शृंगापत्ती
शृंगापत्ती
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
💬 प्रतिसाद
(413)
ट
ट्रेड मार्क
Tue, 08/23/2016 - 17:32
नवीन
+१
म
माम्लेदारचा पन्खा
Tue, 08/23/2016 - 19:49
नवीन
असं म्हणता येऊ शकेल की तेव्हा ती मुलगी त्यांच्यासाठी फक्त एक पेशंट होती...
गर्भपात करायला येणा-या अनेक मुली न सांगता येणा-या कारणांसाठीच तो करतात हे सत्य आहे... कालांतराने तीच मुलगी त्यांच्याच मित्राच्या मुलाशी लग्न करते हा योगायोगच आहे... त्यात त्यांना वाईट वाटता कामा नये....
मात्र आपल्याच मित्राचा मुलगा यात अडकला आहे हे कळल्यावर ते अपसेट होतात...इथे त्यांच्यातला डॉक्टर आणि मित्र यांचे द्वंद्व सुरु झाले....त्यातून ती मुलगी अशी आशा करतेय की हे परत दिसू नयेत...जरी ती पेशंट होती तरीही !
अशा परिस्थितीत मित्राने व्यावसायिक बांधिलकी जपावी, मात्र मित्राशी संबंध तोडायची गरज नाही.... ती मुलगी कधीही ही बाब उघड करणार नाही आणि त्यांना विरोधही करणार नाही त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप !
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 19:57
नवीन
आपल्याच मित्राचा मुलगा यात अडकला आहे
मामलेदार
तुम्ही पण कसे एकदम बुर्ज्वा ( असे लोक म्हणतात)
असो
+१००
आमच्या मित्राने अगदी हेच केलं.
रुपाली उद्या त्यांच्या कडे आली तरी तिला ओळखले नाही असेच ते दाखवू शकतात
शिवाय उद्या रुपालीने जरी घरच्या सगळ्यांना सांगितलं कि मी याच डॉक्टरांकडे गर्भपात केला होता तरीही हे डॉक्टर सांगू शकतील कि माझ्या कडे भरपूर रुग्ण येतात मी कोणाकोणाच्या गोष्टी लक्षात ठेवू?
एकदा लग्न झालेलं असताना दुधात मिठाचा खडा टाकण्यात काय हशील आहे.
म
माम्लेदारचा पन्खा
Tue, 08/23/2016 - 20:01
नवीन
वडिलांच्या मित्राच्या भूमिकेत होते... त्या क्षणी त्यांच्यातल्या डॉक्टरवर त्यांच्यातला मित्र वरचढ ठरला होता नाही तर अशी चलबिचल झालीच नसती !
स
संदीप डांगे
Tue, 08/23/2016 - 20:15
नवीन
डॉक्टरसाहेब, तुमचे अगदी सुरुवातीपासूनचे सर्व प्रतिसाद तुम्हीच एकसलग वाचून काढा अशी विनंती करतो.
१. http://misalpav.com/comment/870902#comment-870902
"होणाऱ्या नवऱ्याला आपल्या पहिल्या शारीरिक संबंधाबद्दल प्रामाणिकपणाने सांगण्याचे धैर्य तिच्याकडे असायला हवे."
२. http://misalpav.com/comment/870429#comment-870429
"आपल्या आनंदासाठी एका जीवाला जन्मापूर्वीच नष्ट करणे यात आजकाल लोकांना वावगे वाटेनासे झाले आहे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत?"
वर ठळक केलेली तुमची वाक्ये व त्यातली तुमची भूमिका, खाली दिलेल्या तुमच्या प्रतिसादांतल्या भूमिकेशी विसंगत वाटत आहेत. एकिकडे तुम्ही 'दुर्लक्ष करण्याइतके उदार झाले पाहिजे' म्हणता त्याचवेळेला मोरल पोलिसिंग करण्याचा यथोचित प्रयत्नही करता. यात तुम्ही इतरांकडून म्हणजे समाजाबद्दल असलेल्या तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या स्वतःच्या मतांमधे फरक पडतोय हे लक्षात घेतलेले नाही. म्हणजे 'समाज कसा उदारमतवादी नाही' हे सांगता, दुसरीकडे स्वतःच्या अपेक्षाही त्या मुलीवर लादता जे सर्वसाधारणपणे समाज करतो.
सुरुवातीला तुमचे प्रतिसाद खूपच संतुलित होते जेव्हा ते तुमच्या डॉक्टरमित्राशी संबंधित होते, पण जसजसे मुलीच्या वागणूकीची, चारित्र्याची चिरफाड करणारे प्रतिसाद यायला लागले तसतसे आपण त्याकडे झुकू लागलात. ही तुमची विसंगत भूमिका खटकली म्हणून तुम्हाला स्पष्ट विचारले की मुद्दा डॉक्टरमित्राच्या दुविधेचा आहे की मुलीच्या चारित्र्याच्या पोस्टमार्टेमचा? ह्याला आपण आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे म्हणत असाल तर ती वेळ आपली आपणच ओढवून आणली असे म्हणावे लागेल.
जे दिसले ते बोलतोय, इथे कुणावरही स्कोअरसेटलींग करायला, आकस ठेवून मीगाबायटींत वेळ फुकट घालवायला मला तरी रस नाही. म्हणून सुरुवातीपासून चर्चा सुरु होती तरी गप्प होतो. जिथून चर्चेचा फोकस डॉक्टरमित्राच्या दुविधेपासून हटून मुलीच्या चारित्र्यावर आला तिथेच चर्चेत उतरलो. कारण नंतरच्या इथल्या काही प्रतिसादांवरुन वाटायला लागले की "डॉक्टर्मित्राची दुविधा सॉल्वेबल नाही मग चला त्यास कारणीभूत असलेल्या मुलीच्या निर्णयांची चिरफाड करा" त्यात तुम्ही "कितीवेळा संबंध ठेवले असतील, गर्भधारणेला कितीवेळा संभोग आवश्य्क आहे" अशा अनावश्यक डिटेल्स देऊन आगीत तेल ओतलेत.
एकूणच चर्चेची पातळी खूपच घसरली. मूळ मुद्दा भरकटून 'गर्भपात चुकीचा का बरोबर' ह्या अनावश्यक मुद्द्याभोवती पिंगा घातल्या गेला. दर्जेदार चर्चेमधे फक्त डॉक्टरमित्राची दुविधाच सर्व बाजूंनी चर्चिल्या गेली असती. तिथवर थांबणे योग्य ठरले असते असे माझे वैयक्तिक मत. धन्यवाद!
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 20:40
नवीन
स्वतःला पाहिजे तेवढेच शब्द घेऊन दिलेला छिद्रान्वेषी प्रतिसाद.
असो
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 20:44
नवीन
लोकांनी आपल्याला पाहिजे तसे सोयीस्कर शब्द निवडून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे यापुढे वितंडवाद घालण्यात मला तरी रस राहिलेला नाही. माझ्या मर्यदित ज्ञाना नुसार मी बऱ्याच करण्याचा प्रयत्न केला. काही लोकाना त्याच फायदा झाला असावा असे वाटते. बाकी काही लोकांचा टाईमपास झाला.
माझ्या कडून आता अधिक काही लिहिणे नाही
इति लेखनसीमा
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 20:45
नवीन
बऱ्याच मुद्द्यांचा उहापोह असे हवे
प
पिलीयन रायडर
Tue, 08/23/2016 - 20:44
नवीन
मी सुद्धा थांबते.
गर्भपाताबद्दल लोकांनी भावनिक मत देणं मी एकवेळ समजु शकते. पण रुपालीच्या चारित्र्यावर चर्चा उतरली हे फार निराशाजनक आहे. लोकहो तुम्हाला खर्यांनी लिहीलेल्या १० ओळींपलीकडे काहीही माहिती नाही. तरी एवढे अंदाजपंचे दाहोदरसे प्रतिसाद?!!
बाकी चर्चा करायची इच्छा खुप असली तरी लोक आयडी बघुन प्रतिसाद देतातच. तेव्हा चर्चेला कुठे आणि कशी वळणं द्यायची हे ही नक्की असतं. साध्य काहीच करायचं नसतं, केवळ जुनी धुणी किंवा उगाच असलेला आकस व्यक्त करायचा असतो. अशांसाठी वेळ नाही. क्षमस्व!
डांगे अण्णा, एक गोष्ट आवर्जुन सांगावी वाटते. आपल्या मेगाफायटी झालेल्या आहेत अनेकदा. पण तुमच्या सोबत मुद्द्यावर चर्चा होऊ शकते आणि चर्चा संपल्यावर मिपा सदस्य म्हणुन व्यवस्थित परत बोलता येतं ह्याचं कौतुक आहे. तुमच्या सोबतचे मतभेद धाग्यावरच संपतात. त्यासाठी धन्यवाद!
प
प्रभाकर पेठकर
Tue, 08/23/2016 - 23:28
नवीन
पायातल्यापायात घुटमळणार्या प्रतिसादांमधून एव्हढं मात्र लक्षात आलं आहे की मिपावर अनेक डॉक्टर आहेत (जे मला आधी माहित नव्हते) आणि संस्कृतीरक्षकही बरेच वाढले आहेत. (पूर्वी मी एकटाच होतो, निदान माझी तशीच संभावना केली जायची). जग बदलो नाहीतर न बदलो, मिपा मात्र खुपच बदलले आहे.
डॉ. खरे ह्यांच्यावर होणारे व्यावसायीक नितिमत्ता न पाळण्याचे आरोप त्यांना किती मानसिक क्लेश देऊन गेले असतील ह्याची कल्पना करवत नाही. खरंच डॉ. खरेंना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे नैतिकतेला धरून आहे का? सुलभा देशपांडेंचे 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक आठवलं.
वैद्यकिय क्षेत्रातील आजची अनैतिकता अनेक मार्गांनी आपण पाहात/अनुभवत असतोच. वैद्यकिय क्षेत्रच का? पोलीस खाते, बांधकाम व्यावसाय क्षेत्र, राजकिय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र वगैरे वगैरे क्षेत्रात जो पराकोटीचा गैरव्यवहार, अनैतिकता रोज रोज आपण पाहात असतो त्या समोर दोन डॉक्टरांमधील संवाद आणि कथेतील पात्रांची ओळख दडवून डॉक्टर खरे ह्यांनी जी त्यांच्या मित्राची भावनिक, नैतिक आणि व्यावसायिक समस्या आपल्या समोर मांडली त्यात मुळात मला तरी कांही अनैतिक दिसले, जाणवले नाही. त्या समस्येवर उद्बोधक चर्चा होणे अपेक्षित होते पण चर्चा भरकटतच गेली.
डॉक्टर हा जरी व्यावसायिक नितिमत्तेच्या बंधनाने बांधलेला असतो तरी तो ही एक हाडामासाचा, मन असलेला, भावना असलेला माणूसच असतो हे विसरून चालणार नाही. कधी कधी त्याच्या मनाची कोंडी झाली तर त्याने कोणा जवळ मन मोकळे करावे? दुसर्या सम व्यवसायी आणि त्या केसशी संबंधीत डॉक्टर जवळ आपली व्यथा, मनाचा गोंधळ आणि आपण अपराधी आहोत का? हा यक्ष प्रश्न सोडवायचा झाल्यास त्याने आपल्या डॉक्टर मित्राजवळ आपली समस्या मांडली तर त्यात मला तरी गैर वाटत नाही. नाहीतर त्या डॉक्टरांना ती (खरी किंवा आभासी) अपराधी भावना जन्मभर जाळत राहिली असती. म्हणजे प्रत्यक्ष चितेवर जळण्याआधी ते 'चिंतेने' (आपण अपराधी आहोत ह्या) जळत राहिले असते. त्यांना समुपदेशनाची गरज होती. ती डॉक्टर खरे ह्यांनी पुरी केली आणि त्यांची अपराधी भावनेतून सुटका केली. एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी केलेला अपराध कायद्यानेही क्षम्य आहे. मग आपण का डॉक्टर खरेंना टोचत आहोत? मला नाही पटत. असेल अनैतिक पण त्या मागे स्वार्थ नाहीए.
प्रश्न उरतो की हे सर्व त्यांनी मिपावर का टाकले? तर सर्व मिपासदस्यांना विचार खाद्य मिळावे आणि मंथनातून कांही विधायक विचार सर्वांसमोर यावेत. प्रत्येक व्यावसायिक आपापल्या व्यवसायाच्या अनुभवांचे कथन करीत असतो. मीही माझ्या व्यवसायातील कांही अपप्रवृत्ती बद्दल मागे इथेच लिहीले होते. तर मग वैद्यकिय व्यवसायालाच का वगळावे?
परवाच 'रुस्तम' चित्रपट पाहिला. अर्थात तो चित्रपट आहे हे मलाही मान्य आहे पण त्यातही भारतिय नौदलाच्या गैरव्यवहाराचे वास्तव उघड केले आहे. कांही चित्रपटातून आर्मीचेही गैर व्यवहार समोर येत असतात. जरी ती चित्रपटांची कथानकं असली तरी अगदीच काल्पनिक नसतात ती बहुतांशी सत्यघटनेवर आधारीत असतात. हे सर्वही अनैतिकच मानले पाहिजे. राष्ट्रीय गुपिते जगासमोर उघड केली जातात. त्या मानाने आपल्या ह्या कथेतील अनैतिकता (असलीच तर) विषेश दखलपात्र नाहीए असे मला वाटते. म्हणजे आजूबाजूला चोर्या, खुन, दरोडे पडत असताना पोलीसांनी डबलसीट सायकलस्वाराला दंड ठोठविण्याइतपत हास्यास्पद आहे, असे मला वाटते.
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/24/2016 - 05:29
नवीन
400!
म
मुक्त विहारि
Wed, 08/24/2016 - 06:06
नवीन
४०१
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 08/24/2016 - 08:28
नवीन
एक साधी गोष्ट सांगितली तर डॉक्टर खरेंना निष्कारण झोडपले जात आहे असे वाटते.
बाकी,
माझे लग्न होण्याआधी जर हा धागा आला असता तर मी त्या मुलीचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला असता.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9