शृंगापत्ती
शृंगापत्ती
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
💬 प्रतिसाद
(413)
स
संदीप डांगे
Tue, 08/23/2016 - 07:36
नवीन
आपण कोण उपटसुंभ?? धन्यवाद!
बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना.
उ
उडन खटोला
Tue, 08/23/2016 - 08:20
नवीन
मिर्ची तिखी है शायद! ;)
म
मृत्युन्जय
Tue, 08/23/2016 - 08:01
नवीन
"अश्या" या शब्दात तुम्हाला अभिप्रेत असलेला भावच प्रतीत होइल असे नाही. "अश्या" या शब्दात एक ही & हि भाव अभिप्रेत असतो हे मान्य पण प्रसंगानुरुप एखाद्या विशिष्त भावसमूहाशी अथवा वैशिष्ट्यरचनेशी निगडीत अभिव्यक्ती निर्देशित करतानाही या शब्दाचा उपयोग होउ शकतो.
असो. तुम्हा दोघांचे बाकीचे संभाषण वाचले नसल्याने बाकी कोणी काय आणी कसे बोलावे याबद्दल काही टिप्पणी करत नाही.
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 08:20
नवीन
बाकी डॉक्टर्साहेब,
"ती पोरगी बघा किती चालू टैप आहे"
एवढ्या एका वाक्यासाठी चालू आहे का हा सगळा खटाटोप..?
हा आपणच काढलेला अर्थ आहे.
आणि "अशा" शब्दावर आपणच ठळक ठसा उठवलाय. मी नाही
हा प्रतिसाद "डांगे" या व्यक्तीला नसून जालावर साधारणपणे आधुनिकपणाचा आव आणणाऱ्या व्यक्तींसाठी आहेत.
आपण ते वैयक्तिक घेतलेत तर त्याला कोण काय करणार?
आणि मग असे भडकून जाऊन तोल गेलेले प्प्रतिसाद दिले जातात. जरा सांभाळून.आपण अनिर्बंधपणे वैयक्तिक होत आहात. सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे ह्या भ्रमात राहून इतरांच्या (ज्या व्यक्तिंबद्दल तुम्हाला शष्प माहिती नाही) मतांची, अनुभवांची, विचारांची एकतर्फी खिल्ली उडवणे योग्य नव्हे. कधी प्रत्यक्ष भेटा, मग बोलू "वचने किं दरिद्रता" ह्या विषयावर. अधिकारी व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. तेवढी काळजी घ्या म्हणजे बरं पडेल.
"सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे" असे कुठे म्हटले आहे ते जरा दाखवा?
स
संदीप डांगे
Tue, 08/23/2016 - 08:35
नवीन
हे कुणी लिहिले?? हे वैयक्तिक नाही तर अजून काय आहे? ह्यानंतर तुमचं पुढचं वाक्य आहे की "जालावर उदारमतवादीपणा दाखवायला काय जातं? वचने किं दरिद्रता" इ. इ.
इथे मी तुमच्याशी तुमच्या मताबद्दल चर्चा करत आहे, तेव्हा इतर जालावरच्या लोकांचा काय संबंध?
तुमच्या प्रतिसादात तुम्ही स्पष्ट मलाच विचारले ना? पुढे त्या प्रश्नाचे उत्तर आपले आपणच गृहित धरुन पुढची वाक्ये फेकलीत. ह्यात स्पष्टपणे वैयक्तिक नाही तर काय आहे? इतर कोणाही बद्दल इतकं ठाम असण्याला "सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे" असं म्हटलं जातं.
वर अनेकांनी लिहिलंय त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या मताविरुद्ध प्रतिसाद आले, लूपहोल्स, विसंगती दाखवणारे प्रतिसाद आले की तुम्ही सैरभैर होता. तुम्हीही भडकूनच प्रतिसाद देत आहात. भाषा सभ्य असली म्हणून काय झाले?
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 09:07
नवीन
प्रेम विवाह नसेल तर "मिपावरील किती लोक" आपल्या भावाचे/ मुलाचे लग्न अशा "प्रामाणिक" मुलीशी करायला तयार होतील.
तसे जालावर "आधुनिक होणे" फार सोपे आहे.
हस्तादपि न दातव्यं, गृहादपि न दीयते
(मधली ओळ आत्ता आठवत नाही)
वचने किम दरिद्रता .
हे मी वर लिहिलेल्या प्रतिसादातीलच वाक्य परत आपल्याला उद्धृत करून दिलं होतं. तो प्रतिसादही आपल्यालाच काय कोणालाही उद्देशून नव्हता.
ते आपण वैयक्तिक घेतलं आणि उच्च भाषा वापरलीत याला मी काय करणार.
डॉक्टर्साहेब,
"ती पोरगी बघा किती चालू टैप आहे"
एवढ्या एका वाक्यासाठी चालू आहे का हा सगळा खटाटोप..? मला तर वाटले डॉक्टरमित्राची खरेच नैतिक अडचण झाली आहे..
याचा अध्यारुथ अर्थ आपणच काढला कि डॉक्टरांच्या मते हि मुलगी "चालू" आहे.
"खाई त्याला खवखवे" एवढच मी म्हणेन
स
संदीप डांगे
Tue, 08/23/2016 - 09:28
नवीन
स्पष्ट बोलू का? तुम्ही त्या मुलीच्या 'चारित्र्या'वर गरजेपेक्षा जास्त स्ट्रेस देत आहात. तेही जुजबी थर्ड पार्टी माहितीच्या आधारे. त्या मुलीशिवाय इथे कोणीही ही खातरजमा करु शकत नाही की तिचे निर्णय तिने का घेतले, त्याची पार्श्वभूमी काय. तुमच्या डॉक्टरमित्राच्या 'म्हणण्या'नुसार तुम्ही मांडले आहेत म्हणता, पण तुमचेही सर्व प्रतिसाद (लेखासकट) ती मुलगी कशी 'मजामारु बेदरकार, ऐय्याश' टैप आहे अशा अर्थाचे दिसत आहेत. हा मी काढलेला अर्थ आहे म्हणत असाल तर असोच. कारण चर्चेच्या सुरुवातीला मी लेखाचा उत्तरार्ध ध्यानात घेतला होता, पण तुमचे प्रतिसाद बघता तुम्हाला पुर्वार्धात जास्त रस असल्याचे दिसत आहे.
जर असेच असेल तर हा निव्वळ बेणारेबाईंच्या उलटतपासणी सारखा खेळ झाला आहे. तुमच्या डॉक्टरमित्राने तुमच्याशी साधलेला संवाद हा खरोखर शृंगापत्तीतून आला आहे की आणखी कशातून ह्यावर आता खरेतर विचार व्हायला हवा.
बाकी अजानुकर्ण साहेबांनी दुसर्या एका धाग्यावर म्हटल्याप्रमाणे नवरा-बायको आपसात बघून घेतील. यावर चर्चा करण्यासारखे खरेच काय आहे?
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 09:38
नवीन
ब्वॉर
आ
आजानुकर्ण
Tue, 08/23/2016 - 15:12
नवीन
हाच निष्कर्ष काढण्यासाठी आटापिटा चालू आहे असं मलाही वाटतंय.
म
मराठी कथालेखक
Tue, 08/23/2016 - 09:43
नवीन
हे ९९% चं शंभर टक्के मान्य.. पण एक शंका आहे हे ९९% पैकी किती मुलगे होणार्या पत्नीला लग्नाआधिच 'तुझे कधी कुणाशी संबंध होते का ?" असं विचारायचं धाडस दाखवितात ? ज्या गोष्टीबद्दल इतका आग्रह आहे त्या गोष्टीची निदान स्पष्ट विचारुन खात्री तरी करुन घ्यावी ना...उगा स्वतःच काहीतरी गृहीत धरायचं आणि मग वस्तुस्थिती वेगळी असली की 'फसवणूक झाली' म्हणायचं याला अर्थ नाही.
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 09:58
नवीन
अगदी बरोबर
लग्न "ठरल्यावर पण प्रत्यक्ष होण्याआधी" हि गोष्ट दोघांनी एकमेकांना विचारणे आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
आणि हि गोष्ट मी माझ्या होणाऱ्या बायकोला विचारली होती.
हेही विचारले होते कि लग्न तू स्वतःच्या मर्जीने करत आहेस कि नाही. जर यात १ % असहायता असेल तर लग्न मीच मोडायला तयार आहे. ( अर्थात काहीही कारण न देता लग्न मोडण्यास होकार देण्याएवढा मोकळेपणा माझ्या घरच्यांकडून मला होता हि वस्तुस्थिती).
आ
आजानुकर्ण
Tue, 08/23/2016 - 15:08
नवीन
डॉ. साहेब तुम्ही या धाग्यावर कायम म्हणताय की कुठेही जजमेंटल झालेलो नाही. मात्र अशी नैतिक शेरेबाजी दर दुसऱ्या प्रतिसादात करत आहात. रुपालीने कुठल्या परिणामांची जबाबदारी नाकारली आहे? तिने लैंगिक संबंध ठेवले, (कदाचित चुकून) गर्भ राहिला. तिला गर्भपाताचा कायदेशीर पर्याय उपलब्ध होता तो तिने स्वीकारला. (तुमच्याच मित्राने गर्भपातासाठी मदत केली आहे) तिचं पुढचं आयुष्य मार्गावर आलेलं दिसतंय. इथं कुठल्या परिणामांची कसली जबाबदारी नाकारली आहे जरा समजावून सांगाल का?
आता जरा तुमच्या मित्राच्या दृष्टिकोणातून बघण्याऐवजी तिच्या दृष्टिकोणातून बघा. पूर्वायुष्यातील - कदाचित चुकीच्या - निर्णयामुळे आयुष्याची संपूर्ण वाताहत होण्याऐवजी तिला काही वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे आयुष्य सुरळीत होण्याचा पर्याय उपलब्ध झाला. आता तिला संसार करायचाय मात्र त्या घटनेची अत्यंत जवळची साक्षीदार व्यक्ती घराशी निगडित आहे. आता त्या व्यक्तीशी तिने कसं वागावं? तिने तुमच्या मित्राशी कुठेही संपर्क केलेला दिसला नाही. तुमच्या मित्राला तिच्या नजरेत तिरस्कार दिसला आणि ही फार मोठी शृंगापत्ती आहे?
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 16:03
नवीन
छिद्रान्वेषी पणा
मी केवळ एक वाक्य लिहिले(quote) आहे ते रूपालीला उद्देशून अजिबात नाही
तुम्ही केवळ माझ्या वर टीका करण्यासाठी ते रूपालीला उद्देशून आहे असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे झालात आणि त्यावर एवढे अवडंबर रचलेत.
तिने केलेला गर्भपात योग्यच होता याबाबत मला शंका नाहीच. कारण "नको" असलेले मूल अनाथालयात देणे किंवा आयुष्यभर कुमारी माता म्हणून समाजाची अवहेलना स्वीकारत जगणे हे दोन्ही पर्याय चूकच आहेत. एकदा चूक झाली तर आयुष्यभर अश्वथाम्या सारखी कपाळावर बाळगत आयुष्य कष्टात काढणे हि गोष्ट अत्यंत चुकीची आहे.
हा मुद्दा येथे आणून काथ्याकूट करण्याचा मूळ हेतू समाजाने एखाद्या स्त्रीची एखादी चूक झाली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके उदार झाले पाहिजे यासाठी आहे. (अशा) मुलीकडे लिहिणार होतो पण डांगे साहेबानी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून दूषणे हि दिली).
मी परत म्हणतो आहे जर माझा मित्र तिला भेटला नसता तर हा मुद्दा येथपर्यंत आलाच नसता.किती तरी मुली आम्ही वारंवार पाहतो आहोत ज्या गर्भपात करून घेतात अन सुरळीत आयुष्य जगत असतात.
आजही याचे पुढे काहीही होणार नाही आणि रुपालीचा संसार सुरळीत चालेल याबद्दल मला माझ्या मित्राची खात्री आहे. पण त्याला वाईट वाटण्यापासून आपण थांबवू शकत नाही हि सुद्धा वस्तुस्थिती आहे.
गर्भपात हा विषय असा आहे कि यात काळे आणि गोरे असे केवळ दोनच रंग नाहीत. शिवाय यात केवळ नैतिक बाजू आहे असे नाही तर कायदेशीर बाजू हि आहे. ती मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
असो.
आ
आजानुकर्ण
Tue, 08/23/2016 - 17:43
नवीन
ते वाक्य रुपालीला उद्देशून नाही तर तो दैनिक सुविचार प्रतिसादात नक्की कशासाठी होता ते कळले नाही. एकंदर चर्चेत कुणी जबाबदारी स्वीकारली आहे किंवा नाही याचा उलगडा झाला नाही. (मुंब्रा-कळवा-डोंबिवली इथल्या मुलींनी परिणामांची जबाबदारी स्वीकारली नाही की काय?)
बाकीचा प्रतिसाद मान्य. तुमची भूमिका मान्य. आणि माझ्याशी मिळतीजुळती आहे. त्याविषयी काहीच मतभेद नाही.
श
श्रीगुरुजी
Tue, 08/23/2016 - 19:03
नवीन
>>> तिने केलेला गर्भपात योग्यच होता याबाबत मला शंका नाहीच. कारण "नको" असलेले मूल अनाथालयात देणे किंवा आयुष्यभर कुमारी माता म्हणून समाजाची अवहेलना स्वीकारत जगणे हे दोन्ही पर्याय चूकच आहेत.
निर्दोष गर्भाची सबळ कारणाशिवाय हत्या करणे हा पर्याय सुद्धा चूकच आहे.
प
पिलीयन रायडर
Tue, 08/23/2016 - 19:42
नवीन
गर्भ निर्दोष ना? नक्की ना हे?
मग बलात्कारातुन गर्भ राहिला तर त्याला मारणं का चालणारे? त्याचा काय दोष?
कुणी तरी ह्याचं सरळ उत्तर देईल का? माझ्याच प्रश्नाला प्रतिप्रश्न न विचारता..
(हाच प्रश्न पुढे वाढवुन अपंग गर्भाचाही काय दोष? त्याला मारणारे आपण कोण? असाही विचारता येईल. तुमच्या ह्या तर्काने एकंदरितच गर्भपाताचा कुणालाही हक्क नाही हेच ध्वनित होऊ शकतं. पण ते सगळं सोडुन सध्या आपण फक्त बलात्कारातुन होणारं मुल एवढंच गृहित धरु)
श
श्रीगुरुजी
Tue, 08/23/2016 - 20:32
नवीन
मूळ लेख पुन्हा एकदा नीट वाचा. गर्भपातामागची प्रेरणा काय होती ते समजेल. गर्भात दोष असता तर डॉक्टरांना ते सोनोग्राफीत दिसले असते व त्यांनी तसे लेखात लिहिलेही असते.
बलात्कारातून गर्भधारणा झाल्याबद्दलच्या प्रश्नाला मागील प्रतिसादात उत्तर दिले आहे. त्याची पुनरावृत्ती इथे करीत नाही.
प
पिलीयन रायडर
Tue, 08/23/2016 - 20:35
नवीन
मग त्या प्रतिसदाची लिंक द्याल का प्लिझ? मला तर इतक्या गोंधळात कुठे सापडला नाही.
स
संदीप डांगे
Tue, 08/23/2016 - 20:55
नवीन
मला तर कुंभमेळ्यात आल्यासारखं वाटतंया.
"अलख षृंगापत्ती" ब्रूम..,
.
"गर्भपात गर्भपात गर्भपात, आपरेसन फोकट सिरिफ चेकींगका पईसा देनेका"
.
"बडा ढिठ है मनुष्य, सचसे मुंह छुपाता फिरता है, राधामय्याने कृष्णसे प्रेम किया पर ब्याह तो किसी औरसे रचाया, पर वह भूली नही अपने शामसावरेंको.. भक्तजनो, ये है सच्ची भक्ती.. बोलो जयरादेश्याम, जयसियाराम..."
.
"कुंती कहलायी पवित्र मां, पुत्र दिये पतीबिन चार चार,"
.
"आओ मित्र, एखाद कश मारलो, फिरतो बस सिवा का साथ है और धुयेंकी बात है"
.
"आनेवाली एलेक्सन्में हमरी पिरामय्याको सबसे जादा वोटोंसे जिताना है भैया.. तोहार को गंगामैयाकी कसम.."
.
"ये पानी हमपे काहे फेंकाबे, अबे तुम क्य्यूं रास्तेमें आये, हम तो ऐसेही फेंकरए थे, कहा कहांसे चले आते है बुडबक"
.
"अबे तू जानबूझके हमको देखतेही फेंके, हम देखा है, हम सब देखा है"
.
"देखो पंडित, इस कुंभमें तो पहिले जैसे भक्त ना रहे, ना पहिले जैसी भक्ती, अरे भक्ती तो हमार वकत हुवा करती थी..."
.
"बहुत टेन्सनमें हो का, आओ तुम्हारा भूत-भविश्य सब बता देतेंय.. अबे बैठ जाओ, पैसा दो पैसा बहुत बडी चीज है का"
ट
ट्रेड मार्क
Tue, 08/23/2016 - 16:54
नवीन
जरा त्या मुलीच्या नवऱ्याच्या दृष्टिकोनातून बघा. जर -
१. तिने लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याला सगळं सांगितलं आहे - तर मग प्रश्नच मिटला. सगळं माहीत असून जर त्या मुलाने लग्न केलं असेल तर बाकी कोणी मध्ये पडण्याचं काहीच कारण नाहीये. त्या मुलीने डॉक्टरांना गाठून सांगायला पाहिजे की नवऱ्याला सर्व माहित आहे.
२. ही गोष्ट लपवून ठेवली आहे - यात त्या मुलाची फसवणूक झाली आहे असं नाही वाटत का? जर तो मुलगा एवढा क्रांतिकारी विचाराचा असेल की नुसता होणाऱ्या बायकोचा दुसऱ्याशी शरीरसंबंधच नव्हे तर त्यातून गर्भधारणाही झालेली चालणार असेल तर त्या मुलीने लपवून कशाला ठेवावे? जर त्याला असं वाटत असेल की आपली (होणारी) बायको या गोष्टींपासून लांब असावी तर मग त्याची फसवणूकच झालीये. उद्या तो आधीचा मुलगा येऊन या मुलीला ब्लॅकमेल (पैसे किंवा परत शरीरसंबंध यासाठी) करू शकतो किंवा नवऱ्याला त्याचा एखादा मित्र भेटू शकतो की ज्याला त्या मुलीबद्दल माहिती आहे. अश्या वेळेला जर लग्न झाल्यावर हे कळले किंवा त्याहूनही वाईट म्हणजे मुलं झाल्यावर जर हे आधीचे प्रकरण कळले तर काय होईल?
समजा माझ्या भावाचं किंवा मित्राचं एखाद्या मुलीवर प्रेम आहे आणि मला जर माहित आहे की ती मुलगी या आधी सुद्धा एका किंवा अधिक मुलांबरोबर गुंतलेली होती तर ते मुलाला सांगणे भाऊ किंवा मित्र म्हणून माझे कर्तव्य नाही का? या केस मध्ये ते डॉक्टर धर्मसंकटात सापडलेत कारण लग्न आधीच झालेले आहे.
अजूनही काही लोक्स म्हणत आहेत की चुकून गर्भ राहिला असेल. परंतु डॉक्टरसाहेब तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की ७२ तासांमध्ये गोळी घेऊन हे सर्व टाळता आलं असतं. जेवढा स्पष्टवक्तेपणा तिने डॉक्टरांना गर्भपात का करायचा आहे हे सांगण्यात दाखवला तेवढाच तिने लग्न ठरवताना होणाऱ्या नवऱ्याला सगळं सांगण्यात दाखवला पाहिजे होता.
आ
आजानुकर्ण
Tue, 08/23/2016 - 17:07
नवीन
आणि तिने तो दाखवलेला नाही हे तुम्हाला कसे कळले? की अंदाजपंचे दाहोदरसे?
म
मार्मिक गोडसे
Tue, 08/23/2016 - 17:22
नवीन
अहो तिने स्वागत समारंभात "हेच ते डॉक्टर ज्यांनी माझा गर्भपात केला" अशी आपल्या नवर्याला ओळख कुठे करून दिली? :)
ट
ट्रेड मार्क
Tue, 08/23/2016 - 17:30
नवीन
तसं तर सगळ्यांचेच अंदाजपंचे दाहोदरसे चालू आहे. नक्की काय परिस्थिती आहे हे तुम्हाला तरी माहित आहे का? असेल तर कशी आणि काय आहे ते सांगा आणि नसेल तर उगाच पंचे गुंडाळू नका.
मी फक्त एक तर्क मांडला - जर का सगळंच खुला मामला असेल म्हणजे किमान नवऱ्याला माहित असेल तर तिने डॉक्टरांना ओळख दाखवायला काहीच हरकत नव्हती. सासू सासऱ्यांसमोर जर नसेल दाखवायची तर संधी मिळेल तेव्हा भेटून परिस्थिती सांगायला हरकत नाही/ नव्हती. वर सासू सासर्यांना काही सांगू नका ही विनंती पण करता आली असती. ज्या अर्थी ओळख दाखवत नाही उलट तिरस्काराची (त्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे) भावना आहे त्याअर्थी तिने ही गोष्ट लपवून ठेवली आहे.
असो. हा तर्क आहे तुम्हाला कळेल/ पटेल असं नाही आणि माझा तसा आग्रहही नाही.
आ
आजानुकर्ण
Tue, 08/23/2016 - 17:35
नवीन
मलाही नक्की परिस्थिती माहिती नाही त्यामुळं मुलीचा संसार नीट पुढं चालावा या सदिच्छेने प्रतिसाद दिलेत.
सगळाच खुला मामला म्हणजे काय? त्या दांपत्याचं स्वतःचं खाजगी आयुष्य आहे. काय विसरायचं, काय लक्षात ठेवायचं, का उगाळायचं याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. डॉक्टरांना ओळख दाखवायची आणि परिस्थिती सांगायची काय गरज आहे हे कळले नाही. डॉक्टरांची त्या दांपत्याच्या संसारात आता काय भूमिका आहे ब्वॉ? डॉक्टर काय तिचे सासरे आहेत की काय? त्या विशिष्ट डॉक्टरांशी आता संबंध येऊ नयेत असे तिला वाटत नसेल का?
अाय लव यू टू.
ट
ट्रेड मार्क
Tue, 08/23/2016 - 20:12
नवीन
दोघांचा संसार नीट व्हावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे आणि त्यामुळेच बहुतेक जण काय करावे हे सांगताहेत.
म्हणजे कुठलीही लपवाछपवी एकमेकांमध्ये नसणे.
दोघांना मिळून हे सिक्रेट ठेवायचं असेल तर ठीक आहे. पण ती एकटीच हे सिक्रेट ठेवतीये हे चूक आहे.
डॉ. खरेंनी एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे हे डॉक्टर भविष्यात या मुलीच्या प्रेग्नन्सीत डॉक्टर म्हणून असू शकतात. त्यावेळेला फॉर्म मध्ये प्रथम गर्भधारणा म्हणून लिहिणार? जरी दुसऱ्या गायनेक कडे गेले तरी त्या डॉक्टरला ती छोटी शस्त्रक्रिया केल्यामुळे कळण्याची शक्यता बरीच आहे.
अरे बापरे... (तुम्ही पुरुष आहात असे समजून) मी त्यातला नाही हो.
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 19:10
नवीन
जरा त्या मुलीच्या नवऱ्याच्या दृष्टिकोनातून बघा.
हा पैलू किती लोकांनी पाहिला?
आ
आजानुकर्ण
Tue, 08/23/2016 - 19:19
नवीन
मुलाच्या दृष्टिकोणातून काय बघायचंय? रुपालीनं तिचं पूर्वायुष्य नवऱ्यापासून लपवलंय की नाही ह्याची काहीच माहिती नसताना तिला आरोपी ठरवण्याची चाललेली पराकाष्ठा अनाकलनीय आहे. बरं 'समजा' तिनं पूर्वायुष्य लपवलंय तर ती आणि तिचा नवरा बघून घेतील की. इथं नक्की काय सिद्ध करायचंय मला आता समजत नाहीये.
र
राजेश घासकडवी
Tue, 08/23/2016 - 19:35
नवीन
+१
या धाग्यात एकंदरीत 'ती मुलगी तसलीच होती, त्यामुळे बिचाऱ्या डॉक्टरची कशी पंचाइत झाली' हे सिद्ध करण्याचा प्रयत्न वाटत राहिलेला आहे. त्यासाठी 'गर्भपात म्हणजे स्त्रीने केलेली हत्याच' (डॉक्टरने ती करून दिली तरी तो बिचारा), 'कशी बेइमान, पैसे पुरेसे मिळवत नाही म्हणून आपल्या प्रियकराला सोडलं!' तसंच 'तिचं लग्न त्या डॉक्टरच्या मित्राच्या मुलाशी झालं म्हणजे त्यांची फसवणूक झाली' वगैरे मुद्दे येत आहेत.
आदूबाळने म्हटल्याप्रमाणे केस अतिशय सोपी आहे - त्या डॉक्टर मित्राने व्यावसायिक जबाबदारी घेऊन कायदेशीर काम केलेलं आहे, त्याबद्दल त्याला पैसे मिळाले. तेव्हा कायदेशीर गोपनीयता पाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आपल्याला ती सांभाळण्यात काही त्रास होत असेल तर व्यावसायिक समुपदेशकाकडे जावं. त्याऐवजी त्याने आपली तळमळ आपल्या समुपदेशक नसलेल्या मित्राकडे व्यक्त केली. ही त्याची चूक झाली. इतकं सोपं आहे हे.
प
पिलीयन रायडर
Tue, 08/23/2016 - 19:47
नवीन
अगदी अगदी!
हेच नाही तर ह्या मुलीने आता नवर्याला सोडून पैशेवाल्यासोबत जाण्याचीही शक्यता आहे इथवर भविष्य सुद्धा वर्तवलं आहे!
आपल्याला इतकी कमी, ते ही इतकी वरवरची माहिती असताना लोक कुठंपर्यंत जाऊ शकतात हे आज इथे पहायला मिळालं. धन्य!
आ
आजानुकर्ण
Tue, 08/23/2016 - 19:53
नवीन
एक्झॅक्टली. एक व्यक्ती एका राज्याचा मुख्यमंत्री असताना तिथं मोठी दंगल झाली. नंतर ती व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाल्यावरही देशात अशा दंगली होऊ शकतील अशा स्वरुपाचं हे फीअरमाँगरिंग वाटलं.
उ
उडन खटोला
Tue, 08/23/2016 - 20:09
नवीन
पिरा एका संस्थळावर एका समूहाची (स्वघोषित) प्रवक्ती आहे. उद्या एखाद्या वॉर्ड मध्ये विशिष्ट समुहासाठी राखीव जागा निघाली तर पिरा निवडणूक लढवू शकते.
आजच्या कृतीनुसार उद्याचे अंदाज बांधायला कुणाची का हरकत असावी?
प
पिलीयन रायडर
Tue, 08/23/2016 - 20:26
नवीन
असं वाचा
"मला पिराचे काही प्रतिसाद वाचुन असं वाटतं की पिरा एका संस्थळावर एका समूहाची (स्वघोषित) प्रवक्ती आहे. उद्या एखाद्या वॉर्ड मध्ये विशिष्ट समुहासाठी राखीव जागा निघाली आणि त्या समुहाने एकमताने पिराला प्रतिनिधी म्हणुन निवडलं तर पिरा निवडणूक लढवू शकते. पण अर्थातच मला पिरा प्रवक्ती आहे की नाही किंवा तिला निवडणुक लढवण्यात रस आहे किंवा नाही हे माहिती नाही. तिच्या प्रतिसादांमागचे संदर्भही सुद्धा मला खरं तर ठाऊक नाहीत. मला खरं तर पिरा बद्दल काहीच माहिती नाही, मी फक्त अधुन मधुन तिचे काही प्रतिसाद वाचलेले आहेत, पण आमची ओळख वगैरे तर अजिबात नाही. काही गोष्टी इकडुन तिकडुन ऐकलेल्या असतील. किंवा कुणाला तिच्या विषयी बोलताना पाहिले असेल. पण ह्या वरुनही मी निवडणुकच काय तर तिची संवेधनशीलता ह्यावरही अंदाज बांधु शकतो!"
पिरा तरी इथे स्वतः लिहीते. पण जी व्यक्ती माहितीच नाही तिच्याविषयी मात्र १००% खात्रीने लिहाल.. हीच तरी गम्मत आहे. आणि तुम्हाला ते चुकही वाटत नाही!!
असो.. मी काय म्हणते. आपलं मत ह्या जन्मात जुळणार नाही. मला तुमच्याशी तेच तेच मुद्दे बोलण्यात रस नाही. तुम्ही काही उद्बोधक वगैरे लिहीलं असतंत तर मलाही फायदा झाला असता. पण तसंही काही दिसत नाही. तेव्हा मी थांबते.
धन्यवाद!
( स्वगतः- लोक कसे आयडी बघुन बरोब्बर हुकमी मुद्द्यांवर येतातच. ग्रेट!)
उ
उडन खटोला
Tue, 08/23/2016 - 20:32
नवीन
उदाहरण दिलं होतं. तुम्हाला समजेल असं वाटलं होतं.
तरी समजलं नाही एवढं समजलं. थांबूया!
श
श्रीगुरुजी
Tue, 08/23/2016 - 20:40
नवीन
माहितीतल्या लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत हे भाकीत आहे.
आपल्याला इतकी कमी व वरवरची माहिती असताना सुद्धा लोकं निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे देऊन चुकीच्या गोष्टींची कशी भलामण करू शकतात हे सुद्धा पहायला मिळालं. धन्य!
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 20:05
नवीन
त्याऐवजी त्याने आपली तळमळ आपल्या समुपदेशक नसलेल्या मित्राकडे व्यक्त केली. ही त्याची चूक झाली. इतकं सोपं आहे हे.
घासू गुरुजी
व्यावसायिक समुपदेशक आभाळातून पडतात काय? शिवाय अशा "माणसाला" हि कहाणी सांगणे हा व्यावसायिक नीतीमत्तेचा भंग नाही का होणार?
जो डॉक्टर हे रोज पाहत आला आहे अशा डॉक्टरचा सल्ला घेतला तर त्यात काय चूक आहे? डॉक्टर समुपदेशक होऊ शकत नाही?
त्याने मला एक्झॅक्टली यासाठीच फोन केला होता. मला मुळात या केसचे ९० % पैलू माहित होते त्याने फक्त या मुलीने माझ्या मित्राच्या मुलाशी लग्न केले एवढी एकच माहिती सांगितली कारण हि माहितीच त्याच्या अस्वस्थतेचे मूळ होते. मी त्याला "कर्मण्ये वाधिकारस्ते" सारखे समुपदेशन केले तर मिपा वर लोकांनी ब्रम्हज्ञान दिल्याचे आरोप केले. शिवाय व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग केल्याचे आरोप केले.
पुरावा नसताना किती लोकांनी निवाडे दिले आणि वर मला जजमेंटल आहे म्हणून दोषही दिला.
तुम्ही सुद्धा त्याचीच री ओढलीत
असो.
र
राजेश घासकडवी
Tue, 08/23/2016 - 20:23
नवीन
भारतात सायकिअॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर वगैरे लोक नसतात?
कारण प्रत्येक डॉक्टरची काही स्पेशालिटी असते त्याप्रमाणे समुपदेशनाचं काम करणारे वेगळे असतात. प्रत्येकच डॉक्टर आपलं स्पेशलायझेशन आणि त्याच्या मर्यादा ओळखून 'मी या बाबतीत असमर्थ आहे, तुम्ही या प्रकारच्या स्पेशालिस्टकडे जावं' असा सल्ला देऊ शकतो, देतोही.
तुम्ही तुमच्या परीने एक मित्र म्हणून योग्यच सल्ला दिला. बहुतांश मिपाकरांनीही सगळं बर्डन तुमच्या मित्र डॉक्टरवरच टाकल्याचं मला दिसतं. ज्यांनी तुम्हाला दोष दिला आहे असं वाटतं त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. याउप्पर आणखी काय बोलणार?
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 20:36
नवीन
प्रत्येकच डॉक्टर आपलं स्पेशलायझेशन आणि त्याच्या मर्यादा ओळखून 'मी या बाबतीत असमर्थ आहे, तुम्ही या प्रकारच्या स्पेशालिस्टकडे जावं' असा सल्ला देऊ शकतो, देतोही.
हि गोष्ट तेवढ्या पातळीवर गेली तर आम्ही पण असा सल्ला देतो.साधी सर्दी झाली तर कां नाक घास तज्ज्ञाकडे जायचा आपला सल्ला उफराटा वाटतो.
परंतु दोलायमान परिस्थितीत साधी सरळ गोष्ट त्यांना समजावून सांगून समजत असेल तर समुपदेशकाकडे जायची गरज भासत नाही.रच्याकने -लष्करात असताना मी मनोविकार शास्त्रात चार महिने काम केले होते
माझ्या बहिणीला जर काही गायनॅकॉलॉजिकल प्रश्न आला तर मी लगेच स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पळतो का ? तेवढे मूलभूत ज्ञान प्रत्येक एम बी बी एस डॉक्टरला असतेच. तसंच मनोविकार शास्त्र हा एम बी बी एस ला एक विषय म्हणून अभ्यासाला असतो. म्हणून बहुतेक वेळेस आपले फॅमिली डॉक्टर आपल्या समुपदेशकाचे काम आपल्या न काळात करत असतात.
अशा विश्वासाने त्यांनी मला फोन केला आणि मी त्यांना धीर दिला तर तो व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग झाला म्हणून लोकांनी कोल्हेकुई सुरु केली. मूळ मुद्दा राहिला बाजूला.
असो
स
संदीप डांगे
Wed, 08/24/2016 - 08:42
नवीन
अशाच अर्थाचं मी काहीतरी बोललो तेव्हा झालेला गदारोळ आठवला, अखेर कोण बोललं हेच महत्वाचे आणि त्यानुसार मिपावर उपदेशाचे ढग दाटून बरसू लागतात...
=))
स
सुबोध खरे
Wed, 08/24/2016 - 08:49
नवीन
उगी उगी
स
संदीप डांगे
Wed, 08/24/2016 - 08:55
नवीन
स्कोअर सेटलींग बद्दल जिथेतीथे उगाच गळा काढणाराने दुसऱ्याला 'उगी उगी' करावं हे खचित मनोरंजक आहे,;)
श
श्रीगुरुजी
Tue, 08/23/2016 - 20:37
नवीन
अर्धसत्य! त्या मुलीला गर्भपाताशिवाय पर्यायच नव्हता, झाले त्याच्यात मुलीची काहीही चूक नाही, गर्भपात करणे हा तिचा हक्कच आहे, डॉक्टरांनी व्यावसायिक नितीमत्ता कशी गुंडाळली हे देखील सिद्द्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
स
समीरसूर
Tue, 08/23/2016 - 06:28
नवीन
लेख आवडला. शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. डॉक्टरसाहेबांनी एक अनुभव म्हणून शेअर केला. एवढा काथ्याकूट करण्यासारखं लेखात आक्षेपार्ह असं खरंच काही वाटलं नाही. आपली लाख इच्छा असली तरी जग हे सोयीने चालतं, कुणाच्या इच्छा-अपेक्षांप्रमाणे नाही.
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 06:54
नवीन
आपली लाख इच्छा असली तरी जग हे सोयीने चालतं, कुणाच्या इच्छा-अपेक्षांप्रमाणे नाही.
you said it
इ
इरसाल
Tue, 08/23/2016 - 12:24
नवीन
मिपावर सद्ध्या "अॅब्रेव्हिएटेड टीपीबी" चालु आहे अस वाट्ट्य.
डॉक्टरांच्या मेन मुद्द्याला सोडुन दुसर्याच गोष्टींचा किस पाडला जातोय.
आणी हो कोणाला पटो ना पटो पण हळु हळु स्कोर सेटलींग दिसतय ! (कृपया तोंड वर करुन "कोण करतय स्कोर सेटलींग ?" अस विचारायला येवु नये.)
स
साहेब..
Tue, 08/23/2016 - 12:32
नवीन
+1
उ
उडन खटोला
Tue, 08/23/2016 - 13:28
नवीन
त्रिशतक पूर्तीबद्दल डॉक्टर साहेबांना, मी नै त्यातली ट्याग असलेली कडी, व्यावसायिक मूल्यशिक्षणाच्या तासाची सीडी, दोन बुट्टया आणि महाभारताचं पुस्तक हे सगळं एक किलो हिरव्या मुगाबरोबर (गिळून गप्प बसण्यासाठी) द्यावं असा प्रस्ताव याठिकाणी ठेवत आहे.
म
मी-सौरभ
Tue, 08/23/2016 - 15:29
नवीन
तुमचा लेख आणि त्याला आलेले ३०० प्रतिसाद वाचले. त्यातला गा पै चा त्या तुमच्या मित्राने काय करावे हा प्रतिसाद फक्त धागा सुसंगत वाट्ला. त्या मताशी मी पण सहमत आहे,
बाकी सर्व प्रतिसाद मात्र धाग्यातल्या आपल्या सोयिच्या गोष्टी धरुन व्यक्त केलेली मतमतांतरेच होती :( हे बघुन एक मिपाकर म्हणुन चांगले नक्कीच वाटले नाही.
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 16:11
नवीन
सौरभ साहेब
अनेक मते येतात. ती आपल्याला पटतात असे अजिबात नाही. पण एखाद्या प्रश्नांची दुसरी बाजू काय आहे जिचा आपण विचार केलेली नसतो ती पण आपल्या समोर येते. लोक आकसाने किंवा संतापाने अश्लाघ्य भाषा हि वापरतात. त्याचे मनावर न घेता मुद्दा काय मांडला आहे तो विचार करावा.
काही लोकांची विचारसरणी अतिरेकी असते तर काही लोक फक्त पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात.
वरील काथ्याकुटात काही लोक डॉक्टर खरे हरामखोर आहेत याही विचारसरणीचे असतील. तेहि एकुन घ्यायचे.
याच बरोबर काही लोक अत्यंत कमी शब्दात आपल्याला मांडायचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून दाखवतात अशांपासून बरेच काही शिकता येते.
हे सर्व आपल्या वैचारिक समृद्धी आणि मानसिक प्रगल्भतेसाठी साठी आवश्यक आहे. तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका.
प
पैसा
Tue, 08/23/2016 - 18:50
नवीन
http://www.misalpav.com/comment/869468#comment-869468 हा माझा आणि खेडूत यांचा पहिलाच प्रतिसाद वाचला नाही का!
त
तेजस आठवले
Tue, 08/23/2016 - 16:58
नवीन
मला असे वाटते, की ह्या लेखाचा उद्देश एवढाच आहे की अश्या प्रसंगात संवेदनशील असणाऱ्या आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या माणसाला कशी टोचणी लागून राहते आणि नकळत पणे तो स्वतःला अपराधी समजतो; हे दाखवणे हा आहे.
बाकी आपल्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेणे हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. निर्णयाबरोबर जबाबदारी पण येते एवढे लक्षात ठेवले की झाले.
बाकी मूळ लेखात किंवा प्रतिसादांमध्ये रुपालीला "चालू" ठरवायचा प्रयत्न झाला आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही.
निव्वळ मजा मारणे हा उद्देश त्या दोघांचाही असू शकेल. मात्र काळजी घेतली किंवा घेतली नाही तरी गर्भधारणा होऊ शकते हि शक्यता विचारात घेतली होती की नाही ते माहित नाही. गर्भधारणा झाली तर गर्भ पाडणे अथवा वाढवणे हे मलाच करावे लागणार आहे हे रुपालीने विचारात घेतले होते की नाही ते पण आपल्याला माहित नाही.
बाकी काही वाक्प्रचार आठवले,
- पकडला गेला तर चोर (इथे ह्या प्रसंगात कोणालाही रूढार्थाने चोर म्हटलेले नाहीये)
-जग खरंच खूप छोटं आहे, कोण कोणाला कश्या स्वरूपात भेटेल काही सांगता येत नाही.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »