच्या घटनाही आपण पाहतोच. त्यामुळे ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे फार क्वचित आचरणात आणलेले दिसून येते बहुतांशी माणसं ही वरील विधान तात्विक दृष्ट्या मान्य करतात पण वास्तवात स्विकारत नाहीत असे माझे निरिक्षण आहे. असो.
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 13:06 नवीन
पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि संत्री अशा तुलना करताय. खोटेपणा, गुंडगिरी, दुष्टपणा आणि गरोदरपण/ गर्भपात एकाच पारड्यात? गरोदर असणारी व्यक्ती सुसंस्कृत असू शकणार नाही, असं गृहीतक आहे का? पाकिस्तानी सून वा जावई चालणार नाही पण असं समजून चालू कुठं एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीमुळे आपल्या मुलाला/ मुलीचे प्राण वाचतात, ते चालेल का? मी extreme उदाहरण घेतलंय पण मुद्दा लक्षात घ्यायला ते चालेल असे वाटते.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/19/2016 - 13:32 नवीन
यशोधरा माझा प्रतिसाद हा 'ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा' ह्या विधानाला खोडून काढण्यासाठी आहे. आपण, लग्न होतं त्या क्षणापासून नाही तर पार्श्वभुमीलाही तितकेच महत्त्व देतो. आणि ते रास्तच आहे असे मला वाटते. पैकी काळाच्या ओघात कांही संकल्पना धूसर झाल्या आहेत त्यामुळे शहरात तरी जातपात पाहिली जात नाही. गावाकडे अजूनही सैराट होऊन चालत नाही. पाकिस्तानी उदाहरणातही आपल्यात रोटी व्यवहार होणे शक्य आहे पण बेटी व्यवहार सहसा मान्य होत नाही. एखाद्या पाकिस्तान्यामुळे आपले प्राण वाचले म्हणून आपण लगेच बेटी व्यवहार करणार नाही (आणि तेही करणार नाहीत). सर्वसाधारण परिस्थिती आणि अपवादात्मक परीस्थिती ही वेगवेगळी असते. गेल्या ३५ वर्षात मस्कतमध्ये अनेक पाकिस्तानी आणि अरबी व्यक्तींशी आणि कुटुंबांशी माझा जवळून संपर्क आला आहे. दोन वेळा मी कराचीलाही जाऊन आलो आहे. तिथल्या दुकानदाराशी पाकिस्तानी आणि भारतिय लोकांबद्दल विस्तृत चर्चाही केली आहे. त्या वृद्ध पाकिस्तानी दुकानदाराचे एक वाक्य मला पटले आणि आजही स्मरणात आहे. 'जमीनपार लकिर मारनेसे इन्सान अलग नही होते'. ह्याचा अर्थ भारतिय आणि पाकिस्तानी कौम एकच आहे. हा आदर्शवाद मला भावला. पण जिथे आपण ९२ कुळी आणि ९६ कुळीत फरक करतो किंवा देशस्थ आणि दैवज्ञ मध्ये फरक करतो तिथे भारतिय आणि पाकिस्तानी लग्नसंबंध कसे स्विकारले जातील?
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 13:39 नवीन
काका :) आपण बदल करणारच नाही म्हणता, मग कोण करणार बदल? आकाशवाणी तर नाही होणार! प्रत्येकानेच ठरवले तरच लहान मोठे बदल होतील ना? आणि पाकिस्तानी व्यक्तीने जीव वाचवला म्हणून लग्न करायचं, असा नाहीये हो! मुद्दा हा होता की पाकिस्तानी व्यक्तीकडून मदत घेतलेली चालू शकते तर कोणी लग्न केल्यास काय बिघडेल? असो. मला जे सांगायचंय ते सांगून झालेय. जमाना बदललाय, बदलतोय. बदलायला हवा.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/19/2016 - 14:41 नवीन
मी आजच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. आपण बदल करणारच नाही म्हणता असे मी कुठे म्हंटले आहे? पाकिस्तानी व्यक्तीकडून मदत घेतलेली चालू शकते तर कोणी लग्न केल्यास काय बिघडेल? पुन्हा तोच मुद्दा उगाळण्यात काय हशील आहे? रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार ह्यावर ते भाष्य आहे. मदत घेऊच नये, संबंध ठेवूच नये असे मी कुठेही विधान केलेले नाही. आपला विषय बेटी व्यवहाराबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने लिहीले आहे. ते वास्तव आहे. पण त्यात बदल होऊच नये, होणारच नाही असे कांही मी म्हंटलेले नाही. मूळ वादातील ज्या क्षणाला लग्न होते त्या क्षणापासून ह्या विषयाकडे पाहण्याचा आदर्शवाद तू मांडला होतास पण वास्तव विपरीत आहे हा माझा मुद्दा आहे. सर्व कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतली जाते. आणि तेही फक्त भारतात नाही तर पाकिस्तानात, अरबस्थानात आणि जगाच्या इतर देशांमध्येही पाहिली जाते. कुठेही दोन टोकाच्या संस्कृतीतील लग्नसंबंध सहजासहजी मान्य होत नाहीत. अपवाद असतीलही पण ते अपवादच असतात.
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 08/19/2016 - 13:07 नवीन
पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि संत्री अशा तुलना करताय. खोटेपणा, गुंडगिरी, दुष्टपणा आणि गरोदरपण/ गर्भपात एकाच पारड्यात? गरोदर असणारी व्यक्ती सुसंस्कृत असू शकणार नाही, असं गृहीतक आहे का? पाकिस्तानी सून वा जावई चालणार नाही पण असं समजून चालू कुठं एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीमुळे आपल्या मुलाला/ मुलीचे प्राण वाचतात, ते चालेल का? मी extreme उदाहरण घेतलंय पण मुद्दा लक्षात घ्यायला ते चालेल असे वाटते.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
च
चलत मुसाफिर Fri, 08/19/2016 - 15:51 नवीन
माझ्या अपत्याने हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्मातील कुणाशीही विवाह केला तरी मला चालेल. पण मुस्लीम किंवा ख्रिस्ती व्यक्तीशी विवाह करण्यास संमती मी देणार नाही. जर दिली, तर आधी त्या व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारावा आणि मुले हिंदू असतील याची हमी द्यावी अशी अट घालीन. (माझी संमती विचारलीच नाही तर काय, हा वेगळा मुद्दा.)
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ग
गंम्बा Fri, 08/19/2016 - 11:10 नवीन
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?
दुसर्‍याच्या मुलामुलींबद्दल सोडा काका. समजा कोणाला आपल्या मुला/मुली बद्दलच असे समजले की त्यांनी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवले आहेत तर हे प्रामाणीक प्रश्न विचारले जातील का?
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
श
शरभ Fri, 08/19/2016 - 11:40 नवीन
+१ असले प्रश्न हे दुसर्यांच्या मुलींबद्दलच यायचे हो.. - शरभ
↩ प्रतिसाद: गंम्बा
स
सूड Fri, 08/19/2016 - 11:15 नवीन
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील? किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील? असे उगीच, आजच्या काळातले अनैतिक, पण प्रामाणिक प्रश्न मनांत आले.
अगदी प्रामाणिक प्रश्न आहे काका!! पण अशा मुलीला/मुलाला ट्रीटमेंट देणारा/री डॉक्टर/रीण ते अनुभव चारचौघात मांडत असेल तर त्याच्याकडे/तिच्याकडे किती मिपाकर ट्रीटमेंट घेणं पसंत करतील हाही माझ्या भाबड्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
आ
आनन्दा Fri, 08/19/2016 - 11:31 नवीन
त्यांनी ओळख लपवली आहे, अशी माहिती तर अनेक लोक अनेक ठिकाणी मांडतात. त्यावरून त्रागा करायची गरज नाही. जोपर्यंत सदर कन्सल्टंट ही माहिती पक्षकाराच्या ओळखीसह मांडत नाही तोपर्यंत मला यात अनैतिक वाटत नाही
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 08/19/2016 - 11:45 नवीन
त्रागा म्हणालात म्हणून लिहीणं भाग पडलं!! मला कुठेही त्रागा दिसला नाही, आपणास दिसत असल्यास तुम्ही किंवा मी किंवा दोघांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. असो वाचनात आम्ही कमी पडत आहोत असं दिसतंय. इति लेखनसीमा.
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 20:13 नवीन
पण अशा मुलीला/मुलाला ट्रीटमेंट देणारा/री डॉक्टर/रीण ते अनुभव चारचौघात मांडत असेल तर त्याच्याकडे/तिच्याकडे किती मिपाकर ट्रीटमेंट घेणं पसंत करतील हाही माझ्या भाबड्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे. सूड राव भाबडेपणाचा आव सोडा न पाहता आकसाने किंवा पूर्वग्रहाने आरोप करत आहात तर तो सिद्ध करून दाखवा हे मी आपल्याला आव्हान देतो. मी लिहिलेल्या या लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे ते दाखवून द्या. कुणाचे नाव पत्ता किंवा वैयक्तिक माहिती कुणाला उघड झाली आहे ते दाखवा.
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 08/22/2016 - 07:34 नवीन
न पाहता आकसाने किंवा पूर्वग्रहाने आरोप करत आहात तर तो सिद्ध करून दाखवा हे मी आपल्याला आव्हान देतो. मी लिहिलेल्या या लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे ते दाखवून द्या. कुणाचे नाव पत्ता किंवा वैयक्तिक माहिती कुणाला उघड झाली आहे ते दाखवा.
डॉक्टर ते तुमच्या मित्रासाठी होतं, जो तुम्हाला सांगतो आणि तिसर्‍याला बोलल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि लहानपणी खेळायचो त्या कानगोष्टींप्रमाणे ही गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार. आकस, पूर्वग्रह म्हणाल तर जसा लेख मला दिसतो तशी प्रतिक्रिया मी लिहीतो. अर्थात तो माझा दृष्टीकोन आहे, त्यामुळे सिद्ध वैगरे करुन दाखवायची इच्छा नाही. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 08/22/2016 - 07:46 नवीन
त्या कानगोष्टींप्रमाणे ही गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार. यालाच पूर्वग्रह म्हणतात. व्यावसायिक नीतिमत्ता कशाला म्हणतात याचे एक उदाहरण- माझे वडील मुलुंडच्या "विरंगुळा" या वरिष्ठ नागरिकांच्या केंद्राचे सचिव होते. त्या केंद्राचे २५०० सदस्य आहेत. आमचे वडील १९६५ पासून मुलुंड पूर्व मध्ये राहत आहेत. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या वरिष्ठ नागरिकांपैकी निदान निम्म्या लोकांना ते अतिशय चांगले ओळखतात. माझे वडील दवाखान्यात आले असता त्यांचे आपापसात नमस्कार चमत्कार होतात. परंतु आजतागायत मी त्यांना एकाही माणसाची वैद्यकीय माहिती सांगितली नाही आणि सांगतही नाही. त्या रुग्णाने स्वतः वडिलांना सांगितली तर तो त्यांचा प्रश्न आहे. असे असताना आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार" असा गंभीर पण कोणताही ऐकीव अथवा प्रत्यक्ष पुरावा नसताना माझ्या मित्रावर गंभीर आरोप करता आहात. याला पूर्वग्रह म्हणायचे, आकस म्हणायचे कि पूर्ण अज्ञान हे आपणच ठरवा. व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन झाले याचा कोणताही स्पष्ट किंवा अस्पष्ट पुरावा आपण दिलेला नाही.
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 08/22/2016 - 11:11 नवीन
आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार" असा गंभीर पण कोणताही ऐकीव अथवा प्रत्यक्ष पुरावा नसताना
हा सबंध लेख!! जरी रंगवून सांगितलं नसेल, नाव बदललं असेल तरी ही गोष्ट मिपावाचकांपर्यंत पोचली.
व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन झाले याचा कोणताही स्पष्ट किंवा अस्पष्ट पुरावा आपण दिलेला नाही.
तुम्हीच म्हटलंत ही गोष्ट तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितली. एका डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरला कॉमन पेशंटच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी सांगणे हे व्यावसायिक नीतीमत्तेचे उल्लंघन नसेल तर मी माझे शब्द मागे घेतो.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 08/22/2016 - 11:23 नवीन
ब्वॉर
↩ प्रतिसाद: सूड
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/19/2016 - 11:15 नवीन
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील? >> ज्याचा त्याचा प्रश्न. बाकी, आजुन सुन वा जावई यायची वेळ आली नसल्याने पास. किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील? >> लग्न ही नवी सुरुवात असल्याने भुतकाळ विसरौनी सुरुवात करावी ह्या मताचा मी आहे. सो ह्याच उत्तर येस असे आहे. अपेक्षा (दोघांकडुनही) ईतकीच की, नंतर विवाहबाह्य फंदात पडु नये ब्वा. (बाकी खुलता कळी सारखं प्रकरण असेल तर नको)
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अनुप ढेरे Fri, 08/19/2016 - 11:27 नवीन
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?
मुळात हा सासू सासर्‍यांचा प्रश्न आहे काय? हा लग्न करणार्‍या जोडप्याचा प्रश्न आहे?
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सूड Fri, 08/19/2016 - 11:11 नवीन
हा जो कोणी तथाकथित मित्राच्या मित्राचा मुलगा (मला हे लिहीताना चिऊचा काऊ तो माझा मामेभाऊ आठवलं!! =)) असो.) आहे तो एखादीच्या गर्भपाताला कारणीभूत झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात तुमचा मित्र कसा जुन्या विचारांचा होता आणि तुम्ही त्याला "पार्थास दाविले ते विश्वरुप" कसे दावलेत ते लिहीलेच आहे, त्यामुळे असले प्रश्न येत नाहीत. पुभाप्र.
स
सुबोध खरे Sat, 08/20/2016 - 20:16 नवीन
अर्थात तुमचा मित्र कसा जुन्या विचारांचा होता आणि तुम्ही त्याला "पार्थास दाविले ते विश्वरुप" कसे दावलेत ते लिहीलेच आहे, मानभावीपणा समजला. लेखाचा खोल अर्थ समजता आला नसेल तर जाऊ द्या. एखाद्या माणसाच्या परिस्थितीत तुम्हाला बदल घडवता आला नाही तर निदान त्याच्या वेदनेवर फुंकर घालायचा प्रयत्नाला तुम्ही विश्वरूप दर्शन म्हणता आहात. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: सूड
_
_मनश्री_ Fri, 08/19/2016 - 11:32 नवीन
साधारण 2 वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रीणीविषयी एक पोस्ट लिहीली होती तिच्या आई वडीलांंचा घटस्फोट झालेला असल्याने तिच लग्न ठरत नाहीये त्यावेळी बहुतेक प्रतिसादांंचा सूर हा होता की लग्न ठरवताना मुलीची कौटुबिक पार्श्वभूमी अशी असताना नकार येत असेल तर त्यात काही अयोग्य नाही ,घटस्फोटीत आई वडीलाच्या मूलीशी लग्न करण्याची रिस्क कोण घेईल ? म्हणजे थोडक्यात काय वरवर सगळ चांंगलंं असल पाहीजे बास मग लग्नाआधी प्रेग्नंंट राहून गर्भपात केलेली मुलगी लग्नाला उभी राहते कारण तिच खानदान चांंगलंं आहे पण दुसरीकडे एक मुलगी लग्नासाठी अयोग्य ठरते कारण ती घटस्फोटीत आई बापाची मुलगी आहे ......
_
_मनश्री_ Fri, 08/19/2016 - 11:42 नवीन

साधारण 2 वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रीणीविषयी एक पोस्ट लिहीली होती तिच्या आई वडीलांंचा घटस्फोट झालेला असल्याने तिच लग्न ठरत नाहीये त्यावेळी बहुतेक प्रतिसादांंचा सूर हा होता की लग्न ठरवताना मुलीची कौटुबिक पार्श्वभूमी अशी असताना नकार येत असेल तर त्यात काही अयोग्य नाही ,घटस्फोटीत आई वडीलाच्या मूलीशी लग्न करण्याची रिस्क कोण घेईल ? म्हणजे थोडक्यात काय वरवर सगळ चांंगलंं असल पाहीजे बास मग लग्नाआधी प्रेग्नंंट राहून गर्भपात केलेली मुलगी लग्नाला उभी राहते कारण तिच खानदान चांंगलंं आहे पण दुसरीकडे एक मुलगी लग्नासाठी अयोग्य ठरते कारण ती घटस्फोटीत आई बापाची मुलगी आहे ......

↩ प्रतिसाद: _मनश्री_
_
_मनश्री_ Fri, 08/19/2016 - 11:48 नवीन
http://www.misalpav.com/node/29045 ही माझ्या पोस्ट लिंंक
↩ प्रतिसाद: _मनश्री_
आ
आनन्दा Fri, 08/19/2016 - 11:33 नवीन
बाकी खरेकाका तुम्च्या मित्राचा "तो" मित्र जर पिपावर असेल तर मात्र काही खरे नाही. :)
प
पुंबा Fri, 08/19/2016 - 13:09 नवीन
खरेन्च्या मित्राचा मुलगा मिपावर असल्यास आणि तो खरेंना ओळखत असल्यास (त्यांच्या दॉ. मित्राचा मित्र म्हणून) तर जास्त डेन्जर आहे..
↩ प्रतिसाद: आनन्दा
इ
इरसाल Fri, 08/19/2016 - 12:37 नवीन
आजकाल मनात येणार्‍या भावनाही किंवा लागलेली टोचणीही मिपावर मनापासुन मांडु शकत नाही असच वाट्टय. घडलेल्या गोष्टी आपल्या विचाराप्रमाणे किंवा कलाने घडायला हव्या होत्या किंवा हव्यात हा अट्टाहास कशाला ? (हे म्हणजे असं झाल, लेख/कविता चांगला/ली आहे अजुन फुलवता आला असता/ती......ज्याने लिहीलाय त्याला योग्य वाटला म्हणुन तसा लिहीला त्यात मला वाट्ट्य म्हणुन कशाला फुलवायचा......भेंडी). एका पिढीचे अंतर विचारात घ्यावे लोकांनी.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा